दोन दुचाकीवर ६ जण आले, कार अडवून बंदूकीचा धाक दाखवला, १० लाखांची बॅग घेऊन पसार झाले

मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेडमध्ये दुचाकीवरून आलेल्या ६ जणांनी कार चालकाला बंदूकीचा धाक दाखवत कार अडवून १० लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे.

खाद्यतेलाचे पैसे वसूल करून परत येत असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ही घटना घडली आहे. या ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या ६ जणांनी कार अडवली आणि बंदुकीचा धाक दाखवून १० लाख रूपये लुटले. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नांदेड येथील खाद्यतेलाचे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांनी वितरीत केलेल्या खाद्यतेलाचे पैसे वसुलीसाठी त्यांचा मुनिम आणि चालकाला पाठवले होते. मुनिम युवराज निवळे आणि चालक अंकुश खुजडे यांनी शंकरनगर, नर्सी , मुखेड येथे जाऊन खाद्यतेलाची वसुली केली. यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते दोघेही कारमधून नांदेडकडे परत निघाले.

परंतु नायगाव जवळून जात असताना पाठीमागून दोन दुचाकीवरुन ६ जण आले. त्यांनी यांची कार आडवली आणि वाद घालायला सुरुवात केली. तेवढात त्यातील काहींनी त्याच्याकडे असलेल्या काठ्यांनी कारच्या काचा फोडल्या आणि बंदूकीचा धाक दाखवत दमदाटी केली आणि कारमधील १० लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन पसार झाल.

या घटनेमुळे नायगाव परिसरात खळबळ उडाली आहे. याविषयी माहिती मिळताच नायगाव आणि कुंटूर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र चोरटे तोपर्यंत पसार झाले होते. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बेठबिगारीसाठी ठेवलेल्या दोन युवकांची पोलिस निरिक्षक अनंत्रे यांनी केली अर्धा तासात सुटका.

 कल्याणे कुटुंबांनी केले पोलिस निरिक्षक यांचा सत्कार

मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील वासरी येथील दोन युवकांना पाथरडी जिल्हा अहमदनगर च्या दुर्गम भागात एका ठेकेदाराकडुन बेठबिगारी गुलामी साठी दिशाभूल करून साईड सेडवर गुंडाच्या ताब्यात आठदहा दिवस ठेवले होते .

संजय कल्याणे पाटील  व माधव खानसोळे पाटील या दोन युवकांना काही दिवसानंतर घरच्यांशी संपर्क केल्यावर हा प्रकार लक्षात आला.

भाजप तालुका अध्यक्ष शंकर  मुतकलवाड , संजय सोनटटके यांनी युवकांच्या नातेवाईक यांना सोबत घेऊन  हा प्रकार मुदखेड पोलिस ठाणे चे पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे यांचे कडे भेटुन सांगितला.

पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे यांनी आपल्या अनुभवानुसार शीघ्र कारवाई चे चक्र फिरवले.

अवघ्या अर्धा तासात तेथील मुख्य ठेकेदारा च्या इसमाशी भ्रमणध्वनीवर संभाषण केले.त्याने  मुदखेड नांदेड च्या  दोन युवकांना रवाना केल्याचे स्पष्ट केले. 

संकटात सापडलेल्यानां शीघ्र मदत केली. याचा आनंद कल्याने पाटील कुटुंबीयानी थेट पोलिस ठाणे मुदखेड मध्ये भेट देऊन पोलिस निरिक्षक अशोक अनंत्रे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीतीत शाल पुष्पहाराने सत्कार केला,  व मिठाई वाटप केली. 

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष एसटीएम , तंटामुक्ती अध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकरराव पवार आमदुराकर , संपादक मनोज कमटे,माजी शहर अध्यक्ष संजय सोनटटके ,प्रल्हादराव कल्याणे व नांदेड पोलिस मनोहर कल्याणे हे या प्रसंगी उपस्थित होते .

"नरेंद्र मोदी २००० रुपयांच्या नोटा छापण्याच्या बाजूने नव्हते; इच्छा नसतानाही.," पंतप्रधानांच्या माजी प्रधान सचिवाचा मोठा गौप्यस्फोट

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नवी दिल्ली 

 दोन दिवसांपूर्वीच २००० रुपयांची नोट वितरणातून बाद करण्याचा निर्णय आरबीआयकडून जाहीर करण्यात आला. देशातील नागरिकांना ती ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्यास सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याचदरम्यान २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळीच्या घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान मोदी २००० रुपयांच्या नोटेला अजिबात अनुकूल नव्हते, परंतु त्यांनी अनिच्छेने या नोटेला संमती दिली होती. खरं तर नृपेंद्र मिश्रा यांचे वक्तव्य रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटा वितरणातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी आले आहे.

पंतप्रधान २ हजारांची नोट बाजारात आणण्यास अनुकूल नव्हते

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदी २००० रुपयांची नोट बाजारात आणण्याच्या बाजूने नव्हते. पण नोटाबंदी मर्यादित वेळेत करायची होती, म्हणून त्यांनी अनिच्छेने परवानगी दिली. “पंतप्रधान मोदींनी कधीही २००० रुपयांची नोट गरिबांची नोट मानली नाही. त्यांना माहीत होते की, २००० रुपयांचे व्यवहार मूल्यापेक्षा होर्डिंग मूल्य वाढणार आहे,” असंही मिश्रा म्हणाले.

२ हजार रुपयांच्या नोटेमुळे चलन साठ्यात मोठी वाढ

नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, पीएम मोदींना असे वाटले की, काळ्या पैशाला सामोरे जाण्याचा प्रयत्न असला तरी जास्त नोटा बाजारात आल्या तर पैसे साठवण्याची क्षमता वाढेल. त्यामुळे पंतप्रधानांचा याला तत्त्वतः विरोध होता, पण व्यावहारिक विचारांसाठी त्यांनी अनिच्छेने ते मान्य केले. नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मर्यादित कालावधीसाठी २००० रुपयांची नोट छापणे हा एकमेव पर्याय उरला होता. चलनाची पुरेशी क्षमता उपलब्ध झाल्यानंतर २००० रुपयांच्या नोटा भविष्यात वितरणातून बाद केल्या जाव्यात, याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नसल्याचे मिश्रा म्हणाले.

महसूलमंत्री स्पष्ट बोलले. वाळूसाठी आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात.आम्हाला लाज वाटते

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

महसूलमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या हस्ते वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथे मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे मोफत पास देण्यात आले.

यावेळी माध्यमांशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधला.

काय म्हणाले विखे पाटील

राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. त्यानुसार ग्राहकांना 600 रुपये ब्रॉसने वाळू मिळणार आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन बुकिंगनंतर 15 दिवसांत वाळू घरपोच मिळण्याचे हे धोरण आहे. यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होणार आहे. नदीपात्र सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. वाळू तस्करीमुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. परंतु अजूनही सर्वत्र सरकारी वाळू डेपो सुरु झाले नाही.

यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अधिकारी आणि वाळू ठेकेदार शासकीय वाळू डेपोसाठी अडथळे आणत आहेत. पण सरकार ठाम आहे. थोडा वेळ लागेल… परंतु हे होणारच आहे. या मार्गात जे आडवे येतील त्यांना आम्ही सरळ करू, महिन्याभरात सर्व सुरळीत होईल.

तहसीलदार हप्ते घेतात

कोपरगावमध्ये तहसीलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. वाळूसाठी तो हफ्ता घेत होता. वाळूच्या बाबतीत आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात, याची आम्हाला लाज वाटते आहे. सरकारी वाळू डेपोसाठी प्रशासनातील या लोकांनी ठेकेदारांशी संगनमत केले आहे. परंतु त्यांना आता सरळ केले जाईल. महिन्याभरात सर्वसामान्यांना घरपोच वाळू मिळेल.हे आहेत फायदे

वाळू धोरणामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाचा त्रास कमी होणार आहे. जीपीएस सिस्टीममुळे वाळू वाहतूक पारदर्शी होईल. आरटीओ मान्यता प्राप्त वाहनांनाच वाळू वाहतूक परवाना मिळेल. वाळू कमी दराने मिळणार असल्याने ग्राहकांचा बांधकाम खर्च कमी होणार आहे.

दोन्ही नेते निर्णय घेतील

जागा वाटपाचा प्रश्नावर महाविकास आघाडीत बिघाडी आहे. रोजच वज्रमूठ तयार होते आणि तिला तडे जात आहेत. आमच्यात काहीच नाही. आमच्यातील जागा वाटपबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. मंत्रिमंडळ विस्तारासाठी अडचणी होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. यामुळे विस्ताराचा निर्णय दोन्ही नेते घेतील, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

श्रीहरीकोटाच्या मिशन कंट्रोल रुममध्ये विद्यार्थी भारावून गेले

इसरो-श्रीहरीकोटा-शैक्षणिक सहल-२०२३

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

 दि.१८ रोजी नांदेड जिल्हा परिषदे कडून आयोजित इसरो शैक्षणिक सहल आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर सह इतर ठिकाणी भेट दिली.

  प्रत्यक्ष जेथून वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह अंतराळात झेपावतात, त्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विद्यार्थ्यांना संधी भेटली आणि त्यांच्या विद्यार्थी जीवनाचे सार्थक झाले. नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथे मिशन कंट्रोल रुममध्ये प्रवेश देवून कशाप्रकारे अंतराळात उपग्रह झेपावतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. स्पेस इंजिनिअर के. जनार्दन यांनी अत्यंत सोप्या भाषेत ही जटिल प्रक्रिया मुलांना अगदी लिलया समजावून सांगितली. मिशन कंट्रोल रुममध्ये मुले भारावून ही प्रक्रिया अवलोकन करीत होते. त्यानंतर ज्या लाँचपँडवरुन उपग्रह आकाशात झेपावतात, त्या लाँचपँडवर विद्यार्थ्यांना जाण्याची संधी मिळाली. 

    प्रथम लाँचपँड दोन दाखविण्यात आला. या लाँचपँडवरुन जीएसयलव्हि तीन या आधुनिक राँकेटच्या सहाय्याने सातशे पन्नास टनापेक्षा जास्तीची उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते. विशेषतः येथे पँडच्या शेजारीच उपग्रहाची निर्मिती करुन नंतर लाँचसाठी आणण्यात येते. व्हिएबीमधून तयार करण्यात आलेला उपग्रह प्रक्षेपणाच्या पाच दिवस आधी लाँचपँडवर आणण्यात येते व नंतरच लाँच केले जाते. 

सध्या २०२४ मध्ये मानवासह अंतराळात  जाणारे गगनयानची निर्मिती प्रक्रिया अत्यंत गतीमान पध्दतीने कार्यान्वित होत आहे. यानंतर लाँचपँड एकवर नेवून तेथील प्रक्रिया सहजसोप्या शब्दात समजावून सांगण्यात आली.

 या पँडवर लहान दर्जाचे उपग्रह तयार करण्यात येतात. विशेषतः येथे पँडवरच उपग्रह तयार केला जातो व तेथूनच उपग्रह आकाशात सोडण्यात येतो. या दोन्ही लाँचपँडमधील मुलभूत फरक विद्यार्थ्यांना अत्यंत बारकाईने व बारकाव्याने के.जगन्नाथ यांनी समजावून सांगितल्यामुळे अधिकारी, केअरटेकरसह सर्वांनीच समाधान व्यक्त केले.

 यावेळी प्रणव प्रशांत दिग्रसकर, आयुष गोविंद चव्हाण, यश पवार, साधना होनवडजकर, रोशनी कदम,रितिका मेहेत्रे या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. 

पाहणी:-मिशन कंट्रोलरुमच्या ज्या स्थानी उपग्रह प्रक्षेपण पाहण्यासाठी देशाचे महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान, इसरोचे मुख्य डायरेक्ट विराजमान होतात, त्या स्थानी आज विद्यार्थ्यांनी बसून प्रक्षेपण प्रक्रिया समजून घेतली, असे गौरोउद् गार डॉ सविता बिरगे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले.

------------------------------------

ब्रिगेडियर श्री.सुधीर सावंत यांच्या हस्ते माजी सैनिक फेडरेशनच्या पदाधिकारी यांची नियुक्ती

 मुख्य संपादक आशिष मुगटकर

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी 

माजी सैनिकांचे मार्गदर्शक ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तालुका वसमत नगरी मध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा मा. आमदार, मा.खासदार  देशातील सर्व माजी सैनिकांचे प्रेरणास्थान भारतीय सेना मध्ये महिलांना भरती करण्यासाठी तत्कालीन सरकारला भाग पाडणारे तथा पुनर्नियुक्त माजी सैनिकांना योग्य सन्मान मिळऊन देनारे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळे मध्ये पी टी चा शिक्षक हा माजी सैनिक असावा हे शासनाकडून जीआर काढून मान्यता मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.

याच सैनिक फेडरेशनच्या नुतन पदाधिकारी यांना ब्रिगेडियर श्री. सुधीर सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.व पुढील वाटचाल करीत शुभेच्छा दिल्या.

आज नव्यानेच सैनिक फेडरेशन महिला नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले सौ. ललिता कुंभार ताई, नांदेड जिल्हा सैनिक फेडरेशन चे मार्गदर्शक पदी मुदखेड येथील ज्येष्ठ माजी सैनिक प्रभू घोंगडे, सैनिक फेडरेशन मुदखेड तालुका मार्गदर्शक पदी श्री माधवराव पवार पाटील, यवतमाळ जिल्हा पोलीस मध्ये नव्यानेच नियुक्ती झालेले तसेच सैनिक फेडरेशन मुखेड शहराध्यक्ष पदी गोविंद कवटीकवार , व वसमत तालुक्यातील अनेक माजी सैनिकांची नियुक्ती केली, वरील नियुक्तीपत्र श्री ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मा. उपनगर अध्यक्ष नगरपरिषद मुदखेड श्री लक्ष्मण देवदे . माजी सैनिक पुनर्गठन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड शहराचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी श्री हयून पठाण, सैनिक फेडरेशनचे लोकप्रिय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा ता.मुखेड येथील प्रसिद्ध "राजे छत्रपती अकॅडमी" सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री ज्ञानेश्वर पाटील डुमणे, सह सैनिक फेडरेशनच्या विभागीय कार्यक्रमासाठी वसमत, हिंगोली जिल्ह्यातील शेकडो माजी सैनिक उपस्थित होते..

नांदेडच्या ५० विद्यार्थ्यांना घडणार हवाईसफर

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नांदेड  जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरावर झालेल्या परीक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगळुरू येथे सहलीसाठी निवड करण्यात आली असून, रविवार, १४ मे रोजी हे विद्यार्थी सहलीसाठी रवाना होणार आहेत. जिल्ह्यात शाळास्तरावर झालेल्या परीक्षेला ७४ हजार ७४४ विद्यार्थी सामोरे गेले होते. यात प्रत्येक तालुक्यातील तीन, अशा एकूण ५० जणांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था व परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यासाठी निवड झाली आहे. १४ मे रोजी ५० विद्यार्थी, शिक्षण विभागातील.... अधिकारी आणि .... शिक्षक, असे एकूण ६० जण विमानाने रवाना होणार असून, २२ मे रोजी नांदेडला परत येणार आहेत. या सहलीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था, तसेच परिसरातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ब्लेझर, शूजसह हवाई सफरीचा खर्च जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात येणार आहे.  

विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये शाळास्तरावर ७४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तसेच केंद्र स्तरावर २०,००० व तालुकास्तरावर १ हजार ९०० आणि जिल्हास्तरावर गुरूकुल ईग्लीश मिडियम स्कूल ,नांदेड येथे १० मार्च रोजी झालेल्या परीक्षेला १६७विद्यार्थी सामोरे गेले. यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण घेणारे तीन विद्यार्थी हवाई सफरीसाठी निवडण्यात आले आहेत. जि.प.च्या सेस फंडातून या सहलीसाठी खर्च करण्यात येणार असून, सीईओ सौ.वर्षा ठाकुर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मे ते २२ मे या कालावधीत सहलीचे नियोजन करण्यात असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॕ.सविता बिरगे यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांची उपस्थिती होती.

नांदेडला जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा.

