मुदखेड /तालुका प्रतिनिधी
दि.२८ रोजी नांदेड चे सर्वांचे लाडके नेते , राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण मुदखेड शहरातील नगरपालिका अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जात होते.
मुगट पाटी येथील जिजाऊ चौकात पालकमंत्री यांचा ताफा येताच काँग्रेस च्या जि. प. मुगट गटाच्या वतीने आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबाचें जंगी स्वागत करण्यात आले. व नंतर त्यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले.
जि.प.गटांतील मागण्यांचे निवेदन सर्व सरपंच व पदाधिकारी यांच्या वतीने मा. साहेबांना देण्यात आले .या प्रसंगी त्यांच्या समवेत विधानपरिषदेचे लोकप्रिय आमदार मा. आमरभाऊ राजुरकर साहेब , जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर , जि. प. सदस्य , भिमराव पा. कल्याने , काँग्रेसचे ओबीसी विभागांचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव , प.स. माजी सभापती शत्रुघ्न पा. गंड्स , माजी प.स.सभापती रत्नाकर पा. शिंदे , तसेच मुगट जि. प. गटातील सर्व काँग्रेस पक्षाचे आजी/ माजी जि.प./प. स. सदस्य ,काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी,कारखान्याचे संचालक ,सर्व सरपंच, उपसरपंच चेअरमन , प्रमुख,कार्यकर्ते व युवक , जेस्ट काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.































