शेवाळा येथे मा.अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 संपादक आशिष मुगटकर


कळमनुरी / तालुका प्रतिनिधी

 कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील गावचे लाडके जावाई माजी.अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीरभाऊ_मुनगंटीवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला.

         शेवाळा ग्रामस्थांच्या वतीने गावातील आयादेव मंदिर देवस्थान येथे विविध प्रकारच्या रोपांचे  वृक्षारोपण करून माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष सुधीरभाऊ_मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये वड,पिंपळ, लिंबोळी या रोपांच्या वृक्षांची लागवड याठिकाणी करण्यात आली.



        वृक्षारोपनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावकरी मंडळीच्या हस्ते वृक्षारोपण करुन हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. 



      यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला माजी उपसभापती गोपू पाटील सावंत, माजी जी प सदस्य प्रल्हाद पाटील सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंद्वार, संजयराव सूर्यवंशी,दिलीपराव कल्याणकर,चंद्रकांत सूर्यवंशी,रुपेश सूर्यवंशी,विजय सूर्यवंशी,राजेश सूर्यवंशी,राजेश्वर व्यवहारे,मधुकर चेटप,माधवराव सावंत,बालाजी सूर्यवंशी,विठ्ठल सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी,अशोक रायेवार,प्रशांत खरवडकर,बालाजी सूर्यवंशी,संदीप सावंत,तुषार सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी,प्रदीप सावंत,समीर सूर्यवंशी,भगवान सूर्यवंशी,सुजय सूर्यवंशी,किरण सूर्यवंशी व इतर गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

स्टेट बँक ऑफ इंडिया मुदखेड च्या मार्फत "राष्ट्रीय लोक अदालत" चे आयोजन

१ ऑगस्ट रोजी लोक अदालत मध्ये प्रलंबित कर्ज आणि एक रक्कमी परतफेड या योजनेचा लाभ घ्यावा - सुधीर करांडे

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड शहर प्रतिनिधी / अतीख अहेमद

     मुदखेड शहरामध्ये  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये १ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक सुधीर करांडे यांनी सांगताना दिली.

पुढे बोलताना करांडे यांनी सांगितले की एक ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतिचे  आयोजन करून तालुक्यातील कर्जा संबंधी प्रलंबित असलेले प्रकरण निकाल काढण्यासाठी या लोक अदालतिचे आयोजन केले. कर्जदारांनी काही कारणास्तव कर्जाची परतफेड ठराविक मुदतीत  नाही केले किंवा वेळेवर करू शकले नाही त्यांनी या लोक अदालतिच्या माध्यमांतून बँकेत येणून संबंधित व्यक्तीला भेटून आपली जे काही प्रकरण आहे. त्या संबंधी चर्चा करावी आणि चर्चेअंती जे काही ठरल त्याअनुषंगाने प्रलंबित कर्ज निकाली अंती एक रक्कम फेडून कायमस्वरूपी आपला कर्जाचे प्रकरण बंद करून घ्यावे. 

   भविष्यात आपल्या बँकेशी व्यवहार मुल्यांक करून पुढे कर्ज काढण्यासाठी सुध्दा विचार करू असे  पत्रकारांना सांगितले तरी या लोक अदालत मध्ये प्रलंबित असलेले कर्ज या निकाली काढण्यासाठी आपण स्वतःहुन लाभ घ्यावा प्रलंबित असलेल कर्ज परतफेड करुण बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन करांडे यांनी केल.

श्रीराम मूर्ती स्थापना दिवस न्याहाळीत साजरा

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

              मुदखेड शहरातील न्याहळी येथील मारोती मंदिर शेजारी असलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती स्थापन प्रथम वर्ष दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

    करोना ची महामारी लवकरात लवकर संपून सामान्य नागरिक शेतकरी, नोकरदार , व्यापारी, नागरिकांना मुक्ती मिळावी तसेच राम राज्य पुन्हा निर्माण व्हावे ही संकल्पना हाती घेऊन मंदिर संस्थांनी दि.२९ जूलै रोजी सायंकाळी ०६ वाजता प्रभू श्रीराम पाठण अविनाश महाराज कुलकर्णी यांनी केले व सर्वांच्या उपस्थित हनुमान चालीसा वाचन करून आरतीला सुरुवात झाली.


मारुती मंदिर संस्थान चे अध्यक्ष ईश्वर पिन्नलवार व कार्याध्यक्ष मारोतराव तोटावाड यांनी प्रभू श्रीरामाची पूजन करून आरती करण्यात आली.


            या मंदिराचे पुजारी रामदास महाराज, बालाजी पावडे, गंगाधर तोटावाड, साहेबराव पावडे, भिमराव महादवाड, गिरीश कोतावार, शुभम बोडके, नितीन आडाणे, राम जोशी, नामदेव काहळेकर, रमेश दगडफोडे, प्रल्हाद कवडे, नागोराव कवडे, गजानन तोटावाड, वैजनाथ कवडे, गंगाधर मेडेवाड, मानसीग गीरी, उत्तम महादवाड, भगवान बाचेवाड, शुभम देशमुख, जनार्दन तोटावाड यांच्या सह महीला उपस्थितीत होते.

           श्रीराम मूर्ती स्थापना दिवसाच्या निमित्ताने मंदिर परिसराला फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते.

खुजडा येथील दलीत वस्तीत सीसी रोडचे भूमिपूजन

  संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

             मुदखेड तालुक्यातील  खुजडा गावात दलित वस्ती मध्ये विकास कामे करण्यासाठी शासनाकडून ८ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.त्यात  सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी हा निधी वापरला जानार आहे.  

               या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, बाबाराव पा कुरे, मा,उपसरपंच मानीका पा कुरे, तेजेराव पा कुरे, केशेव पा कुरे,सरपंच भिमराव पवार, माली पाटिल, शामराव कुरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.



   शिवसेना तालुका प्रमुख तथा खुजडा ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी संजय पाटील कुरे यांनी गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. गावात अनेक विकास कामाला सुरुवात केली. गावच्या विकासासाठी ते निधी खेचून आनत आहेत.गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे असे ते म्हणाले.

        यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारोती चिलमवाड, माधव पा कुरे, राजधुत पा कुरे, चेअरमन व्यंकटी कुरे,शामराव कुरे, बालाजी कुरे, संतोष कुरे, मुनीर शेख, होगु पयलान,ग्यानोबा कुरे, संभाजी कुरे, शिवाजी कुरे, दिगाबंर पवार, बाबाराव पवार, श्रीहारी कुरे, नामदेव कुरे, हानमंत कुरे, बालाजी चिलमवाड, मारोती दतलवाड,ईशाक शेख,यशवंत पवार, प्रल्हाद कुरे,जकोजी कुरे, सुरेश कुरे, गौतम पवार, व अन्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

नायगाव राष्ट्रवादी काँग्रेस कडून पुरग्रस्तासाठी मदत फेरी



नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात जीवित व नैसर्गिक हानी झालेली आहे.संकट काळात एकमेकांना मदत व सहकार्य करणे म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणे होय.याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नायगाव तालुकाध्यक्ष मा.भास्कर दादा भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मदत फेरी नायगाव शहराच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली.


          यावेळी नैसर्गिक आपत्तीतुन सावरण्यासाठी बाजारपेठेतील नागरिकांनी स्वयंम स्फुर्तीने समोर येऊन सढळ हाताने मदत करत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्याची मदत एकत्रित करून जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयाच्या माध्यमातून पिडीत पुरग्रस्तांन पर्यत पोहचवली जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे यांनी दिली आहे.

                        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वसंत सुगावे पाटील,श्यामराव पा. चोंडे, विश्वनाथ पा. बंडूरे,गजानन पा.होटाळकर,मारोती कदम,माधव कोरे,युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव,कैलास पा. जाधव,साहेबराव पा. कांडाळकर,जगण जाधव,मारोतराव वड्डे, जळबा सूर्यवंशी,गोविंद पा. कवळे, माधवराव बेंद्रीकर,अंबादास गोरे,राजू सूर्यवंशी,सुधाकर कोकणे,दशरथ इरेवाड,अखिल चोंडे यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुगट शाळेतील विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत चमकले.

संपादक आशिष मुगटकर 


मुगट / प्रतिनिधी

          मुगट येथील जिल्हा परिषद शाळेतील ११ पैकी ६ विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

     या परिक्षेत कु.शीतल गजानन कल्याणे, पवार प्रनव प्रभाकर,डाके ज्ञानेश्वर नरहारी, हाटकर ऋषीकेश गंगाधर, हाटकर यश चंद्रकांत, हाटकर प्रनव प्रकाश हे विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ एप्रिल रोजी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम. एस) ची परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात आली होती मुदखेड तालुक्यातील अनेक शाळांनी यात सहभाग घेतला होता. या परीक्षेमध्ये मुगट जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यावर्षी चमकले आहेत.

      प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळेने या वर्षीच्या परीक्षेत चांगलेच यश संपादन केले आहे. कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्याने घरी राहून या परीक्षेचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला व वेळोवेळी विषय शिक्षकांचे मार्गदर्शनामुळे या परिक्षेत विद्यार्थ्यांना चांगले घवघवीत यश संपादन करता आले. 

   परिक्षेसाठी शाळेतील एकच मुलगी व दहा मुले असे एकूण अकरा विद्यार्थी या परीक्षेत बसले होते. त्यात माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा पाटील कल्याणे यांची मुलगी शितल कल्याणे ही एकच मुलगी शाळेतून परीक्षेत बसली होती तीने या परीक्षेत यश संपादन केले आहे.

सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक सौ अरुणाताई कल्याणे (जिल्हा परिषद सदस्य) भीमराव पा. कल्याणे (संचालक), कांताबाई वंजे सरपंच, जिजाबाई कल्याणे( उपसरपंच), प्रल्हाद कल्याणे, दादा पाटील कल्याणे, तुकाराम मुंगरे( मुख्याध्यापक) सर्व शिक्षक व कर्मचारी ,पालक यांनी केले आहे.  

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारड येथे १११११ वृक्षांचे वृक्षारोपण

 शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण.

संपादक आशिष मुगटकर

वृक्षारोपण :- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करताना उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख, माणिक लोमटे व इतर मान्यवर मंडळी.


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

       शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारड ग्राम पंचायत चे उपसरपंच यांच्या संकल्पने आणि सरपंच व सदस्य यांच्या ठरावाद्वारे बारड गट क्र.१६५ मध्ये आज १११११ वृक्ष लागवडीचा ऐतिहासिक कार्यक्रम हाती घेतला.

              भोकर उपविभागीय अधिकारी श्री राजेन्द्र खंदारे साहेब यांच्या हस्ते पहिले झाड लावून वृक्षारोपण कार्यकमाचा शुभारंभ करण्यात आला .


 

   " या वेळी मनोगत व्यक्त करताना मतदारसंघात शिवसेना नविन उपक्रम हाती घेत आहे हे नेते बाळासाहेब देशमुखांनी प्रारंभी स्पष्ट केले . मी माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व बारड ग्रामस्थांनी व परिसरातील शिवसैनिकांनी मानवाच्या उपयोगात येईल असे वृक्षारोपण करून शुभेच्छा दिली.शिवसेना व काॅगेस आणि राष्ट्रवादी काॅगेस च्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कडुन एकोप्याने सर्वसामान्यांचा विकास व्हावा या साठी मी एकोप्या साठी योगदान देत आहे असा खुलासा केला ."

            सरपंच श्री. प्रभाकरराव आठवले बारडचे उपसरपंच तथा शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख , तंटामुक्ती अध्यक्ष नरहरी आठवले, सोसायटीचे चेअरमन रघुनाथराव देशमुख, किशोर देशमुख, सेवानिवृत्त वन अधिकारी किसनराव देशमुख, विलासराव देशमुख , माजी शिवसेना तालुका प्रमुख मानिक लोमटे, टिप्परसे , जिल्हा परिषद शाळेचे मुअ तळणीकर मॅडम , माहुरकर सर , शिक्षक बोनलेवाड , जामा मशिद सदर शेख दौलतसाब , मझहर शेख, गणपत शिंदे नागेलीकर ,बाळासाहेब गव्हाणे,दिगांबर पाटील,संजय पुयड नागेली चेअरमन. खांडरे तिरकसवाडीकर , बारड तलाठी बार्शीकर मॅडम, ग्राम विकास अधिकारी अनुप श्रीवास्तव व ग्राम पंचायत कर्मचारी ,अंगणवाडी सेविका व मदतनीस छायाचित्र कार संदिप शिंगणे , वच्चेवार तथा ग्रामपंचायतीचे पूर्ण सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. 





मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलिस दलात वृक्षारोपण

संपादक आशिष मुगटकर

वृक्षारोपण :- केंद्रीय प्रशिक्षण संस्था मुदखेड येथे वृक्षारोपण करताना
संस्थेचे कमांडंट , लीलाधर महरनिया व प्रादेशिक कुटुंब कल्याण समूहाचे अध्यक्ष संतोष देवी , अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते.


मुदखेड शहर प्रतिनिधी/ आतिख अहेमद

            मुदखेड नांदेड येथील केंद्रीय प्रशिक्षण संस्था केंद्रीय राखीव पोलीस दल, वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत या संस्थेच्या आवारात आणि यावर्षी ५००० वर्षांच्या लागवडीचे उद्दीष्ट पुढे ठेवत आणि मान्सून हंगामानिमित्त आज २५ जुलै २०२१ रोजी संस्थेचे कमांडंट , लीलाधर महरनिया  व प्रादेशिक कुटुंब कल्याण समूहाचे अध्यक्ष संतोष देवी आणि संस्थेच्या कमांडेंट  लीलाधर महरनिया यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगताना म्हणाले की, वातावरण सुंदर आणि छान ठेवण्यासाठी आपण वृक्षारोपण करणे सुरूच ठेवले पाहिजे आणि दिवसा त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे. दिवसेंदिवस आपण आपल्या मुलांनाही पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक आणि संवेदनशील बनवायला हवे, प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचे रक्षण व समृद्धीचे संकल्प देखील घ्यावेत, आपल्या आयुष्यात चांगले जीवन हवे असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे आमच्या मुलांचे या झाडांप्रमाणेच आणि वनस्पतींचेही पालनपोषण करावे लागेल कारण शुद्ध हवा आणि ऑक्सिजनशिवाय मानवी जीवन अशक्य आहे.


त्यानंतर, कॅम्पसमधील सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, बिहार विशेष सशस्त्र पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचारी (महिला कमांडो कोर्स), जवान आणि त्यांच्या कुटुंबियांनी कडुनिंब, करंज लिंबाचं, सीताफळ, गुलमोहर, आवळा इत्यादींची सुमारे ५०० रोपे लावली. याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि जवानांना स्वतंत्रपणे देण्यात आली आहे, त्याशिवाय जवानांच्या  घराच्या आजूबाजूला लावलेल्या वनस्पतींची देखभाल करण्याची जबाबदारी कुटुंबात राहणारे  कुटूंबांवर सोपविण्यात आली होती. 


यावेळी सीएमओ एसजी डॉ. दिनेश कुमार मिश्रा, डेप्युटी कमांडर ब्रिजमोहन राठोड, डेप्युटी कमांडर रूपेश कुमार आणि सहाय्यक उप कमांडर पुरुषोत्तम राजगढ़कर , वैदकीय अधिकारी डॉ. मोहम्मद सरफराज सहित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि  यांच्यासह सर्व जवान, त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

अवैद्य दारूची मुगट मध्ये खुलेआम विक्री.

 किराणा दुकान,पाणटपरी, घराच्या आड खुलेआम दारुची विक्री

संपादक आशिष मुगटकर



    मुदखेड / तालुका प्रतिनिधी

               मुगट येथील मुख्य रस्त्यावर ( नवी आबादी) पान टपरी, किराणा दुकान, घरातून अवैद्य दारूची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. या अवैद्य दारूची विक्रीची दुकाने दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्हा परिषद शाळे पासून केवळ दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर व मुदखेड मुख्य रस्त्यावर एक नाही दोन नाही तर दहा ते बारा ठिकाणावरून अवैद्य दारूची जोमाने विक्री होत आहे.

      हा सर्व व्यवसाय मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे अनेक लोक या मुख्य रस्त्यावर आपली वाहने उभी करून दारू सेवन करत आहे. रात्रीच्या वेळेस दारुड्यांचा बाजार भरल्यासारखा दिसतो हा सर्व व्यवहार शासकीय अधिकाऱ्यांचे हात ओली करून चालत आहे.असे दारू विक्री करणारे म्हनत आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क चे अधिकारी केवळ महिन्याला भेटीसाठी येतात त्यामुळेच या अवैद्य दारूची दुकाने दिवसेंदिवस वाढतच आहे. असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

    त्यामुळे या परिसरात व शेजारी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . काम न करण्याच्या वृत्तीमुळे या दारूच्या व्यवसायाकडे अनेक लोक वळत आहेत.परिसरातील खांबाळा धनज,सरेगाव,आमदुरा तसेच नांदेड, मुदखेड, उमरी प्रवास करणारे अनेक तळीराम या ठिकाणी दारू पिण्यासाठी विशेष थांबा घेत आहेत. त्यामुळे रात्रीला या मुख्य रस्त्यावर चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहेत. 

          अवैद्य दारू दुकानाला मुदखेड, नांदेड येथून दारूचा सुरळीत पुरवठा चारचाकी व दुचाकी वाहनाने दररोज केला जातो तर मुदखेड येथील काही तांड्यावर ऊन गावठी दारूचा पुरवठा सुद्धा केला जातो.             

          या व्यवसायात दिवसेंदिवस अनेकजण उतरत आहेत त्यामुळे मुगट मध्ये दारू विक्री करणाऱ्या मध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे.त्यामुळे दारूचे दर कमी करुन दारुची विक्री सुरू आहे.                                 गावातील कमी वयातील मुलं या दारूच्या व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे गावात गुंड प्रवृत्तीची मुले भांडणे, तंटे घडून येत आहे. याच मुख्य रस्त्यावरील दारूच्या दुकानात पेट्रोल पंपावरील चोरी करून चोर या ठिकाणी रात्रीला दारू पीत बसले होते अशी गावात चर्चा आहे.

     गावातील ही अवैद्य दारूची दुकाने बंद करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेणार की नाही या बद्दल प्रश्न च आहे. तरीसुद्धा प्रशासनाने व संबंधित विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन गावातील अवैध दारूची दुकाने कायमची बंद करावी अशी मागणी गावातील ज्येष्ठ मंडळीकडून होत आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त मुगट येथे ११११ वृक्षांचे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण.

 संपादक आशिष मुगटकर

वृक्षारोपण :- मुगट येथे वृक्षारोपण करताना राजेंद्र खंदारे उपविभागीय अधिकारी भोकर, भिमराव पा कल्याणे, प्रभाकर बुवा धाराशिवकर, माधवराव कल्याणे, ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थितीत होती.


मुगट /प्रतिनिधी

मुगट येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील श्री दत्त धाम संस्थान अवली बुवा माळ टेकडी या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार मुगट व ग्रामपंचायत कार्यालय मुगट च्या सहकार्याने ११११ वृक्षांचे वृक्षारोपण राजेंद्र खंदारे (उपविभागीय अधिकारी भोकर) यांच्या हस्ते करण्यात आले .

 श्री.दत्त मंदिरात प्रथम गुरू पुजन करण्यात आले नंतर या कार्यक्रमाची रूपरेषा व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले.नंतर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी राजेंद्र खंदारे, सुरेश बेंद्रे, भिमराव पा. कल्याणे, डॉ.शिवाजी स्वामी यांनी आपले गुरुपौर्णिमेचे महत्व व वृक्षारोपणाची काळाची असलेली गरज या विषयाचे महत्त्व उपस्थित लोकांना पटवून सांगितले.



 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्पण बुवा जालंधर, अशोक बुवा बाळापूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री दत्त धाम संस्थानचे संचालक प्रभाकर बुवा धाराशिवकर यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.



या कार्यक्रमाला भिमराव पा. कल्याणे, (जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी) धोंडीबा वंजे,(सरपंच प्रतिनिधी) माधवराव पा. कल्याणे, (तंटामुक्ती अध्यक्ष) गोपीनाथ मुंगल, मिनाक्षी मुंगल,(ग्रामसेवीका) शिवाजी मुंगल, सूर्यभान मुंगल, गणेशराव येळंबकर, संभाजी मुंगल गुरुजी, अंबादास मुंगल, धाराजी पवार, बालाजी मुंगल, अशोक मुंगल, विनायक खेडवनकर,विजय वाकडे,ओम कल्याणे, दादा कल्याणे,राम कल्याणे, दत्ता कल्याणे, नागोराव शेलगावकर, माधवराव कल्याणे, नागनाथ कदम, नागोराव गिरे,आडेराव साहेब, शामसुंदर मुंगल, गुलाबराव मुंगल, प्रदिप मुंगल,मृर्ताजी मुंगल, देवदत्त हाटकर, कैलास कल्याणे,वामन हाटकर, दत्ता जाधव सह गावातील अनेक युवक या वेळी मोठ्या संख्येने वृक्षारोपणा साठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे तर सुत्रसंचलन अनिल कुलकर्णी यांनी केले.

संत कृष्णा माता संजीवनी समाधी सोहळा साजरा

   संपादक आशिष मुगटकर

पालखी :- संत कृष्णा माता संजीवनी समाधी सोहळ्या निमित्ताने गावात पालखी फिरताना.


मुगट / प्रतिनिधी

                     मुगट येथील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत कृष्णामाता यांचा संजीवनी समाधी सोहळा देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी संपन्न होतो. मुगट व परिसरातील अनेक भक्त या निमित्ताने. मातेच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात.मागच्या वर्षी कोरोनामुळे अनेक भक्त दर्शना पासून वंचित राहीले होते.तर यावर्षी पाऊसामुळे अनेक भक्तांना येता आले नाही.

                संत कृष्णा माता यांच्या समाधी ची विधीवत पूजा अर्चा करण्यात आली.सायंकाळी माता पालखीत विराजमान होवून गावातील मुख्य मंदिराचे दर्शन घेत संत कृष्ण माता यांची पालखी शेवटी  मंदिरात येते. मुगट गावात अनेक देवतांची लहान मोठी हेमाडपंथी मंदिर आहेत.महाभारतात श्रीकृष्णाचे मुकुट या ठिकाणी पडले होते म्हणून या गावाचे नाव मुकुट व कालांतराने मुगुट व आज मुगट अशी दंतकथा सांगितली जाते.



                               गावात संत आत्माराम,संत देवगीर बुवा,माता फुलारी आई,संत आवली बुवा,उंबर खावल्ली,संत कृष्णा माता, कृष्ण मंदिर,शनि मंदिर,चौमुखी गणेश मंदिर, हेमाडपंथी शिव मंदिर अशी अनेक देवस्थाने आहेत.तर गावचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदीर आहे.                              गावातील प्रमुख मंदिरा पैकी संत कृष्णमाता मंदिर हे एक असून या ठिकाणी मातेची जिवंत समाधी घेतली आहे. मातेने याठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी जिवंत समाधी घेऊन पंढरपूर येथील आषाढी वारी ला गेलेल्या गावातील भक्तांना चंद्रभागेच्या  तीरावर आषाढी एकादशीच्या दिवशी भेट दिली व दृष्टांत दिला अशी आख्यायिका संत कृष्णामातेची सांगितली जाते. आजही आपल्या भक्तांना वेळोवेळी ती धावून येते  भक्तगण आपला अनुभव सांगतात.

आगामी निवडणुकीत विधानसभेवर शिवसेना चा भगवा फडकवू

  बारड येथील शिव संपर्क अभियान कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांचे प्रतिपादन

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचत नागरिकां च्या अडीअडचणी सोडवून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून भोकर विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकू असा विश्वास शिव संपर्क अभियान बारड येथील कार्यक्रमात बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे.

बारड येथे शिव संपर्क अभियाना अंतर्गत शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रम व शिवसेनिकाना मार्गदर्शन करण्यात आले आहे.


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली असून मुदखेड तालुक्यात दि.१७ पासून शिव संपर्क अभियान जोमाने सुरू करण्यात आले आहे.

तालुक्यातील मुगट ,माळकोठा, निवघा, बारड येथे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यावेळी भोकर विधानसभा नेते बाळासाहेब देशमुख बारडकर शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले , शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, जि.प.सदस्य बबनराव बारसे, परमेश्वर पांचाळ ,विश्वंभर पवार, पिंटू पाटील, आशोक कपाटे, माजी जि प सदस्य शिवाजी पाटील कस्तुरे ,बाळू पाटील ,माणिक लोमटे, सुरेश शेट्टे, आदी प्रमुख उपस्थित होते. 

पुढे बोंढारकर म्हणाले शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून गावा गावात फिरत असताना नागरिकांनचा प्रतिसाद मिळत असुन गाव पातळीवरील समस्या अडचणी जानुन घेत गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अडचणीचा निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले तर शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून गण वाईज बैठका घेऊन त्याठिकाणच्या समस्या जाणून घेत असल्याचे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर भोकर मतदारसंघात मोठे यश मिळणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी सरपंच प्रभाकर आठवले, अँड परमेश्वर पांचाळ, सचिन चंद्रे, सचिन माने, पिंटू पाटील वासरीकर, चेअरमन रघुनाथ देशमुख से.स.सो.चेअरमन किशोर ना. देशमुख, गुलाबराव देशमुख वाडीकर, श्यामजी वानखेडे, नरहरी आठवले आदीसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

बारड ते सरेगाव खड्डेमय रस्त्याला डपक्याचे रुपडे

   मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांची होते दमछाक!


खड्डेच खड्डे :-  बारड सरेगाव रस्ता की खड्ड्यात रस्ता असे चित्र पहायला दिसत आहे.

बारड / प्रतिनिधी

                बारड ते सरेगाव खड्डेमय रस्ता बनला असल्याने मोठ्या आकाराच्या खड्डयाने प्रवास करने जीवावर बेतले जात आहे. याच परिसरातील आठ ते दहा गावे याच मुख्य रस्त्याशी जोडले आहेत. या खेड्याच्या ग्रामस्थांची याच मुख्य रस्त्यावरून प्रवास करताना  दमछाक होत असून अनेक वेळा पडण्याच्या अपघाती घटना या ठिकाणी घडत असल्याने हा रस्ता कधी बनणार असा सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अनेक वेळा या रस्त्याबाबत दुधनवाडी, बोरगाव, सरेगाव, जवळा पाठक, जवळामुरार ,धनज ,पाथरड या ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत रस्ता मजबुतीकरण किंवा नूतनीकरणासाठी अनेक वेळा निवेदन दिले आहेत परंतु अद्याप या रस्त्याचा मुहूर्त लागला नसल्याने अल्प पावसातच रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे दररोज ये जा करण्यासाठी चा मुख्य रस्ता असलेल्या सरेगाव - बारड रस्त्यावर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. हा रस्ता तसा बायपास  रस्ता म्हणून नांदेड जाण्यासाठी वाहणधारकाना सोयीचा ठरला ठरला आहे परंतु रस्त्यावरील मोठ्या खंड्याने साचलेल्या डबक्यात रस्त्यावरून प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे

नांदेड शहराला तसेच बारड बाजारपेठ येथे जाण्या - येण्यासाठी बायपास व जवळचा रस्ता म्हणून मोठ्या प्रमाणात वाहणधारकानी पसंती दिली होती परंतु या रस्त्याची पण पार वाट लागली असून बारड ते नांदेड शहराला जोडणारा हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे .

परिसरातील या गावाना जाण्यासाठी तसेच ही मधील गावे रस्त्यावर जोडीली जावीत म्हणून पंतप्रधान सडक योजने अंतर्गत या रस्त्याची उभारणी करण्यात आली होती परंतु रस्ता होवून खुप वर्ष झाले आहे.

रस्तावर कुठल्याही प्रकारचे मेंटेनन्स केले गेले नसल्याने हा रस्ता पुर्ण पणे खड्डे मय झाला असल्याने याची झळ मात्र या रस्त्यावर असलेल्या दुधन वाडी, जवळा मुरार, जवळा फाटक, सरेगाव,बोरगाव देगाव, पाथरड, कारखाना, या गावाच्या ग्रामवासीया ना सोसण्याची वेळ आली आहे. बारड ते नांदेड या शहराला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने तसेच या परिसरात तील नागरिकाना रहदारीचा सोयीच्या एकमेव रस्ता खड्डे मय झाल्याने रस्त्यावर वाहनांची वाहतूक करताना अनेक अडचणी चा सामना करण्याची वेळ आली आहे.

बारड - सरेगाव रस्ता नांदेड शहरातील बारड भोकर कडे  जाणारे दैनंदिन कर्मचारी वातानु कूलित तसेच सोयीचा रस्ता असल्या कारणाने या रस्ताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो परंतु रस्ता दुरावस्था अवस्थेत असल्याने रस्त्यावरील गावकऱ्यांना जाण्यायेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बाकी लोकांनी या रस्त्याकडे वरून प्रवास करण्याकडे पाठ फिरवली आहे रस्त्यावरील खड्डयामुळे अनेक अपघात घडत असून मोठ्या खड्यामध्ये टूव्हीलर धारक पडताना च्या घटना घडत आहेत.

या परिसरातील नागरिकांनचा रहदारीचा मुख्य रस्ता चा प्रश्न गंभीर बनला असून बारड सरेगाव जवळामुरार जवळा पाठक हा रस्ता धनज मुगट ला जोडण्यात यावा तसेच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावी अशी मागणी बारड, सरेगाव,दुधनवाडी, जवळामुरार,पाथरड जवळाफाटक, धनज या ग्रामवासियाकडून करण्यात येत आहे.

शिवसेना शाखेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते उद् घाटन

    शिव संपर्क अभियानाला मुदखेड तालुक्यात चांगला प्रतिसाद !

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड येथे शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या शिव संपर्क अभियाना निमित्त शहरांमध्ये आज शिवसेना शाखेचे उद् घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

  या शिवसेना शाखा उद् घाटन प्रसंगी अनेक युवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख मान्यवर मंडळींनी उपस्थित शिवसेनीकांना मार्गदर्शन केले. 

 त्यावेळी बारड नगरीचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, शिवसेना शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले,नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे, मुदखेड तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे,विधानसभा संघटक विश्वंभर पवार,प.सं.सदस्य पिंटू पाटील वासरीकर, शिवसेना शहरप्रमुख मुदखेड सचिन पाटील माने,सचिन चंद्रे,कृ ऊ.बा.समिती सदस्य सुरेश शेटे, शहरसंघटक सुधाकर सूर्यवंशी,श्याम पाटील वानखेडे



,उपतालुकाप्रमुख गोविंदराव शिंदे,गुलाबराव देशमुख,उत्तम दरात,बालाजी शिंदे,संजय गाडे,परिक्षीत मुंगल,किसन खतगावे,बाळू पांचाळ,विलास मेंटकर, साहेबराव चव्हाण,अंकुश मामिडवार, शाखाप्रमुख शिवा पावडे, बालू बाकरे,उपशाखाप्रमुख कल्लू पठाण, अनिल मोरे, बालाजी मादसवार,लक्ष्मण चमकुरे,दीपक पाटील,पवन अटकलवाड, देवा शेटे,अमोल हाटकर,सुरेश लोणवडे, आनंदा नांद्रे,फिरोज भाई,गंगाधर मगरे आदी.

अतिवृष्टी बाधीत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या -हरिहरराव भोसीकर

 जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

संपादक आशिष मुगटकर



नांदेड/प्रतिनिधी

           जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास ९७५१.३२ हेक्टरवरील अधिक पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकाचे पंचनामे करून  अतिवृष्टीने बाधित असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर  केली आहे.

      जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून जोरदार पाऊस झाला. दि. १ ते १४ जुलै या दरम्यान नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये ९७५१.३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, मुदखेड, किनवट या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसला आहे. १६५हून गावे अतिवृष्टीमुळे प्रभावीत झाले आहेत. तसेच अतिवृष्टीच्या पाण्यामुळे ७ व्यक्ती मृत्यू पावले आहेत. तिघे जण जखमी आहेत. पशुधनाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये ५४ जनावरे दगावली आहेत तर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ५७ घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या अतिवृष्टीने प्रभावीत झालेल्या व नुकसान झालेल्या सर्व बाबींचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकरी व इतर सर्व घटकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे. 

यावेळी नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे पाटील, सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, डॉ. परशुराम वरपडे, बालासाहेब मादसवाड, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शेळके, सरचिटणीस देवराव टिपरसे, सुनंदा पाटील जोगदंड, सौ. रेखा राहिरे, हिमायतनगर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, बाबुराव हंबर्डे, अ‍ॅड. प्रियंका कैवारे, प्रा.नारायण शिंदे, रामदास पाटील जाधव, रमेश गांजापूरकर, शेख शादूल, विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, प्रकाश मांजरमकर, चंपत हतागळे आदी जणांची उपस्थिती होती.

बारड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 संपादक आशिष मुगटकर


बारड /  प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील इंदिरानगर, बारड येथे अस्पृश्य, शोषित, पिडित, कामकरी, कष्टकरी अशा सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणून त्यांची सुख-दु:ख उजागर करून जागतीक कीर्तिचे प्रतिभावंत लेखक शिवशाहीर थोर समाजसुधारक संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 

 यानंतर नुकतीच भारतीय जनता पार्टी मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिराजी लक्ष्मणराव गाडेकर यांचा समाजाच्या वतीने सार्वजनिकरित्या पुष्पहाराने सन्मान करून पुढील कार्यास समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

  यावेळी नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे मुदखेड तालुकाध्यक्ष पिराजी गाडेकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे तालुकाअध्यक्ष पी जी केदारे, शिवराज केदारे प्रेरक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नर्सिंग आठवले गुरुजी दिनेश लोणे, किसन देशमुख,कैलास पुलकूंटवार, सामाजिक कार्यकर्ते मारोती वाघमारे,प्रदीप केदारे, स्वप्निल वाघमारे, कपिल सोनटक्के, संदिप कांबळे,रामभाऊ केदारे, रुपेश वाघमारे, महेंद्र केदारे, साईनाथ लोनवडे,बाळू मुपडे, आणि मी सामाजिक कार्यकर्ते व गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

रोहिपिंळगांव ,वसंतवाडी येथील विविध विकास कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व उद् घाटन संपन्न

नांदेड ते बासर  या १००किमी. सि.सी रोडची उदघोषणा!

   संपादक आशिष मुगटकर


मुगट / प्रतिनिधी

 दि. १८ जुलै २१ रोजी मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद ग्राम रोहीपिंपळगांव येथे अंतर्गत २३५ लक्ष रु निधीच्या विविध विकास कामांचे उद् घाटन व भूमिपूजन , वसंतवाडी येथे ०५ लक्ष रु निधीच्या कामांचे उद् घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मंत्री नांदेड मा. ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.

          यात प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम १कोटी८७लक्ष रुपये, बौद्ध घटकांच्या वस्तीत विकास कामांसाठी २७.५०लक्ष रुपये, दोन अंगणवाडी बांधकाम १७लक्षरुपये,शाळा वर्ग खोली इमारत दुरुस्ती साठी ११.२०लक्ष रुपये यांचा समावेश आहे.

                          या प्रसंगी या रस्त्याची दुरवस्था झालेली पाहून  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी तात्पुरती या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात येईल. यावेळी बोलतांना  नांदेड ते बासर या नवीन १०० किमी दुतर्फा सिमेंट रस्त्याची उदघोषणा  केली दिवाळीच्या वेळी या रस्त्याचे काम सुरू केले जाईल असे ते म्हणाले.या परिसरातील मुरुम,रेती माफियांवर व जिल्ह्यातील सर्व घटना घडामोडी वर माझे लक्ष आहे. त्यांच्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आता नवीन होनारा सिसी रस्त्याची काळजी घेणे तुमच्या सर्वांचे काम आहे.हा नवीन रस्ता १०वर्ष तरी टिकेल पण आपण तो कमीत कमी ५वर्ष तरी चांगला ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. रस्ता नांदेड- आमदुरा-शिखाचीवाडी- रोहिपिंपळगाव- वसंतवाडी  मुदखेड मार्गे ते बासर असा असनार आहे.

   त्याप्रसंगी आ. अमरनाथ राजूरकर, सदस्य विधानपरिषद, मा. सौ. मंगारांणी अंबुलगेकर अध्यक्ष, जि.प. नांदेड, मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर अध्यक्ष, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी, मा. गणपतराव तिडके चेअरमन, भाऊराव चव्हाण उद्योग समूह,जि.प.समाजकल्याण सभापती मा. रामराव नाईक, मा. रोहिदास जाधव, अध्यक्ष नांदेड जिल्हा ओबीसी विभाग, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. उद्धवराव पवार निवघेकर, मा.सौ. अरुणाताई भिमराव पा. कल्याणे सदस्या मुगट ,जि.प.गट, मा. आनंदराव गादीलवाड उपसभापती पंचायत समिती मुदखेड, म्हैसाजी भांगे कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड, मा. भिमराव पाटील कल्याणे संचालक भाऊराव चव्हाण उद्योग समूह, माजी सभापती मा. रत्नाकर शिंदे,


 संचालक मा. माधवराव शिंदे, मा. किशनराव मुंगल, बालाजीराव शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा. साहेबराव मोरे, मा. डॉ. माणिकराव जाधव, मा. शत्रूघन गंड्रस, मा. लक्ष्मण देवदे, मा. बालाजीराव गाढे, मा. गोविंदराव गाढे, मा. विलास हाटकर, मा. आनंदराव शिंदे, मा. रामराव खांडरे डोणगांवकर, मा. मारोती जाधव, मा. केशव कुरे, मा. मारोती बीचेवाड, मा. नागोराव जाधव, मा. संजय कोलते पत्रकार, नांदेड जि.प. अतिरिक्त मुख्यधिकारी, मा. झांपले तहसीलदार मुदखेड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व स्टाफ, गटविकासाधिकारी जाधव, विस्तार अधिकारी गायकवाड व सर्व स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. व सर्व स्टाफ, रोहिपिंळगांव व वसंतवाडी- रोहीतांडा ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्य व गांवातील सर्व कार्यकर्ते, मुगट जि.प. गट व मुदखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.


शिवसेना जिल्हा अध्यक्ष आनंदराव बोंढारकर यांच्या नेतृत्वखाली शिवसेना संपर्क अभियानाचा झंझावात सुरु


जिल्हा परिषद, पंचायत समिती , कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगर परिषद निवडणूक केंद्रित करून शिव  संपर्क अभियानाची सुरुवात !

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी /आतीक अहेमद

                             शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवस शिव संपर्क अभियान घेतले जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुदखेड तालुक्यात दि.१७ जुलैपासून शिव संपर्क अभियान जोमाने सुरू करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जि.प मुगट गट ,पं.स.माळकौठा गण,पं.स. निवघा गण आणी जि.प.बारड गट येथे कार्यक्रम घेण्यात आले .

                  यावेळी भोकर विधानसभा क्षेत्र नेते तथा उपसरपंच  बाळासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे ,शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले , भोकर विधानसभा समन्वयक परमेश्वर पांचाळ ,विश्वंभर पवार, पिंटू पाटील वासरीकर, मुदखेड तालुका प्रमुख संजय पाटील  कुरे, माजी जि प सदस्य शिवाजी पाटील कस्तुरे ,अर्धापूर पंचायत समिती उपसभापती अशोक कपाटे ,बाळू पाटील ,माणिक लोमटे, सुरेश शेट्टे आदी प्रमुख उपस्थिती होती 


            बारड या ठिकाणी प्रथमच शिवसेनेचा मोठा कार्यक्रम झाले याची सर्वत्र चर्चा होत आहे .सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक माणिक  लोमटे यांनी केले त्यानंतर  विश्वंभर पवार,शिवाजी कस्तुरे ,प्रल्हाद इंगोले, बबनराव बारसे, बाळासाहेब देशमुख आणी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर यांनी शिवसेना संपर्क अभियानाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सभासद नोंदणी सुरू करण्यात आली


           

मा.ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मुगट जिल्हा परिषद गटात विकास कामांचा शुभारंभ

संपादक आशिष मुगटकर

मुगट जिल्हा परिषद गटातील विकास  कामांना मिळणार गती.



मुगट /प्रतिनिधी

     दि.१८जुलै २०२१ रोजी रविवारी सकाळी ११. वाजता, महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुगट जिल्हा परिषद गटातील अनेक विकासकामांना शुभारंभ करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या काळात विकास कामांची गती कमी झाली होती तरी सुद्धा चव्हाण साहेबांनी आपल्या भोकर मतदारसंघात विकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात घेचुन आनला आहे तसेच विविध विकास कामांसाठी निधी ची कमतरता  सुध्दा भासू दिली नाही. 

 मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगांव येथे २३५ लक्ष रु निधीच्या विविध विकास कामांचे उद्धघाटन व भूमिपूजन व वसंतवाडी येथे ०५ लक्ष रु निधीच्या कामांचे उद्धघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मंत्री नांदेड मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते होणार आहे. 

प्रमुख उपस्थिती मा. आ. अमरनाथ राजूरकर सदस्य, विधानपरिषद,मा. सौ. मंगारांणी अंबुलगेकर अध्यक्षा जि.प.नांदेड,मा. गोविंदराव शिंदे नागेलीकर संचालक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड तथा अध्यक्ष, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी.मा. गणपतराव तिडके चेअरमन भाऊराव चव्हाण उद्योग समूह,मा. रोहिदास जाधव माजी, सदस्य जि.प. मुगट गट, मा.सौ. अरुणाताई भिमराव पा. कल्याणे सदस्या, मुगट जि.प. गट,मा. आनंदराव गादीलवाड उपसभापती, पंचायत समिती मुदखेड.मा.म्हैसाजी भांगे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुदखेड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

     तरी मुगट जि.प. गटातील व मुदखेड तालुक्यातील आजी/माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धवराव पवार निवघेकर अध्यक्ष, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटी.मा.भीमराव पाटील कल्याणे संचालक भाऊराव चव्हाण उद्योग समूह. रामराव खांडरे डोणगांवकरअध्यक्ष, मुदखेड तालुका कॉंग्रेस कमिटी (सोशल मिडिया) यांनी केले आहे.






                

पिराजी गाडेकर यांची भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या मुदखेड तालुकाध्यक्षपदी निवड

 संपादक आशिष मुगटकर

निवड :- मुदखेड तालुका अध्यक्षपदी पिराजी गाडेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्विकारताना.


मुदखेड / प्रतिनिधी

     बारड येथील सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित सर्वांसोबत प्रेमाने वागणारे हसतमुख चेहरा सामाजिक चळवळीतील एक अग्रेसर नाव सर्वांच्या प्रती मदतीची भावना ठेवणारे त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क पिराजी गाडेकर यांची नुकतीच राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.



   यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार अविनाश घाटे युवा मोर्चा प्रदेश उपअध्यक्ष मारोतरावजी वाडेकर जिल्हाध्यक्ष गंगाधररावजी कावडे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेशभाऊ देशमुख बारडकर देगलूर तालुकाअध्यक्ष शिवाजीमामा कनकंडे 

 यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिराजी लक्ष्मणराव गाडेकर यांच्या सामाजिक ‌कार्याची व त्यांचा असलेला जनसंपर्क पाहून राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चाच्या मुदखेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावेळी गणपत गायकवाड पत्रकार डी टी सूर्यवंशी, माधवसिंह ठाकुर,संजय खंडागळे शेंबोलीकर, पुंडलिक लिंगायत,जय गायकवाड, शिवराज केदारे इत्यादींची उपस्थिती होती.

 या निवडीचे सर्व जिल्ह्यातून पुढील कार्यासाठी मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मातृभूमी न्युज नेटवर्क कडून आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!


मुदखेड एस बी आय बँकेच्या शाखा व्यवस्थापक म्हणून सचिन करांडे रुजू

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड /शहर प्रतिनिधी /अतिक अहमद

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापक म्हणून सचिन करांडे दिनांक १३ जुलै रोजी रुजू झाले या अगोदर करांडे यांनी विदर्भ येथील अमरावती ठिकाणी स्टेट बॅंक इंडिया च्या शाखेत सेवा देऊन त्यांची बदली नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे झाली या पूर्वी मुदखेड शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापक ज्ञानेंद्र प्रसाद हे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांची नांदेड येथे बदली झाली .

स्थानिक पत्रकाराशी बोलताना करांडे यांनी स्पष्ट केले की बँकेच्या ग्राहकांना सर्व प्रकारची मदत आणि सेवा पुरवून संतुष्ट करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलताना नमूद केले ग्राहकांशी संबंधित सर्व प्रकारचे तक्रार , अडी अडचणी , आणि निवारण करण्यासाठी सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात येण्याची ग्वाही या वेळी दिली पुढे सांगितले की बँकेचे ग्राहकांनी सुध्दा कर्जाची परतफेड आणि अन्य बाबीसाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

उर्दू घराच्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ - पालकमंत्री अशोक चव्हाण

 उर्दू घरचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

संपादक आशिष मुगटकर


नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

 दि.१४ रोजी उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या “उर्दू घर” च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा मला अधिक आनंद आहे, अशा भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या "उर्दू घर" इमारतीचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती होती. 

हे उर्दू घर कला, साहित्य आणि भाषिक विकासाच्या अंगाने इथल्या जनसामान्यासाठी, उर्दू भाषिकांसाठी महत्वाची भूमिका निभावेल या दूरदृष्टीतून निर्माण करण्यात आले आहे. व्यवस्थापन समितीने उर्दू व इतर भाषावरील अनेक वैविध्य असलेले व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम येथे कसे आयोजित करता येतील यांचे नियोजन केले पाहिजे. हे उर्दू घर कला, साहित्य यांचे माहेरघर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन याचे रुपांतर शादीखाना किंवा अन्य कामासाठी होणार नाही, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन नव्या पिढीच्या शिक्षणाला अधोरेखीत केले.

अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी त्यांनी ना. नवाब मलिक यांच्याकडे केली.

अल्पसंख्याक विकास विभागाला किमान एक हजार कोटी रुपयांचा वार्षिक निधी असला पाहिजे यासाठी आम्ही मंत्रीमंडळ पातळीवर प्रयत्न करु, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करुन जिल्ह्यातील शादीखाना, कब्रस्तान व इतर उपक्रमासाठी तुर्तास जिल्हा वार्षिक योजनेतून जेवढे यथाशक्य होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. नांदेड येथे ईदगाह साठी असलेले मैदान कमी पडते. हे लक्षात घेता याचाही विकास करण्याचे मी असल्याचे सांगितले.

अल्पसंख्यांकांच्या विकासाच्या योजना व “उर्दू घर” सारखे प्रकल्प हे पुढच्या पिढीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या चांगल्या स्थितीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासकीय पातळीवरुन यांची देखरेख जरी समितीमार्फत केली जाणार असली तरी इथे येणाऱ्या प्रत्येकाने या “उर्दू घर” कडे आपल्या घराच्या जबाबदारीने पाहून त्यात सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या उदघाटन पर भाषणात केले . उर्दू घरचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झाले ते तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी उर्दू घर ला दिलीपकुमार यांचे नाव देण्याबाबत केलेल्या मागणीला त्यांनी होकार देवून यासाठी एकमताने निर्णय घेवू असे स्पष्ट केले.


भाषेच्या आदानप्रदानाचे उर्दू घर प्रतिक ठरेल

- अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक

हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची जुबान आहे, बोली आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून “उर्दू घर”ची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले. उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या योगदानातून उर्दूच्या विकासासाठी प्रयत्नाची गरज आहे. आज नांदेड येथे सुरु झालेले “उर्दू घर” हे केवळ उर्दू भाषेपुरते मर्यादीत नव्हे तर मराठीसह इतर भाषेच्या प्रसाराचे, एकामेकांच्या आदान-प्रदानातून भाषिक विकासाचे प्रतिक ठरेल असा विश्वास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे उर्दूतील शिक्षण, उर्दू भाषेची त्यांना असलेली आवड आणि अल्पसंख्याकापोटी त्यांनी जपलेली कटिबध्दता ही सर्वश्रुत आहे. आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त उर्दू घरचे उद्घाटन व्हावे हे काळानेही मंजूर केलेले आहे. वास्तविक यांचे उदघाटन मागच्या वर्षी मार्चमध्ये नियोजीत होते. कोरोना मुळे ते पुढे ढकलावे लागले. ज्यांनी उर्दू भाषेसाठी योगदान दिले अशा स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस या वास्तूच्या उद्घाटनाला मिळाल्याचा मला विशेष आनंद असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्घाटन पर केलेल्या भाषणातील मागणीचा संदर्भ घेवून त्यांनी याठिकाणी समितीकडून जे प्रस्ताव येतील त्याबाबत सकारात्मक विचार करुन अल्पसंख्यांकासाठी कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याचा प्रयत्न करु असे स्पष्ट केले. अल्पसंख्याक समाजात गरीबीमूळे न शिकता येणारा वर्ग मोठा आहे. अशा वर्गातील शिक्षणासाठी मुले जर पुढे येत असतील तर त्यांचाही प्राधान्याने विचार करु, त्यांना शिकवू असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक वर्गातील मुलांसाठी वसतीगृहाबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले. 

मोठया कष्टातून आकारास आलेल्या या “उर्दू घर”ला अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी, उर्दू साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी, साहित्यीकांनी योगदान देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अधिक नावारुपास येईल, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे “उर्दू घर” असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव “उर्दू घर”ला देण्यात यावे अशी मागणी तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी करुन या केंद्रात ई-शिक्षण केंद्र आकारास कसे आणता येईल याबाबत समितीतर्फे प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थीना सायकल व शैक्षणिक साहित्याचे वाटप

 प्रितम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रितम भाऊ गंजेवार GNG ग्रुप चे गजानन गंजेवार बंधु चा प्रेरणादायी उपक्रम !

संपादक आशिष मुगटकर



नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र व प्रितम फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आज गवळीपूरा नांदेड येथे सायकल वाटप व शालेय साहित्याचे वाटप प्रितम फाउंडेशनचे अध्यक्ष प्रितम भाऊ गंजेवार व GNG ग्रुप चे गजानन गंजेवार यांच्या हस्ते गरजु शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

   गेल्या अनेक वर्षांपासून गंजेवार बंधू विविध सामाजिक उपक्रम हाती घेत असतात. संपूर्ण महाराष्ट्रभर GNG ग्रुपच्या माध्यमातून व प्रितम फाउंडेशनच्या साहाय्याने असे विविध  उपक्रम राबविले जातात.

गेल्या वर्षी कोरोनासारख्या जागतिक संकटात सुध्दा आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र व प्रितम फाउंडेशन पुणे  त्यांचे कार्य अविरत  पुणे सुरूच राहिले होते. त्यांच्या या कार्याचे सर्व-स्तरातून स्वागत होत आहे व इतर सामाजिक तसेच राजकीय व्यक्तिंनी सुद्धा असेच कार्य हाती घेऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडावे असे आव्हान गजानन गंजेवार यांच्या तर्फे करण्यात आले....

मुदखेड येथे मुस्लिम युवकांनी केले रक्तदान शिबिर संपन्न

 मुस्लिम युवकांनी  " रक्तदान शिबिराचे" आयोजन करून केली नव्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात!!

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ शहरप्रतिनिधी /अतीक अहेमद

     कोरोना  महामारी च्या काळात ज्याप्रमाणे रुग्णांना रक्ताची तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णाच्या  नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होत होती त्यांची धावपळ बघून मुदखेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मुस्लिम युवकांनी रक्तदान शिबिराचा आज आयोजन केलं होतं नांदेड येथील क्रेसेंत ब्लड सेंटर यांच्या मार्गदर्शन व मुदखेड शहरातील इतिहासात मुस्लिम युवकांनी प्रथमच असा सामाजिक उपक्रम केल्याची सर्वत्र शहरामध्ये चर्चा होत आहे आज सकाळी दहा वाजता मुदखेड मदिना मशीदजवळ रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आज आयोजन केले होतेे.

     या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य अधीक्षक  डॉ. दिलीप फुगारे , पोलीस निरीक्षक महेश शर्मा  , काझी लतिफ सहाब कस्मी, उपाध्यक्ष जमियत उल्लेमा नांदेड सलीम देशमुख , नगर परिषद मुखाधिकरी यांचे  प्रतिनिधी दिलीप पवार,  युथ ब्रिगेड निर्देशक फरहान देशमुख , अध्यक्ष युथ ब्रिगेड सोहेल अदबी , सल्लगार शाहेझान अहेमद , सेक्रेटरी मुझम्मील सौदागर सोहेल पठाण , माजी उपाध्यक्ष तथा माजी सैनिक लक्ष्मण देवदे,  मदिना मस्जिद चे धर्मगुरू हफीज मोहसीन सिद्दीकी ,नगर सेविका प्रतिनिधी बबलू सेेठ, नगर सेविका प्रतिनिधी अब्दुल सलाम, डॉक्टर मोहम्मद मुजीब,नगर सेविक प्रतिनिधी मुजीब पठाण, अध्यक्ष मदिना मस्जिद मोहम्मद युसुफ , उपाध्यक्ष शौखात खां पठाण, हाजी इब्राहिम पहेलवान, शेख महेबुब भाई, शेख रफीक सहित  स्थानिक पत्रकार आदींची प्रमुख उपस्थिती होती .

   या वेळी रक्तदान कार्यक्रमाची सुरूवात पवित्र कुराणाचे श्लोक करून झाली तदनंतर ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य अधीक्षक  डॉ. दिलीप फुगारे  यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात रक्तदानाविषयी काळाची गरज आहे व मुस्लीम युवकांनी ज्याप्रमाणे रक्तदान या विषय खूपच गांभीर्याने घेऊन या ठिकाणी रक्तदान  शिबिराचे आयोजन केला त्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले .




      या नंतर पोलीस निरीक्षक महेश शर्मा आपल्या संबोधत करत असताना सांगितले की अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून ज्याप्रमाणे रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे त्यांना या उपक्रमाद्वारे आपण रक्तदान उपलब्ध करून त्यांना सहकार्य केले पाहिजे अशी सामाजिक कर्तव्याची बाब कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

 काझी लतिफ सहाब कस्मी, उपाध्यक्ष जमियत उल्लेमा नांदेड सलीम देशमुख , डॉक्टर मोहम्मद मुजीब व तसेच पत्रकार संजय कोलते यांनी मुस्लिम युवकांनी शहरात प्रथमच असा सामजिक उपक्रम केला बदल युवकांचे कौतुक केले.



शहरातील जवळपास अडीचशे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली असता  बातमी लिही पर्यंत जवळपास सत्तर च्या जवळ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती भेटली आहे मुदखेड शहरातील मुस्लिम युवक माजीद लाला, इब्राहिम मुलतानी, झुबैर खान, मोहम्मद बिलाल उर्फ मुन्ना, अफरोज बागवान, शेख अझीम, अरबाज भाई, एजाज खान, असिफ पठाण, अमीर हमझा, मोहम्मद शेरान, मोहम्मद मिझान आदींनी परिश्रम घेतले सूत्र संचलन फरहान देशमुख आणि पत्रकार अतीक अहेमद यांनी केले तथा आभार पत्रकार संजय कोलते यांनी मांडले.

लोकप्रिय बातम्या