 परिचारिका: आरोग्य सेवेचे अखंड व्रत 

मुख्य संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून  पंडित दीनदयाळ उपाध्याय शैक्षणिक सेवाभावी संस्था व नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संयोजिका माहेश्वरी संजय कौडगे व राजेश्री भास्कर डोईबळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर दीपक कोठारी विभागीय अध्यक्ष,शंतनू कोडगिरे जिल्हा अध्यक्ष, लक्ष्मण क्षीरसागर मा.जिल्हा अध्यक्ष,चंदा रावळकर नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक,ज्ञानेश्वरी चव्हाण PHN, आपटे लक्ष्मीबाई आधिसेविका, सुप्रिया बेटमोगरेकर, डॉ. शेखर चौधरी, सनतकुमार महाजन ,प्राचार्य संभाजी सूर्यवंशी ,माणिक लांडगे,पिसाळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

परिचारिका हा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणारी रुग्णांना धीर देणारी व त्याचे मनोबल उंचावणारी रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनवून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहते या परिचारिका विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असे प्रस्ताविक मध्ये बोलताना  भास्कर डोईबळे यांनी सांगितले.या कार्यक्रमात दोन विशेष सत्कार करण्यात आले पार्वती लष्करे यांची मुंबई येथे परिचारिका म्हणून निवड झाली तर अष्टगाथा कळवणे यांची पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस  म्हणून नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 




इंटरनॅशनल कौन्सलिंग ऑफ नर्सेस २०२३ च्या वतीने यावर्षी आमच्या परिचारिका - आपले  भविष्य यंदाची थीम घेऊन सर्व नर्सिंग यांना प्रमाणपत्र देण्यात आले.आपण एखाद्या रुग्णालय जातो तेव्हा आपणास तिथे अनेक परिचारिका किंवा नर्सेस पहावयास  मिळतात.कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टर पेक्षा अधिक काळ परिचारिकांच्या देखरेख खाली असतो डॉक्टरांचे आधी त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सामोरे जाऊन आधार व मानसिक धैर्य देण्याचे काम परिचारिका सदैव करत असतात अशी असे मत  दीपक कोठारी  यांनी व्यक्त केली. दैनंदिन मध्ये येणाऱ्या अडचणी व त्यावर योग्य आणि परिचारिकेच्या विषयी मनात असलेली भीती आपटे लक्ष्मीबाई यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली व त्यातून परिचारिका यांचे मनोधर्य वाढवले.आरोग्य यांचे मोठ्या समूह व मजबूत कणा म्हणून परिचारिका ओळखले जाते परिचारिका या डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहेत असे लक्ष्मण क्षीरसागर यांनी मत व्यक्त केले. 

सांसर्गिक रोगाचा  प्रसार रोखण्यासाठी दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचाव्यात, आरोग्यसेवा वितरणात ,नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य, पुरवण्यासाठी परिचारिका सदैव तत्पर असतात त्यांनी स्वतःची क्षमता ओळखून मोठ्या प्रमाणात काम करावे अशी प्रतिपादन चंदा रावळकर सांगितले. परिचारिकांना मानवी वर्तणूक रुग्णांना घेणे प्रामाणिक व आतक परिश्रम दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे समजण्याची भावना, सौजन्य, सेवाभाव , ममत्व,  सदैव तत्परता,जबाबदारी स्वीकारणे ,सहकार्याची भावना संभाषण कौशल्य , स्वयंशिस्त इत्यादी गुण व कौशल्या असावी  लागतात हे मी स्वतः डॉक्टर असल्याने सर्व परिचारिका मध्ये गुण पाहत आहे.तरी पण  सरकारी रुग्णालयापेक्षा खाजगी रुग्णालयामध्ये वेतन कमी भेटते अशी खंत पण व्यक्त केली सेवा देत असताना त्यांना जास्त  वेतन मिळाले पाहिजे असे मत डॉ. शेखर चौधरी यांनी मांडले. यावेळी  अमित शर्मा. गंगाधर कोलमवार,भालचंद्र डोईबळे ,अंकिता कामटिकर,गगन येमेकर,गौरव वाळिंबे, अष्टगाथा कळवणे ,भाग्यश्री खांडरे,मेघा गिरी,पार्वती लष्करे यांनी  हा कार्यक्रम यशस्वी केला.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदणी राजबोस,सुनीता जागलेकर यांनी तर आभार प्रदर्शन गंगाधर कोलमवार यांनी केलं.

चिलपिंपरी येथील दोन बांधकाम मजुरांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

 मुख्य संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार  
मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे बांधकाम करणाऱ्या दोन मिस्त्रीं मजुरांचा विजेचा शॉक लागून हृदय द्रावक मृत्यू झाल्याची घटना ११ मे रोजी दुपारी २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान घडली . या दुर्घटनेत गावातील युवक केशव भागवत गाडे हा तरुण देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की चिलपिंपरी येथे हरी गाडे यांच्या घरकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी गावातील बांधकाम मिस्त्री पुंडाजी बाबाराव गाडे वय २५ वर्ष व संभाजी आनंदा गाडे हे वय २४ वर्ष हे दोघे बांधकाम करीत होते त्यादरम्यान बांधकामासाठीचे पिलर उभे करत असताना त्याचा झोक गेल्यामुळे सदरचे पिल्लर लगत असलेल्या विद्युत तारावर धडकले त्यामुळे क्षणार्धात आग डोंब उसळला आणि सदरच्या दुर्दैवी घटनेत सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या दोन्ही मिस्त्री बांधकाम करणाऱ्या मजुरांचा हृदय द्रावक मृत्यू झाला. 

गावामध्ये सदर घटना वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर संबंधितांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आली. 

पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे यांना सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून पत्रकार संजय कोलते यांनी दिली.त्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे .का.चंद्रशेखर मुंडे ,पो.हे. का. बालाजी गीते ,विनायक मठपती, हे तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.मयत दोन्ही इसमांच्या नातेवाईकांनी दिलेल्या जवाब वरून पोलिसांनी तातडीने पंचनामा केला.

 ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री राठोड यांनी त्यांच्या प्रेताचे शेव विच्छेदन केले त्यानंतर दोन्ही प्रेते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आली आणि या दुर्घटने बाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडून चिलपिंपरी येथे दोन्ही मयतांच्या पार्थिव देहावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 





दिव्यांगांच्या विकास कामी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना गायकवाडानी घातले साकडे

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



 नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

 नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ सशक्तीकरण अभियानाच्या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माझी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे नांदेड येथे आले असताना भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी मराठवाडा विभागाचे प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिव्यांग समान संधी हक्क व  पुनर्वसन संरक्षण  कायद्यान्वये दिव्यांग व्यक्ती व विकास कामी राज्यातील खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग विकास व पुनर्वसन कामासाठी पाच टक्के विकास निधी खर्च करणे अपेक्षित असताना. राज्यात अशा प्रकारचा खर्च कुठेही होताना दिसत नाही. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांगांची लोकसंख्या 5% असताना, अजूनही दिव्यांगांची फार मोठ्या प्रमाणात उपेक्षाच पहावयास मिळते. ही उपेक्षा कमी करण्यासाठी केवळ सरकारने प्रयत्न करून चालणार नाही तर राज्यातील सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे जर झाले तरच राज्यातील दिव्यांग व्यक्ती व पुनर्वसन होणे शक्य आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने किमान भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर कमळ चिन्ह घेऊन निवडून आलेल्या खासदार व आमदारांना तरी दिव्यांग व्यक्ती व पुनर्वसन विकास कामी  स्थानिक आमदार व खासदार निधीतून पाच टक्के निधी खर्च करावा अशा लेखी सूचना सर्व राज्यातील खासदार आमदारांना द्याव्यात असे साकडे भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी मराठवाडा विभागाचे प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घातले आहे. या मागणी वर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष काय ठोस भूमिका घेतील याकडे राज्यातील सर्व दिव्यांगाचे लक्ष लागून आहे.

हदगाव आम आदमी पार्टीच्या पत्रकार सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



हदगाव ( प्रतिनिधी ) /भगवान देशमुख 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून खऱ्या अर्थाने बौद्धिक विचारसरणी पेरणाऱ्या पत्रकार , वृत्तपत्र विक्रेते , लेखक , कवी , सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान पूर्वक सत्काराचे आयोजन दि ०३ मे २०२३ रोजी गुरु रविदास सांस्कृतिक सभागृहात आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगावच्या वतीने आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर कदम पाटील पांगरिकर  तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मा. जगन्नाथ पवार , उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार मा. बी. बी . हंबर्डे , पोलीस इंस्पेक्टर मोरे साहेब , नांदेड विधान अध्यक्ष मा .ऑड जगजीवन भेदे साहेब , आप युवा कार्यकर्ते मा संदीप राठोड , सामाजिक कार्यकर्ते  तथा तळणीचे सरपंच मा कपिल तावडे , मा. अतुल थडके ,आप जिल्हा सदस्य मा सुदाम पाईकराव हे उपस्थित होते.



अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकार , कवी ,लेखक , वृत्तपत्र विक्रेते , सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मानपत्र , पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी  मा . पंडितराव पतंगे , मा .चांद पाशा , मा .धर्मराज गायकवाड , मा .अरविंद जाधव , मा. संदीप तुपकरी , मा.दादासाहेब शेळके (सामाजिक कार्यकर्ते ) , मा. कॉम्रेड शाम लाहोटी , इस्माईल पिंजारी , मा .राजेश मामीडवार , या विविध पत्रकार संघटनेच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला . तसेच लगेच युधिष्ठिर देवसरकर , सुरेश जाधव , गौतम कदम , अब्दुला चाऊस , सतिष जारंडे , विकास राठोड , दादाराव खंदारे , सुनील बाराटे , अभिजित देवसरकर , दिपक सुर्यवंशी , के. पी. सोनसळे , गजानन जिद्देवार , शेख शहबाज , मारोती काकडे , भगवान कदम , महेंद्र धोंगडे , चंद्रकांत भोरे , गजानन सुकापुरे , विजय कोल्हे , गौतम वाठोरे , शरद कदम , दिलीप सोनाळे , भगवान शेळके , युनूस सय्यद , संदीप वानखेडे , प्रभाकर दहीभाते , पंजाब सुर्यवंशी , रामेश्वर बोरकर , बंडू माटाळकर , संदीप कदम , राजेश खंदारे ,  राजेश राऊत , दायमा दादा पळसेकर , प्रकाश नरवाडे , बंडू तावडे ,  साबणे दादा , बाळूदादा  शिंदे , आदर्श शेतकरी कबिरदास कदम , आदी अनेक सामाजिक कार्यकर्ते , लेखक , कवी , वृत्तपत्र विक्रेते , पत्रकार , प्रिंट मीडिया , इलेक्ट्रॉनिक मिडीया आदी बांधनाचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी मा बी .बी हंबर्डे साहेब , पी .आय . जगन्नाथ पवार साहेब , मा कॉम्रेड शाम लाहोटी , मा धर्मराज गायकवाड , मा .राजेश राऊत , मा ऍड भेदे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप जिल्हाध्यक्ष मा ज्ञानेश्वर कदम पाटील पांगरिकर यांनी केला या संचलन  कार्याध्यक्ष ऍड रविकुमार सुर्यवंशी , शिवाजी जोजार , नागोराव गंगासागर , यांनी केले तर आभार प्रदर्शन मा ऍड के आर राऊत सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास देशमुख ,  मा बापूराव कदम पाटील साप्तीकर , संदीप कदम , माधवराव सुर्यवंशी , गिरीश गायकवाड , शेख यासिन , योगेश दमकोंडवार (युवा तालुका अध्यक्ष आप हदगाव )यांसह अनेक आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी केले . 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रीतीभोज सहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली .

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी अमोल टेकले तर शहराध्यक्षपदी शिवाजी एडके यांचे नियुक्ती

 मुख्य संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 

ग्रामीण पत्रकारांसाठी लढा देणारी अखिल भारतीय स्तरावरील संघटना म्हणून परिचयास असलेली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ अमरावती ही अनेक वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी लढणारी संघटना आहे. 

या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ही संघटना कार्यरत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुदखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मुदखेड तालुक्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.त्यामध्ये  मुदखेड तालुकाध्यक्षपदी अमोल टेकले (वैजापूर पार्डी), तालुका महासचिव पदी प्रल्हाद मस्के (डोणगावकर) यांची निवड करण्यात आली.



मुदखेड शहराध्यक्षपदी शिवाजी एडके यांची निवड करण्यात आली.


 यावेळी निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना मान्यवर मंडळीच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. येणाऱ्या काळात तालुक्यातील व शहरातील उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका लवकरच करण्यात येतील असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या या निवडीमुळे अनेक ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख मनोजजी कामटे, जिल्हाध्यक्ष शुध्दोधन हनवते, जिल्हा महासचिव आशिष कल्याणे पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

लोकप्रिय बातम्या