पारंपरिक रित्या भट्टी लावून पिकवली जाते केळी

                संपादक आशिष मुगटकर

केळीची भट्टी :- मुदखेड शहरातील रहिवाशी सय्यद उस्मान सय्यद नवाज मागील काही वर्षापासून पांरपारिक रित्या केळीची भट्टी लावून केळी पिकवतात.


 मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद           

आजच्या आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात फळांना रासायनिक  क्रियेद्वारे ताबडतोब पिकवूण बाजार पेठेत पिकलेल्या फळांना उपलब्ध करुण गुंतविलेले पैसे कमावण्याच्या उद्देशाने लोकांची मानसिकता झालेली दिसत आहे परंतु मुदखेड शहरातील मदिना नगर येथील रहिवाशी सय्यद उस्मान सय्यद नवाज मागील काही वर्षापासून पांरपारिक रित्या केळीची भट्टी लावून नंतर निसर्गाच्या हवेद्वारे चार ते पाच दिवस उघडं ठेऊण पिकवण्याचा त्यांची  वेगळी अशी प्रसिद्धी आहे .                                    

 या संदर्भात पांरपारिक केळीची भट्टी लावण्याचा त्यांचा जे मानस आहे ते सांगतात की मी ही केळी पिकवण्याची काही किमया नसून निसर्ग केवळ आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचा आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी विज्ञानाने दिलेले महत्व पटवून दिले.

 प्रत्येक क्षेत्रात फळांना रासायनिक क्रियेद्वारे ताबडतोब पिकवूण बाजार पेठेत पिकलेल्या फळांना उपलब्ध करुण गुंतविलेले पैसे कमावण्याचा जे उद्देश आहे त्यामुळे मानवजातीवर होणारे परिणाम पाहता नैसर्गिक आणि पांरपारिक रित्या पिकवलेले फळ मनुष्याच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. 

सय्यद उस्मान यांंनी सांगितलेले  की जर केळीची भट्टी सोमवारी लावून मंगळवारी त्या भट्टीला उघडून चार ते पाच दिवस निसर्गाच्या  हवेद्वारे हवा देऊन रविवारी बाजार पेठेत विकीसाठी उपलब्ध करता या भट्टी साठी किमान ७०० ते ८०० रुपये खर्च लागते या भट्टी मध्ये २५ ते ५० डझन केळी ठेवण्यात येते आणी संपूर्ण केळीची विक्री झाल्यास एक हजार रुपयाच्या जवळपास नफा मिळतो आणी सध्या लॉक डाऊन असल्याने मागणी आणी विक्री कमी असल्याची खंत सुद्धा व्यक्त केली या केळीला मागणी जास्त नसून आरोग्याच्या दृष्टिकोणातून उपयुक्त असल्याचे मनोगत सांगितले.

नरेंद्र मोदी विचारमंचच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी भायेश्वर मुंगल यांची निवड

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड /तालुका प्रतिनिधी

       मुदखेड तालुक्यातील  ईजळी( खा.) येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते भायेश्वर पाटील मुंगल यांची मुदखेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.

   विश्वगुरु तथा भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देश देशातील तळागळातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविन्यासाठी एक सामाजिक संघटन असावे या उद्देशाने प्रेरित होऊन तसेच श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे विचार,कार्य आणि उद्देशाने प्रेरित होऊन काम करनार्या इतर संघटनांशी समन्वय साधून श्री.नरेंद्र मोदी विचार मंच देशभर आपले संघटन मजबूत करीत आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविभाई चाणक्य यांच्या सहमतीने,श्री.नरेंद्र मोदी विचार मंचचे नांदेड (ग्रा.)जिल्हाध्यक्ष महेश रमेशराव देशपांडे यांनी एका लेखी पत्राद्वारे भायेश्वर पाटील मुंगल यांना मुदखेड  तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याचे कळविले आहे.

   माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास देशाचे यशस्वी पंतप्रधान तथा विश्वगुरु श्री.नरेंद्र भाई मोदी यांचे नावाने चालणारी सामाजिक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्षानी दाखविला त्या विश्वासास पात्र राहून मोदीजींचे विचार,कार्य आणि उद्देश तालुक्यातील प्रत्येक गावा गावात पोहचविन्याचा निर्धार नुतन ता.अध्यक्ष मुंगल यांनी व्यक्त केला.

या निवडी चे भाजपाचे ज्येष्ठ नेते मुदखेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी,भाजपा भोकर विधानसभा मतदासंघाचे नेते प्रवीण गायकवाड,भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष हानुमंत देशमुख,भाजपा तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड,माजी सभापती भगवान पानेवार,संचालक तथा भाजपा ता.उपाध्यक्ष बालाजी पाटील खटिंग,बालाजी तेलंग,माजी संचालक गुलाब सुर्यवंशी,निळकंठ हामंद,अल्पसंख्यांक मोर्चा भाजपचे शेख रफिक,मुदखेड शहर भाजपाचे प्रा.दिनेश शेटे,संजय सोनटक्के,सतिश पाटिल मुंगल,सुभाष यरपलवाड,प्रभाकर पांचाळ,म.कबीर गुलाम दस्तगिर,शे.सद्दाम,तुळशीराम चुकेवाड,सरपंच आनंद हेमके,केशव पाटिल ढगे,माधव वाघमारे,भुजंग पाटील वडजे अदिनी अभिनंदन केले आहे.

केळी विमा कंपनीने बारड मंडळ वगळल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष

 केळी विमा भरूनही नुसकान भरपाई मिळत नसल्याने याला जबाबदार कोण? 

बारड / प्रतिनिधी

केळी विमा कंपनीने बारड मंडळाला विमा रक्कम देण्यातून वगळल्याने उन्हाळ्यातील तीव्र तापमानाने गेलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून उन्हाच्या तापमानाने केळी बागाचे मोठे नुसकान झाले असल्याने केळी विमा भरूनही नुसकान भरपाई मिळत नसल्याने याला जबाबदार कोण असा सवाल शेतकरी केळी उत्पादक वर्गातून केला जात आहे. हा सरास बारड मंडळावर विमा कंपनीने केलेला अन्याय असल्याचे यावेळी शेतकरी वर्गातून भावन व्यक्त करत आहेत.

बारड परिसर हा केळी पिकासाठी अनुकूल असल्याने या भागातील सर्व शेतकरी आपल्या शेतावर केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतो परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि केळी बागांना लाखो रुपये खर्च करून कधी ठेंगा हातात मिळत असल्याने शेतकरी अडचणीत असतो याला सपोर्ट म्हणून या भागातील जागृत शेतकरी विमा कंपनीकडून केळी विमा नेहमी काढण्यात सजग असतो २०१९-२० मध्ये उन्हाच्या तापमानाने या भागातील शेतकऱ्यांच्या केळी बागाचे अतोनात नुकसान झाल्याच्या घटना याठिकाणी घडल्या आहेत परंतु हवामान मापक यंत्राच्या आधारावर विम्याची केल्म मंजूर करण्यात येतात या भागातील शेतकऱ्यांनी ज्या वेळेस केळी बागा करपल्या केळी घड उन्हाच्या तापमाने गळती होवून बागाचे नुसकान होत होते अशा वेळेस विमा कंपनीला सूचनाही केल्या होत्या त्यांना मेल द्वारे संदेश पाठवला होता परंतु याकडे दुर्लक्ष झाले असावे

 २०१९ -२० मध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी विमा काढला होता परंतु ज्या भागात केळीचे क्षेत्र कमी आहे अशा ठिकाणी विमा कंपनीने क्लेम मंजूर केला असून कंपनीचा घाट  असल्याचा आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे. मुदखेड मंडळ मुगट मंडळाला विमा लागू करण्यात आला आहे परंतु बारड मंडळाला यातून वगळल्याने नुस्कान झालेल्या केळी उत्पादकांचे काय?याबाबत शेतकऱ्यांन कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विमा कंपनीने या भागाचा त्यावेळेस सर्वे करून शेतकऱ्यांना विमा देण्याची गरज होती.तसे झाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

याभागात विम्याचा क्लेम शेतकरी केळी बागाच्या संरक्षणात मोठ्या प्रमाणात भरला जातो. त्यांना विमा पासून कंपनीने वंचित केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे तसेच हवामान मापक यंत्र ही नादुरुस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत आहे मुदखेड तालुक्यातील मुदखेड मंडळ, मुगट मंडळाला विमा मिळत आणि बारड मंडळ वगळण्यात येते याला जबाबदार कोण असा सूरही या भागातील शेतकरी वर्गातून निघत आहे. याबाबत या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कंपनीच्या विरोधात व प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर रोष व्यक्त करण्यात येत आहे

मागील काही दिवसापूर्वी पण विमा कंपनीने याच भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला होता कंपनीने चक्क एका बँकेला विम्याची रक्कम पुरेपूर दिली तर दुसर्‍या बँकेतील शेतकरी खातेदारांना रक्कम कमी दीली होती परंतु सतत जागरूक शेतकऱ्यांनी पाठपुरावा करत दैनिक लोकमतच्या माध्यमातून कंपनीला जागे करून 65 लाख रुपयाचा क्लेम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून घेतला होता यावेळी निलेश देशमुख,शेतकरी मित्र मंडळ व जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी यासाठी परिश्रम घेत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवून दिली होती

परंतु यावेळी मात्र विमा कंपनीने बारड मंडळ वगळून केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी नुकसानीचा क्लेम मिळाला नसल्याने केळी बागाच्या नुसकान भरपाई साठी जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे विमा कंपनीच्या कामावर संकोच निर्माण केला जात असून विमा कंपनी च्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

मुदखेड येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

 तालुक्यातिल बुथ परत्वे भाजपा कार्यकर्त्यानी केले अभिवादन .                         संपादक आशिष मुगटकर
जयंती :- मुदखेड  येथील भाजपा नेते प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी करण्यात आली.

  मुदखेड /शहर प्रतिनिधि / अतीक अहमद  

     दि.२५.  जनसंघाचे संस्थापकिय अध्यक्ष पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०५ व्या जयंती निमित्त सबंध देशभर भाजपा कार्यकर्त्यानी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर आपापल्या घरी पंडितजीच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन आपापल्या घरी भाजपाच्या कमळ असलेला ध्वज उभारून १०५ वी जयंती साजरी केली.त्याचाच एक भाग म्हणून मुदखेड येथील भाजपा नेते प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी पंडीतजीची जयंती साजरी करण्यात आली.    

   मुदखेड तालुक्यातील विविध बुथवर सर्व बुथप्रमुखानी केले. यात ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड यानी त्यांच्या वासरी या गावी अभिवादन केले,तर पिंपळकौठा येथे गुलाब सुर्यवंशी यानी आपल्या निवासस्थानी जयंती साजरी केली.

     प्रवीण गायकवाड यांच्या निवासस्थानी ,कृ.ऊ.बा.सचे माजी सभापती भगवानराव पानेवार,संचालक तथा भाजपा ता.उपाध्यक्ष बालाजिराव खटिंग,संचालक सुरेश शेटे,माजी संचालक तथा भाजपा ता.सचिव  निळकंठ हामंद,तुळशीराम चुकवाड आदी मान्यवरानी उपस्थित राहून आपला सक्रीय सहभाग नोंदऊन अभिवादन केले आहे.

मुगट येथे सौरपथ दिवे बनले शोभेचे खांब..

 ग्रामपंचायतचे सौर पथदिव्याकडे दुर्लक्ष.

शासकिय मालमत्तेचे खुलेआम पणे चोरी.



बॅटरी चोरी  :- मुगट येथील ग्रामपंचायतीने गावातील सौर पथदिवे बसवली होती.पण आज केवळ सौरपथ दिव्याची प्लेट व खांबच अभा आहे. बॅटरी व बल्प चोरीस गेली आहेत.

मुगट / प्रतिनिधी

           मुदखेड तालुक्यातील मुगट ग्रामपंचायत कडून चार वर्षांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर, धार्मिक मंदिरा जवळ,चौरस्त्याच्या ठिकाणी हे सौरपथ दिवे बसवन्यात आले होते पण आज केवळ त्या अनेक ठिकाणी सौरपथदिव्याचे नुसते खांबच त्या ठिकाणी उभे पाहायला मिळत आहेत.

           मुगट गावात सण २०१३/ २०१४ या कालावधीमध्ये गावातील मुख्य रस्त्यावर, धार्मिक स्थळा जवळ सौर पथदिवे मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आली होती. या सौरपथ दिव्यातील एका बॅटरीची किंमत जवळपास सहा ते सात हजार आहे. हे सौर पथदिवे  गावात बसवल्यामुळे पावसाळ्यात रात्री-बेरात्री पाण्यामुळे विज जात होती तरीही गावात तील मुख्य रस्त्यावर, धार्मिक स्थळ जवळ या सौरपथ दिव्यांमुळे रात्रीला सतत प्रकाश असायचा. गावात हे सौर पथदिवे  दोन ते तीन वर्ष चांगल्या प्रमाणात चालली नंतर ग्रामपंचायतीने गावातील विद्युत खांबावर एलईडी लाईट बसवण्यात आले त्यामुळे या सौर पथदिव्याकडे  ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले. तरीसुद्धा काही सौर पथदिवे चालू होते तर काही  बंद पडल्यात जमा होतो.  

       याचा फायदा गावातील भुरटे चोर घेऊ लागले व दररोज कुठली  बॅटरी चोरी तर कुठला बल्प चोरी चे प्रकार सुरू झाले. हळूहळू या सौरपथ दिव्यांच्या जवळपास सर्वच बॅटऱ्या ह्या चोरीला गेल्या तर अनेक खांबाचे लाईट सुद्धा चोरीला गेली पण या चोरीच्या घटना ग्रामपंचायतला माहित असून सुद्धा त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. 

    पावसाळ्यात या सौरपथ दिव्या मुळे गावात रात्रीला चांगलाच प्रकाश असायचा पण आज हा सौर पथदिव्याचा प्रकाश आज नाहीसा झाला आहे. पावसामुळे रात्री-बेरात्री वीज बंद केली तरीही गावात या सौरपथामुळे  वीज ही कायम असायची परंतु आज ही सौर पथदिवे दिवे नसल्यामुळे याच रात्रीला वीज गेल्यावर संपूर्ण गाव अंधारात कायम राहत आहे. याचाच फायदा घेऊन गावात चोरीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. गावात दोन महिन्यातच दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत.


      गावात या सौर पथदिव्यामुळे  ग्रामपंचायतीच्या विजेच्या बिलाची चांगलीच बचत होत होती व रात्रीला विशेष करून वादळी वाऱ्यासह पावसाने अंधारात सुद्धा वीज गेली तरी गावात प्रकाश राहत होता.

        आज  या प्रत्येक ठिकाणी नुसते खांब उभे आहेत. या सौर पथदिव्यांच्या बॅटरीची चोरी, बल्प चोरी व चक्क काही ठिकाणी तर या खांबाची सुद्धा चोरी झालेली आपल्याला दिसून येईल गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतचे नुकसान होत असून सुद्धा ग्रामपंचायत मात्र  या चोरांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरले असून याचाच फायदा हे चोर उचलत आहेत व गावात चोरीची प्रमाणसुद्धा वाढले आहे हे नाकारता येणार नाही‌ त्यामुळे पुन्हा एकदा गावातील हे सौर पथदिवे सुरू करण्याची मागणी ही गावातील सर्वसामान्य नागरिकाकडून होताना दिसून येत आहे.

देवापूर येथे श्री शिवशंकर शेतकरी गटाचा वर्धापन दिन साजरा

 संपादक आशिष मुगटकर

वर्धापनदिन :- मुदखेड तालुक्यातील देवापूर येथे श्री शिवशंकर शेतकरी गटाचा प्रथम वर्धापन दिन कृषीविषयक विविध कार्यक्रम घेऊन साजरा.

मुदखेड / तालुका प्रतिनिधी

    मुदखेड तालुक्यातील देवापूर येथे श्री शिवशंकर शेतकरी गटाचा प्रथम वर्धापन दिन कृषीविषयक विविध कार्यक्रम घेऊन तसेच शासनाने कोविड-१९ साठी निर्देशित केलेल्या नियमानुसार साजरा करण्यात आला.

   गावातील जेष्ठ नागरिक चंपतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटाचे सचिव केशव जाधव यांनी केले.

   यावेळी मं. कृ. अ. वाघमारे साहेब यांनी गट क्षमता बांधणी तर प्रगतिशील शेतकरी विठ्ठल लष्करे यांनी पूर्वहंगामी ऊस लागवड याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी सहाय्यक तथा पेस्ट स्काऊट राम कपाटे यांनी कृषी तंत्रज्ञान वापरताना येणाऱ्या अडचणी, सोयाबीन बीजोत्पादन, कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी, कापसातील बोंडे सड तसेच केळीवरील सी एम व्ही रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

     कोरोना वर यशस्वीरीत्या मात केल्याबद्दल चंपतराव जाधव यांचा तर कृषी विषयी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राम कपाटे यांचा गावकऱ्यां तर्फे सत्कार करण्यात आला. पर्यावरण प्रेमी कृषी मित्र विठ्ठल लष्करे यांच्याकडून सर्व शेतकऱ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. त्यानंतर कृषी वार्ता फलकाचे अनावरण करण्यात आले. 

     कार्यक्रमासाठी तलाठी होंडे ,पो. पा. साहेबराव जाधव, चेअरमन आनंदराव जाधव ,पंडितराव जाधव तसेच गावातील शेतकरी आणि गटाचे सदस्य उपस्थित होते. गटाचे अध्यक्ष कमलाकर जाधव यांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनला फुटले कोंब : तात्काळ पंचनामे करा व शेतकऱ्यांना मदत द्या - भगवानराव देशमुख

 संपादक आशिष मुगटकर
निवेदन :- सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तळणी मंडळामध्ये झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.यासाठी हदगाव तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देताना भगवानराव देशमुख व सोबत शेतकरी.

अतिवृष्टीमुळे शेतात बनले पाण्याचे तळे.
 सोयाबीन शेंगांना फुटले कोंब.

हदगाव/ तालुका प्रतिनिधी

हदगाव तालुक्यातील तळणी मंडळांमध्ये सततच्या अतिवृष्टी मुळे या खरीप हंगामातील उडीद, मूग व सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे शेतात पाण्याचे तळे साचले असून उभ्या सोयाबीन पीकालाच कोंब फुटल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

तळणी परिसरात अतिवृष्टीमुळे व पैनगंगा नदी व ईसापुर धरण च्या विसर्गामुळे अनेक नदी नाली तुडुंब भरले आहेत. त्यामुळे सततच्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला आता तळ्याचे रुप आले आहे. त्यामुळेच शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षीचे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातचे निघून गेल्यात जमा आहे. 

शेतात पाणी :- सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे तळणी मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असे पाणी साचले आहे.त्याच पाण्यातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटलेले पाहताना शेतकरी.
या वर्षीच्या खरीप हंगामाची सुरुवात ही बळीराजाला संकट घेऊनच आली. शेतकऱ्यांना बोगस बियाणामुळे अनेकांची सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा सोयाबीनची पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी जवळचे पैसे संपल्यावर उसनवार पैसे घेऊन ही पेरणी केली आहे. पण आज सोयाबीन काढणीच्या वेळी हातचे आलेली हे पीक पाण्याने गेल्यामुळे या हंगामात बळीराजा चांगलाच आर्थिक कोंडीत सापडला आहे. 

या परिसरात दरवर्षी सोयाबीनचा उतारा  एकरी नऊ ते दहा क्विंटल येत असतो पण यावर्षी शेतकऱ्यांला एकरी एक, दोन क्विंटल तरी  उतारा निघेल की नाही यात तीळ मात्र शंका नाकारता येणार नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून आर्थिक संकटात सापडला आहे.

 शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भगवानराव देशमुख(.अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना मराठवाडा विभाग प्रमुख किसान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ) व त्याच्या शिष्टमंडळाने कृषी अधिकारी हदगाव यांच्याकडे केली आहेत. यावेळी शंकरराव तावडे, बबनराव जारडे, प्रशांत तावडे उपस्थित होते

डोणगाव येथील दलित वस्तीतील पाणी पुरवठा बंद.

दलित वस्तीतील पाणी पुरवठा चालू करण्याची मागणी        

 मुदखेड /शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

     मुदखेड तालुक्यातील डोणगाव येथील दलित वस्ती वार्ड क्रमांक एक मधील गेल्या पाच महिन्यापासून बौद्ध व मातंग वस्तीतील सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्याने येथील पाणीपुरवठा सुरळीत पणे चालू करून देण्याची मागणी गटविकास अधिकारी अनंत कदम यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे

एप्रिल महिन्यापासून ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा पाईप लाईन फुटल्या कारणे बौद्ध व मातंग वस्तीमध्ये पाणी पुरवठा बंद असल्याने या प्रभागातील नागरिकांची पाण्याअभावी हाल-अपेष्टा होत असून वस्तीतील नागरिक पाण्याअभावी परेशान होण्याची वेळ आली आहे या प्रभागातील पाणी पुरवठा बंद संदर्भात लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्या कडे अनेक वेळा सांगुन चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला असल्याचे निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.अद्यापही या प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने ग्रामस्थांनी या प्रभागातील पाणी पुरवठा  सुरळीत करून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याचे दालन गाठून निवेदन दिले आहे.

         या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे निवेदनावर पुडंलीक सुर्यवंशी, पदमीनबाई सूर्यवंशी शोभाबाई हनुमंते, यशोदाबाई वाघमारे  शांताबाई वाघमारे  सत्वशीला धोतरे, सुमनबाई धोत्रे शोभा वाघमारे राहुल वाघमारे दत्त हनुमंते शशिकांत वाघमारे कमलाबाई वाघमारे हरिचंद्र धोतरे,सतिष पवार,तुकाराम कांबळे, संभाजी सोनटक्के आदीसह गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत

डॉ.श्रुती लोणीकर यांची एम.एस.नेत्रविज्ञानात उत्तुंग भरारी

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद  

                      मुदखेड शहरातील प्रसिद्ध चिकित्सक तथा येथील ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत लोणीकर यांची सुकन्या डॉ.कु.श्रुती लोणीकर यांनी मुंबई येथील नामांकित जे.जे.मेडिकल कॉलेज व रुग्णालय येथून एम.एस.नेत्रविज्ञानच्या परीक्षेत ६४% गुण घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

      माझ्या शैक्षणिक प्रवासात मला अनेक अढथळे आले, इतरांनाही येत असतात, परंतु त्यावर मात करून यश पत्कारायची जिद्द आपल्यामध्ये असली तर कोणीही प्रगतीपासून आपणास लांबवू शकत नाही असे यानिमित्ताने डॉ.श्रुती लोणीकर म्हणाल्या.

     या उत्तुंग भरारीबद्दल डॉक्टरांची डॉक्टर सुकन्या कु.श्रुती लोणीकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मुदखेड येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट

वादग्रस्त पाण्याच्या टाकीचा प्रश्न अखेर जिल्हाधिकारी साहेब यांनी मिळवला ..!   

संपादक आशिष मुगटकर                           

वादग्रस्त जागेची पाहणी :- मुदखेड येथील  वादग्रस्त ठरलेल्या जलकुंभाच्या जागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झांपले,न.प.मुख्यधिकारी.रामराजे, कापरे,नगराध्यक्ष मुजीब जहागिरदार , लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.

मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

               मुदखेड शहर नगर पालिकेकडून मोंढा भागामध्ये नवीन जलकुंभ उभारण्यात येत असताना त्या कामास कृषी उत्पन्न बाजार समिती ने ब्रेक लावला होता. या मुदखेड नगर परिषद विरूद्ध कृ. उ. बा. समीती संघर्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्यक्ष वादग्रस्त जागेवर जाऊन मिटविला. 

            आता मुदखेड नगर परिषद पाणी पुरवठा विभागासाठी नवीन जलकुंभ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे या  वादग्रस्त जागेवर जवळपास पन्नास वर्ष पूर्व बांधकाम करण्यात आलेली पाण्याची टाकी आहे येथून शहराच्या अनेक भागात मुदखेड नगर परिषद पाणी पुरवठा करते या ठीकाणी नवीन जवळपास चार लक्ष लीटर पाणी क्षमतेचे जलकुंभ उभारण्याचे येत होते या कामाला गुतेदाराने सुरूवात केल्यानंतर कृ. उ. बा. चे सभापती म्हैसाजी भांगे आणि संचालक मंडळाने रोक लावला होता. हा वाद आता जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष मुदखेड दौरा करूण वाद मिटवला. न.प.चे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

               यावेळी उपविभागीय अधिकारी राजेन्द्र कंधारे, तालुका कांग्रेस अध्यक्ष तथा संचालक उद्धव पवार, नगरध्यक्ष मुजीब जहागीरदार, तहसिलदार दिनेश झंपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, कांग्रेस शहर अध्यक्ष तथा गट नेते माधव पाटील कदम, माजी उपाध्यक्ष तथा नगर सेवक करीम खाँ साब, नगर सेवक संजय आऊलवार, लेखापाल रामेश्वर वाघमारे, अनंत कुलकर्णी, पांडुरंग मोरे, नितीन चव्हाण, शेख इनुस, दिलीप पवार, ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सह सचिव संजय कोलते,   मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेख जब्बार , माजी अध्यक्ष तालुका पत्रकार संघ ईश्वर पिन्नलवार,अतीक अहमद, नामदेव राहेरे     आदी उपस्थित होते. 


                     जिल्हाधिकारी इटनकर यांनी तहसील इमारती मध्ये प्रसाधनाची व्यवस्था कुठे आहे विचारल्यानंतर अनेकांनी मौन धारण करुण उत्तर देण्याचे टाळले यावरूण तालुक्याच्या मुख्य कार्यालयात नागरिकांना सोयी सुविधा नसल्याचे दिसले.

मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा .

  शिवसेनेची तहसिलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी .! 

.संपादक आशिष मुगटकर

निवेदन :-  मुदखेड  तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतातील सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून तालुक्यातओला दुष्काळ जाहीर करा. यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी तहसीलदार दीनेश झांपले यांना निवेदन देऊन मागणी केली आहे

     बारड / प्रतिनिधी

        मुदखेड तालुक्यात दिनांक १८ रोजी सकाळी तीन तास ढगफुटी सारख्या पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह इतर पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून तालुक्यातओला दुष्काळ जाहीर करा. यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी तहसीलदार दीनेश झांपले यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

             या परिसरातील शेतकरी हा सततच्या नुकसानीने परेशान झाला असून पेरणी पासूनच बोगस बियाण्यापासून तीनदा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर कसेतरी सोयाबीन हाताला आले होते परंतु अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यासह इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने मुदखेड तालुकातील शेतकऱ्यांच्या शिवारातील  पिकांच्या नुकसानीचा सर्वे करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. हाताला आलेला सोयाबीन हंगाम पाण्यात गेल्याने  शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने याकडे गांभीर्याने घेत तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तत्परतेने मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

        यावेळी निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे, विधानसभा संघटक विश्वंभर पवार  उप्पतालुका प्रमुख गोविंद शिंदे, शहर प्रमुख सचिन पाटील माने, अविनाश झमकडे, सचिन चंद्रे, गुलाबराव देशमुख सुधाकर सूर्यवंशी संचालक सुरेश शेटे साहेबराव चव्हाण बाळू चंद्रे पवन अटकलवाड, संजय गाडे, फालाजी पवार, निवेदनावर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण थेट बांधावर

खरबी शिवारातील ढगफुटी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी .

संपादक आशिष मुगटकर
नुकसानीची पाहणी :-  शेंबोली खरबी शिवारातील अचानक पडलेल्या ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांच्या  पिकांचे आतोनात नुकसान झाले. त्याची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या  नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना सुचना दिल्या.
बारड / प्रतिनिधी

        मुदखेड तालुक्यातील शेंबोली खरबी शिवारातील अचानक पडलेल्या ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांची आतोनात नुकसान झाले असल्याने त्याची दखल घेत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला आहे.

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश पाटील भोसीकर, खरबी सरपंच गंगाधर पाशमवाड,जि.प.सदस्य प्रकाशराव भोसीकर, जिल्हा कृषी अधीक्षक  रविशंकर चलवदे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे तहसीलदार,मंडळ अधिकारी, विमा प्रतिनिधी, कृषी सहायक, ग्रामसेवक,आदीची  प्रमुख उपस्थितीत होते. 

       पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट बांधावर जाऊन शेंबोली, खरबी येथील शेतकरी नामदेवराव भोसले,संभाजीराव भगत, अशा तीन ,चार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात ढगफुटी सारख्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानीची पाहणी केली.

संवाद :- पालकमंत्री आशोकराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना धीर देत शासनस्तरावरुन जे काही सहकार्य, मदतीसाठी प्रयत्न करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
  नुकसान ग्रस्त  शेतकऱ्यांंशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. तर ढगफुटी झालेल्या परिसरात जाऊन  त्या ठिकाणच्या परिस्थितीचा प्रत्यक्षात आढावा घेतला आहे. पूरपिडीत शेतकऱ्यांचे नुकसान पाहता  संबंधित यंत्रनेस , अधिकारी यांना परिसरातील नुकसानीचा सर्वे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या . खरबी शिवारातील पिकाच्या नुकसानीचा सर्वे तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडून सुरू करण्यात आला असल्याची माहिती यावेळी खरबी सरपंच गंगाधर पाशमवाड यांनी दिली आहे.



स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड येथे अनोखा उपक्रम घेउन ७२ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

 इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनीच्या हस्ते ध्वजारोहन. 

संपादक आशिष मुगटकर

ध्वजारोहण :-  बारावी बोर्ड २०२० परिक्षेत गुणवंत विद्यार्थीनी  कू.ज्योती किशनराव नादरे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोबत शाळेतील शिक्षक  उपस्थित होते.

बारड / प्रतिनिधी  

        मुदखेड तालुक्यातील बारड येथील  स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड  ता मुदखेड संचलीत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय  व स्वा. से. राजाराम बापू माध्यमीक शाळा बारड यांच्या सयुक्त विद्यमाने  एका अनोख्या उपक्रमाने आज ७२  वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेच्या वतीने प्रमूख पाहुणे म्हणून इयत्ता बारावी बोर्ड २०२० परिक्षेत गुणवंत विद्यार्थीनी  कू.ज्योती किशनराव नादरे हिच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहन करण्यात आले व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,

      यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष कू. ज्योती नादरेच्या हस्ते वर्षभर शाळेला सेवा देणारे  शाळेचे तत्पर सेवक सयाजी कानगुले,सौ कमलबाई आठवले,शिवप्रसाद बलदवा आणि शिवराज नरवाडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख  बारडकर ,उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,सचिव रामेश्वर कोरबनवाड, सहसचिव अशोकराव गव्हाणे दिलीपराव दुर्गे,नवनाथराव देशमुख,गौतम आठवले प्राचार्य हेमंत इंगळे,मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार  गावतील पालक व शाळा ,कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.गोवंदे तर आभार चुब्बेवार सर यांनी मांडले.

डोंगरगाव येथे विज पडून म्हैस दगावली .

 डोंगरगाव येथील शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुसकान.

संपादक आशिष मुगटकर

पंचनामा :- मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी भास्कर व्यवहारे यांची म्हैस विज पडून दगावली.या  घटनेचा पंचनामा करताना तलाठी सौ.कल्पना मुंडकर.


बारड / प्रतिनिधी 

          मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यावेळेस कडाडून वीज पडून डोंगरगाव येथील शेतकरी भास्कर आनंदराव व्यवहारे यांच्या गट नंबर१६४ मध्ये असलेल्या म्हैशीवर विज पडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.शेतकऱ्याचे साठ हजाराचे नुसकान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

यावेळी वीज पडून म्हैस दगावल्याची घटनेची  माहिती तलाठी सौ.कल्पना मुंडकर यांना मिळाली असता घटना स्थळी भेट देऊन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला आहे.

 यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांनी म्हैशीची पाहणी करून त्याचा अहवाल विज पडून दगावली असल्याचा  सादर केला आहे.

यावेळी घटनास्थळी श्यामराव व्यवहारे, बाबासाहेब व्यवहारे, सतिष व्यवहारे, अनिल व्यवहारे, कैलास व्यवहारे आदी उपस्थित होते

परम पूज्य वैराग्यमुर्ती दत्ता बापुजी यांच दुःखद निधन

 हदगावचे गुरु छत्र हरपले.

निधन :- परम पूजनीय वैराग्य मृर्तीमंत श्री.दत्ता बापुजी यांचे दुःखद निधन

नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

       नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील महानुभाव पंथा मधील एक खूप मोठा आधार  वैराग्यमूर्तीमंत,परम पूजनीय श्री.दत्ता बापुजी यांचे दुःखद निधनाने आज महानुभाव पंथाला पोरके करून कैवल्य वासी झाले आहेत.

    हदगाव येथील श्री श्री श्री वैराग्यमूर्ती, मायेची सावली, सामान्य जनतेचे कैवारी, जिल्ह्यात सर्वांना आपलेसे वाटणारे, मायेचे छत्र,  आध्यत्मिक गुरू परमपूज्य श्री_दत्ता_बापूजी यांचे काल रात्री ९.२५  वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.त्यामुळे हदगावकरावर दुःख चा डोंगर कोसळला आहे. परिसरात या दुःखद बातमी मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 त्यांचा अंत्यविधी दि १९.०९.२०२० रोजी सायंकाळी ०४ वाजता भदंत टेकडी जवळ असणाऱ्या महानुभाव पंथाच्या खाजगी स्मशानभूमीत होणार आहे..

   आज हदगावकर यांनी एक अनमोल रत्न गमावले आहे. हदगाव कर पोरके झाले.परमपूज्य दत्ता बापुजीने प्रथम दुःख, सुख घेऊन येणाऱ्यांचे सातवन्य करायचे त्यांचे दुःख दूर करायचे आणि बापूने प्रथमतः हादगाव शहरात मंगल कार्य उभारून गोरगरिबांच्या लग्नाकरिता एक मोठी दिशा या माध्यमातून दिली.

 त्यांनी अस्मरणीय महा पंगत हदगाव शहरात केली. आत्ताच काही दिवसापूर्वी भाजी-भाकरीचा कार्यक्रम घेतला असे महान कार्य करणारे ,हदगावकरांचा हिरा ,भुषण परम पूज्य महंत दत्ता बापू आपल्याला सोडून गेले आज आपण पोरके झालो . दत्ता बापुजी यांचे अनेक भक्त मंडळी ही महाराष्ट्र,व आंध्र प्रदेश या ठिकाणी आहेत. त्यांच्या या निधनाने त्यांच्या भक्ता वरिल गुरू चे छत्र हरपले आहे.

मुगट येथे चोरीचे सत्र सुरच.

 एकाच रात्री चार ठिकाणी चोरी.

  गावकऱ्यांत भितीचे वातावरण.

मुगट / प्रतिनीधी

मुगट येथे दि.१७ रोजी रात्री ला २च्या सुमारास चोरट्यांनी गावातील चार वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करून नगद रोख रक्कम लंपास केली आहे.

दि.१७ रोजी रात्री १वाजल्या पासून पाऊस व वीजेच्या गडगडाट चालूच  होता.त्याच वेळेस रात्री गावातील सर्व लाईट बंद झाली.याच अंधाराचा व पावसाचा फायदा घेऊन चोरट्यांनी  गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एस बी आय बँक शेजारी असलेल्या मेडिकल फोडून त्यातील  चोरट्यांनी चोरी करून नगद ५५रोख रक्कम लंपास केली असे मेडिकल चालक यांनी सांगितले. 

 अंगणवाडी सेविका यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.याच घरात पुर्वीसुध्दा चोरी करण्यांत आली होती परंतु हाती केवळ कागदाची पिशवी घेऊन चोर पसार झाले होते. गावाच्या जवळ ती पिशवी व कागदपत्रे फेकून दिली. घरातील कपाट काडुन सामान बाहेर फेकुन दिले.मात्र त्याच्या हाती काही लागले नाही.शेजारी असलेल्या दुकानदारांचे सुद्धा बंद घर सुध्दा दुसऱ्यादा फोडले.या घरात कुणी राहत नसल्याने हाती काहीच लागले नाही.

 शेवटी गावात असलेल्या आखाड्यात झोपलेल्या व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला पैसे ठेवत असलेल्या ठिकाणाहून चांगली च रक्कम त्यांच्या हाती लागली. रोख रक्कम लंपास करून चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

यापुर्वीही मागणी दोन महिन्यापुर्वी चोरट्यांनी अशाच प्रकारे गावात चोरी केली होती.ही गावातील चोरीची ही दुसरी घटना आहे.त्यामुळे गावातील लोकांच्या मनात चोरांची भिंती निर्माण झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलिस जमादार आलेवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सोबत गावातील पोलिस पाटील भगवान हाटकर हे होते.

बारड मंडळात अतिवृष्टी अचानक पडलेल्या धो-धो पावसाने परिसरातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  शासनस्तरावरून नुकसानीचे पंचनामे करून योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी !

संपादक आशिष मुगटकर

शेतात पाणी :- बारड जवळील शेबोली या गावातील शेतात  मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.

बारड / प्रतिनिधी

        बारड मंडळात अचानक पडलेल्या पावसाने  परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अचानक बरसलेल्या अतिवृष्टी पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनस्तरावरून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

नुकसान :-  बारड येथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे.

अचानक पडलेल्या पावसाने परिसरातील नदी नाले तुडुंब पाण्याने भरून वाहत असल्याने चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे तर बारड येथील शंकर नगर पादंन वसाहत, भिमनगर ,इंदिरानगर या परिसरातील घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने अनेकांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करण्याची वेळ आली असून काहीजणांचा संसार उपयोगी पसारा पण वाहून गेला असल्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत परंतु तहसील प्रशासनाला मात्र या अचानक पडलेल्या पावसाची भनक नसल्याने याबाबत तहसील प्रशासनाकडे पावसाची नोंद नसल्याने बारड परिसरात अतिवृष्टी पाऊस झालेल्या घटनेची मात्र त्यांना  खबर नसल्याने नागरिकांकडून प्रशासनात हलगर्जी व्यवस्थापना बाबत  रोष व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.

भिंत पडली :- बारड येथील अचानक झालेल्या पावसाच्या पाण्याने घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर घरात पाणी घुसून काही जणांची संसारोपयोगी साहित्य पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने सध्या स्थितीत या भागातील रहिवाशी परेशान झाला आहे.

 

शहरात मुसळधार पावसामुळे नांदेड व इतर गावांना जोडणाऱ्या सीता नदीत पूरसदृष्य परिस्थिती

 मुदखेड ते नांदेड वाहतूक काही काळासाठी ठप्प . 

संपादक आशिष मुगटकर
  पाणी रस्त्यावर :- मुदखेड ते नांदेड या मुख्य रस्त्यावर सीता नदीचे पाणी आल्यामुळे वाहतूक व्यवस्था काही काळासाठी ढासळली होती

मुदखेड/शहर प्रतिनिधी /अतीक अहेमद

      मुदखेड तहसील व शहरात काल रात्री ०४:०० ते ०५:००  दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे शहराच्या उत्तर व दक्षिण भागामधून वाहणारी सीता नदीचा प्रवाह जास्त वाढल्याने मार्गावरील सामान्य वाहतूक विस्कळीत झाली. पर्यटकांना पाण्याचा प्रवाह कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली.

          १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर दरम्यान हवामान खात्याने मराठवाडा विभागात मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते पण १६ सप्टेंबरनंतरही १८ सप्टेंबरच्या रात्रीप्रमाणे संपूर्ण पावसाळ्यात इतका मुसळधार पाऊस झाला नव्हता परंतु काल रात्री मुगट विभागात ११ मिमी, मुदखेड विभागात ५५ मिमी, पर्यजन्यमाण विभाग सहाय आशाताई मेटकर यांनी ५५ मिमी फोनवर माहिती दिली आणि ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस अतिवृष्टी चा मानला जाऊ शकतो असे सांगितले. दरम्यान, शहरातील सीता नदीमुळे झालेल्या पूरात शहरातून नांदेड, मुगट, ईजळी, बारड, निवाघासह इतर ग्रामीण भागात जाणाऱ्या  लोकांना थांबावे लागले.

पुराचे पाणी रस्त्यावर :- मुदखेड ते बारड या रस्त्यावर सीता नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून  रस्ता काढताना दुचाकी स्वार.

         कोरोना महामारीच्या साथीमुळे रेल्वे मार्ग बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना नांदेड शहर व इतर ठिकाणी जाण्यासाठी केवळ पृष्ठभागाच्या वाहतुकीवर अवलंबून राहावे लागले, सीतानदीत पाण्या पातळी वाढल्यामुळे शहरातील अहिल्याबाई चौक पर्यंत नागरिकांसह वाहणांची गर्दी होती कोणत्याही अनुचित घटनेची माहिती नाही.               स्थानीक पोलिसांचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बी.डी. ठाकूर, पोलिस कर्मचारी बोंनिवाड, आवळे इत्यादींनी नांदेड व इतर ठिकाणी येण्यासाठी, जाण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवत नागारिकांना पाण्याच्या प्रवाहात न जाता प्रतिक्षा करत पाणी कमी होईपर्यंत थांबण्याचे आवाहन केले. दरम्यान दुपारी ठीक ०१:३० वाजता नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नंतर वाहतूक सुरुळीत झाल्याची माहिती मिळाली.

मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्सहात साजरा

  तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.

संपादक आशिष मुगटकर

ध्वजारोहन :- मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त ध्वजारोहन करताना तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार व उपस्थित मान्यवर मंडळी.

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी 

           मुदखेड येथील  तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात मराठवाडा मुक्ती दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सुद्धा प्रतिमा पुजन व पुष्पहार घालण्यात आला.

तालुका अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हैसाजी भांगे, उपसभापती तेजाबराव मुंगल, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी सरचिटणीस रामराव खांडरे डोणगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप गाढे, बालाजीराव खटिंग, सुरेश शेटे, पद्माकर मोटरवार, हिरामण राठोड, यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुदखेड तालुक्यात वीज पडल्यामुळे म्हैस दगावली.

  •  मुदखेड तालुक्यातील ईजळी घटना. 
  • म्हैस जागीच ठार
  • संपादक आशिष मुगटकर

म्हैस दगावली :- मुदखेड तालुक्यातील ईजळी (वरची) येथे वीज पडल्यामुळे म्हैस दगावली.त्यावेळी घटनास्थळी गावातील मंडळी पाहन्यासाठी जमली होती.

मुदखेड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील ईजळी (वरची) या गावात दि.१५ रोजी. सकाळी१०:३०सुमारास वीजेच्या गडगडाट सह पाऊस सुरू झाला व गावच्या शेजारच्या दत्तमंदिर परिसरातील शिवारात देवराव कामाजी जाधव यांची  म्हैस बांधलेली होती.  अचानक मोठा आवाज करीत वीज म्हैसी वर पडून म्हैस जागीच ठार झाली .

ही घटना  गावातील नागरिक, शेतकरी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तलाठी संदिप केंद्रे, पशुवैद्यकीय अधिकारी बि.बि. बुछलवार, यांनी पंचनामा करुन मुदखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत म्हैशीचे शवविच्छेदन करण्यात आले.

 यावेळी घटनास्थळी भुजंग मारुती मुंगल, परीक्षित दत्तरम मुंगल,भिमराव श्रावन हाटकर सरपंच, अशोक दत्‍तराम मुंगल, वामन लक्ष्मण मुंगल, मुरलीधर देवुबुवा ढगे, चांदु देवराव जाधव व्‍यंकटी देवराव जाधव यासह गावातील अन्य पंच नागरिक उपस्थित होते.

बारडच्या बेपत्ता महिलेचा शोध लागेना


बारड /प्रतिनिधी 

       मुदखेड तालुक्यातील बारड येथिल कोंडाबाई वामनराव बागडे शेतातील कामावरुन घराकडे परत आली नसल्याने बेपत्ता महिलेचा शोध लागत नसुन नातेवाईक  अस्वस्थ झाले आहेत. 

       कोंडाबाई वामनराव वागडे वय (६५) ता : ९ ( बुधवार) दररोजच्या प्रमाणे शेतात काम करण्यासाठी घरुन गेल्या होत्या यानंतर घराकडे पुन्हा परतल्या नसल्याने कुटुंबांने गावातील परीसरात शोध घेतला जवळील सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु शोध काही लागला नाही यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेवून कोंडाबाई बागडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

      बागडे परिवाराने सार्वजनिक ठिकाणी शोध घेतला परंतु कुठेही ठावठिकाणा लागला नाही 

          कोंडाबाई बागडे यांची उंची पाच फुट दोन इंच वर्ण काळा अंगावर हिरव्या  रंगाचे चिट्याचे लुगडे नेसलेली आहे बोली भाषा मराठी असुन तेलगू भाषेचे ज्ञान अवगत आहे.

  याबाबत सदर सदरिल महीला कुणाला आढल्यास किंवा दीसल्यास याबाबत बारड ठाण्यात संपर्क साधनांचा आवहान यावेळी बारड ठाण्याचे सह्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी केले आहे .

मो नं ९३०९७४०७२३ , ९९२२३७३०३८,९९७५०९७०६९,९०२१७९०५९८


शिक्षण आपल्या दारी

 बारड बीटस्तरीय ऑनलाईन शिक्षण सुसंवाद  कार्यशाळा.    



 
                               

बारड / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या आँनलाईन शिक्षण उपक्रमा अंतर्गत शिक्षण आपल्या दारी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी बारड बीटस्तरीय शिक्षकांनची आँनलाईन शिक्षण पध्दतीबाबतीत शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आँनलाईन बैठकीचे  नियोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या बैठकीला १६७शिक्षकांनी सहभागी होऊन शिक्षण पद्धती जानुन घेतली आहे.      

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जि.प. शिक्षण विभाग, गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बीटस्तरीय ऑनलाईन शिक्षण संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षकांची *संवाद कार्यशाळा* घेण्याचा हेतू व सद्यस्थितीतील गरज, आँनलाईन शिक्षण पध्दत उपयुक्तता याबाबत सखोल माहीती दिली आहे. .

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात  ऑनलाइन - ऑफलाइन पद्धतीने शिक्षण कसे द्यावे  याची कार्यपद्धती बाबत चर्चा यावेळी करण्यात आली तर शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे.                          

प्राचार्य डायट डाॕ.रविंद्र अंबेकर यांनी प्रस्तुत कार्य शाळेला उपस्थित राहून शिक्षकांना यावेळी मार्गदर्शनात या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी राबवित असलेल्या चांगल्या उपक्रमाचे सादरीकरण करावे, शाळा बंद पण शिक्षण चालू.......  या उपक्रमांतर्गत दैनंदिन अभ्यासमाला व  त्यातून आॕनलाइन -आफलाइन शिक्षण कसे चालू पाहीजे. तसेच  शैक्षणिक दिनदर्शिका माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर उपलब्ध झाल्या असुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी  व्हावी.

 शाळा बंद - पण शिक्षण आहे...... याअभ्यासमालेतील कन्टेन्ट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेअर केला पाहिजे, हा कन्टेन्ट वापरून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे असे म्हणता येईल, दैनंदिन अभ्यासमाला शेअर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला याचे फीडबॅक/ प्रत्याभरण शिक्षकांनी घ्यावा.या बीटस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेतून पर्यवेक्षकीय यंत्रणा एका व्यासपीठावर आल्यामुळे शिक्षकांना एक दिशा मिळेल. दीक्षा ॲप वरील कन्टेन्ट हा दर्जेदार व सर्टिफाइड आहे शिक्षक मित्र व विद्यार्थी मित्र या संकल्पनेची अंमलबजावणी  शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात यावी. विद्यार्थी शिक्षणासाठी आज समाजाच्या मदतीचीही खूप गरज निर्माण झाली आहे. असे सविस्तर माहिती यावेळी सांगितली आह ज्येष्ट अधिव्याख्याता डायट चिटकूलवार यांनी शाळा बंद पण शिक्षण चालू आहे ही दैनंदिन अभ्यासमाला प्रत्येक मुलांपर्यंत गेली पाहिजे.त्यावर शिक्षकांनचे लक्ष असले पाहिजे तर शिक्षक संतोष तिम्मापूरे  यांच्या स्वाध्याय पुस्तिकेवर प्रकाश टाकला आहे. ही पुस्तिका प्रत्येक  विद्यार्थ्यांना मिळण्यासा पाठपुरावा करून मिळूवून देणार असल्याचे सांगितले.काही ठिकाणी Google मीटिंग ॲपचा वापर करून *व्हर्च्युअल क्लासरूम च्या* माध्यमातून आपल्या बीटमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण होत आहे  यात साधारपणे आज ४०% विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतर ६०% विद्यार्थ्यांसाठी आॕफलाइने *स्वाध्यायपुस्तिका व शिक्षक मित्र* च्या माध्यमातून सुशिक्षित युवकांनच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जावेण.इतर व्हीडिओ आपल्या साहित्या पेक्षा *दिक्षा अॕप* च्या माध्यामातून शिक्षण चालू ठेवावे असे यावेळी मार्गदर्शन शिक्षकांना करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्यापक प्रमाणात *शिक्षक मित्र मोहीम* राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे केंद्रप्रमुख भिसे यांनी सांगितले.तर शिक्षक चव्हाण  यांनी *टिलीमीली*या कार्यक्रम बाबत माहीती दिली.शिक्षक लाडके यांनी *बालरक्षक* या बाबत संपूर्ण माहीती दिली.            

  बारड बीट येथील शिक्षक साईनाथ सुत्रावे ,पाटील जी.पी.,  संतोष तिम्मापूरे , शिक्षीका छाया मॕडम,  शेवाळकर  यांनी मनोगतातून बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. शाळा स्तरावर शिक्षण कसे चालू आहे. याची माहीती दिलीआहे                                    

    आँनलाईन कार्यशाळा कार्यक्रम प्रस्ताविक गटशिक्षण अधिकारी व्यंकटराव पाटील यांनी केले तर प्रशासनाच्या वतीने बारड बीटचे केंद्रप्रमुख अरुण अतनुरे यांनी आभार मानले.

लंम्पी चर्म रोगाची जनावरांना लागण

       पशुपालकांची चिंता वाढली.

लक्षणे :- पशुवैद्यकीय दवाखान्यात आलेल्या लहान जनावराच्या अंगावर गाठीची लक्षणे आढळून येत आहेत.


मुगट / प्रतिनिधी

           मुगट व परिसरातील अनेक गावांमध्ये जनावरांना लंम्पी या स्किन डिसीज चा प्रादुर्भाव अनेक खेड्यात आढळून येत आहे. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाली आहेत. मुगट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक जनावरे तपासणीसाठी येत आहेत. जवळपास पाच ते सहा गावांसाठी मुगट येथील एकच दवाखाना आहे.

लंबी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागा पुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

खेड्यापाड्यातील अनेक गावातील जनावरांच्या अंगावर गाठी , जनावराला ताप येणे, नाक व डोळ्यातून पाणी येणे . ही लक्षणे दिसून आली तर त्या जनावरास लंबी हा विषाणूजन्य रोगाची लागन झाली असे दिसून येते. तो संसर्गजन्य असल्यामुळे या बाधित जनावरांना इतर जनावराच्या सहवासात ठेवणे धोक्याची निर्माण होऊ शकते .

या आजाराचा संसर्ग प्रसार मुख्यत्वे डास, माशा, गोचीड व जनावरांचा एकमेकांना स्पर्श यामधून होत असतो. त्यामुळे बाधित झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे वेगळा चारापाणी सुद्धा वेगळे ठेवणे. या उपायोजना चे कटाक्षाने पालन केले तर या चर्म रोगापासून  आपण आपल्या पशूंना वाचू शकतो.

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु करा नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीची मागणी

राज्यात जवळपास सहाय्यक प्राध्यापक १२०००  जागा रिक्त .

संपादक आशिष मुगटकर

निवेदन :-  शासनाने तात्काळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्याकडे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देेताना प्रा.डॉ बाबु महंत गिरि,आदीसह समीती पद अधिकारी उपस्थित होते.

बारड/ प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडून तब्बल दहा वर्षापासून महाविद्यालय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीतपणे होत नसल्याने शासनाने तात्काळ सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याची मागणी नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्याकडे नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे.

             राज्यात जवळपास सहाय्यक प्राध्यापक १२०००  जागा रिक्त आहेत त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम झाला असून उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सहायक प्राध्यापकाच्या जागा त्वरित शासनाने भरण्याची गरज आहे तर या विपरीत या जागा भरल्या नसल्यामुळे नेट-सेट पीएचडी केलेल्या प्राध्यापकाचे शिक्षण घेऊन हा सुशिक्षित बेरोजगार झाला असल्याने आर्थिक इनकम नसल्याने चिंतेची बाब बनली आहे सुशिक्षित बेरोजगारांच्या पालकांमध्ये एवढे शिक्षण घेऊन मुलगा बेरोजगार असल्याने मोठी चिंतेची बाब असून पालक वर्गातून असंतोष निर्माण झाला आहे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सहाय्यक प्राध्यापकांची भरती त्वरित करण्यात येण्याची मागणी यावेळी संघर्ष समीतीच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनावर प्रा.निरंजन गिरी, प्रा.नितीन चौदंते,प्रा.सुदर्शन शेळके, प्रा.साहेबराव हनमंते, प्रा.डॉ बाबू महंत गिरी आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत


मराठा आरक्षण खंड पिठाकडे

संपादक आशिष मुगटकर



नांदेड/प्रतिनिधी/ आशिष कल्याणे  

  दि.९ सप्टेंबर रोजी. मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष २०२०-२१ साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे.पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणासाठी आता घटनात्मक खंडपीठ  पुढची सुनावणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय घेत आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.त्यामुळे आता पुढची सुनावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये मराठा समजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.या प्रकरणावर विचार करण्यासाठी मोठ्या खंडपीठाची निर्मिती केली जाईल, असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी मराठा आंदोलनाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी सरकारने योग्य बाजू मांडली नाही म्हणून सरकारचा निषेध केला आहे.

देशातील सर्वच राज्यानी ५० टक्या पेक्षा अधिकच आरक्षण दिल आहे, सुप्रीम कोर्टाने आज पर्यंत कुठल्याही प्रकरणात स्थगिती दिलेली नाही. फक्त महाराष्ट्रासाठी वेगळा निर्णय का घेतला गेलाय, याच कारण शोधलं गेलं पाहिजे, अशा प्रतिक्रिया मराठा आंदोलकांकडून येत आहेत.












बारड परिसरात बिबट्या अवतरला

  •  गोबरातांडा  शिवारात आखाड्यावरील बच्छड्याचा खात्मा शेतकरी भयभीत. 
  • जनजागृतीचा मात्र वनविभागाला विसर.

संपादक आशिष मुगटकर


बारड/ प्रतिनिधी

            मुदखेड तालुक्यातील बारड परिसरात अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर बिबट्या अवतरल्याने सुरवातीच्या एंट्रीत म्हशीची बच्छड्याचा खात्मा केल्याची घटना गोबरातांडा शिवारात घडली असल्याने गावशेजारी बिबट्या असल्याने शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  परंतु याकडे मात्र वनविभागाने गांभिर्याने घेतले नसल्याचे समोर आले असून जनजागृती चा वनविभागाला विसर पडला आहे.

        काही दिवसांपुर्वी परिसरातील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती त्यामुळे भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

     परंतु संबंधित अधिकारी जंगल मे मंगल यानुसार शहराच्या ठिकानवरुनच शेळ्या हाकत असल्याने बिबट्याच्या भितीने भयभीत असलेल्या शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

           बारड पासून जवळ असलेल्या गोबरातांडा वस्तीच्या जवळ असलेल्या गट नंबर१५७, मधील नामदेव नारायण बागडे यांच्या आखाड्यावर असलेल्या मैशीच्या बच्छड्याचा बिबट्याने निर्घृण पणे खात्मा केला आहे यावेळी घटनेचा पंचनामा केला असून यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांनी पोस्टमार्टम केलेआहे.घटनेने या भागातील नागरिकांन मध्ये भिती निर्माण झाली आहे तर बिबटच्या दहशदीने तांडा वस्तीतील नागरिक पण परेशान झाले असल्याने वनविभागाने याभागात जनजागृती मोहीम राबवून शेतकर्याना दीलासा देण्याची गरज असून सहकार्य करण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

वाढीव वीज बिलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक.

 वाढीव विज बिलाबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब.

संपादक आशिष मुगटकर ✒️✒️✒️
विचार पुस :- महाराष्ट्र नवनिर्माण सेने मुदखेड च्या वतीने मुदखेड येथील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यास वाढीव वीज बिलाबाबत विचारपूस करताना.

       नांदेड/  प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

                    मुदखेड येथे वाढीव वीज बिल कमी करा करून द्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुदखेडच्या वतीने महावितरण अभियंता मुदखेड यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची त्यांनी दखल न घेताच ग्राहकांना वाढीव वीज बिल वाटप करण्यात आली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुदखेड येथील अभियंता महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २० हुन अधिक कार्यकर्ते अभियंता महावितरण कार्यालय मुदखेड या ठिकाणी सोमवारी सकाळी १०:३० दाखल झाली. महावितरण कार्यालयात उपस्थित असणाऱ्या अधिकार्‍यांना त्यांनी वाढीव वीज बिलाबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात वर जाब विचारला. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

तोडफोड :- मुदखेड येथील महावितरण कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनाचा अधिकाऱ्यांना जाब विचारला अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले व कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

.

 त्यावर त्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी कार्यालयात राज ठाकरे  यांच्या नावाने घोषणा देत त्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. विज बिल माफ न केल्यास आणखीन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून महावितरणला देण्यात आला.

भोकर येथे राष्ट्रीय क्रिडा दिन उत्साहात साजरा.

 संपादक आशिष मुगटकर

क्रिडादिन :- मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करताना मान्यवर मंडळी

   नांदेड/ विशेष प्रतिनिधी / पिराजी गाडेकर

    भोकर येथे फिट इंडिया फ्रीडम रन अंतर्गत हा नवीन उपक्रम राबविण्यात  आला असून  त्या अनुषंगाने क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नांदेड तसेच ज्ञानवर्धनि मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारड संचलित...क्रीडा प्रशिक्षण केंद्र भोकर, हौशी ॲथलेटिक्स संघटना नांदेड यांच्या या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

          मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा होत असून  त्या निमित्त मंजुळाबाई  किन्हाळकर मुलींचे विद्यालय मैदान ते दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर रोड ३ कि.मी. अंतर जाऊन येणे मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला सहभाग नोंदवत  पार करत हा उपक्रम यशस्वी रित्या पूर्ण केला आहे.

          शारिरीक  व मानसिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी व रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी धावणे व चालणे हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे त्यास नेहमी तंदुरुस्त (फिट) राहण्याची आवश्यकता आहे त्याच उद्देशाने

          दि . ५ सप्टेंबर २०२० रोजी भोकर येथे हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सनीटायझर मास्क आणि सामाजिक अंतर पाळून यात सर्व वयातील स्पर्धक मोठ्या सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाची सांगता मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून संपन्न करण्यात आला.


या कार्यक्रमाचे  आयोजन क्रिडा प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच बालाजी एल.गाडेकर यांनी केला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एस. कुमरे यांनी केले.या प्रसंगी आरोग्य विषयी क्रीडा क्षेत्राचे महत्व सांगण्यात आले.झालेल्या कार्यक्रमाची सार्वत्रिक कौतुक केले जात आहे व नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, भोकर तालुका क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी गुरुदीप सिंधू, क्रीडा अधिकारी अनिल बंदेल   यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली

भारतीय मानव कल्याणमहासमिती चे तालुका प्रमुख नियुक्त

 भारतीय मानव कल्याणमहासमितीत काँग्रेसच्या ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते यांना मिळाली संधी.

शिक्षक दिन व गुरू वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

मातासाहिब देवाजी जन्मोत्सव मुगट

"शाळा बंद शिक्षण चालू" उपक्रमासाठी कोरोना काळात कार्य करणाऱ्या शिक्षकाचा गौरव

 शिक्षक दीना निमित्य बारड बिटचा अभिनव उपक्रम !

संपादक आशिष मुगटकर

शिक्षक दिन :- शेंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करताना शिक्षण विस्तार अधिकारी, सरपंच, मुख्याध्यापक,
 शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
 

       बारड / प्रतिनिधी

        मुदखेड तालुक्यातील बारड बिट अंतर्गत कोरोना संकटात "शाळा बंद शिक्षण चालू " या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाचा शेंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गौरव करण्यात आला आहे. यावेळी प्रथम शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

             शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर गुट्टे,सरपंच बाळासाहेब देशमुख, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, केंद्रीय मुख्याध्यापक संजय माहुरकर यांच्या संकल्पनेतून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

गौरव :-शेेंबोली जि.प.प्रा.शाळा चे पदोन्नत मुख्याध्यापक लक्ष्मण दत्ताराम शिंदे यांना  शिक्षक दिनी शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.


कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीतही संपूर्ण विद्यार्थी विकासाच्या ध्यासातून शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमात सक्रिय राहून विद्यादानाचे पवित्र कार्य करत असल्याबद्दल शेबोंली जि.प.प्रा.शाळा चे पदोन्नत मुख्याध्यापक लक्ष्मण दत्ताराम शिंदे यांना  शिक्षक दिनी शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.

यावेळी केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष बालाजी कल्याणकर, शिक्षक नेते शिवाजी भगनुरे, चंपत मुन्नेश्वर, रामकृष्ण लोखंडे, शामला महाजन, गोविंद गोरेवाड आदी उपस्तिथ होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. आदिती हीने केले तर आभार विद्यार्थ्यांनी कु. अक्षरा गोरेवाड यांनी मानले.

बारड ग्रामपंचायत अंतर्गत गोबरातांडा वस्तीमध्ये विकास कामाचे लोकार्पण

  गोबरातांडा  वस्तीमध्ये विकास कामांला शुभारंभ



उद् घाटन :- बारड येथील गोबरातांडा वस्तीमध्ये विकास कामाचे उद् घाटन  करताना बाळासाहेब देशमुख बारडकर सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख, ग्रा.प. सदस्य माणिक लोमटे, शिवाजी देशमुख,तांडा प्रमुख अमृता राठोड, गोविंद पवार, पंडित जाधव, रामा राठोड, गुलाब सखाराम राठोड, फुलशिंग राठोड, रामराव राठोड, शामराव राठोड, भीमराव राठोड, वसंत राठोड आदी

बारड/प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील  बारड ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोबरातांडा वस्तीमध्ये विकास कामाचे उद् घाटन  करण्यात आले असून यावेळी वसंतराव नाईक तांडा सुधार योजने अंतर्गत समाजासाठी समाज मंदिर मंजूर झाले आहे.  तसेच गोबरातांडा येथील नागरिकांनसाठी चौदा वित्त आयोग,निधीतून शुद्ध पिण्याच्या पाण्याची वॉटर प्लांट ची उभारणी करण्यात आली आहे या दोन्ही कामाचे उद् घाटन यावेळी बारड चे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमास सरपंच प्रतिनिधी विलास देशमुख, ग्रा.प. सदस्य माणिक लोमटे, शिवाजी देशमुख,तांडा प्रमुख अमृता राठोड, गोविंद पवार, पंडित जाधव, रामा राठोड, गुलाब सखाराम राठोड, फुलशिंग राठोड, रामराव राठोड, शामराव राठोड, भीमराव राठोड, वसंत राठोड, आदीसह नागरिक उपस्थिती होते.






नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी ‛वंचित’चे मुदखेड न.प.समोर लोटांगण आंदोलन

संपादक आशिष मुगटकर


मार्गदर्शन :- वंचित बहुजन आघाडीचे ॲड. कमलेश चौंदते मुदखेड नगर परिषद येथे आयोजित लोटांगण आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना.


 अतीक अहमद                                                                               मुदखेड तालुका/ शहर प्रतिनिधी

       शहराच्या लुम्बिनी नगर येथील बौद्ध विहाराचे अपूर्णकाम मार्गी लावणे; वाचनालय, धार्मिक स्थळे, आठवडी बाजार सुरू करणे, ऑटो रिक्शा चालवण्यास परवानगी देणे; नवी आबादी, अशोका नगर व इतर भागातील बंद असलेले रस्ते व नाल्याचे काम पूर्ण करणे अश्या नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यरतत्पर नगरसेवक ॲड.कमलेश चौदंते यांच्या पुढाकाराने न.प.समोर लोटांगण आंदोलन करण्यात आले.

    या लोटांगण आंदोलना दरम्यान उपस्थितांना प्रभावित करणारे मनोगत नगरसेवक ॲड.कमलेश चौदंते, ॲड.माधव हाटकर मुगटकर यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी आपल्या घोषणांनी न.प.परिसर दणाणून सोडला.

    यानिमित्ताने न.प.चे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना सदर मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी केशव मुद्देवाड, सुरज हणमंते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर वंबआचे तालुकाध्यक्ष गंगाधर पा.पवार निवघेकर, राहुल उर्फ अप्पा चौदंते, बाळू राऊत, गोविंद बामणे, ओमकार चव्हाण, केदार शेवटे, बालजी काटकर, सुनील गायकवाड, मोहन यादव आदींच्या स्वाक्षऱ्या नमूद आहेत.


बारड कोविड सेंटरला दोन रुग्ण पाँझिटिव्ह

 ग्रामीण भागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव



बारड/प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील बारड येथील कोविड केअर सेंटरमध्ये अँटिजन तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये दोन तरुण रुग्ण पाँझिटिव्ह असून बारड येथील तीस वर्षाचा युवक बाधीत झाला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ के.एच. कदम यांनी यावेळी दीली आहे.

सध्या स्थितीत बारड सेंटरला डोंगरगाव, शेबोंली,बारड येथील एकूण सहा रुग्ण ऍडमिट असून त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरु आहे

उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णाला डीसचार्ज केले आहे.

ग्रामीण भागात रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.परंतु सध्या स्थितीत रुग्णाची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कुठल्याही प्रकारची नियमावलीचे पालन ग्रामीण भागात होत नसून जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दीसत आहे तर सरास पणे अनेक ठिकाणी गर्दी पाहावयास मिळत असल्याने करोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे याबाबत प्रशासकीय यंत्रनेने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुगट प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सह सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह तर डोणगांवात पाच रुग्ण कोरोना बाधित

  ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव


बारड/ प्रतिनिधी

मुगट प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सहकर्मचारी करुणा पॉझिटिव झाले असून तालुक्यातील डोणगांवात पाच रुग्ण कोरोना बाधित झाल्‍याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार यांनी यावेळी दीली आहे.

डोणगांव येथे पंचवीस अँटिजन तपासणी करण्यात आल्या असून त्यामध्ये पाच जन बाधीत झाले असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने शिरकाव केला असल्याने नियमावलीचे पालन करण्याचे आवहान आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

मुगट प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना होम क्याँरंन्टाईन  करण्यात आले असल्याचे तर डोणगांव मधील पाच रुग्णांना मुदखेड कोविड केअर सेंटर मध्ये ऍडमिट करण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितली आहे.

परंतु ग्रामीण भागात ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णाची संख्या वाढत असताना शासन नियमावलीचे पालन करण्यात येत नसल्याने रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने गर्दीच्या ठिकाणी तसेच तोंडाला माक्स किंवा नियमावलीचे पालन होत नसल्याने त्याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज असून दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे तर गर्दीच्या ठिकाणी पाबंद लावण्यासाठी भूमिका बजावण्याची गरज असुन कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना मोहीम राबविण्याची मागणी ग्रामीण भागातील

सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.

निर्भय नारी फाउंडेशनचा उपक्रम

    मोफत ऑनलाईन उद्योग,विक्री कौशल्य प्रशिक्षणास महिलांचा मोठा प्रतीसाद  

संपादक आशिष मुगटकर


बारड/ प्रतिनिधी

निर्भय नारी फाऊंडेशन  संस्थेच्या वतीने नुकतेच तिन दिवशिय संपुर्ण महाराष्ट्रराज्यातील  बचत गटाच्या महिलांसाठी उद्योग व विक्री कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणास बचत गटाच्या महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी बचतगटातील महिलांना त्यांच्या लघुउद्योग वाढवण्यासाठी तसेच त्यांचे विक्रिकौशल्य ही विकसित व्हावे यासाठी निर्भय नारी फाउंडेशन तर्फे कोरोणाच्या काळातही महिलांना घरात राहूनही हे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण घेता यावे व त्यांचे विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात संपुर्ण महाराष्ट्रातील विविध ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांची लाक्षणिक उपस्थिति होती.यावर प्रशिक्षणार्थी महिलांनी व्हिडियो द्वारे, एसएमएस द्वारे उत्तम प्रतिसाद मिळाला. हजारो उद्योजक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातुन सर्व स्तरातील बचत गट या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. यावर महिलांनी या प्रशिक्षणाचा  प्रत्यक्ष उद्योगात उपयोग करावे असे आवाहन निर्भय नारी फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा उषा पाटील इंगोले यांनी केले.

यावेळी पाटील यांनी बचतगटाच्या माध्यमातून महीलांचा झालेला विकास यावर प्रकाश टाकला त्याचबरोबर महीलांनी एकत्र येऊन उत्पादन तर वाढवले परंतु महीला मार्केटींग मध्ये कमी पडत आहेत याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आणि म्हणुन महीलांचे मार्केटींग,विक्री कौशल्य सुधारावे यासाठी काही महत्त्वाचे मार्ग त्यांनी सांगितले त्यामध्ये - आँनलाईन आँफलाईन मार्केटींग कसे करायचे हे सविस्तर सांगितले तसेच ग्राहकांना आकर्षित करणे,प्रचारावर लक्ष देणे, विक्री वाढवण्यासाठी व्यवस्था करणे,खर्चावर नियंञण ठेवणे, कमीत कमी कर्ज काढुन व्यवसाय सुरु करणे,खुपच नफेखोरीतुन बचाव करणे,पी.आर.वर विशेष लक्ष देणे,टिम वर्कच महत्व, नेतृत्व करणे, कर्मचाऱ्यांसी स्नेह संबंध जोपासणे त्याच बरोबर प्रामाणिकपणे काम करणे अशा अनेक मुद्यावर उषा पाटील यांनी सविस्तर प्रशिक्षण दिले - विशेष म्हणजे त्या स्वतः एक मोटीवेशनल ट्रेनिंग तसेच व्यवसायीक प्रशिक्षक व स्वतः उद्योजीका असल्यामुळे बचत गटातील महिलांना त्यांच्या प्रँक्टीकल अनुभवाचा प्रचंड मोठा फायदा झाला त्यामुळे सर्वच महीला अत्यंत आनंदी झाल्या व त्यांनी video द्वारे आपल्या उत्फुर्त प्रतीक्रीया नोंदवल्या व समाजि भावनेतुन निर्भय नारी फाऊंडेशन ने महाराष्ट्रातील बचतगटासाठी घेतलेल्या या तीन दिवशिय मोफत प्रशिक्षणाचे सर्वञ कौतुक होत आहे...

लोकप्रिय बातम्या