बारड / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड ता मुदखेड संचलित स्वा. से. राजाराम बापू माध्यमिक शाळा व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड आणि केम्ब्रिज इंग्लिश स्कुल बारड यांच्या संयुक्त विद्यमाने आज ४ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवशिष्ट आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण व परिसरातील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक बालकिशन इरलेवाड,नागोराव मुंगल यासह शाळा , कॉलेज व केम्ब्रिज इंग्लिश स्कुलच्या सर्व शिक्षकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात गावातील जेष्ठसेवानिवृत्त शिक्षक,प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन झाली .
५ सप्टेंबर शिक्षक दिनी संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा गुरु वशिष्ठ आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडचे प्रा. मारोती पवार व स्वा. से. राजाराम बापू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका सौ अनिता पाटील यांनाया कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष मा श्री संजयराव देशमुख बारडकर होते प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख,सचिव रामेश्वर कोरबनवाड,अशोकराव गव्हाणे,दिलीपराव दुर्गे,पंडितराव भोसले,शेषेराव दंडे,एन डी देशमुख गौतम आठवले,भगवानराव कांजाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
या पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना "शिक्षक हे विद्यार्थी घडवतात त्यांच्या हातून ही सेवा अविरत घडो या शुभ कार्याला माज्या कडून शुभेच्छा" शिक्षकदिनी संजयराव देशमुख यांनी शुभेच्छा
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख, उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,श्री शितला देवी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ छायाबाई संजयराव देशमुख रामेश्वर कोरबनवाड, अशोक गव्हाणे,दिलीपराव दुर्गे, भगवानराव कांजाळे,एन डी देशमुख, बारड चे सरपंच प्रभाकर आठवले,प्राचार्य हेमंत इंगळे,मुख्याध्यापक रामकीशन चुब्बेवार, प्राचार्य सचिन पाटील यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि परिसरातील पालकमंडळी उपस्थित होती कोविड -१९ च्या धर्तीवर सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु आकांक्षा मुदखेडे व शिवानी नाईकवाडे या विद्यार्थिनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा