मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
दि. २५ रोजी शुक्रवार मुदखेड येथे एम सी एल (mcl) इंडिया अंतर्गत श्री अनघा लक्ष्मी ऍग्रो प्रोडूसर कंपनी च्या कार्यालयाचे उदघाटन कोलंबी येथील दत्त संस्थांचे महंत श्री यदुबन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले .
शेतकऱ्यांचा कच्चामाल म्हणजेच गजरा गवत व शेतातील अनावश्यक काडीकचरा यापासून बायो सीएनजी गॅस व सेंद्रिय खते निर्माण करणारा प्रकल्प मुदखेड तालुक्यात उभारला जातोय या प्रकल्पाचे संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे.
या कार्यालयात आपल्याला प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार असून सभासद नोंदणीसाठी आपण कार्यालयात संपर्क साधावा असे आव्हान प्रकल्पाचे चेअरमन श्री उद्धवराव पाटील पवार निवघेकर,मुख्य प्रवर्तक श्री सुरेशजी बेद्रे, संचालक विजय पाटील व्यवहारे, संचालक आनंदराव पाटील शिंदे, संचालक देवरावजी लोमटे, संचालक चक्रधर पाटील पवार, संचालक राम पाटील कल्याने, संचालक देविदास चंद्रे,संचालक लिंगेश्वर बेद्रे व व सर्व कार्यकारणी उपस्थित होते.
३० जून ही सभासद होण्याची शेवटची तारीख असून यात सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सभासद होऊन सहभाग घ्यावा असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
ऑफिस पत्ता- पवार ट्रेडर्स जवळ, काँग्रेस कमिटी ऑफिस च्या बाजूला नांदेड रोड मुदखेड.
संपर्क- ९९६०६०११५८, ९९२२८२६२७८


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा