नांदेड /प्रतिनिधी / आशिष कल्याणे
                            उपराष्ट्रपती व्यंकय्या  नायडू यांनी राज्यसभा सदनात छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, अशी घोषणा चालणार नाही ! म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचा त्यांनी अपमान आहे. असे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी म्हटले आहे.त्यामुळे  शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड तालुका व शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन  जाहीर निषेध व्यक्त केला व तसेच मुदखेड तहसीलदार झंम्पले यांना लेखी निवेदन देण्यात आले.                                                                          यावेळी पंचायत समिती प्रतिनिधी पिंटू पाटील वासरीकर,भोकर विधानसभा अध्यक्ष विश्वंभर पाटील पवार,उपप्रमुख आनंदराव पाटील जाधव, गोविंद पाटील शिंदे ,संचालक सुरेश शेट्टी, शहर प्रमुख सचिन पाटील माने,शहर प्रमुख सचिन चंद्रे,उपतालुकाप्रमुख गुलाबराव देशमुख,गंगाधर पाटील मगरे, संघटक सुधीर सूर्यवंशी,अंकुश मामिडवार,संजय पाटील गाढे, सोनू अरपल्लू, विलास पाटील कल्याणे, भिमराव पवार आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत कृष्णामाता संजीवनी समाधी सोहळा संपन्न.

इमेज

पाटनूर येथील युवकांना अजगराचे छायाचित्र पडले महागात.

मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूचा निषेध.

इमेज