धार्मिक स्थळासह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही माहूर गड आता ठरेल वैभवाचे केंद्र - पालकमंत्री अशोक चव्हाण

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड (जिल्हा प्रतिनिधी)

 दि. २७ :- विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देवून भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडही त्या दृष्टीने विकसित करुन या परिसरातील वनसंपदेच्या, पर्यटनाच्या विकासकामांना प्राधान्य देत एकात्मिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.


माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृतिर्थाजवळील कॉमन फॅसिलिटी सेंटरपासून तीनही गडांना जाण्या-येण्यासाठी रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये नुकताच करार झाला आहे. या निमित्ताने त्यांनी माहिती दिली. 

माहूर गड आता धार्मिक स्थळांसह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही वैभवाचे केंद्र ठरेल यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महाराष्ट्राच्या प्रमूख शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहूर गडाचा आता कायापालट होत असून लवकरच सर्व वयोगटातील भाविकांना त्यांच्या आवडीनुसार भक्तीसोबत पर्यटनाचीही जोड देता येईल. नांदेडच्या पूर्व-ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगाच्या माथ्यावर रेणूका देवी, अनुसया माता आणि दत्त शिखर हे देशातील सर्व भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. याचबरोबर या डोंगर रागांच्या पायथ्यातून पैनगंगा नदी आपला अवखळ प्रवाह घेत पुढे विदर्भात जाते. अनेक वर्षापासून या भागात असलेली जैवविविधता, वनसंपदा, वन्यजीव हे पर्यटनाच्या दृष्टीनेही शक्ती स्थळ राहीले आहे.  

या शक्ती स्थळांचा येथील जैवविविधता सांभाळून सर्व सेवा सुविधायुक्त‍ विकास आता केला जात असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत असलेल्या विकास कामांच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

माहूर विकासाच्या दृष्टीने आजवर नोंदविल्या गेलेली पर्यटकांची संख्या, वाहनांची वर्दळ, भक्त व पर्यटकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा, पर्यावरणाच्या दृष्टीने लागणाऱ्या वन विभागाच्या मान्यता, येथील भुगर्भ रचनेनुसार कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक असलेली काळजी व तसा आराखडा ही सर्व कामे प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून  वॅपकॉस लिमिटेड ही कंपनी करेल.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली ही विकासकामे होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली मुदखेड तालुक्यात पक्ष बांधनीला गती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्यायच्या तालुकाध्यक्षपदी  संतोष दर्शनवाड तर    सोशियल मिडीया तालुकाध्यक्षपदी ऋषीकेश गोंदगे.




मुदखेड / तालुका प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.हरिहरराव भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन अध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन बळकटीकरण करण्यासाठी अधिक जोर दिला आहे.त्यामुळे नवतरुण युवक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस चा हात धरून पक्षात प्रवेश करत आहेत.त्यामुळे मुदखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्षाची दाकत दिसून येणार आहे.



 राष्ट्रवादी कार्यकर्ते संतोष दर्शनवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभाग तालुकाध्यक्ष पदाचे तर पाथरड येथील सामाजीक कार्यात नेहमी सक्रिय असणारे ऋषीकेश गोंदगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशियल मिडीया तालुकाध्यक्षपदाचे नियुक्तिपत्र सह्याद्री विश्रामगृह नांदेड येथे पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. हरिहरराव भोसीकर साहेब यांचे हस्ते मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांचें शिफारशीनुसार देण्यांत आले.

       यावेळी जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब गोरठेकर,रमेश देशमुख शिळवणीकर,बालाजीराव शेळके, सोशियल मिडीया जिल्हाध्यक्ष शादूल होनवडजकर,सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष कपील कांबळे,सरचिटणीस डी.बी.जांभरूणकर,ॲड.सचीन देशमुख, प्रमोद देशमुख,चक्रधर पाटील कळणे,म.बुराण,जळबाजी गोंदगे, मदन गोंदगे, दिगांबर गोंदगे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

मुदखेड येथे आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

दि.२५ रोजी जिल्हा आयोजन विधी सेवा प्राधिकरण नांदेड तथा विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाणी न्यायालय 'क' स्तरावर मुदखेड या ठिकाणी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन आज दि.२५ रोजी सकाळी१०:३० वाजता करण्यात आले आहे.

सदरील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणी १३८ एन. आय. ॲक्ट, कौटुंबिक हिंसाचार कायदा, पोटगीचे प्रकरणी इत्यादी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वी ची बँकेशी निगडीत थकबाकीची दाखल पूर्व प्रकरणे( स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा मुदखेड, स्टेट बँक ऑफ शाखा मुगट, स्टेट बँक ऑफ शाखा बारड) व पाणीपट्टी, घरपट्टी, विद्युत बिल इत्यादी (मुदखेड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील) प्रकरणाचा सदरच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समावेश होणार आहे तरी या द्वारे मुदखेड कार्यक्षेत्रातील सर्व जनतेने आवाहन करण्यात येते की आपण आपली प्रकरणे तडजोडीने राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावी असे आवाहन श्री सिद्धार्थ वी. ठोंबरे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मुदखेड यांनी केली आहे.

 तसेच जनतेनी आपली दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्या याकरिता बँकेची अथवा तालुका विधी सेवा समिती मुदखेड यास संपर्क करावा. 

दिनांक २५ सप्टें २०२१ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून  तडजोडीने मिटवावीत असे सांगण्यात आले आहे.

बारड येथे राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य यांचा पुण्यस्मरण दीन साजरा

 संपादक आशिष मुगटकर



बारड प्रतिनिधी

बारड येथील राजराजेश्वर शिवालय मंदीरात राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दीन विरशैव समाजबांधवा कडून साजरा करण्यात आला डॉ शिवलिंग शिवाचार्य यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करुन सामुहिक महाआरती करण्यात आली

कोरोना नियमावलीचे पालन करत  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

 यावेळी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवन चरित्रावर स्मरण करण्यात आले शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी सर्व धर्मीय समाजासाठी मानव कल्याणकारी कार्य तसेच जीवन जगण्याची दिशा समाजाला देण्यात आयुष्य समर्पित केले आहे

यावेळी वीरशैव समाज संघटनेकडून राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावेळी अशी सामूहिक मागणी केली आहे 

कार्यक्रमास श्रीराम कोरे,दीलीपराव कोरे,संजय मुलंगे,सारंग स्वामी, बाळु स्वामी,माधव भिमेवार,प्रभाकर भिमेवार,काशीनाथ मुलंगे, वसंत लालमे,जीवन भिमेवार,मारोती बिचेवार, प्रमेश्वर भिमेवार,प्रमेश्वर अंतेवार,संतोष एमले, नामदेव बिचेवार,बालाजी आम्रे,यशवंत लोमटे, शिवप्रसाद कराळे, प्रमेश्वर एमले, विनोद कोरे,सदाशिव तांडे,प्रमेश्वर भिमेवार, बाबुराव बिचेवार,रामेश्वर धुडकेवार,शंकर लाहेवार, बालाजी कत्रे, मुंजाजी कत्रे, आदीसह समाजबांधव उपस्थित होते.

आर्यन मॅन डॉ. रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 पोलीस बॅच २००७ चा स्तुत्य उपक्रम..

रक्तदान शिबिर:- रक्तदान करताना पोलीस नाईक प्रकाश मामूलवार, पोलीस अमलदार अनिल मुपडे पोलीस अंमलदार गणेश वाघमारे, श्री संतोष अमिलकंठवार व २००७ च्या बॅच चे नांदेड पोलीस दल ,अधिकारी व अमलदार आदी


नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

नांदेड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया च्या पाठीमागे श्री गणेश मंदिर परिसर येथे आर्यन मॅन डॉ.रवींद्र सिंगल (अप्पर पोलीस महासंचालक) महाराष्ट्र यांच्या वाढदिवसा निमित्ताने नांदेड पोलीस २००७ च्या बॅचच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते..

शिबीराचे उद घाटन अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे (भोकर जि. नांदेड) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान करताना पोलीस नाईक प्रकाश लक्ष्मणराव मामुलवार, पोलीस आमदार अनिल मुपडे, पोलीस अमलदार वाघमारे, श्री संतोष आमिलकंठवार यांच्या २००७ च्या बॅचचे नांदेड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.



 


फोटो ओळी ------------


रक्तदान करताना पोलीस नाईक प्रकाश मामूलवार, पोलीस अमलदार अनिल मुपडे पोलीस अंमलदार गणेश वाघमारे, श्री संतोष अमिलकंठवार व २००७ च्या बॅच चे नांदेड पोलीस दल ,अधिकारी व अमलदार आदी…….


 


------------- सोबत शिबीराचे छायाचित्र ------------------------------

कामळज येथे श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्दी वर्षे व श्री गोविंद प्रभू जन्मोत्सव उत्साहात संपन्न

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

                  महानुभाव पंथाचे संस्थापक परब्रम्ह परमेश्वर अवतार,समाजउद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी १२ व्या शतकात अवतार धारण करून महानुभाव पंथाची स्थापना केली समाजातील अनिष्ट,रूढी, प्रथा-परंपरा विरुद्ध, समाज सुधारत स्त्री पुरुष समानतेचा पंथात पालन करणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्दी वर्ष व स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे अवलिया परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभू अवतार दिन आज दि १८ सप्टेंबर २०२१ रोज शनिवारी कामळज ता मुदखेड येथे मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला

     या महोत्सवाची सुरुवात दि ११ शनिवार रोजी महंत श्री चिरडे बाबांच्या भागवत कथेच्या सप्ताहाने झाली सात दिवस कामळज परिसरातील असंख्य धर्म प्रेमी बंधू भगिनींने लाभ घेत सर्व परिसर भक्तिमय झाला होता

 दि १७ सप्टेंबर शुक्रवार रोजी महंत श्री चिरडे बाबांच्या भागवत कथेचे समारोप झाला तद्नंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित राहून सर्व साधू संत आणि उपस्थित जनतेशी संवाद साधून महानुभाव पंथातील वादग्रस्त असलेल्या नांदेड येथिल श्री चक्रधर स्वामी चारणांकित द्विजगोरक्षन संदर्भात सकारात्मकता दर्शविली व रिद्धपुर येथिल श्री चक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापनेच्या बाबतीत चर्चा करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यास परमेश्वराणे मला आशीर्वाद द्यावा हे काम माज्या हातून घडन्याचे मला भाग्य लाभावे मी महानुभाव पंथाच्या सर्व प्रश्नांसाठी तुमच्या सोबत असल्याचे सांगून प्रसंगी सर्व पंथीयांना शुभेच्छा दिल्या 

 सायंकाळी  ५ वाजता कुलवंदनाची भव्य पालखी मिरवणूक व यात पंथातील आम्नाय महंत श्री ज्ञानभास्कराचार्य भास्कर बाबाजी नंदुरबार शहादा,आचार्य श्री यक्षदेव बाबाजी शास्त्री श्री क्षेत्र रुद्धपुर उत्तरकाशी,श्री आचार्य कारंजेकरबाबाजी कवीश्वर कुलाचार्य अमरावती, श्री आचार्य माहुरकर बाबाजी शास्त्री पिठाधिस श्री क्षेत्र माहुर ,श्री आचार्य कापुसतळणीकर बाबाजी श्री क्षेत्र दक्षिण काशी फलटण यांची शोभायात्रा काढून त्यात श्री कृष्णराधा,श्री चक्रधर स्वामी व गोविंद प्रभू महाराज यांची झाकी व भजन ,कीर्तन आणि ढोल तास ताश्याच्या गजरात सर्व गावभर भक्तिमय वातावरणात निर्माण झाले .

 दि १८सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे पाच वाजता कुलवंदनास मंगलस्नान, स.८ वाजता आचार्य श्री यक्षदेव बाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण, आचार्य श्री कारंजेकर बाबा च्या हस्ते सभामंडप उदघाटन आणि कार्यक्रम अध्यक्ष आचार्य श्रीभास्कर बाबा भोजने कार्याध्यक्ष आचार्य श्री कापुसतळणीकर बाबांनी उपस्थित धर्म प्रेमींना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व गोविंद प्रभू महाराजांच्या लीळा सांगून धर्मोपदेशक केला .

      या कार्यक्रमाचे आयोजक गोपीनाथ पाटील, परशराम पाटील,भीमराव पाटील,विश्वाम्बर पाटील,बाबाराव पाटील,माधव पाटील,सुदाम पाटील पडोळे यांनी केले 

  या प्रसंगी या सात दिवसांत अनेक संत,महंत, राजकीय,सामाजिक प्रतिष्ठित व्यक्तीने भेटी दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता माजी सरपंच नागोराव पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली व गावातील सर्व जनतेच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला

मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मराठवाडा मुक्ती दिन साजरा.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कासराळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



 मराठवाडा मुक्ती संग्राम अम्रतोत्सव निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत मेगा कोविड लसीकरण सत्र जिल्हाधिकारी डॉ.ईटनकर सर,मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा घुगे(ठाकूर) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे सर यांचे मार्गदर्शन खाली राबवण्यात आले. 

 त्या वेळी कोविड लसीकरणा मध्ये ऐकुन -११६४ नागरिकांनी सहभागी होवून लसीकरणा करून घेतले.

या मेगा सत्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ. बेंदगुंडे, डॉ. गोवंदे,डॉ.काळे, डॉ. कस्तुरे. डॉ. भिसे. डॉ. नाझ,श्री. साळवे, श्री. जोशी,श्री.शिंदे,श्री.मुक्कावार.

श्रीमती. वाठोरे,, श्रीमती. गाडेकर, कुरूडे,, मेहतर, नंदे, डोंगरे, कपाळे,, टिप्परसे, श्री. वळसिंगे,, कराड, राठोड, मुळे,, गुर्लेवाड, व सर्वच कर्मचारी तसेच आशाताईं यांच्या सहकार्याने काम साध्य झाले.

गुरूकुल इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण 

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आज गुरुकुल इंग्लिश स्कूल आमदुरा व शिकारघाट येथे भारततीय सैन्य दलातील सैन्यामध्ये कार्यरत असलेले रामजी पा. पवार व स्वप्नील पा. पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 ध्वजारोहणाच्या वेळी शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रा. चंपती पवार, पठाण सर, अँड. गजानन पवार,बिसंनसिंग आमदुरेकर, अँड. नवनाथ पंडित,दत्ता पवार, सरपंच शीतल गोरकवाड, उपसरपंच युवराज पवार व मारोती पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पवार व माजी शंकरराव पवार, माजी सरपंच पांडुरंग पवार व रामदास पवार, बालाजी पंडित, संभाजी पा. पवार, गजानन पावर, अवधूत पवार, संतोष पवार, पवार, अरुण पवार, गंगाधर पवार, राम पवार, राजू पवार व गावातील सर्व प्रतिष्टीत नागरिक उपस्तीत होते..

हेक्टरी 50 हजार मदत द्या; जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर


नांदेड/प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील 85 महसूल मंडळात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाली आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे हेक्टरी 50 हजार रूपयांची शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, तसेच नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केली आहे. तसेच या मागणीसंदर्भात शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, पालकमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 14 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजवला. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील 85 महसूल मंडळात ढगफुटीमुळे अतिवृष्टी झाली. नदी, नाल्या महापूर आल्याने शेतकर्‍यांच्या जमिनी खरडून गेल्या. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, नायगाव, उमरी व अन्य तालुक्यात ढगफुटीमुळे अतिवृष्टी होऊन 4 लाख 36 हजार 359 शेतकर्‍यांच्या 3 लाख 51 हजार 617 हेक्टर शेतामधील पिकांचे नुकसान झाले. महापूरामुळे रस्ते खरडून गेली, पशुधनाचे नुकसान झाले, घरांची पडझड झाली, जमिनी रखडून गेल्या, त्यामुळे हेक्टरी 50 हजार रूपयांची आर्थिक मदत द्यावी. तसेच शेतकर्‍यांच्या पिकविम्याची सरसगट रक्कम मिळवून द्यावी. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनी दुरूस्त करून द्याव्यात, तसेच डेंग्यु व साथीच्या रोगाने थैमान घातल्यामुळे संबंधितांना उपाययोजनांसाठी त्वरीत आदेशीत करावे असे दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, रमेश देशमुख शिळवणीकर, भगवानराव पाटील आलेगावकर, गफार खान, कल्पनाताई डोंगळीकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, मधुकरराव पाटील पिंपळगावकर, रमेश गांजापूरकर, गजानन पांपटवार, डॉ. विक्रम देशमुख, विठ्ठलराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर, बालाजी शेळके, तालुकाध्यक्ष उत्तमराव पाटील आलेगावकर, प्रा. मजरोद्दीन, धनंजय सुर्यवंशी, शिला बोंबले, माधव पवार, देवराव टिपरसे, रामदास पाटील, शिवानंद शिप्परकर, आत्माराम कपाटे, शेख साबेर, विठ्ठल पाटील, ओमप्रकाश पत्रे, पांडूरंग गोरठेकर, उद्धव वीजगोरे, खेळगे नागनाथ, शीला पाचपुते, कुसूम देशमुख, सुनंदा पाटील जोगदंड, लक्ष्मीकांत पदमवार, अंकुश देसाई, संदीप राऊत, चंद्रकांत टेकाळे, योगेश पाटील, शरद जोशी यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

कामळज येथे श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्दी महोत्सव व श्री गोविंद प्रभू अवतार दिना निमित्त भागवत कथेला प्रारंभ

   संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका/प्रतिनिधी

  मुदखेड तालुक्यातील कामळज येथे दि ११सप्टेंबर शनिवार रोजी भगवान श्री चक्रधर स्वामी अष्ट शताब्दी तथा गोविंद प्रभू जन्म दिन महोत्सवाला सुरुवात झाली.

त्या  निमित्ताने कार्यक्रमांच्या प्रारंभी पंथाचा ध्वजारोहण व मंडप उद्घाटन नांदेड जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष श्री गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला व तसेच देवपूजा पूजन जिल्हा परिषद सदस्य श्री भिमराव पाटील कल्याने यांच्या हस्ते करण्यात आले.



 त्यानंतर संगीत भागवत कथाकर प.पू.प.म.श्री चिरडे बाबा यांच्या माधुर वाणीने भागवत कथा सप्ताह प्रारंभ करण्यात आली. त्या प्रसंगी महानुभाव परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प पू श्री कान्हेराज बाबा सह परिसरातील साधू संत व बालाजी पाटील शिंदे माळकोठेंकर आणि धर्मप्रेमी माता भगिनी व पुरुष मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून भागवत कथेचा लाभ घेत आहेत हा सप्ताह सात दिवस चालू असून दि १८ सप्टेंबर रोजी श्री चक्रधर स्वामी अष्ठशताब्दी महोत्सव व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महानुभाव पंथीय साधू संत आणि राजकीय मंडळींच्या उपस्थित साजरा होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक मंडळी कामळज यांच्या वतीने करण्यात आली आहे

पावसामुळे व गोदावरीच्या आलेल्या बॅक वॉटरमुळे मुगट येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

 

तहसीलदार यांनी दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

संपादक आशिष मुगटकर



.मुदखेड तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील गावाच्या पश्चिमेला असलेल्या खडकी व होळ नाल्यांना पावसाचे पाणी व गोदावरीच्या आलेल्या बॅक वॉटरमुळे या नाल्या शेजारी असलेल्या जमिनी जलमय झाल्या आहेत.त्यामुळे या शेतातील सोयाबीन, हळद, केळी, ऊस यांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले. मागील दोन दिवसापासून शेतात पाणी कायम आहे. त्यामुळे सोयाबीन, हळदीचे पीक हातचे गेल्यात जमा आहे.

     आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी तात्काळ संचालक भिमराव पाटील कल्याणे यांनी सकाळी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व या पुराची घटना तहसीलदार साहेब दिनेश झांपले यांना दिली.  




      या पुराची पाहणी करण्यासाठी दुपारी तहसीलदार आपल्या टींमसह पावसाचे पाणी व गोदावरीच्या बॅक वॉटरमुळे आलेल्या पुराची पाहणी केली.व जागेवरच मंडळ अधिकारी,व तलाठी यांना नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे सांगितले.



    यावेळी संचालक भिमराव पाटील कल्याणे, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव कल्याणे, ग्रामपंचायत सदस्य धाराजी पवार, मंडळ अधिकारी बालाजी कुराडे, बीडीओ गायकवाड,तलाठी  अर्पना देशपांडे कृषी सहायक देशमुख, शेतकरी दत्ता कल्याणे, रामराव कल्याणे, दादा कल्याणे,राम कल्याणे, बाबुराव कल्याणे,चंपतराव कल्याणे, सदाशिव कल्याणे, शिवानंद कल्याणे या ठिकाणी उपस्थिती होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोकर तालुका संपूर्ण कार्यकारणी बरखास्त

 जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांचा एक मोठा निर्णय !



भोकर तालुका (प्रतिनिधी)

          महाराष्ट्र नवनिर्माण सेना भोकर येथे गाव तिथे शाखा व आगामी निवडणूक भोकर नगरपरिषद ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती ह्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा प्रकारे आपले उमेदवार निवडून येईल ह्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक असल्याने नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांनी एक मोठा निर्णय घेऊन संपूर्ण कार्यकारणी बरखास्त केली.सर्व विंग चे तालुका अध्यक्ष ,शहराध्यक्ष ,शहर उपाध्यक्ष ,शाखा अध्यक्ष,शाखा उपाध्यक्ष ह्या सर्व विंग ची पदे बरखास्त केली आहेत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांनी हस्त लिखित लेटर हेड द्वारे सूचना केली आहे.

          सदरील कार्यकारणी हि संपूर्ण जिल्हा कमिटीच्या जिल्हाध्यक्ष समक्ष चर्चा करून आगामी सक्षम असा तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष देण्यासाठी तयारी करून पुढील निर्णय १५ दिवसाच्या आत नवीन कार्यकारणी देणार असल्याचे नमूद केले.

          यावेळी जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार,गजानन चव्हाण(जिल्हाध्यक्ष),अब्दुल शफी (शहराध्यक्ष,नांदेड ),सौ.उषाताई नरवाडे(महिला सेना,जिल्हाध्यक्षा नांदेड), संतोष सुमेवाड(वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष,नांदेड),दिपक स्वामी(विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष,नांदेड),शक्तीसिंग परमार (वि.सेना जिल्हाध्यक्ष,नांदेड),माधव मेकेवाड(भोकर विधानसभा अध्यक्ष) यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



मुगट जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत ५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.

 शाळेचे मुख्याध्यापक तूकाराम मुंगरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद कल्याणे यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शालेय शिक्षक रकसाळे डी.एस.,घोरडवार एस.एन.,लव्हाळे एम.जी.,कोकणे व्ही.एन., मंगनाळे बि.आर.,बाउसकर एस.पी.,एम.ए.खालिख, मोरे एस.आर., लोखंडे एन.बि., शिक्षीका संतोषीमाता आर., कुलकर्णी पी.जी., कांबळे एम.एस., सोनाळे व्ही.एस., लिपिक अंबूरे एस.ए, सेविका सुर्यवंशी जी.आर. व शालेय विद्यार्थी यांची या प्रसंगी उपस्थिती होती.




स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड च्या वतीने शिक्षक दिन व गुरू वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

  


बारड / प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड ता मुदखेड संचलित स्वा. से. राजाराम बापू माध्यमिक शाळा व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड आणि केम्ब्रिज इंग्लिश स्कुल बारड यांच्या संयुक्त विद्यमाने आज ४ सप्टेंबर  शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवशिष्ट आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण व परिसरातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बालकिशन इरलेवाड,नागोराव मुंगल यासह शाळा , कॉलेज व केम्ब्रिज इंग्लिश स्कुलच्या सर्व शिक्षकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला

  कार्यक्रमाची सुरुवात  गावातील जेष्ठसेवानिवृत्त शिक्षक,प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती  व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन  झाली .

  ५ सप्टेंबर शिक्षक दिनी संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा गुरु वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडचे प्रा. मारोती पवार व स्वा. से. राजाराम बापू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ अनिता पाटील  यांना 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष  संस्थेचे अध्यक्ष मा श्री संजयराव देशमुख बारडकर होते प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख,सचिव रामेश्वर कोरबनवाड,अशोकराव गव्हाणे,दिलीपराव दुर्गे,पंडितराव भोसले,शेषेराव दंडे,एन डी देशमुख गौतम आठवले,भगवानराव कांजाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 

   या पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना "शिक्षक हे विद्यार्थी घडवतात त्यांच्या हातून ही सेवा अविरत घडो या शुभ कार्याला माज्या कडून शुभेच्छा" शिक्षकदिनी संजयराव देशमुख यांनी शुभेच्छा 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख, उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख रामेश्वर कोरबनवाड, अशोक गव्हाणे,दिलीपराव दुर्गे, भगवानराव कांजाळे,एन डी देशमुख, बारड चे सरपंच प्रभाकर आठवले,प्राचार्य हेमंत इंगळे,मुख्याध्यापक रामकीशन चुब्बेवार, प्राचार्य सचिन पाटील यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परिसरातील पालकमंडळी उपस्थित होती कोविड -१९ च्या धर्तीवर सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु आकांक्षा मुदखेडे व शिवानी नाईकवाडे या विद्यार्थिनी केले.



गणेश उत्सव साजरा करतांना शासनाच्या सुचना पाळा , उपविभागीय अधिकारी राजेन्द्र खंदारे यांचे प्रतिपादन

                       

मुदखेड तालुका शांतता समितीची बैठक संपन्न

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी/ अतीख अहेमद

मुदखेड तालुक्यातील गणेश मंडळ पदाधिकारी यांनी सार्वजनीक सण किंवा गणेश उत्सव साजरा करतांना शासनाच्या सुचना चे पालन करावे असे प्रतीपादन उपविभागीय अधिकारी राजेन्द्र खंदारे यांनी केले. मुदखेड तालुका शांतता समिती बैठक दिनांक ३ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात पार पडली . पोलीस उपविभागीय अधिकारी राजेन्द्र खंदारे , पोलीस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख,तहसीलदार दिनेश झांपले यांची बैठकीत मुख्य उपस्थिती होती. पोलिस निरिक्षक महेश शर्मा यांनी प्रास्ताविकात शासनाच्या पत्रक आदेशाची माहिती दिली. वीज वितरण अभियंता निखील धाकडे , मनोज कमटे, ज्येष्ठ नेते राम चौधरी,माजी नगरसेवक गोविंद सेठ कालाणी , गोविंद गोपनपले, प्रकाश बल्फेवाड , गिरिष कोतावार, ॠषी पारवेकर , हामंद डोणगावकर , पाळाव्यात असे स्पष्ट प्रतीपादन पोलिस किशोर पांचाळ, केशव पांचाळ , रवी लोहाळे, प्रल्हाद बाचेवाड , विजय आलेवार सुरेश दवणे यांनी परिश्रम घेतले. 

सुत्र संचालन संजय कोलते यांनी सुरेख पद्धतीने केले आभार सपोनि राजु वटाणे यांनी आभार मानले. पोलीस उप निरिक्षक बालाजी पवार, अपरंपार मठ संस्थान चे अध्यक्ष सुरेश शेटे , मुजीब पठाण , नप चे दिलीप पवार, अनेक गावचे पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष,गणेश मंडळ पदाधिकारी यांची उपस्थिती होती.            

विशेष म्हणजे आज सायंकाळी पोलिस उप अधिक्षक विजय कबाडे यांनी मुदखेड पोलिस ठाण्यात भेट देवुन आढावा घेतला. एकंदरीत आगामी पोळा सण सह गणेश उत्सव कार्यक्रमाला प्रशासनाने गंभीर घेतले आहे हे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुदखेड तालुका अध्यक्ष पदी बालाजी कल्याणे यांची निवड.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील बालाजी उत्तमराव कल्याणे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुदखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र मनसे जिल्हाअध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार, यांच्या हस्ते देण्यात आले.यापुर्वा मनसे विद्यार्थी सेना भोकर विधानसभा पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. नुकतेच यापुर्वीचे तालुका अध्यक्ष माधव पावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे तालुका अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद देण्यात आले आहे.



 याप्रसंगी गजानन चव्हान ,शहर अध्यक्ष अब्दुल शफिक , महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष सुभाष भंडारे, शक्तिसिंह परमार,दिपक स्वामी,सहकारसेना जिल्हाअध्यक्ष प्रविण मंगणाळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष अनिकेत परदेशी , व संतोष बनसोडे ,प्रशांत उदगिरे, माधव पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.बालाजी कल्याणे यांची मनसे मुदखेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मनसे तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मातृभूमी न्युज नेटवर्क च्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन💐🙏


मंदिर उघडण्यास व भजन ,कीर्तनाला परवानगी द्या-राष्ट्रीय वारकरी परिषद ची मागणी

संपादक आशिष मुगटकर


कंधार तालुका प्रतिनिधी/साईनाथ काळवणे.

संपूर्ण देशासह राज्यात सर्वच क्षेत्रातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन परवानगी देत आहे पण मंदिर चालू करण्यास व त्याच पार्श्वभूमीवर भजन, कीर्तन व प्रवचनास शासनाने परवानगी देण्याची मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद कंधारच्या वतीने वतीने करण्यात आली.

राष्ट्रीय वारकरी परिषद कंधार यांच्यावतीने तहसीलदार कंधार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, सध्या सर्वच क्षेत्रातील उद्योगधंदे शासनाच्या नियम व अटीचे पालन करून हळूहळू सुरळीत होत आहे. त्याच धर्तीवर कोरोनामुळे इतिहासात प्रथमच मंदिर बंद ठेवण्यात आले आहेत व वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यास मनाई आहे. जसे इतर उद्योगांना नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार वारकन्यांना ही शासनाच्या ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार मंदिर उघडण्यास ,भजन व कीर्तन करण्याची रीतसर परवानगी द्यावी .असे निवेदन देण्यात आले.

    निवेदनावर ह.भ.प.मृदंगचार्य सत्यम महाराज केंद्रे( तालुका अध्यक्ष कंधार),ह.भ.प. व्यंकटी महाराज हाडोळीकर (उपाध्यक्ष) ह.भ.प. रामलिंग महाराज मठपती (तालुका सचिव),ह.भ. प. शंकर महाराज होनराव (तालुका संघटक) ,ज्ञानोबा हनमंतराव घुगे(सदस्य ) ज्ञानेश्वर चोपदार ( कोषाध्यक्ष )वैजनाथ घुगे,गंगाधर घुगे   यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

मुदखेड येथे ऊर्स व इतर कार्यक्रम रद्द !

 

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ऊर्स कमिटीचा निर्णय !



मुदखेड तालूका प्रतिनिधी/ (अतिक अहमद)

मुदखेड शहरापासून जवळपास ३ किलो मिटर भोकर रोड वर स्थित असलेले सर्व समाजाचे श्रध्दास्थान हजरत गैबी पिर यांचा पोळा या दिवशी संदल निघते.

ऊर्स आणी यात्रा या वर्षी सुध्दा रद्द करण्याचा निर्णय ऊर्स कमिटीने कोवीड -१९ च्या प्रादुर्भाव असल्यामुळे तथा शासनाचे निर्बंध शिथील असून गर्दी मुळे प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्यामुळे गैबी पिर ऊर्स कमेटीचे अध्यक्ष शेख मन्नान भाई बागवान यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.

मुदखेड शहर हे मराठवाड्यातील शेवटचा रेल्वे जंक्शन सुपरिचित असून प्रसिद्ध तर आहेतच त्या येथील केळी आणी फूले देशभरात आपली ओळख ठेवतात परंतू धार्मिक समभाव म्हणून हिंदू , मुस्लिम आणी इतर जातीचे लोक हजरतगैबी पिर दर्गा येथे आपले श्रध्दा व भक्तिभावाने गैबी पिर दर्ग्याला साकडे घालूण अडकलेले काम पूर्ण करूण घेतात हजरत गैबी पिर बाबा दर्ग्याला दर्शन घेण्यासाठी विर्दभ ,मराठवाडा, तेलंगनाराज्य आणी कर्नाटक राज्यातून यात्रेकरु याठिकाणी दर्शनाला येतात २०२० मार्च पासून देशामध्ये कोवीड-१९ मुळे सुद्धा गैबी पिर चा संदल ऊर्स आणी यात्रा कोवीड-१९ महामारी च्या कारणामुळे रद करण्यात आली होती या वर्षाही सुद्धा गैबी पिर चा संदल ऊर्स आणी यात्रा रद करण्यात आल्याची माहिती ऊर्स कमेटी च्या वतीने देण्यात आली दिनांक ०६ सप्टेंबर २०२१ रोजी ऊर्स व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करायचे होते परंतू ऊर्स कमिटी ने शासनाच्या दिशा निर्देशानुसार सर्वानुमते ऊर्स व इतर कार्यक्रम रद करण्याचा निर्णय घेण्यात आला या वेळी ऊर्स कमिटीचे अध्यक्ष शेेख  मन्नाई भाई बागवान,ऊर्स कमेटीचे उपाध्यक्ष अजीज भाई मिरचीवा ले, हजरत गैबी पिर बाबा येथील मुजावर शेख रशीद भाई, नफीस भाई, जमील भाई फुलवा ले, शेख पाशा शेख नासेर , हुसैन मामु , इशहक भाई फुलारी, अझीम भाई बागवान आदींची उपस्थिती होती .

माळकौठा येथे लोक शाहीर,साहीत्य रत्न आण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

    मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पहिल्या प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच मारोती पा.जाधव हे होतेे.

ध्वजारोहण ग्रा.प.सदस्य शंकर पांचाळ व ग्रामविकास अधिकारी गिरीधार मोळके यांच्या हस्ते करण्यात आले . प्रतिमा पुजन सर्व मान्यवरांनी-मा.सरपंच संदिप गोनेवाड,मा.उपसरपंच बापुसाहेब शिंदे,मा.ग्रा.सदस्य सदाशिव गोनेवाड,चंपती हनुमंते,संभाजी पैलवान,से.सो.सदस्य गेंदु हनुमंते यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुरुवात ह.भ.प.व्यंकट महाराज यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन करण्यातआले,जयंती मंडळाच्या वतीने सेवानिवृत गट शिक्षण अधिकारी बालाजी गुरुजी जाधव,गंगाधर गुरुजी सोनटक्के,दिनकर गुरुजी हनुमंते,शिवराम गुरुजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात अला.

अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मान्यवरांनी दिनकर हनुमंते गुरुजी, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी बालाजी जाधव,मा.सरपंच मारोती जाधव,हभप व्यंकट महाराज, लहान बालकांनी प्रकाश टाकला

 यावेळी मुदखेड पोलीस जमादार पवार साहेब,सुरनर साहेब,कन्याशाळेचे बोफेवार सर गावातील बालाजी जाधव ,यशवंत जाधव ,बाबाराव जाधव,बळवंत जाधव,नागेश जाधव,गुलाब जाधव ,परमेश्वर जाधव,संजय जाधव, चक्रधर शिंदे ,साईनाथ शिंदे,शामराव हनुमंते,मारोती गोनेवाड व अजमोदीन शेख आणि समाज बांधव माता भगीनी सर्व मंडळी उपस्थितीत होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष रमेश सोनटक्के,नागेश सोनटक्के,ज्ञानेश्वर सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

लोकप्रिय बातम्या