श्री रंगनाथ महाराज शालेय साहित्य वाटप योजनेचे प्रकाशन.
नांदेड / प्रतिनिधी / आशिष कल्याणे आर्य वैश्य कोमटी समाज महाराष्ट्र व गंजेवार बंधूंच्या प्रितम ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षी राबविण्यात येणाऱ्या "श्री रंगनाथ महाराज शालेय साहित्य वाटप योजनेचे " प्रकाशन विविध देवस्थानांमध्ये पूजा अर्चना करून व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गंजेवार बंधूंच्या प्रितम ग्रुप तर्फे प्रतिवर्षी विविध समाजउपयोगी विविध उपक्रम राबविले जातात परंतु कोरोनाच्या पाश्वभूमीवर आर्थिक डबघाईत आलेल्या गरजू लोकांना कोणत्याही परिस्थितीत आपली सेवा पोहोचवायचीच ही गाठ मनात गठ्ठ बांधून त्यांनी तबबल अकरा हजार वह्यांचे वितरण नांदेड जिल्ह्यात घरपोच केले. "मुलगा-मुलगी एक समान द्यावे त्यांना शिक्षण छान" ह्या गजानन गंजेवार यांच्या व्यापक विचारांची आज सर्व स्तरातून स्तुती होत आहे व शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही ह्याची शास्वती मी देतो असे गजानन गंजेवार यांनी म्हंटले.....

The Great work sir
उत्तर द्याहटवा