कानपूर येथील मुस्लिम युवकांवरील गुन्हे रद्द करुन, पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

मागील आठवड्यात उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यातील  जश्न इदे मिलादुन्नबी च्या मिरवणुकीत मुस्लिम समाजातील २५ युवकांवर मिरवणुकीत आय लव यू मोहम्मद असे फलक हातात झळकताना असताना कानपूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून युवकांवर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शहरातील तहसील कार्यालयात सकल मुस्लिम समाजाने निवेदन देत युवकांवरील गुन्हे रद्द करण्यात यावे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करण्यात येण्याची मागणी केली महामहीम राष्ट्रपती यांना तहसील प्रशासनाच्या माध्यमातून  यावेळी तहसीलदार डॉक्टर आनंद देऊळगावकर आणि पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांनी समाजाकडून निवेदन स्वीकारले.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ आणि २६ च्या अनुसार प्रत्येक भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र असून प्रत्येक नागरिकांना आपल्या धर्मानुसार समाजात धार्मिक विधी पार पाडण्याचा अधिकार असून व धार्मिक प्रचार आणि प्रसार  करण्याचा अधिकार असताना कानपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने मुस्लिम युवकांवर दाखल केलेले गुन्हे हे बेकायदेशीर असून त्वरित हे गुन्हे  रद्द करण्यात यावे आणि आणि संबंधित प्रकरणाची  सखोल चौकशीत करत पोलीस प्रशासनाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी सकल मुस्लीम समाजातील धार्मिक गुरु मुफ्ती सुलेमान हाफीज, इमरान रजामौलाना जमील, हाफीज अतिक रेहमान,हाफीज रिजवान ,हाफीज याहया, हाफीज हारुण ,हाफिझ श मशिर सह  , सामाजिक कार्यकर्ते , राजकीय पुढारी आणि युवकांची मोठया संख्येत उपस्थिती होती.

मुगटच्या ग्रामसभेतूनच सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी चे पलायन.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि. १७ रोजी मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये  सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा ठेवण्यात आली होती. 

ग्रामसभेपूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्राम अभियान या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी  दाखवण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी भांडेकर हे उपस्थीत होते.

महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांनसाठी विविध उपक्रमांची माहिती तलाठी सौ. बार्शीकर यांनी दिली.

ग्रामसभेला शांतेत सुरुवात झाली होती.गावातील युवकांनी मागील ग्रामसभेत झालेल्या विविध खर्चाच्या मुद्यावर चर्चा करायला सुरुवात केली.नवीन आलेल्या ग्रामसेविका यांच्या कडे काहीच पुर्वीच्या ग्रामसभेची माहिती नसल्याने थेट उपस्थित सरपंच उपसरपंच व प्रतिनिधी यांना प्रश्न विचारली गेली. प्रश्नास उत्तर देण्यासाठी सरपंच, उपसरपंच याची बारी येताच तेव्हाच पुर्व नियोजित पणे काही युवकांनी ग्रामसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

याच संधीचा फायदा घेत सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभेतून पलायन करुण  घर गाठले.

तरी मोठ्या संख्येने ग्रामस्थ त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले होते.

नवीन आलेल्या ग्रामसेविका कोकरे यांनी आपला परिचय करून दिला. ग्रामस्थांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला.  ग्रामपंचायत विषयी आपल्या लेखी तक्रारी देण्याचे आवाहन त्यांनी केले.

१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ज्या ३७  मुद्द्यांचा समावेश केला होता ते मुद्दे १७ सप्टेंबरच्या ग्रामसभेत घेण्यात येणार होत पण त्यातील एकाही मुद्द्यावर या ग्रामसभेत चर्चा झाली नाही.

केवळ सरपंच, उपसरपंच यांच्या कडून वेळ काढू पणा करण्यात आला.

  दि.२ ऑक्टोबर२०२५ रोजी या ठिकाणी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व वरील ३७ मुद्दे यावर चर्चा करण्यात यावी अशी विनंती नवीन आलेल्या ग्रामसेविकेकडे गावातील युवकांनी  केली.

 यावेळी ग्रामसेविका सौ. कोकरे, चौगुले, बिट जमादार कवठेकर, कदम, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील सारंग मठपती, तंटामुक्ती अध्यक्ष,माजी सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. 

 [व्यवस्थित चाललेल्या ग्रामसभेमध्ये आपला नविन भ्रष्टाचार पुन्हा उघड होईल या भीतीपोटी जाणून बुजून सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी यांनी ग्रामसभेमध्ये गोंधळ घालून त्या ठिकाणाहून पळून गेले.- संदिप शंकरराव कल्याणे ]

कामळज येथे श्री गोविंद प्रभू तथा चक्रधर स्वामी जयंती निमित्त श्री दत्त कथा सप्ताह साजरा

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड प्रतिनिधी /कैलाश पाटील 

              मुदखेड तालुक्यातील कामळज महानुभाव  पंथाच्या आचार विचार आणि तत्वज्ञानाने प्रेरित झालेले अनुयायाचे गाव.गावात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्री चक्रधर स्वामींनी ५४ वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य करून तमाम दीन-दलितांना, धर्म मार्तंडांना ,स्त्री पुरुष समानतेचा, स्वातंत्र्याचा मंत्र दिला अखिल विश्वाचे संविधान ज्यामध्ये आहे तो मराठी साहित्यातला आद्य चरित्र ग्रंथ 'लीळाचरित्र' ज्यांनी सांगितला व त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची तथा आदयसमाज सुधारक वऱ्हाड कुल देशाची कुलदैवत, ज्यांनी रुद्धपूर प्रांती१२५ वर्षे राज्य केले त्या गोविंद प्रभू जयंती संपन्न झाली.

           अशा पवित्र दुर्लभक्षणी भजन,कीर्तन, प्रवचन, प्रसाद वंदन,देवपूजा, श्री दत्तकथा शोभायात्रा संतदर्शन, पंचावतार उपहार हा अलभ्य लाभ झाला.

      दिनांक ९सप्टेंबर २०२५ रोज मंगळवार प्राप्त: पाच वाजता कुलवंदनास मंगलस्नान, गीतापाठ, पारायण, ध्वजारोहण, सभामंडप उद्घाटन, , स्वागत, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, शुभेच्छा पर वक्तव्य, श्री दत्त कथेचा शुभारंभ संगीत श्रीदत्तकथा कथाकार प.पु. प. म. श्री आचार्य चिरडे बाबा महानुभाव निफाड जि.सातारा यांची सृश्राव्य संगीत श्रीदत्तकथा सप्ताह वेळ दुपारी तीन ते पाच या वेळेत श्री दतात्रेय प्रभुच्या अद्भूत अमोघ लिळा श्रवण करीत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

           किर्तन सेवा-तपस्विनी पूजाताई धाराशिवकर बदनापूर जि.जालना,प. म. श्री विजयराज दादा खामनेकर राहेर, जि.नांदेड,तपस्विनी प्रमिलाताई कल्याणकर राठोडा जि. लातूर,. प.म.श्री जीवन कवी भोजने हयतनगर जि. हिंगोली,तपस्विनी शितलताई भोजने बरड शेवाळा ता.हदगाव,प. म. श्री रमेश शास्त्री बीजेगाव जि. नांदेड,संगीत भजनी मंडळ कार्यक्रम,किर्तन संगीत साथ सांप्रदायिक भजनी मंडळ मुगट ता. मुदखेड,

प्रास्ताविक व आभार-महंत अनंतव्यास बाबा जावळे,

      मार्गदर्शक-पद्मश्री खरवळकर बाबा जामोदेकर, प. म. श्री हरबास शास्त्री कारंजेकर,प .म श्री महंत गोमेराज बाबा कारंजेकर,प .म. श्री शहागडकर बाबा पैठणकर,प. म. श्री मालोव्यास बाबा कोठी यांच्या मार्गदर्शनाखाली 

          दि;१५ सप्टेंबर२०२५ दुपारी तीन वाजता कुलवंदनाची रथयात्रा,आचार्य महंताची भव्य शोभायात्रा ,संगीतसेवा श्री दत्त भजनी मंडळ कांबळज (बु)ता. मुदखेड ,दिः१६ सप्टेंबर प्राप्त:काळी पाच वाजता कुलवंदनास सुगंध चंदनादी मंगल स्नान,८ ते ११:३० वाजता गीतापाठ पारायण,ध्वजारोहण प.पु प म श्री हरबास शास्त्री बिल्लाली यांच्या हस्ते तद्नंतर ध्वजगीत, सभामंडप उद्घाटन , प पु प म श्री नांदेडकर बाबा यांच्या हस्ते व प पु प म  आचार्य प्रवर श्री सातारकर बाबा महानुभाव करंजे मढ सातारा यांच्या अध्यक्षतेखाली धर्म संपन्न. 

      या वेळी खा.प्रा.रविंद्र चव्हाण, डॉ सचिन पाटील उमरेकर, मनोराज भंडारी, तिरुपती कदम, दत्तू देशमुख,मारोती किरकण, कैलास गोडसे, शाम वडजे, प्रताप देशमुख,पिंटू पाटील वासरीकर, संजय पाटील कुरे, गणेश पाटील शिंदे आदि मान्यवर आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा शुभेच्छा संदेश व जिल्हयातील संत महंत व तपस्विनी भिक्षुक यांच्या उपस्थितीत.

                                             अतिथी स्वागत, स्वागतगीत, दीपप्रज्वलन,प्रास्ताविक,धर्मसभा अध्यक्षीय भाषण,पंचावतार उपहार,आरती महाप्रसादांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

                या अशा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील  सर्व संत, महंत, भिक्षुक, तपस्विनी, धर्मप्रेमी बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.  कामळज गावकऱ्यांच्या सहकार्याने , श्रध्देने आणि मेहनतीने हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. 

मुगट येथे विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा.

  संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार 

दि.१७ रोजी मुगट येथे विविध ठिकाणी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कांताबाई वंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी ग्रामसेविका कोकरे उपसरपंच प्रतिनिधी भीमराव कल्याणे, संचालक माधवराव कल्याणे, तंटामुक्ती अध्यक्ष दादा पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी हे उपस्थित होत्या. 



जिल्हा परिषद शाळेत शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        यावेळी सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक उपस्थित होते. 


           जी.के इंग्लिश स्कूलमध्ये शाळेचे अध्यक्ष किशनराव कल्याणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद गंगातीर, आशिष पाटील हे उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद गंगातीर यांनी आपला वाढदिवस शाळेतील मुलान सोबत साजरा केला.  



शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका यशोमती लंगोटे, सहशिक्षिका, पालक व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

मुगटच्या ग्रामसभेपूर्वीच, ग्रामसेवकाचे आरोग्य बिघडते ?

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार 

मुगट येथे दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी मुगट ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आली होती.

 ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक उपस्थित होते. गावात ग्रामपंचायत कडून गावात विकासाच्या नावाखाली केलेली अनेक कामे कागदपत्रे झाली असून त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे  गावातील युवकांनी शासकीय मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाचून काढला. 

सरपंच, उपसरपंच प्रतिनिधी यांना बसस्थानक, वाचनालय व इतर कामाविषयी खुलासा करता आला नाही. गावातील युवकांनी त्यांना गावातील विकास कामाविषयी अनेक प्रश्न विचारले परंतु त्यांना उत्तरे देता आले नाही. 

मागील तीन-चार महिन्यापूर्वीच नवीन ग्रामसेवक श्रीनेवार यांनी ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच सह सांगितले होते की, तुमच्या सर्व समस्याचे निरसन करण्यासाठी वेळ द्या.मी नवीन आहे संपूर्ण हिशोब देण्यासाठी आपण पुन्हा १७ सप्टेंबरला ग्रामसभेचे आयोजन करू  यावर युवक समाधानी झाले होते.परंतु  १७ सप्टेंबर पूर्वीच ग्रामसेवक श्रीनेवार यांनी आपल्या तब्येतीचे कारण पुढे करत  ग्रामसभेपूर्वीच रजा घेतली की घेण्यास भाग पाडले ? त्यांच्या ठिकाणी सद्या तात्पुरत्या ग्रामसेवीका म्हणून एका महिला ग्रामसेवीका  दि.१५ रोजी मुगटला रुजू झाल्या.                              गावा मध्ये मोठ्या संख्येने  झालेला भ्रष्टाचार  दडपण्यासाठी, ग्रामसभा न घेण्यासाठीच  सरपंच, उपसरपंच यांनी जाणून-बुजून ग्रामसेवक महिला ग्रामसभेपूर्वीच रुजू केल्या मुळे गावात याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. 

       नूतन महिला ग्रामसेवीका आल्यामुळे त्यांना यापूर्वीचा मुगट ग्रामपंचायतचा कोणताही कारभार माहित नाही ?. गावातील समस्या, मागील हिशोब यावर त्या पण उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे जाणून बुजून या ठिकाणी महिला ग्रामसेवीका आणून बसवण्यात आली आहे. 

             ग्रामपंचायत कडून केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी या ठिकाणी वेळ काढू पणा केला जात आहे. असा आरोप गावकरी करत आहे.

{सरपंच, उपसरपंच यांनी संगणमत करून हेतू पुरस्कार पणे या ठिकाणी ग्रामसेवकाला ग्रामसभेपूर्वी सक्तीची रजा घेण्यास भाग पाडले असून नवीन महिला ग्रामसेवक या ठिकाणी तात्पुरती पदभार देऊन वेळ काढून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.गावात झालेला भ्रष्टाचार लपवण्याचा यांचा डाव आहे. असे मत मातृभूमीशी बोलताना शंकर मुंगल, अनिल कल्याणे यांनी व्यक्त केले.}

मुदखेडला ईद- ए- मिल्लादूनबी सोहळा उत्साहात साजरा

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी/ अतिक अहेमद

         मुस्लिम धर्मियांचे प्रेषित तथा संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त आज शहरात न्याहाळी रोडवरील बिलाल मेकानिक यांच्या घरून ईद मिलादुन्नबी ची मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केली आणि या मिरवणुकीची सांगता शहरातील इस्लामपुरा येथील रझा मस्जिद ठिकाणी  झाली.

 याप्रसंगी इस्लामपुरा येथील रजा मज्जिदचे धर्मगुरू हाफिझ महंमद इमरान रजा आणि मिललत नगर येथील हजरत गरीब नवाज मशिदीचे धर्मगुरू हाफीझ झहीर यांनी फतेहा करत मिरवणुकीची सांगता दुपारी २ वाजता केली आणि मिरवणूक शांततेत पार पडली. 

इस्लाम धर्मियांचे प्रेषित तथा संस्थापक मोहम्मद साहेब यांची जयंती तिथीनुसार दिनांक ५ सप्टेंबर रोजी देशासह जगात साजरी करण्यात आली होती परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाने ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीस विनंती करत ५ सप्टेंबर च्या ऐवजी इतर दुसऱ्या दिवशी साजरा करण्यासाठी विनंती केली राज्यातील पारंपारिक गणेशोत्सव विसर्जन दिनांक ६ सप्टेंबर रोजी संपन्न होणार असून पोलीस प्रशासनावर अधिकचा ताण निर्माण होता कामा नये यासाठी विनंती केली गेली होती विनंती स्वीकार करून ईद मिलादुन्नबी कमिटीने आज दि.१२ सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला, आज सकाळी ९ वाजता न्याहडी रोडवरील  बिलाल मेकानिक यांच्या घरासमोर समोर शहरातील राजकीय ,सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

 याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार , मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास  गोडसे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख , भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब ,माजी नगर सेवक ऍडव्होकेट कमलेश चौदंते,माजी नगरसेवक गोविंद गोपणपल्ले, उबाटाचे शिवसेना शहर प्रमुख अविनाश झमकडे ,उबाटाचे शिवसेना शहर प्रमुख साहेबराव चव्हाण,माजी नगरसेवक माधव कदम, माजी नगरसेवक संजय आऊलवार, माजी नगरसेवक प्रतिनिधी किशोर पारवेकर, विनोद चव्हाण, कपिल लोखंडे, पिंटू ठाकूर, रघुनाथ राठोड, काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ता श्रीनिवास महादवाड, राम खांडरे, माजी नगरसेवक प्रतिनिधी रावसाहेब चौदंते, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष महंमद गौस, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, भाजपा चे माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के , भोकर विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शेख इरफान, राष्ट्रवादी शहर काँग्रेस अध्यक्ष महंमद बुरहान, माजी नगरसेवक इमरान मच्छीवाले, माजी नगरसेवक बबलू सेठ, ज्येष्ठ नागरिक इरबा सूर्यवंशी,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संजय कोलते, पत्रकार अतिक अहेमद, धम्मदाता कांबळे, शेख शमशुद्दीन, शेख जब्बार, अब्दुल रजाक, संतोष दर्शनवाढ, मोहम्मद अवेज कुरेशी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन मराठी पत्रकार संघाचे  जिल्हा संघटक संजय कोलते यांनी केले.

ईद ए मिलादुन्नबी मिरवणुक आणि इतर धार्मिक कार्यासाठी अर्धापूर पोलीस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांच्या प्रमुख मार्गदर्शन व नेतृत्वात मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी आर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे,पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर मुंडे, बलवीर सिंग ठाकूर, रघुवंशी, जोंधळे, पीएसबी चे किशोर पाटील, शेख समदानी, चक्रधर मुंगल,भिसे, यांच्यासह ३० पोलीस कर्मचारी एक आरसीबी प्लाटून आरक्षित ठेवण्यात आली होती.

या मिरवणुकीत मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ असलेले मक्का आणि मदिना प्रतिकृती प्रतीक म्हणुन मिरवणुकीच्या वाहनात ठेवण्यात आले होते मुस्लिम धर्मीय आर्थिक प्रतिकूल परिस्थितीत या पवित्र स्थळांचा दर्शन घेत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांची शिकवणीतील आदर्शमूल्य जोपासतात त्यात समता ,बंधुत्व, समानता, प्रेम ,शांती ,करुणा असे विचार समाजात पसरून मोहम्मद पैगंबर यांच्या सांगितलेल्या मार्गावर मुस्लिम धर्मीय काटेकोरपणे प्रेरणा घेत समाजात त्यांचे विचार रुजवण्याचा किंबहुना प्रयत्न करतात आणि देशात आणि समाजात प्रेम शांती करुणा समानता या आदर्शांचा प्रसार करतात

जिल्हा सैनिक मेळावा नांदेडला संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी / सरदार गुलाबसिंघ पुरणसिंघ 

दि.५ रोजी  सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. खासदार ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत (निवृत) यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकांचा मेळावा कुसुम सभागृह नांदेड येथे  संपन्न झाला.

       फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मा उपनगराध्यक्ष नगरपरिषद मुदखेड  लक्ष्मण देवदे तसेच मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या शिफारशीने सैनिकांच्या व शहीद परिवारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या  संघटनेच्या कार्यात अजून गती वाढावी.यासाठी जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली.

 सुधीर सावंत साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले, सैनिक फेडरेशन जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रभू महालिंगआप्पा घोंगडे, जिल्हा कार्याध्यक्षपदी केके पवार, जिल्हा सचिव जनार्दन शेजुळे,लोहा तालुका अध्यक्षपदी संजय ढगे,मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते, हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी चिमणाजी थोटे, भोकर तालुका अध्यक्षपदी देविदास कोंडामंगल, मुखेड तालुका अध्यक्ष भगवान नागरगोजे, नायगाव तालुका अध्यक्षपदी गजानन बोरचोंडे, धर्माबाद तालुका अध्यक्षपदी वाडेकर आय जी, यांची निवड करण्यात आली. 

