नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ सशक्तीकरण अभियानाच्या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माझी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे नांदेड येथे आले असताना भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी मराठवाडा विभागाचे प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिव्यांग समान संधी हक्क व पुनर्वसन संरक्षण कायद्यान्वये दिव्यांग व्यक्ती व विकास कामी राज्यातील खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग विकास व पुनर्वसन कामासाठी पाच टक्के विकास निधी खर्च करणे अपेक्षित असताना. राज्यात अशा प्रकारचा खर्च कुठेही होताना दिसत नाही. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांगांची लोकसंख्या 5% असताना, अजूनही दिव्यांगांची फार मोठ्या प्रमाणात उपेक्षाच पहावयास मिळते. ही उपेक्षा कमी करण्यासाठी केवळ सरकारने प्रयत्न करून चालणार नाही तर राज्यातील सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे जर झाले तरच राज्यातील दिव्यांग व्यक्ती व पुनर्वसन होणे शक्य आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने किमान भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर कमळ चिन्ह घेऊन निवडून आलेल्या खासदार व आमदारांना तरी दिव्यांग व्यक्ती व पुनर्वसन विकास कामी स्थानिक आमदार व खासदार निधीतून पाच टक्के निधी खर्च करावा अशा लेखी सूचना सर्व राज्यातील खासदार आमदारांना द्याव्यात असे साकडे भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी मराठवाडा विभागाचे प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घातले आहे. या मागणी वर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष काय ठोस भूमिका घेतील याकडे राज्यातील सर्व दिव्यांगाचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा