मुदखेड तालुका / प्रतिनिधी
आज मुदखेड शहरात ठीक सकाळी ११ वाजता नांदेड रोड लगत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित जागेच्या ठिकाणी विधीवत पूजन करून अभिवादन करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर माजी उपाध्यक्ष तथा माजी सैनिक लक्ष्मण देवदे यांच्या सह इतर मान्यवरांनी प्रकाश टाकताना त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व तसेच शहरातील इतर ही प्रशासकीय कार्यालये मध्ये सुध्दा जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी धनगर समाजाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी सैनिक लक्ष्मण देवदे , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडेराव वड्डे, माजी नगरसेवक संजय आऊलवार, भाजपा अनुसूचित जाती मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड,सेवानिवृत्त पोलिस अधिकारी राम देवदे नांदेड जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,भुजंग फुले, मारुती कमजळे ,शिवाजी बिस्मीले, मारुती गुंठे, वामन गुंठे, गजू संभोड ,बालाजी वडे ,कोंडीबा इरपे, अशोक रेड्डेवर, ऋषी पारवेकर, भाजपा शहराध्यक्ष मुन्ना चांडक ,भगवान पानेवार , शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे ,सुरज बिस्मिल्ले, पिंटू संबोड , पांडुरंग कमजळे, प्रसाद गुंठे , बालाजी गरपल्ले गीतेश गुंठे,संतोष फुले,दत्ता वत्ते, मसनाजी वत्ते, गजू संबोड,प्रवीण फुले,मोईन फुलारी,पत्रकार संजय कोलते, ईश्वर पिन्नलवर,अतीक अहमद, सिद्धार्थ चौदंते, धम्मा कांबळे, अब्दुल रजाक सहित धनगर समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












