शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित,अंशत: अनुदानित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक व माध्यमिक शाळामधील शिक्षक शिक्षकेत्तरांना १०० टक्के वेतन देण्यात यावे यासाठी आज दि.९ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन सुरु आहे.

        महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांची वेठबिगारी संपवुन त्यांना सन्मानाचे जिवन जगता यावे यासाठी वीस वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना २४ जुन २०१४ शासन निर्णयानुसार अघोषित,त्रुटींची पुर्तता करणाऱ्या,२० व ४० टक्के अनुदान प्राप्त प्राथमिक,माध्यमिक व उच्च शाळांना अनुदान देण्यात यावे.आजच्या परिस्थितीत शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व असून याच क्षेत्रात विद्यार्थ्यांना भविष्याच्या वाटा दाखविणारा शिक्षकच वेतना अभावी भरकटलेला आहे.या शिक्षकाला वेतनाची अत्यंत आवश्यकता असून लवकरच निवेदनात नमुद केलेल्या विषयावर तोडगा काढून न्याय देण्याचे काम शासनाने करावे अन्यथा दि.२३ मेपासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील अघोषित, अंशतः अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील १४९ शिक्षकांनी वेतनासाठी लढा देत असतांनाच आपल्यि प्राणांची आहुती दिली.आता शासनाने येथील शिक्षकांचा अंत पाहू नये.

       आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर प्रा कैलाश खानसोळे प्रा.लोखंडे सी बी,प्रा.शेख,राजेसाब, प्रा.राजेंगोर आत्माराम, प्रा.खुरदामोजे एस टी, प्रा सुदर्शन फाजगे,.प्रा केंद्रे बी एम,कदम पी एम,प्रा कैलाश जगताप, ढवळे एच पी,श्री खडसे डी. के.सुर्यवंशी बी. टी,प्रा.भागवत गोरे,श्री जाधव ए एम,जाधव ए व्ही,गायकवाड बी. एम,मोरे एस के,मुरमरे के एस,ठेम्बरे आर जी, प्रा गच्चे एस. के.कांबळे एस.आर.आदींसह नांदेड जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या