उद्या पासून सर्व सामान्यांचे बजेट कोलमडणार,हे ५ नियम बदलनार

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुंबई प्रतिनिधी 

 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक नवीन नियम लागू होत असतात. आता 1 जूनपासूनही घरगुती खर्चाशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. या महिन्यात LPG सिलिंडर, इंधानाच्या किमती, बॅंकेचे नियम, ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहेत.

या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. यामुळे अनेकांचे बजेट कोलमडू शकते. कोणत्या नियमांमध्ये काय बदल होतील ते जाणून घेऊयात... 

इंधनाचे दर बदलणार 

1 जूनपासून पेट्रोल-डिझेल, CNG-PNG सह हवाई इंधनाच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या नव्या किंमती वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून हे दर स्थिर आहेत आता यात बदल होऊ शकतो. 

गॅस सिलिंडरचे दर वाढणार? 

महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या नव्या किंमती जाहीर होत असतात. 1 जून पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला होता, मात्र आता 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल होऊ शकतो. 

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे सोपे होणार 

ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये 1 जूनपासून बदल होणार आहेत. आता खाजगी संस्थांना (ड्रायव्हिंग स्कूल) ड्रायव्हिंग चाचण्या घेता येणार आहेत. मात्र या चाचण्या फक्त RTO ची मान्यता असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्येच होतील. याआधी या चाचण्या सरकारी केंद्रांमध्ये घेतल्या जात होत्या. तसेच आता 18 वर्षांखालील अल्पवयीन चालक वाहन चालवताना आढळल्यास त्याला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. 

SBI क्रेडिट कार्डच्या नियमात बदल होणार

भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या SBI च्या क्रेडिट कार्डचे नियम 1 जून पासून बदलणार आहेत. AURUM, SBI Card ELITE, SBI Card ELITE Advantage आणि SBI Card Pulse, SimplyCLICK SBI कार्ड, SimplyClick Advantage SBI कार्ड आणि SBI Card PRIME या क्रेडिट कार्ड्सवर सरकारी कामांसंबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. 

आधारकार्डबाबत हा बदल होणार 

UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत 14 जूनपर्यंत आहे. ही मुदत आणखी वाढवण्याची शक्यता नाही. त्यामुळे 14 जूननंतर आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार नाही. यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. त्यामुळे 14 जूनपूर्वी आधार कार्ड अपडेट करुन घ्या.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; मुदखेड भाजपाची मागणी

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि. 30 येथिल तहसील कार्यालयात भारतीय जनता पार्टी मुदखेडच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत एक निवेदन पाठवून तथाकथित शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या बेभान कृत्याचा हवाला देत घटनाकारा चा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक न्यायालयात गुन्हा चालवण्याची मागणी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल बेभान अवेशामध्ये घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा  पिसाट वृत्तीने कार्यकर्त्यासह फाडली या दुर्दैवी घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आ.चंद्रशेखर बावणकुळे तसेच राज्याचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहणास प्रतिसाद देत भाजपा पदाधिकाऱ्यांनी घटनात्मक पद्धतीने आपला निषेध एका निवेदनाद्वारे नोंदविला.

निवेदनावर भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,ता.अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग, शहराध्यक्ष संजय उर्फ पप्पू सोनटक्के,न.पा.माजी गटनेता माधव पाटील खटिंग, माजी नगरसेवक संजय आऊ लवार,इम्रान मछिवाले, चांदु बोकेफोड, रावसाहेब चौदंते,कानोबा बिषमिले,युमो अध्यक्ष सतीश मुंगल,गजानन कमळे,निळकंठ हमदं, सोनू चंद्रे, संतोष सावंत, शिवाजी बाचेवाड, राजू बोकेफोड, शैलेश गुडमलवार, शंकर मोतेवार, पंडित चव्हाण, दिगंबर देशमुख, कालिदास जंगीलवाड, विलास पुयड,साईनाथ गिरी, व्यँकटी धमशेडवार, राजू बोकेफोड आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

बापरे ! ७५ वर्षीय आजोबांच्या पायात होती विठ्ठलाची मूर्ती ,चार महिने लक्षांतही आलं नाही.

 संपादक आशिष मुगटकर



ठाणे प्रतिनिधी

 ठाण्यातून एक आश्चर्यचकीत करणारी बातमी समोर आली आहे. एका आजोबांच्या पायातून डॉक्टरांनी चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या आजोबांना आपल्या पायात विठ्ठलाची मूर्ती आहे याची कल्पना देखील नव्हती.

जखम झाल्यानंतर चार महिन्यांनी त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधळा तेव्हा ही बाब समोर आली. या घटनेवर सर्वच लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार देवघरात साफसफाई करताना एका 75 वर्षीय आजोबा स्टुलावरून खाली पडले आणि त्यांच्या पायाच्या तळव्यात काही तरी घुसल्याने जखम झाली. ती जखम भरल्यानंतर चार महिने झाल्यावरही पाय दुखणे आणि पायातील सूज कायम असल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी एमआरआय केल्यावर आजोबांच्या तळव्यात लोखंडी पट्टीसदृष्य काहीतरी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंगळवारी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून लोखंडाची पट्टी नाही तर चक्क विठ्ठलाची मूर्ती बाहेर निघाली. ही मूर्ती जवळपास साडेतीन सेंटीमीटर एवढी लांब असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पायाचा पहिला एमआरआय नॉर्मल आला

मुलुंड पश्चिम येथे राहणारे 75 वर्षीय आजोबा हे चार महिन्यांपूर्वी घरातील देवघराची साफसफाई करत होते. साफसफाई करताना वस्तू इकडे तिकडे पसरल्या होत्या. याचदरम्यान अचानक ते स्टुलावरून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या पायाच्या तळाव्यात काही तरी घुसल्याने त्यांच्या पायाला जखम झाली होती. ती जखम पूर्णपणे बरे झाल्यानंतरही पाय दुखतच होता. त्यांच्या पायातून पाणी येत असल्याने त्यांनी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. दुखणे आणि सूजने नेमके काय भानगड आहे हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या पायाचा एमआरआय काढला. तेव्हा तो नॉर्मल आला होता. परंतु दुसऱ्यांदा एमआरआय काढल्यानंतर पायात काहीतरी असल्याचे त्यामध्ये स्पष्ट दिसले. 

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना विठ्ठलाचं दर्शन

यानंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थोपेडीक सर्जन डॉ. विलास साळवे आणि त्यांच्या टीमने त्या आजोबांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. या अर्धा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर आजोपांच्या पायाच्या तळव्यातून जी वस्तू बाहेर निघाली ती पाहून डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले. ती वस्तू लोखंडाची पट्टी नसून विठ्ठलाची मूर्ती असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अर्थोपेडीक सर्जन डॉ. विलास साळवे यांच्या टीमने ही शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पूर्ण केली.

मुगट जिल्हा परिषद शाळेचा ऐतिहासिक निकाल.

संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहर 

मुगट येथील जिल्हा परिषद शाळेचा या वर्षीचा ऐतिहासिक गुण घेऊन विद्यार्थीनीं उत्तीर्ण झाली आहे. तर दुसरीकडे शाळेचा निकाल 87.67% ऐवढा लागला आहे. 

दहावी परीक्षेस शाळेतून एकूण 73 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 64 विद्यार्थी दहावी परीक्षा पास झाले आहेत. त्यात विशेष प्राविण्य घेऊन 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 23 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये 27 विद्यार्थी सर्वसाधारण श्रेणी मध्ये 2 विद्यार्थी असे एकूण 64 विद्यार्थी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. 


शाळेमध्ये सर्वप्रथम हाटकर राजकन्या गौतम 95.60% द्वितीय गंगाधर पल्लवी साईनाथ 93.60% तृतीय अजय विजय वाकडे 87.50% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, संचालक आदींनी  अभिनंदन केले.

आमदुरच्या गुरूकुल कोचिंग क्लासेसची यशाची परंपरा कायम.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील गुरुकुल कोचिंग क्लासेस दरवर्षी प्रमाणे यंदाही गुणवत्ता पुर्वक निकाल लागला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने दहावी परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

   प्रा. चंपती पवार सरांचे गुरुकुल कोचिंग क्लासेस आमदुरा व रोहीपिंपळगाव येथील क्लासेसचा 100% निकाल मराठी व सेमी माध्यमाचा 100% निकाल लागला आहे.

हा निकाल केवळ योगायोग नाही तर वर्षभर गुरूकुल कोचिंग क्लासेस ने नियोजनपूर्वक केलेल्या मेहनतीचे फळ आहे असे प्रा.चंपती पवार म्हणाले! 

   प्रथम वैष्णवी अर्जुन किरकन (92%) दुसरा भाविका भुजंग शिंदे ( 90% )दुसरा वैष्णवी शिवाजी किरकन ( 90% )तिसरा निकिता माधव पवार ( 89.40% )चौथा ऋतुजा ज्ञानेश्वर मदनवाड (89%) यांनी विशेष यश संपादन केले आहे.

     श्रद्धा पुयड(87.40%)सेजल पवार ( 87% )संध्याताई पवार (86.80)ओमकार कांजाळकर  (86%)गणेश किरकन(85.80%)युवराज खानसोळे (85%)ऋतुजा खानसोळे (85%)शितल पवार (84.40%)सुनील पवार (84.20)प्रेम इंगोले (84%)आकांक्षा पवार (83.40%)भाग्यश्री कदम (83.60)सिद्धी पाटील(82.20%)तनुजा खानसोळे (82.20)अस्मिता शिंदे (82.20)संजीवनी खानसोळे(82%)गणेश कदम (82%)अनिरुद्ध शिंदे(81.60%)ऋतुजा पवार (81.40)ओमकार पवार (81.20%)माया पाटील (80-80%)साक्षी शिंदे(80.60%)आरती शिंदे(80%)शिवानी कदम (80%)साक्षी किरकन (80%) प्रथम श्रेणी मध्ये 72दित्तीय श्रेणी मध्ये 34 सेमी व मराठी क्लासेसचा 100% निकाल 80% च्यावर क्लासेस अनेक विद्यार्थी पास झाले आहेत.

नंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन घवघवीत यश मिळविले

संपादक आशिष मुगटकर

 कंधार तालुका प्रतिनीधी

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी निकाल जाहीर झाला आहे.यात संगुचीवाडी येथील  

नंदराज शिवराज  रुंजे यांनी उत्तुंग यश मिळवलंय. तो श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर येथे शिकत होता . त्याला तब्बल ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत .घरची परिस्थिती गरीबीची, अशा बिकट आर्थिक परिस्थितीत अभ्यासात एकाग्रता, सातत्य, ध्येयप्राप्ती चिकाटी असलेल्या संगुचीवाडी येथील नंदराज शिवराज रुंजे या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी परिक्षेत ९७.२० टक्के गुण मिळवून आई वडीलांच्या श्रमाचे चीज केले आहे.

           नंदराजच्या यशाबद्दल त्याचा चुलता ( काका) सांगतात की, “माझा पुतण्या हुशार आहे. त्याने दहावीत जवळपास ९८ % मार्क्स घेतले आहेत . त्याला पुढे जे काही करायचं आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”  “त्याने मिळवलेले चांगले मार्क्स पाडून रुंजे कुटुंबात चांगलं यश मिळवलं आहे. त्याचा आम्हाला गर्व आहे.”भविष्यात त्याला  जे पण करायचं आहे त्यासाठी मी त्याच्यासोबत आहे, असं चुलता ( काका ) कैलास पांडुरंग रूंजे  यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले की माझा पुतण्या डॉक्टर बनावा ही आमची इच्छा आहे आणि माझा पुतण्या आमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल .

       त्याच्या यशात  आजी ,आजोबा ,आई , काका , काकू,  आत्या - मामा यांच्या पाशी शिक्षण घेऊन यश मिळवले , शाळेतील शिक्षक ,नातेवाईक  यांचे सहकार्य व  मार्गदर्शन लाभले आहे .त्याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्या दिल्या. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

१२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी केले कौतुक

 संपादक आशिष मुगटकर


   नांदेड जिल्हा प्रतिनिधी.

          नुकताच १२वी बोर्ड परिक्षा 2024 चा निकाल लागला असुन मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा 96.01% निकाल लागला आहे.त्यात कला शाखेचा 93.33% , विज्ञान शाखेचा 100% लागला आणि शंकरराव देशमुख इंग्लीश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज बारडचा सायन्स व कॉर्मसचा 100% निकाल लागला ‌आहे.गुणवंत विद्यार्थी पुढील शाखे प्रमाणे श्री शिवाजी कला महाविद्यालय बारड कला शाखा 1.सपना संजय पवार निवघा,2. वैशाली संतोष पवार निवघा, 3. व्यवहारे स्नेहल सुभाष डोंगरगाव, विज्ञान शाखा 1. मॅकलवाड शुभांगी बालाजी भोसी 2. पुल्लागोर प्राची सोननाथ नांदेड 3. कल्याणकर प्रांजल विठ्ठलराव भोसी4. राजेगोरे प्रगती प्रशांत शेलगाव,



शंकरराव देशमुख इंग्लीश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज बारड विज्ञान शाखा1.धबडगे अनुष्का रामराव 2. निर्मले यश गोविंदराव3. देशमुख समृद्धी नागेंद्र वाणिज्य शाखा1. चव्हान अनुष्का गणेश नांदेड2. कान बले रितेश गजानन नांदेड 3. कुलकर्णी अमृता रमाकांत या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांसह विद्यार्थांच्या गुणवतेचे कौतुक केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यासाठी  प्राचार्य सचिन गव्हाणे, प्रा. नारायण सावंत, प्रा. परशुराम माने, प्रा. कैलाश कपाटे, प्रा. कैलाश खानसोळे, प्रा. मारोती पवार, प्रा. बापुसराव केंद्रे, प्रा. मनोहर ओसावार आदि शिक्षक उपस्थित होते.

मुंबईत भिक मागुन घेतली 3 एक्कर जमीन; लाखो रुपये कमावले,पण शेवट भयानक झाला.

संपादक आशिष मुगटकर



 मुंबई : मोठ्या शहरांमध्ये भीक मागणाऱ्या काही व्यक्तींकडे मोठं घबाड सापडल्याचं आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. मुंबईत भीक मागणाऱ्या एका महिलेची कहाणी काहीशी वेगळी आहे. गेल्या आठवड्यात या महिलेचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळला.

या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईतली मंदिरं, मशिदी आणि दर्ग्याच्या बाहेर, तसंच फुटपाथ, रस्त्यांवर भीक मागणाऱ्या शांताबाई कुऱ्हाडे (वय 79) आता हयात नाही. ही महिला दरमहा 25 ते 35 हजार रुपये कमावत होती. यापैकी 25 हजार रुपये ती दरमहा तिच्या कऱ्हाडमध्ये राहणाऱ्या एकुलत्या एक मुलीला पाठवत होती आणि उरलेले पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पैशांतून शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने सुमारे तीन एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीतून ते कापूस, सोयाबीन, तसंच इतर पिकं घेत आहेत. उर्वरित जमिनीवर घरं बांधून त्यातून मिळणाऱ्या भाडेपट्टीतून लाखो रुपये कमावत आहेत.

या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बैजू महादेव मुखिया (वय 45) याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं, की सुरुवातीला बैजू पोलिसांसमोर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. कडकपणे चौकशी केल्यावर त्याने शांताबाईची हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपी बैजू बिहारमधल्या मधुबनीतल्या झंझारपूर पुरानी बाजार इथला रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तो मुंबईत आला आणि मजुरी करू लागला. मालाडमध्ये ज्या घरात शांताबाई राहत होती, त्याच खोलीत तो भाडेतत्त्वावर राहत होता; पण नंतर भाडं न दिल्याने घरमालकाने त्या घरातून बैजूला काढलं आणि ते घर चार हजार रुपये महिना भाड्यावर शांताबाईला दिलं. बैजूनं भाडं न दिल्याने गेल्या महिन्यात घरमालकानं त्याला घरातून बाहेर काढलं होतं. राहिलेलं भाडं न दिल्याने त्याचं सामानही घरमालकानं आपल्याकडे ठेवलं होतं.

सुमारे 38 वर्षांपूर्वी शांताबाई मुंबईत आली. तिचा पती गावात शेती करत होता. दोन वर्षांनंतर पतीचा मृत्यू झाला. तिला काम मिळत नसल्याने शेतजमीन विकून ती मुंबईत आली आणि भीक मागू लागली. ती सुमारे 35 ते 36 वर्षांपासून मुंबईत भीक मागत होती. भीक मागून तिनं तिच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात केला होता. शांताबाई मालाडच्या चिंचोली बंदर परिसरातल्या विठ्ठलनगरमध्ये भाडेतत्त्वावरच्या एका घरात अखेरच्या श्वासापर्यंत राहत होती. या घराचं चार हजार भाडं ती घरमालकाला देत असे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी शांताबाईचा या घरात संशयास्पद मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी बैजूनं घरमालक नसताना घरात ठेवलेलं सामान बाहेर काढण्यासाठी लोखंडी पत्रे काढून जुन्या घरात प्रवेश केला. त्या वेळी घर रिकामं असेल असं त्याला वाटलं. घरात घुसून सामान घेऊन फरार होऊ असा त्याचा विचार होता; पण घरात घुसल्यावर तिथं त्याला शांताबाई कुऱ्हाडे दिसली. ती बेडवर झोपलेली होती. तिच्याजवळ पैशाची बॅग ठेवलेली होती. बैजूने बॅगेतले पैसे चोरण्याचा प्रयत्न केला; पण आवाज ऐकून शांतबाई झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरडा सुरू केला. आपण पकडले जाऊ या भीतीने बैजूने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. त्यानंतर तो पैसे न घेता घटनास्थळावरून फरार झाला.

डीसीपी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय रवी अडाणे यांच्या टीमला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेले 50 सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले गेले. घटना घडली तेव्हा एक संशयित व्यक्ती विनाचप्पल या परिसरात फिरताना दिसली. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. गुप्तहेरांच्या मदतीने त्याचं लोकेशन मालाडच्या विजयनगर परिसरात मिळाले. तिथं सापळा रचून त्याला अटक केली.

शांताबाईने घरमालकाला डिपॉझिट म्हणून 15 हजार रुपये दिले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की शांताबाई तिच्या मुलीला आणि नातवांना भेटायला कधीतरी जात असे; पण तिचा जास्त वेळ मुंबईत भीक मागण्यात जात असे. ती एका मनी ट्रान्स्फर एजन्सीच्या माध्यमातून तिच्या मुलीला दरमहा किमान 25 हजार रुपये पाठवत असे. सध्या पोलीस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत

कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम.

संपादक आशिष मुगटकर



कंधार तालुका प्रतिनिधी 

कंधार तालुक्यातील कौठा बारुळ येथील कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला. या महाविद्यालयाने ‌‌‌‌दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ‌ यशस्वी परंपरा कायम  ठेवली आहे.कै. शिवराजजी‌ देशमुख ‌कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98:50% लागला‌ आहे.

 यामध्ये विज्ञान शाखेतुन ‌मठवाले शिवगंगा  85:17% द्वितीय पवळे क्रष्णा‌75;33% कला शाखेतुन शैख‌ निगार‌ 80:33% द्वितीय सुर्य वंशी‌ पुजा 78:83% विज्ञान शाखेचा 100%  निकाल लागला असून तर कला शाखेचा ‌98% निकाल लागला ‌आहे.

 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ‌संस्थेचे सचिव शिवकुमार देशमुख ‌संस्थेच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळे सर‌ यानी ‌सर्वांचे अभिनंदन केले यावेळी सर्व ‌शिक्षक ‌& शिक्षकेतर ‌कर्मचारी उपस्थित ‌होते.

गौतम बुद्धांचे जन्मस्थान असलेला लुंबीनीचे ऐतिहासिक महत्त्व काय?

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील ‘लुंबिनी’ हे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीनंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले होते.

लुंबिनी गार्डन

नेपाळच्या रुपंदेही जिल्ह्यातील लुंबिनी हे शाक्य राजकुमार सिद्धार्थ गौतम यांचे जन्मस्थान मानले जाते. सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्तीनंतर बुद्धत्त्व प्राप्त झाले. लुंबिनी संकुलात बुद्धाच्या आईला समर्पित असलेल्या प्रसिद्ध मायादेवी मंदिरासह अनेक पवित्र स्थळे आहेत. मंदिराला लागूनच एक पवित्र तलाव आहे. या तलावात मायादेवीने सिद्धार्थाला जन्म देण्यापूर्वी विधिवत स्नान केले होते असे मानले जाते. लुंबिनी बागेचे वर्णन बौद्ध साहित्यात प्रदिमोक्ष-वन (पापमुक्त जंगल) असे केले आहे. या बागेत सालची झाडे, सुंदर फुले, पक्षी होते. या बागेची निर्मिती कोलिया वंशाचा राजा अंजन याने त्याची राणी रूपादेवी किंवा रुम्मिंदेई हिच्यासाठी केली होती. मगधी भाषेत रूपादेवी किंवा रुम्मिंदेई या नावाचा उल्लेख “लुमिंडेई” असा करण्यात येतो. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते या भागाला लुंबिनी असे संबोधण्यात येऊ लागले. तर इतर काही अभ्यासकांच्या मते हे नाव सम्राट अशोकाने नंतर दिले होते.

कोलिया वंश हा कपिलवस्तूच्या शाक्य कुळाशी वैवाहिक संबंधाने जोडला गेला होता आणि त्यांनी संयुक्तपणे बागेचे व्यवस्थापन केले. मायादेवी ही राजा अंजनाची कन्या होती, तिचा विवाह शाक्य राजा शुद्धोदनाशी झाला होता. बौद्ध साहित्यानुसार, लुंबिनी हे कपिलवस्तू (सध्याचे स्थान अनिश्चित), कुशीनगर (आधुनिक उत्तर प्रदेशातील) आणि वैशाली, पाटलीपुत्र, नालंदा आणि राजगृह (सर्व आजच्या बिहारमधील) मधून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर स्थित होते. या मार्गावर उच्चभ्रू आणि सामान्य लोकांसाठी दुकाने, खानपाणाची ठिकाणे आणि विश्रामगृहे होती.

सिद्धार्थचा जन्म

बौद्ध पौराणिक कथेनुसार, मायादेवी कपिलवस्तूहून देवदहाकडे जात असताना त्यांना वाटेत लुंबिनीमधील साल झाडे लागली. या झाडांमधून जात असताना त्यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. बाळ जन्माला आल्यानंतर असे म्हटले जाते की, बाळ मायादेवीच्या कुशीतून उडी मारून सात पावले चालले. आणि हा त्याचा शेवटचा जन्म असेल आणि त्याचा पुनर्जन्म होणार नाही असेही जाहीर केले.

शाक्य राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ (काही परंपरेनुसार इसवी सन पूर्व ४८०) आहे. इसवी सन पूर्व ४८३ (किंवा इसवी सन पूर्व ४००) मध्ये ८० व्या वर्षी त्यांचे महानिर्वाण झाले असे मानले जाते. इ.स.पूर्व २४९ मध्ये, सम्राट अशोकाने बुद्धाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी स्तंभ उभारला. सिद्धार्थाच्या जन्म सोहळ्यात असित नावाच्या ब्राह्मणाने कपिलवस्तूला भेट दिली होती. सिद्धार्थाला पाहताच असिताने भविष्यवाणी केली होती. त्या भविष्यवाणीनुसार हा मुलगा एकतर महान राजचक्रवर्ती किंवा महान धर्मचक्रवर्ती होईल असे वर्तवण्यात आले. याविषयी बौद्ध परंपरेत संदर्भ सापडतात.

गृहत्याग

सिद्धार्थचे वडील शुध्दोदन यांना सिद्धार्थाने राजा व्हावे असे वाटत होते. म्हणूनच त्यांनी राजपुत्राला कोणत्याही दुःखाचा स्पर्श होऊ नये यासाठी काळजी घेतली होती. राजपुत्राचे पालनपोषण शाही राजवाड्यात सर्व सांसारिक सुखसोयी आणि ऐषोरामात झाले. परंतु त्यामुळे राजपुत्राला कोणत्याही प्रकारचे समाधान लाभले नाही. एकदा राजपुत्राला एका प्रसंगी एक म्हातारा, एक आजारी व्यक्ती, एक मृत व्यक्ती आणि एक तपस्वी दिसला. त्यामुळे राजपुत्राला अनेक प्रश्न पडले. याच प्रश्नांच्या उत्तराकरिता सिद्धार्थाने एका रात्री घर सोडले.

त्यावेळी सिद्धार्थ २९ वर्षांचा होता. आपली पत्नी आणि नवजात मुलाला मागे सोडून सिद्धार्थ राजवाड्यातून बाहेर पडला आणि त्यावेळी फक्त त्याच्या विश्वासू सारथी चन्ना आणि घोडा कंथक त्याच्याबरोबर होते. या घटनेला बौद्ध परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आत्मज्ञान

वयाच्या ३५ व्या वर्षी सिद्धार्थ गौतम मगधचा राजा बिंबिसाराच्या प्रदेशात वसलेल्या गया शहराच्या बाहेरील बोधी वृक्षाखाली ध्यान करू लागला. वयाच्या ४९ व्या दिवशी सतत ध्यान केल्याने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. यावेळी सिद्धार्थाला जगातील दुःखाचे कारण समजले असे म्हणतात. यानंतर सिद्धार्थ हा बुद्ध, प्रबुद्ध झाला. बोधगया हे आज चार महान बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, तर लुंबिनी हे बुद्धांचे जन्मस्थळ आहे. वाराणसीजवळील सारनाथ येथे पहिला उपदेश दिला होता. बुद्धाचे महानिर्वाण कुशीनगर येथे झाले. बुद्ध लुंबिनीशी खूप संलग्न होते. महापरिनिब्बन सुत्तानुसार, त्यांच्या हयातीत अनेक प्रसंगी कपिलवस्तूसह त्यांनी या स्थळाला भेट दिली होती. महापरिनिर्वाणीच्या क्षणी त्यांनी आपल्या अनुयायांना इतर तीन पवित्र स्थळांसह लुंबिनीला भेट देण्याचा सल्ला दिला होता.

ऐतिहासिक स्थळ

लुंबिनी येथे इसवी सनपूर्व सहाव्या शतकातील अनेक पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहे. चिनी भिक्षू फॅक्सियन (फ़ाहियान) आणि झुआनझांग (ह्युएन त्सांग) यांनी अनुक्रमे ५ व्या आणि ७ व्या शतकात या स्थळाला भेट दिली. १९ व्या शतकात लुंबिनीचा इतिहास शोधण्याच्या प्रयत्नात पुरातत्त्व अभ्यासकांनी या परिसरात सर्वेक्षण केले होते.

लुंबिनी आणि बौद्ध धर्माच्या इतिहासातील इसवी सन पूर्व ३ रे शतक महत्त्वाचे होते. कलिंगाच्या युद्धातील नरसंहार पाहिल्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि धर्माच्या प्रसारासाठी स्वतःला वचनबद्ध केले. त्यांनी लुंबिनीला भेट दिली आणि इसवी सन २४९ मध्ये, बुद्धाच्या जन्मस्थानावर एक धार्मिक वास्तू उभारली. तसेच याच ठिकाणी स्तंभही उभारून त्यावर शिलालेखही कोरवून घेतला.

लुंबिनीचा अशोक स्तंभ भग्न अवस्थेत आहे. शिल्लक स्तंभाच्या खालील भाग हा जमिनीच्या ४ मीटर आत आहे. तर जमिनीवरील भाग ६ मीटर आहे. मूळ स्तंभ बराच उंच असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. प्रवासी वर्णनावरून मूळ स्तंभ कशास्वरुपाचा होता याची कल्पना येते. मूळ स्तंभाच्या शीर्षकावर उलटे कमळ आणि प्राण्याची प्रतिमा होती.

स्तंभावरील शिलालेख, पाली भाषेत होता. तर लेखाची लिपी ब्राह्मी होती. या कोरीव लेखात अशोकाने बुद्धाच्या जन्मस्थळी प्रार्थना केली आणि यात्रेकरूंना सर्व धार्मिक करांपासून मुक्त केले जाईल असे म्हटले आहे. १३१२ मध्ये, खास-मल्ल राजा रिपू ​​मल्ल याने ‘ओम मणिपद्मे हूं’ (ॐ मणि पद्मे हूँ) हा बौद्ध मंत्र आणि स्तंभावर त्याचे नाव कोरले. असे असले तरी १८९६ साली पुन्हा शोध लागेपर्यंत लुंबिनी अनेक शतके विस्मरणात गेले होते. आणि याच ठिकाणी नंतर पुरातत्व अभ्यासकांनी उत्खनन केल्यावर अनेक गोष्टींचा शोध लागला….

कैलास मानसरोवर तिबेट देश चीन पासून मुक्त व्हावा - सनतकुमार महाजन_

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

भारत तिब्बत सहयोग मंचच्या वतीने चीनच्या ताब्यात असलेले  कैलास मानसरोवर तिबेट मुक्ती संकल्प यज्ञ उत्साहात पार पडला.या वेळी देवगिरी प्रांत महामंत्री सनतकुमार महाजन,जिल्हा अध्यक्ष भास्कर डोईबळे,हा संकल्प यज्ञास पुरोहित म्हणून नारायण कुलकर्णी,सुरेश लंगडापुरे,सविता गबाळे यांची प्रमुख उपस्थित होते.

