मुदखेड तालुका / प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२७ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांना हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास मुदखेड नगरपरिषद चे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खंडेराव वडे सर ,पत्रकार इश्वर पिन्नलवार , माजी उपनगराध्यक्ष बंदेअली खाँ पठान उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, सेवानिवृत्त शिक्षक बालाजी चुडेवार सर, विजय मेटकर ,उपेंद्र देवदे ,शिवाजी बिस्मिले ,भुजंग फुले, मारुती कमजळे गंगाधर बिस्मीले आदिंच उपस्थिती होती.
या प्रसंगी मुदखेड शहरातील सर्व जाती-धर्माचे लोक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यास उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा