मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.२४ रोजी मुदखेड येथील ओमकार गार्डन मंगल कार्यालयात नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा मित्र पक्ष व महा युतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित भोकर विधानसभा मतदार संघातील बूथ कार्यकर्ता संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण बोलतांना म्हणाले की,आम्ही दोघे मागच्या निवडणुकीत एक मेकांच्या विरुद्ध लढलो त्या वेळी नांदेडच्या जनतेने माझा पराभव केला याचा अर्थ जनतेला कमळ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व मान्य आहे. म्हणून मी ही निर्णय केला जे नांदेड च्या जनतेला आवडते ते मला मान्य आहे.याच कारणाने भाजपात प्रवेश केला आणि भाजपा नेतृत्वाने माझ्यावर फार मोठा विश्वास टाकून २४ तासात देशाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत खासदार म्हणून काम करण्याची संधी देऊन माझ्यावर फार मोठा जबादारी दिली आहे. ही जबाबदारी पार पडताना मोदीजी यांची विकशीत भारत अभियानात सहभागी होऊन विकशीत महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकशीत भोकर विधानसभा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अबकी बार चारसो पार!या विजयात नांदेडची जागा जिंकणे अगदी गरजेचे आहे. तेंव्हा आपण मला आयुष्यभर साथ दिली पुढेही देणार आहात. म्हणून नांदेड लोकसभा निवडणुकीत खा.प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी साथ देण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर,डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर,खा. प्रताप पाटील चिखलीकर आ.राजेश पवार,माजी आ.अविनाश घाटे,आ. अमरनाथ राजूरकर,जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर ऍड.किशोर देशमुख यांची समायोचित भाषणे झाली तर प्रमुख उपस्थितीत भाजपा लोकसभा समन्वयक देविदास राठोड भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे,जि. प.माजी अध्यक्ष मंगारानी अंबुलगेकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण गायकवाड, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गणपत पिटेवाड,प्रदेश सदस्य संतोष मारकवार,बालाजी स्वामी,जिल्हा उपाध्यक्ष किशोर लघळुदकर,नामदेव आईलवाड,माजी सभापती रोहिदास जाधव,माजी नगराध्यक्ष सुनील शेटे,मनोज कमठे भाजपा ता.अध्यक्ष बालाजी खटिंग मुदखेड, गणेश कापसे,दंडवे भोकर, डॉ.लक्षीमन इंगोले, गव्हाणे अर्धापूर,भाजपा शहराध्यक्ष संजय सोनटक्के,माधव कदम मुदखेड, योगेश हळदे,राजू शेटे अर्धापूर, विशाल माने भोकर, पुरुषोत्तम चांडक,प्रभाकर पांचाळ,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर ग्रामीण व शहरी भागातून भाजपाचे जुने व नविन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी राजे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना मान्यवरांच्या हस्ते पुस्पमाल्या अर्पण करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय देशमुख लहानकर,मारोती किरकन यांनी केले तर सूत्रसंचालन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन कल्याणकर, संजय कोलते यांनी केले. कार्यक्रम स्थळी खा. अशोक चव्हाण व खा. प्रताप पाटील चिखलीकर आणि मान्यवरांचे आगमन होताच कोण आलेऱे कोण आले नांदेड जिल्ह्याचे वाघ आले!चपा-चपा भाजपा या हजारोच्या घोषणानी कार्यकर्त्यात हर्ष उल्हास दिसून आला.