याबाबतीत सविस्तर वृत्तांत असे की दि.९ मे सकाळी ९ वा.भारत तिबेट सहयोग मंच,पतंजली योगपीठ परिवार,स्वामी समर्थ मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे पाच कुंडी संकल्प यज्ञ आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी भारत तिबेट मंचचे देवगिरी प्रांत महामंत्री सनत कुमार महाजन मार्गदर्शन करताना आपल्या देशाचा परंपरागत बंधू असलेला देश तिब्बत आज सुद्धा चीनच्या ताब्यात आहे.१९५२ मध्ये चीन पाय पसरायला सुरुवात केली,तदनंतर १९५८ मध्ये संपूर्ण तिबेट ला चीनने ताब्यात घेतले आणि ते तिबेट ला परतंत्र केले.आपल्या संस्कृतीतला अविभाज्य बौद्ध पंथ हा तिबेटचा अध्यात्मिक पंथ आहे,त्या ठिकाणाहून अशा प्रकारच्या सर्वप्रथम वस्तू,गोष्टी व संस्कृती चीनने हळूहळू संपूर्ण नष्ट केली. म्हणून या सर्व प्रकारचे संरक्षण करायचे असेल तर तिबेट हा चीन पासून मुक्त झाला पाहिजे, तिबेट मुक्त झाला म्हणजे कैलास मानसरोवर ही मानाचे पवित्र स्थान ही मुक्त होणार आहेत.चीन हा भारताच्या शेजारी कधीच नव्हता चीन आणि भारतामध्ये तिबेट हा देश होता त्याचबरोबर भारताचा ४००००स्क्वेअर फुट भूभाग चीनच्या ताब्यात गेलेला आहे. हा भूभाग चीनच्या पराधीनतेपासून मुक्त करण्यासाठी म्हणून सबंध हिंदुस्तानच्या १४० कोटी जनतेच्या मनात संकल्प जागृत व्हावा म्हणून हा महासंकल्प यज्ञ संपन्न केला आहे.

 दि.५ मे हा भारत-तिबेट सहयोग मंच चा स्थापना दिवस आहे.त्याच अनुषंगाने या सप्ताहात हा संकल्प अभियान राबवत आहोत अशी प्रतिपादन करण्यात आलेतर यजमान म्हणून सपत्नीक भास्कर डोईबळे, प्रल्हाद घोरबांड ,प्रेमानंद शिंदे, बोडके गणेश,राजेश्वर चेडगुलवार,शिवदास डोईबळे.

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेमुळे खत उद्योग हैराण

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे; तर शेतकऱ्यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा कृषी खात्याने दिला आहे.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सध्या घमासान चर्चा होते आहे. कृषी निविष्ठांवरील खर्च वाढल्याचाही मुद्दा समूह माध्यमांवर सतत उपस्थित होतो आहे. त्याचे निमित्त साधत 'ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खते महागली आहेत' अशी जोरदार अफवा सोमवारी (ता. ६) राज्यभर पसरली होती. विशेष म्हणजे काही वृत्तवाहिन्यांनी ही अफवा खरी समजून खत दरवाढीच्या बातम्या प्रसारित केल्या.

त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. या बातम्यांमध्ये १०:२६:२६ खताच्या ५० किलोच्या गोणीचे दर १४७० रुपयांऐवजी १७०० रुपये, २४:२४:०:० श्रेणीचे दर १५५० रुपयांऐवजी १७०० रुपये २०:२०:०:० ची किंमत १२५० रुपयांऐवजी १४५० रुपये तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चुकीचे सांगण्यात आले. या बातम्यांना खरे मानत काही भागात विक्रेत्यांनी अडवणूकदेखील सुरू केल्याचे गुणनियंत्रण विभागाच्या एका तंत्र अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, कृषी आयुक्तालयात खत दरवाढीची अफवा धडकताच स्वतः गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी खत उद्योगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात कोणतीही दरवाढ झालेली नसून उलट आरसीएफ कंपनीच्या एका श्रेणीची किंमत कमी झाल्याचे आयुक्तालयाच्या निदर्शनास आले.

आरसीएफ कंपनीचे उपमहाव्यवस्थापक भगवानसिंह चौहान यांनी दिलेल्या लेखी पत्रात खतांचे दर नमूद केले. त्यात आरसीएफ युरियाची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) २६६.५० रुपये (४५ किलो गोणीसाठी) तर ५० किलोची सुफला १५:१५:१५ ची किंमत १४७० रुपये, १०:२६:२६ ची किंमत १०७० रुपये; तर डीएपीची किंमत १३५० रुपये अशी नेहमीप्रमाणेच स्थिर असल्याचे कळविण्यात आले.

निवडणुकीच्या वातावरणाची संधी साधत खत दरवाढीची अफवा पसरवली गेली असू शकते, असे 'फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया'च्या सूत्रांनी सांगितले. ''राज्यात कोणत्याही कंपनीने खतांची दरवाढ केलेली नाही. शहरालगतच्या शेतकऱ्यांना ही अफवा असल्याचे पटले आहे; परंतु दुर्गम व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या अफवेचा फटका बसू शकतो.

मुळात, केंद्र शासनाने अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) अलीकडेच जाहीर केले आहे. त्यानुसार खत निर्मिती कंपन्या आपापल्या उत्पादनाचा निर्मिती खर्च आणि किमतीचे पुढील किमान सहा महिन्यांचे नियोजन करीत आहे. त्यामुळे मध्येच खताची दरवाढ होण्याचा प्रश्‍न उद्‍भवत नाही,'' असे असोसिएशनच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

''आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाचे दर अचानक वाढल्यास कंपन्यांना खतांच्या किमतीचा आढावा घ्यावा लागतो. मात्र त्यासाठी देखील केंद्राची परवानगी घ्यावी लागते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाबाबत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या खतांच्या किमती स्थिर आहेत,'' असेही असोसिएशनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

उलट दर कमी झाले

'आरसीएफ'च्या सूत्रांनी सांगितले, की संयुक्त खतांच्या दरात वाढ झालेली नाही. उलट २०:२०:०:१३ खताची नव्या पुरवठ्याची किंमत १३०० रुपयांऐवजी १२५० रुपये झाली आहे. त्यामुळे या श्रेणीचे नवे खत शेतकऱ्यांना प्रतिगोणी ५० रुपये कमी दराने मिळणार आहे.

विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रणखत उद्योगाकडून आम्ही खात्री केली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत. विक्रेत्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 'एमआरपी'पेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास कारवाई केली जाईल.

खताच्या श्रेणी (ग्रेड)निहाय स्थिर

किमती अशा (सर्व दर ५० किलो गोणीचे)

युरिया २६६.५० रुपये (४५ किलो)

डीएपी १८:४६:०:० १३५० रुपये

एमओपी ०:०:६०:० १६५५ ते १७०० रुपये

एनपी २४:२४:०:० १५०० ते १७०० रुपये

एनपीएस २४:२४:०:०८ १६०० रुपये

एनपीएस २०:२०:०:१३ १२०० ते १४०० रुपये

एनपीके १९:१९:१९ १६५० रुपये

एनपीके १०:२६:२६:० १४७० रुपये

एनपीके १२:३२:१६ १४७० रुपये

एनपीके १४:३५:१४ १७०० रुपये

एनपी १४:२८:० १७०० रुपये

एनपी २०:२०:०:० १३०० रुपये

एनपीके १५:१५:१५ १४७० रुपये

एनपीएस १६:२०:०:१३ ११५० ते १४७० रुपये

एनपीके १६:१६:१६:० १३७५ रुपये

एनपी २८:२८:०:० १७०० रुपये

एएस २०.५:०:०:२३ १००० रुपये

एनपीकेएस १५:१५:१५:०९ १४५० ते १४७० रुपये

एनपीके १७:१७:१७ १२१० रुपये

एनपीके ०८:२१:२१ (४० कि.) १८०० रुपये

एनपीके ०९:२४:२४ (४० कि.) १९००

एसएसपी (दाणेदार) ०: १६:०:११ ५३० ते ५९० रुपये

एसएसपी (भुकटी) ०: १६:०:१२ ४९० ते ५५० रुपये

आमदुरा येथे वारकरी भव्य दिव्य बाल सुसंस्कार शिबिराला सुरुवात

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील श्री शेत्र दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी श्री. ब्रह्मचैतन्य वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्यावतीने वारकरी भव्य दिव्य बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला दि.६ पासून सुरुवात झाली या शिबिराची सांगता दि.१० रोजी होणार आहे.

या पाच दिवसीय शिबिरामध्ये इयत्ता तिसरी ते दहावीचे विद्यार्थ्या सहभागी होऊ शकतात. या शिबिरात सामुदायिक प्रार्थना, हनुमान चालीसा ,श्रीमद् भागवत कथा, मृदंग गायन, हरिपाठ नित्य श्लोक ,साधू संतांची चरित्रे यांचा प्रमुख समावेश असणार आहे.

सद्गुरु शांती ब्रह्म कुरेकर बाबा आळंदीकर यांच्या शुभ आशीर्वादाने या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक व गोसेवक म्हणून संजयजी महाराज पाचपोर अकोला तसेच युवा कीर्तनकार तथा भागवताचार्य ह. भ. प. वैष्णवी ताई पवार आमदुरेकर हे असणार आहेत.

संगणकाच्या युगात सध्याच्या काळाच्या ओघात समाजाला व लहान मुलांना बालवयामध्ये मुलांच्या मनावर सुसंस्कार विचार देव, देश, धर्म, संत, ग्रंथ आणि पंथ याची विचार बिंबवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या शिबिराचे आयोजन प्रथमच मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे करण्यात आली आहे असे शिबिराचे संचालक ह.भ.प. गणेश महाराज पवार आमदुरेकर (अध्यक्ष श्री ब्रह्मचैतन्य वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची) यांनी केली आहे.

लोकप्रिय बातम्या