मुगट वार्ताहार
मुगट सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी काँग्रेसचे रमेश पाटील कल्याणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुगट येथील काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते, तथा माजी उपसरपंच रमेश पाटील कल्याणे यांची गावातील नागरिकांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी सोसायटीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी दिली आहे.
त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, माजी.ग्रामपंचायत सदस्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सेवा सहकारी सोसायटीची निवडणूकीत सहाय्यक निबंधक जी. एल. हाटकर, निवडणूक निर्णय अधिकारी चांदणे यांनी काम पाहिले.
बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढिल प्रमाणे.
चेअरमनपदी रमेश पाटील कल्याणे व्हाईस चेअरमन पदी सौ. गौरी शरद पवार, संचालक किसन बालाजी कल्याणे, नागोराव दिगंबर कल्याणे,प्रकाश बाबाराव कल्याणे, रामकिसन सदाशिव कदम, शिवाजी दिगंबर कल्याणे, कल्याणराव चंपतराव कल्याणे,देवबा आबाजी मुंगल, तुकाराम दत्ता काटकर. सौ.शांताबाई टोपाजी हाटकर. गंगाराम नारायण रंगवाळ,रोहिदास मारुती चिंतले. यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रतिनिधी धोंडीबा वंजे, उपसरपंच प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे,तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील कल्याणे,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बालाजी पाटील कल्याणे, विलास हाटकर,अॅड. माधवराव हाटकर,अनिल कुलकर्णी. ग्रामपंचायत सदस्य धाराजी पवार,विलास कल्याणे,प्रमोद कल्याणे, दत्ता सरगोळे ,अवधूत कल्याणे,वसंत कल्याणे, यांची यावेळी विशेष उपस्थितीत होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा