केंद्रीय रिजर्व पुलीस बल प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथील केंद्रीय रिजर्व पुलीस बल प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय खेळ दिवसाच्या निमित्ताने प्रशिक्षण संस्थेत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ब्रिगेडियर श्री.जी.एस.रेड्डी यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय खेळ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आपल्या अभिभाषणात त्यांनी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित मुख्य घटनांवर प्रकाश टाकत त्यांचे कार्य महान आहे असे ते म्हणाले.


भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले असून,हा पुरस्कार देशातील तीसरा मोठा पुरस्कार आहे.

हा दिवस साजरा करण्याचा मागचा हेतू हा आहे की खेळ, खेळाडू यांना सन्मान देने.त्या बरोबरच दर वर्षी हा दिवस साजरा केल्याने खेळा विषयी जागरूकता व आवड करण्याचे मुख्य कार्य केले जाते.त्यामुळे हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस हा राष्ट्रीय खेळ दिवस उत्साहात साजरा करून त्यांचे स्मरण केले जाते.असे ते म्हणाले.आयोजीत हॉलीबॉल, बास्केटबॉल स्पर्धेत विजेता संघाला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. 


यावेळी ब्रिगेडियर श्री जी. एस रेड्डी, सेना मेडल प्राचार्य सीटीसी मुदखेड़, श्री लीलाधर मेहरानिया कमांडेंट , श्री लॉरेंस बैंडो चीफ मेडिकल ऑफिसर, श्रीमती अमूल्य कुजूर चीफ मेडिकल ऑफिसर, श्री अमित शर्मा उप कमांडेंट, श्री जैकी कुमार सहायक कमांडेंट, श्री प्रदीप ने सहायक कमांडेंट, श्री पुरूषोत्तम राजगढ़ कर सहायक कमांडेंट आदींची उपस्थिती होती.


गुरुजी रुग्णालय सहकारी तत्त्वावर चालणारे आदर्श रुग्णालय मनपा आयुक्त लहाने यांचे प्रतिपादन

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

नांदेड येथील छत्रपती चौक परिसरातील नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्था द्वारा संचलित व श्री मथुराशांती प्रतिष्ठान द्वारा चलित श्री गुरुजी रुग्णालय हे सहकारी तत्वावर चालणारे नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यातील सर्वात मोठे असे दीडशे खाटांचे सेवाभावी रुग्णालय आहे असे प्रतिपादन नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले.

श्री गुरुजी रुग्णालय,मराठी पत्रकार परिषद व वृत्तपत्र विक्रेता संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते रविवारी बोलत होते. या प्रसंगी दवाखान्याच्या व्यवस्थापनाचे प्रमुख व श्री मथुरा शांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत बजाज,तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी विजय जोशी, गोवर्धन बियाणी, प्रकाश कांबळे,प्रदीप नागापूरकर, राजू झवर,जयपाल वाघमारे, परडे सुनील, प्रशांत गवळी, करणसिंह बैस  आणि वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे बालाजी पवार, चेतन चौधरी, चंद्रकांत घाटोळ,गणेश वडगावकर,बाळू जल्डेवार आदी उपस्थित होते.

आयुक्त लहाने पुढे म्हणाले की मी आजवर या दवाखान्याचे नाव ऐकून होतो. या तपासणी शिबिराच्या निमित्ताने हा दवाखाना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. तीन मजली आणि दीडशे खाटांचा भव्य व सुसज्ज दवाखाना पाहून समाधान वाटले. गुरुजी दवाखान्यात गोरगरिबांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते. तसेच गरजू रुग्णांना कमी दरात उपचार केले जातात ही स्तुत्य बाब आहे असेही आयुक्त लहाने म्हणाले.

आजच्या या शिबिरात शेकडो जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी विजय जोशी  यांनी सूत्रसंचालन डॉ लक्ष्मीकांत बजाज यांनी प्रास्ताविक आणि प्रभाकर बिरादार  यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीते करिता रुग्णालय व्यवस्थापन,डॉक्टर व स्टाफ याने अथक परिश्रम घेतले.

पाथरड (रेल्वे) शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करुन वाढदिवस साजरा

.संपादक आशिष मुगटकर



 मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील पाथरड (रेल्वे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यी  कुमार पुष्पक आनंदा थोरात ह्यांनी आपल्याच व शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा केला.

 या निमित्ताने विद्यार्थ्यांचे वडील श्री आनंद थोरात व्यवस्थापन समिती सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक श्री हरीओम सर यांच्या विनंतीला मान देऊन गावचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच श्री कैलास  पाटील उपसरपंच श्री जयवंत थोरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी दत्तराव पाटील व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री संतोष राजमोरे सर,व्यवस्थापन समिती सदस्य श्री व्यंकू मेटकर तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते. 


या कार्यक्रमांमध्ये वाढदिवसाचे औचित्य साधून श्री आनंद थोरात यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले.हा वाढदिवसाचा कार्यक्रम परिपाठा नंतर लागलीच घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये गावचे कर्तव्यदक्ष सरपंच कैलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना यापुढे पण अशाच प्रकारे आनंद थोरात यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा जो पायंडा पाडला  आहे त्यातून प्रेरणा घेत राहण्याची घोषणा केली.



त्यानंतर गावचे उपसरपंच श्री जयवंत थोरात यांनी मार्गदर्शनपर बोलत असताना प्रस्तुत शाळेचे शिक्षक श्री कल्याणकर सर व श्री शेवाळकर सर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अभिनंदन करत त्यांच्या अध्यापनाचे तसेच उपस्थिती वाढवण्यासाठी करत असलेल्या  कामाचे कौतुक केले. एकंदर शाळेच्या होत असलेल्या गुणवत्ता विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.

त्यानंतर व्यवस्थापन समिती सदस्य श्री लिंगू मेटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांच्या विद्यार्थीदशेतील अनुभव सांगितले. विद्यार्थीदशेत असताना त्यांना एकदाही  व्यासपीठावर यायची संधी मिळाली नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शालेय जीवनात तर नाहीच पण विद्यालयीन जीवनात सुद्धा कधीच अशी संधी न मिळाल्याने आजही मी व्यवस्थित बोलू शकत नाही असे  निसंकोच प्रांजळ मत त्यांनी मांडले. त्यांच्या तुलनेमध्ये आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरड [रेल्वे ] शाळेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्टेजवर येतात ,सुंदर अशी भाषणे करतात याबद्दल त्यांनी शाळेच्या सर्व स्टाफचे कौतुक केले . तसेच यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना असेच  व्यासपीठ मिळवून देण्याचे शालेय प्रशासनाला आवाहन केले.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळेच्या एकूण ४७ विद्यार्थ्यांनी भाषणाची तयारी केली होती. त्यादिवशी पाऊस चालू असल्यामुळे ही भाषणे घेता आली नाहीत. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात मराठी इंग्रजी व हिंदी अशी ५ भाषणे घेण्यात आली..

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री हरिओम सर यांनी सभेस मार्गदर्शन करत असताना वाढदिवसाच्या निमित्ताने होत असलेल्या समाज कार्यामध्ये जो कोणी आपल्या पाल्याचा वाढदिवस साजरा करेल त्यांनी शाळेसाठी एक झाड व एक जाळी देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला लागलीच ज्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा होत आहे त्या आनंदा थोरात [ व्यवस्थापन समीती सदस्य ] यांनी प्रतिसाद देत पुढील दहा ते अकरा दिवसांमध्ये जाळी व झाड देण्याचे आश्वासन समस्त सभेला दिले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री कल्याणकर सर यांनी केले तर सबंध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सहशिक्षक श्री येमेकर सर, पांचाळ सर, श्रीमती मैराळ मॅडम तसेच मुख्याध्यापक श्री हरी ओम सर यांनी सहकार्य केले.

मुदखेड पंचायत समिती कडून माजी सैनिकांचा सत्कार

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुदखेड पंचायत समिती कडुन  आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा कै.शंकरराव चव्हाण सभागृहात मोठ्या  थाटात पार पडला. 

अध्यक्ष स्थानी गट विकास अधिकारी श्रीकांत बेळदे हे होते तर नायब तहसीलदार संजय नागमवाड यांची विशेष उपस्थिती होती. 

नांदेड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण देवदे, ग्राम सेवक कळणे , गव्हाणे गोपाळवाडीकर , संजय कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी गायकवाड,न.प राज्य  कर्मचारी संघटनेचे रामेश्वर वाघमारे हे प्रमुख  उपस्थिती  होती .

स्वातंत्र्य दिनानिमित्त विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने नांदेडला भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

           ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्त व विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी सैनिक मा.श्री.दिलीपजी दिक्षीत तसेच नांदेड येथील जेष्ठ समाज सेवक समाज भुषण मा.श्री.आर.के.दाभडकर यांच्या वाढदिवसाचे पण औचित्य साधुन  श्री विश्वकर्मा चौक,बी.के.हाॅलच्या बाजुला,श्रीनगर नांदेड येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष मा.श्री.सत्यनारायण पांचाळ जुन्नीकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.




             या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन नांदेड येथील जेष्ठ समाज सेवक समाज भुषण मा.श्री.आर.के.दाभडकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शिवसेना नेते नांदेड जिल्हा समन्वयक तथा प्रसिद्ध विधीज्ञ मा.श्री.ॲड.परमेश्वरजी पांचाळ साहेब होते.प्रमुख पाहुणे म्हणुन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे विभागीय संघटक मा.उमाकांत पोतदार,विभागीय कार्यकारी सदस्य मा.अरुणजी चट्टेकर, विभागीय सदस्य मा.मुरलीधर कौठकर, मा.दत्ताजी तामसकर, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ नांदेड जिल्हाध्यक्ष मा.जी.एस.पांचाळ मुगटकर, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई पांचाळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वनिर्माते प्रभु श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन व महाआरती प्रमुख मान्यवर व समाज बांधवांनी केली. महाआरती झाल्यानंतर आर.के.दाभडकर, ॲड.परमेश्वर पांचाळ,ॲड.जी.एस.पांचाळ,सत्यनारायण पांचाळ,पांडुरंग पांचाळ,सुरेखाताई पांचाळ,मोहनजी पांचाळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

हे रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा भाजपा का.आ.जिल्हाध्यक्ष मा.नारायण पांचाळ, वि.वं.स.सं.नांदेड जिल्हाध्यक्ष मा.सत्यनारायण पांचाळ जुन्नीकर,युवा जिल्हाध्यक्ष मा.पांडुरंग पांचाळ आमदुरेकर,जिल्हा उपाध्यक्ष यादव पांचाळ देगलुरकर,जिल्हासचिव ज्ञानेश्वर पांचाळ,जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगसेवक उमरी साईनाथ मुटकुटवार,उमरी तालुकाध्यक्ष राजु पांचाळ गोळेगांवकर,धर्माबाद तालुकाध्यक्ष मोहन पांचाळ,विशाल हिवरकर,गजानन हिवरकर,राम हिवरकर,मारोती पांचाळ आटाळेकर,नरशिंग पांचाळ आटाळेकर, सतिश कुंभकर्ण,अविनाश हिवरकर,मोहन पंडरीनाथ पांचाळ,व सर्व समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले. प्रमुख मान्यवरांचे आभार राजु पांचाळ गोळेगांवकर यांनी मानले.

मुदखेड शहरात स्वातंत्र्य दिनाची विशेष संध्या सुपरहीट ठरली

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 मुदखेड येथे प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रा कडुन आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने स्वातंत्र्य दिनी विविध रंगी साजरा करण्यात आला. 

नांदेड वसंत नगर केंद्र मुख्य  संचालक बीके स्वाती बहेनजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य उपस्थितीत श्री कालेजी देवी मंदिर ट्रस्ट च्या रणछोडदास मंगल कार्यालयात देश भक्ती व सांस्कृतिक संध्या कार्यक्रम घेतला. धार्मिक व देश भक्ती गीत व नृत्य तथा व्यसन मुक्ती वर आधारित नाटक सादर करून बालकांनी उपस्थितांचे  टाळ्या बक्षीस व वाहवा मिळवली. हा कार्यक्रम सुपर हीट ठरला.



  या  वेळी  मान्यवर सह पोलिस अधिकारी,कर्मचारी,पत्रकार,महीला, आणि ब्रम्हाकुमारी  परिवारातील अनेक जन उपस्थित होते.

 आथर्व गंगाधर डांगे (वय १४) याने सुरेल देशभक्ती गीत सादर केले.

 स्वरा यशवंत बारतोंडे (वय ७), ऐश्वर्या सुभाष चंद्रे (वय ९), आराध्या संदीप बारतोंडे (वय ८),अक्षरा सुभाष चंद्रे( वय १२)यांनी उपस्थित महिलांच्या  टाळ्या चा कडकडाट मिळवला.

व्यसन मुक्ती वर आधारित नाटक  ब्रम्हाकुमारी परिवाराने  सादर करून गंभीर विचार करायला लावले.

 सेवानिवृत्त सैनिक यांचा सत्कार ही ब्रम्हाकुमारी परिवारानी केला .

माजी अध्यक्ष नारायणराव कोत्तावार , पोलीस उप निरिक्षक राजु वटाने,मनोज कमटे,संतोष गाढे, ईश्वर पिननलवार,अब्दुल रज्जाक यांची प्रमुख उपस्थितीती होती.

 सुत्र संचालन संतोष सावंत यांनी केले

 प्रसिद्ध गायक कालिदास चौधरी व रवी शहाणे यांनी देशभक्तीचे गीत सादर केले.मुदखेड उप सेवा  केंद्र संचालक बीके पुजा बहेनजी यांनी मुख्य संयोजक भुमीका करून ब्रम्हाकुमारी  परिवाराच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वी केला.

मुदखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२७ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांना हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास मुदखेड नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खंडेराव वडे सर ,पत्रकार इश्वर पिन्नलवार ,  माजी उपनगराध्यक्ष बंदेअली खाँ पठान  उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, सेवानिवृत्त शिक्षक बालाजी चुडेवार सर, विजय मेटकर ,उपेंद्र देवदे ,शिवाजी बिस्मिले ,भुजंग फुले, मारुती कमजळे गंगाधर बिस्मीले आदिंच  उपस्थिती होती.

या प्रसंगी मुदखेड शहरातील सर्व जाती-धर्माचे लोक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यास उपस्थित होते .

१००% अनुदान मिळावे यासाठी आ.कल्याणकर यांची भेट.

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

१००% अनुदान मिळावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली आ. बालाजीराव कल्याणकर यांची भेट घेतली.

नांदेड जिल्हयातील विनाअनुदानीत ' अशंतः अनुदानीत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज दिः ६ रोजी नांदेड उत्तर चे आमदार ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निकटवर्तीय बालाजीराव कल्याणकर यांची भेट घेवुन राज्यातील ६०००० शिक्षक विनाअनुदानित ' अशंतः अनुदानित असुन गेली २० वर्षापासुन विनामुल्य विद्यादानाच पवित्र काम करतात यांना हक्काची १००% पगार मिळावी यासाठी तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना बोलून आमचा प्रश्न मार्गी लावू शकता यावर मा.आमदार साहेबांनी सोमवारी मुख्यमंत्री साहेब नांदेड ला येणार आहेत तुमची भेट करून देवुन तुमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरिने प्रयत्न करीन असे सांगीतले यावेळी प्रा. कैलाश खानसोळे . प्रा बालाजी पावडे ' प्रा. आशिष केंद्रे प्रा झाकेर सर सह अनेक शिक्षक उपस्थित होते

लोकप्रिय बातम्या