अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी शिक्षकांच्या धरणे आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

राज्यातील अंशत: तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाला भीम पैंथर व रिपब्लिकन सेनेने जाहीर पाठिंबा दिला.

अंशतः अनुदानित शिक्षकांच्या अनुदान टप्पा वाढीसह विविध मागण्याबाबत शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करावा या मागणीसाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्यभर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे. नैसर्गिक टप्पा वाढीचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने केली जात आहे. या मागणीस नांदेड जिल्हा शिक्षन संस्थाचालक समन्वयकांनी पाठिबा दिला येणाऱ्या कॅबिनेट मध्ये निर्णय नाही झाल्यास शाळा बंद करून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले यावेळी रंगनाथ वाघ, दिगंबर पाटील पेटकर, प्रा. डी बी जांभरूनकर, बालाजी शेळके, चंपतराव हातांगळे, प्रकाश मांजरमकर, सुरेश पाटील, विक्रम देशमुख, दिलीपराव धर्माधिकारी, दिगंबर गवळे, प्रा मजरुद्दीन सर, शिवदास मोठे, सुर्यकांत विश्वासराव, रामचंद्र येईलवाड, मोती भाऊ केंद्रे,संजय सिप्परकर,व्ही टी चव्हाण,मनोहर भोसीकर, बेंद्रीकर साहेब,जावेद मोहीद'भीम पैंथरचे विभागीय अध्यक्ष विनोद वाघमारे व रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे व युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले , नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, शिक्षण संस्थाचालक राष्ट्रवादी शरद पवार गट संघटना नांदेड जिल्हा,जाहीर पाठिंबा दिला व राज्य शासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला. प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता ! युवा कांग्रेसच्या अभियानाला मोठा प्रतिसाद

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनीधी.

नांदेड युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवा जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे पाटील  यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता ! 

या अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. माजी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष पवार यांच्या गावातुन या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गावातील युवकांनी यास पाठिंबा दाखवत मोठ्या संख्येने यात स भागी झाले होते. 

 या संविधानाचा काँग्रेस पक्षाचा व लोकशाहीचा विचार तळागळामध्ये रुजवण्याचा संकल्प या शाखा उद् घाटनाच्या माध्यमातून सर्व  युवकांनी हाती घेतला आहे .या प्रसंगी युवा कांग्रेसच्या शाखेचे शाखा उद् घाटन करण्यात आले.

शाखा अध्यक्षपदी नितीन पाटील पवार, शाखा उपाध्यक्ष पदी अजय पाटील पवार, सरचिटणीस म्हणून सचिन पवार, कृष्णा पवार सचिव, सहसचिव योगेश पवार व सोशल मीडिया प्रमुख म्हणून सुनील पवार यांची निवड करण्यात आली. शाखा सदस्य म्हणून संदीप पवार, प्रदीप पवार,प्रवीण पवार,सुरज पवार, शिवा पवार, कृष्णा पवार,किसन पवार, छगन पवार, वैभव पवार,बालाजी पवार, चक्रधर पवार,जावेद शेख, बालाजी लखे इत्यादी युवकांची निवड करण्यात आली.

 यावेळी  मुदखेड तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख, मुदखेड शहराध्यक्ष कैलास अण्णा गोडसे, श्रीनिवास महाद्वाड, ज्ञानेश्वर पवार, प्रशांत पाटील मुंगल, गणेश कपाटे, संजय सावंत डोंगरगाव (उपसरपंच), विलास कल्याणे , शरद पवार, तिरुपती मगरे, महेश पवार,संभाजी गाढे,बापूजी गाढे,करण गाढे, शहाजी गाढे, गफार शेख, इत्यादी मान्यवरांसह  निवघा गावातील शेकडो युवक मंडळी उपस्थीत होते. 

नांदेड जिल्ह्यातील विविध गावातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद युवक काँग्रेसच्या या अभियानाला मिळत आहे.

आळंदी ते पंढरपुर पायी दिंडी वारीत मुगट येथील वारकऱ्याचे दुःखद निधन.

 संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहार

मुगट येथील  जेष्ठ वारकरी धोडींबा महाजन कदम ( वय ८१) याचे आळंदी ते पंढरपुर पायी वारित करत असतांना आज दि.१३रोजी सकाळी १० वा. गाव. वेळापुर ता.माळशिरस जिल्हा सोलापुर या ठिकाणी निधन झाले.

मुगट येथील पायी दिंडीत ते दरवर्षी प्रमाने यंदाही सहभागी झाले होते.या दिंडीत गावातील अनेक जन सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षा पासुन ते आळंदी ते पंढरपुर पायी दिंडीत व वारीत सहभागी होत असत.

त्याचा पार्थिव देह मुगट ता.मुदखेड दि.१४ रोजी सकाळी खाजगी वाहनाने  आनन्यात येणार असुन.त्यांचा अंत्यविधी याच दिवशी सकाळी ११ वाजता  मुगट येथिल स्मशान भुमीत होनार आहे.गावातील अनेक धार्मीक कार्यक्रमात ते आवर्जुन सहभागी होत असत.

त्यांच्या पश्तात पत्नी, दोन मुल,एक मुलगी असा परिवार आहे

देळूब (खुर्द) येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड.

 संपादक आशिष मुगटकर



अर्धापूर तालुका प्रतिनिधी 

दि.9 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देळूब (खुर्द) ता. अर्धापुर येथील शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. 

यामध्ये अध्यक्षपदी श्री गोविंद नागोराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी फुलाजी गोपीनाथ मांजरे यांची निवड करण्यात आली आहे.

तर सदस्य म्हणून मारुती कदम ,उमराव कदम, शेषेराव पताळे, दिगंबर डाखोरे, केशव पारवे ,सीमा गजानन मांजरे ,अलका आनंदा कऱ्हाळे, ताई माधव डाखोरे ,वैशाली देविदास पवार ,वनीता गणपती वळसे, अलका राम पावडे, जिजाबाई लक्ष्मण डाखोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 निवड झालेल्या सर्वांचे मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी व सहशिक्षक स्वप्निल भागवत यांनी स्वागत केले.

हैदराबाद गॅझेट पाहण्यासाठी गेलेले अधिकारी महाराष्ट्र परतले.

 संपादक आशिष मुगटकर


 मातृभूमी न्युज नेटवर्क

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबादला 11 अधिकाऱ्यांची टीम पाठवली होती.

अधिकारी आपलं काम संपवून 10 जुलैच्या रात्री महाराष्ट्रात परतले आहेत. तीन दिवसांपासून हे पथक हैद्राबादेत होते. त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्रं देण्यात आली नाही. मात्र स्कॅन करून साडे सहा हजारांहून अधिकचे मूळ दस्तऐवज दिले जात आहे. 


1800, 1820 1900 या दरम्यानच्या हैदराबाद राजवटीत झालेल्या जनगणनेचे दस्त महाराष्ट्र सरकारकडे आले असून स्कॅन करून ही कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली जात आहेत. हैदराबाद संस्थांनच्या काळामध्ये जी जनगणना झाली. त्याची आकडेवारी महाराष्ट्र सरकारकडे आहे. त्याच्या आधारावर मराठा समाज कुणबी होता हे सिध्द करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्य मराठी/ मराठा (ब्राह्मण व्यतिरिक्त) समाजास तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचे समित्यांचे अहवाल व शासनाचे निर्णय आहे. 

मराठवाड्यातील मराठा समाजाला कसा फायदा होईल?

हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज 36 टक्के आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत. जर तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाचा लाभ द्या, यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं दिसतंय.

मागील वर्षी देखील छत्रपती संभाजीनंगरच्या विभागीय कार्यालयातील 6 जणांच्या पथकाने हैदराबादला भेट दिली होती. अशाच नोंदी त्यावेळी घेण्यात आल्या होत्या. मात्र कायदेशीर अडचण अशी आहे की, यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा कुणबी समाज 36 टक्के आहे याची नोंद नाही. मात्र मराठवाड्यामधील जिल्ह्यांतील निकष तपासून मान्य केले गेले तर, मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेट तपासून त्याचा स्वीकार करा ही मागणी एकप्रकारे मान्य होईल. राज्य सरकारने हा निकष कायदेशीरदृष्ट्या मान्य केला तर मराठावाड्यातील मराठा बांधव ओबीस आरक्षणापासून वंचित राहणार नाही.

खासदार आष्टीकरांच्या प्रयत्नामुळे आषाढी एकादशी निमित्त नांदेड ते पंढरपूर दोन विशेष रेल्वे धावणार.

 संपादक आशिष मुगटकर


हदगाव तालुका प्रतिनिधी

 महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठू रुक्माईच्या दर्शनासाठी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक डिव्हिजन नांदेड यांच्याकडे आषाढी एकादशी निमित्त हिंगोली मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील वारकऱ्यांना नांदेड ते पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती त्या मागणीला रेल्वे विभागाने हिरवी झेंडी देऊन नांदेड ते पंढरपूर अशा दोन विशेष रेल्वेच्या फेऱ्या सुरू केल्याचे पत्र पाठवले आहे...

या बाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक 16 ते 17 जुलै रोजी विठुराच्या दर्शनासाठी भाविकांची होणारे गर्दी लक्षात घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना नांदेड ते पंढरपूर या गाडीच्या दोन विशेष रेल्वे फेऱ्या नांदेड विभागाने सुरू कराव्या अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती त्या मागणीला अखेर रेल्वे विभागाने हिरवी झेंडी दाखवत दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू  केल्याचे पत्र हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील यांना दिले आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रयत्नाने हिंगोली लोकसभे मधील वारकरी संप्रदायातील भाविक भक्तांना पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दोन विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत याची सर्व वारकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आव्हान हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जनतेला केले आहे.

माझी एकच शेवटची ईच्छा: भरपावसात मनोज जरांगे पाटील यांचे भाषण

 संपादक आशिष मुगटकर 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेडमध्ये आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडच्या सभेला सुरूवात केली. मनोज जरांगे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी ‘पाटील- पाटील’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

ढगाळ वातावरण, रिमझिम पावसात मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित केलं. आपल्या विरोधात जे जातील त्यांना पाडा. मग ते महाविकास आघाडीचे असो की महायुतीचे असो… पाडायचे म्हणजे पाडायचे, असं मनोज जरांगेंनी नांदेडच्या सभेत म्हटलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलंय.


मनोज जरांगेंचं विधान काय?


माझी एकच शेवटची इच्छा आहे की, करोडो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. एक एक रुपया जमा करून मराठा लेकरं शिकवत आहेत. ऊसतोड केली, रोजाला जात आहेत. सावकाराच्या घशात गेले पण लेकराला कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणाने मराठवाड्याचा घात केला. मराठ्यांनी ठरवले आता काय झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. जो कोणी मराठा अधिकारी आहे त्याला धमकावलं जातं. समाजाने आपल्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहायचे शिका, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

तर त्यांना पाडणार…- जरांगे पाटील

मराठ्यांनी काहींना पाडले पण जे आमच्या मतांवर निवडून आले. त्यांनी आमच्या बाजूने बोला… आमच्या बाजूने उभे नाही राहिले तर मात्र तुम्हाला पण पाडणार आहोत. निवडून आलो आता पाच वर्षे बिनधास्त झालो असं म्हणू नका. एवढ्यावेळेस मी शंभूराजे देसाई यांच्यावर विश्वास ठेवलाय. आता दगफटका करू नका. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा सर्व मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. जर तसे झाले नाही तर मात्र मराठे मुबंईला आलोच म्हणून समजा. एकदा का मुंबईत आलो की परत माघार नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

मी 6 कोटी मराठ्यांच्या अपेक्षाभंग होऊ देणार नाही. तुमच्यासाठी मी सरकारच्या नरड्यावर पाय ठेवतो. पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या. – तुम्ही आमचे शेकडो लोक पाडले, आम्ही तुमचा एक पडला तर तुम्हाला किती वाईट वाटले. छगन भुजबळ तुम्ही फुकटच, बोगस खाता आणि आम्हाला विरोध करता. छगन भुजबळ काय त्याच्या शंभर पिढ्या आल्या तरी मागे हटायचं नाही, असंही मनोज जरांगे यांनी या सभेत म्हटलं आहे.

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट पाहू नये : जिल्हाधिकारी

 संपादक आशिष मुगटकर









चला सेतू केंद्रावर;एक रुपयात पिक विमा योजना ;१५ जुलै शेवटची तारीख 

नांदेड, दि. ४ :- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४ पिक विमा पोर्टल चालू झालेले असून १५ जुलै २०२४ पर्यत अंतिम मुदत आहे. तरी शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरुन घ्यावा. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा/ पुनर्गठन करुन शासनाच्या एक रुपये पिक विमा योजनेत अधिक सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

पिक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता  भरुन घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करुन घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल तर, अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेऊ नये, कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधारकार्डवरील सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.

तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घेवून शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्ती करुन घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे असे कृषि विभागाने कळविले आहे.




दै.चालु वार्ताचे मुख्य संपादक यांना फोन वर शिवीगाळ व धमकी…

 संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क 

अंबड तालुक्यात धनगर पिंपरी येथील वैदकिय अधिकारी डॉ प्रसाद काकडे यांनी आज सकाळी ( दि : 2 जुलै ) दै चालु वार्ताचे मुख्य संपादक यांना फोन करून शिवराळ भा RCषेचा वापर केला. आणि वैद्यकीय बातम्या पुन्हा लावाल्या तर बगुन घेण्याची एकेरी भाषा वापर करत धम दिला.

सविस्तर बातमी असी कि डॉ प्रसाद काकडे अंबड तालुक्यात धनगर पिंपरी आरोग्य सेवा केंद्र येथे कार्यरीत आहेत. पण यांच्या बदल आजूबाजूच्या गावाकऱ्यांच्या अनेक तक्रारी वारंवार असतात. आणि ते अनेक वेळा केंद्रावर उपस्तिथ नसतात त्यामुळे अनेक वेळा रुग्णाची गैर सोय होते.

नेहमी प्रमाणे हे डॉक्टर मोहद्य शनिवारी उपस्तिथ नव्हते,एक घटना घडली आणि आणि एक रुग्ण तात्काळ प्राथमिक उपचारासाठी धानोरी पिंपरी आरोग्य केंद्र येथे पोहचला.रुग्णला दमा असल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार मिळणं आवश्यक होत. पण रुग्ण आरोग्य केंद्रावर पोहचला तेव्हा तिथे डॉ प्रसाद काकडे उपस्तिथ नव्हते त्यामुळे नाइलाजासत्व रुग्णला पुढे उपचारासाठी घेऊन जावं लागलं आणि प्राथमिक उपचाराला वेळ झाल्यामुळे रुग्णचां मृत्यू झाला. ही सविस्तर माहिती मृत्यू झालेल्या रुग्णच्या मुलानी दै चालु वार्ता प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे यांना दिली. आणि त्याचं आधारवार दै चालु वार्ताला बातमी लागली.

बातमी कसी लागली ती खोटी आहे असं म्हणतात सकाळी दै चालु वार्ता मुख्य संपादक यांना शिवीगाळ करून दम दिला. आता पत्रकार व संपादक यांनी सामान्य लोकांसाठी प्रश्न विचारायचा का नाही ? असं प्रश्न पडतो.पत्रकाराणा लोकांचे प्रश्न मांडण्याचा संविधानिक अधिकार असताना डॉ प्रसाद सारख्या उच्चशिक्षित अधिकारी जबाबदार व्यक्तींना बे जबाबदारी बोलत असतील तर कसं हे रुग्णची सेवा करत असतील असा प्रश्न आता स्थानिक लोकं विचारात आहेत.

दै चालु वार्ता डॉ प्रसाद काकडे यांच्या विरोध कायदेशीर रित्या प्रशासनाला प्रश्न विचारेल आणि डॉ तुमच्या बेजबाबदार पणा मुळे रुग्ण दगावला हा प्रश्न पेपर मध्ये मांडला तर डॉ प्रसाद काकडे तुम्हाला राग का आला पाहिजे…? मग् डॉ प्रसाद हा डॉक्टर आहे का अंबडचां डॉन असं प्रश्न आता जणमाणसात निर्माण झाला आहे. आता आरोग्य प्रशासन – डॉ प्रसाद काकडे याच्यावरती काय कारवाई करणार याकडे सर्व अंबडवासियांचे पूर्ण लक्ष आहे.

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षांच्या वाढ दिवसानिमित्त वृक्षारोपण आणि रुग्णांना फळांचे वाटप

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

दि.१जुलै रोजी (अजित पवार गटाचे ) राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष  सुरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त  शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाणे परिसरात  वृक्षारोपण करत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी नांदेड उत्तर  युवक जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमीरे , नांदेड उत्तर जिल्हा युवक कार्याध्याक्ष हणमंत नटूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शहरातील ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मा सुरजदादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गुणांना फळांचे वाटप करण्यात आले व तसेच शहरातील मध्यवर्ती कार्यालयातील नवीन पोलीस ठाण्याच्या  परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या वेळी नांदेड उत्तर जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहम्मद साजिद ,राष्ट्रवादी भोकर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख इरफान शेख इमाम, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मोहम्मद बुरहान मोहम्मद मजीद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मुखिद ,पत्रकार मोहम्मद हकीम खान दान,बालाजी बिंदगे,शिंदे पाटील पांगरगावकर,मोहम्मद सलमान मोहम्मद जाफर, आनंदा निखाते,आकाश पांडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे,सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, हेड कॉन्स्टेबल बलवीर सिंग ठाकूर, ड्रायव्हर पगलवाड  यावेळी उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या