सैनिक मेळाव्यात सैनिकाच्या अडचणी बाबत सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी सैनिकाच्या काही अडचणी मांडल्या. नांदेड जिल्ह्यात शहीद जवान व मोठ्या प्रमाणात सेवार्थ सैनिक सेवानिवृत्त सैनिक व सैनिक परिवार असून सैनिकासाठी अत्यंत महत्त्वाचा सीएसडी कॅन्टीन चा विषय मांडला जिल्ह्यात आज पर्यंत सैनिक संघटना प्रयत्न करूनही कॅन्टीन  स्थापन झाली नाही, त्यासाठी प्राधान्याने नांदेड जिल्हात कॅन्टीन चालू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे,असी विनंती केली ! सुधीर सावंत यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांची लवकरच भेट घेऊन नांदेड जिल्हा कॅन्टीन चा विषय लवकरच मार्गे लावू असे सांगितले ! स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सैनिकांना आरक्षण मिळावे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माजी सैनिक कार्यालयासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या भूखंड शासनाने उपलब्द करून द्यावा. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शासनाने जीआर काढावा. तसेच सैनिकांना जे काही सुविधा मिळतात  घरपट्टी नळपट्टी सहित इतर अनेक सुविधा अर्ध-सैनिक बल यांनाही मिळाव्यात यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने श्री सुधीर सावंत  यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. 

     कार्यक्रमात नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संघटक कॅप्टन विठ्ठल कदम, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नायब  तहसीलदार हय्युम पठाण उपस्थित होते. 

   कार्यक्रमाची प्रस्तावणा डुमणे पाटील यांनी मांडले व आभार प्रदर्शन हयुम पठाण यांनी केले. सैनिक मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त  सैनिक व महिला मोठ्या प्रमाणत उपस्थीत होते.

कामळज येथे श्री गोविंद प्रभू तथा चक्रधर स्वामी जयंती निमित्त श्री दत्त कथा सप्ताहाचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड प्रतिनिधी / कैलाश पाटील 

             मुदखेड तालुक्यातील कामळज महानुभाव  पंथाच्या अनुयायाचे गाव.गावात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्री चक्रधर स्वामींनी ५४ वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य करून तमाम दीन-दलितांना, धर्म मार्तंडांना ,स्त्री पुरुष समानतेचा, स्वातंत्र्याचा मंत्र दिला अखिल विश्वाचे संविधान ज्यामध्ये आहे तो मराठी साहित्यातला आद्य चरित्र ग्रंथ 'लीळाचरित्र' ज्यांनी सांगितला व त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची तथा आदयसमाज सुधारक वऱ्हाड कुल देशाची कुलदैवत, ज्यांनी रुद्धपूर प्रांती१२५ वर्षे राज्य केले त्या गोविंद प्रभू जयंती संपन्न होत आहे.

अशा पवित्र दुर्लभक्षणी भजन,कीर्तन, प्रवचन, प्रसाद वंदन,देवपूजा, श्री दत्तकथा शोभायात्रा संतदर्शन, पंचावतार उपहार हा अलभ्य लाभ होणार आहे उपरोक्त कार्यक्रमाची रूपरेषा.

दिनांक ९सप्टेंबर २०२५ रोज मंगळवार प्राप्त: पाच वाजता कुलवंदनास मंगलस्नान, गीतापाठ, पारायण, ध्वजारोहण, सभामंडप उद्घाटन, , स्वागत, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, शुभेच्छा पर वक्तव्य, श्री दत्त कथेचा शुभारंभ संगीत श्रीदत्तकथा कथाकार प.पु. प. म. श्री आचार्य चिरडे बाबा महानुभाव निफाड जि.सातारा यांची सृश्राव्य संगीत श्रीदत्तकथा सप्ताह वेळ दुपारी तीन ते पाच वाजता संपन्न होईल.

किर्तन सेवा-तपस्विनी पूजाताई धाराशिवकर बदनापूर जि.जालना,प. म. श्री विजयराज दादा खामनेकर राहेर, जि.नांदेड,तपस्विनी प्रमिलाताई कल्याणकर राठोडा जि. लातूर,. प.म.श्री जीवन कवी भोजने हयतनगर जि. हिंगोली,तपस्विनी शितलताई भोजने बरड शेवाळा ता.हदगाव,प. म. श्री रमेश शास्त्री बीजेगाव जि. नांदेड,संगीत भजनी मंडळ कार्यक्रम,किर्तन संगीत साथ सांप्रदायिक भजनी मंडळ मुगट ता. मुदखेड,निमंत्रित आचार्य-प.पू. प.म श्री आचार्य प्रवर सातारकर बाबा महानुभाव आश्रम करंजे मठ सातारा ,

प्रास्ताविक व आभार-महंत अनंतव्यास बाबा जावळे,

मार्गदर्शक-पद्मश्री खरवळकर बाबा जामोदेकर, प. म. श्री हरबास शास्त्री कारंजेकर,प .म श्री महंत गोमेराज बाबा कारंजेकर,प .म. श्री शहागडकर बाबा पैठणकर,प. म. श्री मालोव्यास बाबा कोठी यांच्या मार्गदर्शनाखाली 

दि;१५ सप्टेंबर२०२५ दुपारी तीन वाजता कुलवंदनाची रथयात्रा,आचार्य महंताची भव्य शोभायात्रा ,संगीतसेवा श्री दत्त भजनी मंडळ कांबळज (बु)ता. मुदखेड ,दिः१६ सप्टेंबर प्राप्त:काळी पाच वाजता कुलवंदनास सुगंध चंदनादी मंगल स्नान,८ ते ११:३० वाजता गीतापाठ पारायण,ध्वजारोहण ध्वजगीत, सभामंडप उद्घाटन,अध्यक्ष स्थानापन्न,अतिथी स्वागत, स्वागतगीत, दीपप्रज्वलन,प्रास्ताविक,धर्मसभा अध्यक्षीय भाषण, आभार,पंचावतार उपहार,आरती महाप्रसादांनी कार्यक्रमाची सांगता होईल ,या अशा भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचा नांदेड जिल्ह्यातील  सर्व संत, महंत, भिक्षुक, तपस्विनी, धर्मप्रेमी बंधू-भगिनीने अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान कामळज गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कामळजच्या मराठा बांधवांनी आझाद मैदान मुंबई येथे केला विजयी जल्लोष

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील 

 मुदखेड तालुक्यातील कामळज गावचे मराठा बांधव दिः २९ ऑगस्ट पासुन आझाद मैदान मुंबई येथे मा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसगट ओबासी मधून आरक्षण मिळावे, शिंदे सरकारने या पूर्वी वासी येथे सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच अश्वासन पाळावे यासाठी दिं २७ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी  ते मुंबई महामोर्चा काढला.

यासाठी पहिल्या दिवसापासुन कामळज ता. मुदखेड येथील शेकडो बांधव आपल्याला आरक्षण मिळाव, लेकराबाळच भाविष्य खुलाव,आपल्या जीवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस याची भिती न बाळगता मा मनोज जरांगे पाटीला यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. मनोज जरांगे पाटलाच्या आदेशाच पालन करीत टप्प्याटप्प्याने मराठा बांधवाची ये जा चालू होती .जो पर्यत जरांगे पाटलाच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यत कामळज गावकरीही माघार घेणार नाहीत असा ठाम विश्वास बाळगुन आंदोलनात सहभागी झाले होते .



आज सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या व अन्नत्याग आंदोलन मागे घेतले यावेळी उपस्थित कामळज मराठा मावळ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर विजयी जल्लोष साजरा केला.

लोकप्रिय बातम्या