मुगट येथे ट्रक व ऑटो चा भीषण अपघात.

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहर

मुगट येथील मुदखेड रोड वरील ऐरिकेशन क्यॉम जवळील वळन रस्त्यावर ट्रक व ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत.

मुदखेड हुन वाजेगाव कडे जाणाऱ्या ऑटोची वळण रस्त्यावर समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे. त्यामुळे या आठवतील प्रवासी जखमी झाली असून त्यात दोन महिला, एक पुरुष, एक लहान मुलगा यांचा जागेवरच मृत्यू झाला तर या यातील इतर प्रवासी लहान, मुले ,बायका ही सुद्धा गंभीर जखमी झाली आहेत अद्याप तरी जखमीची ओळख पटली नाही.

 हे सर्व मजुर असुन वाजेगाव कडे जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शी कडून सांगण्यात आले आहे. 

या ठिकाणी लगेचच मदत कार्याला सुरुवात झाली.शेतातील शेतकरी अपघात घडताच धावुन आहे असून जखमींना शासकीय रुग्णालय मुदखेड येथे लवकरच हालवण्यात येणार आहे.

सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन असामान्य कर्तृत्त्व गाजवता येते; हीच रामजन्म कथेची फलश्रुती!

 मुख्य संपादक आशिष मुगटकर




नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

आज श्रीराम नवमी. प्रभू रामरायाचे जीवनचरित्र पाहिले, तर अयोध्येचा राजकुमार असूनही त्याच्या वाट्याला का कमी हालअपेष्टा आल्या?

श्रीरामांचा जन्म झाला, तो श्रावणकुमाराच्या माता पित्यांच्या शापातून. एवढा मोठा पुण्यात्मा, परंतु त्याच्या जन्माच्या आधीच त्याची सावत्र आई कैकयी त्याच्यासाठी वनवास मागून घेते. रामाचा जन्म होतो. राजा दशरथाकडून आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी यांच्याकडून कोडकौतुक करून घेण्याच्या दिवसात गुरुगृही जाण्याचा प्रसंग येतो. 

राजवाड्यात जन्म घेऊनही गुरुंच्या आश्रमात जाऊन पाणी भरणे, लाकडे वेचणे, गुरे राखणे ही कामे त्याला करावी लागतात. शिक्षण करून राम आणि त्याचे भाऊ घरी परततात, तर विश्वामित्र ऋषी पंधरा वर्षाच्या रामाला उपद्रवी राक्षसांचा बंदोबस्त लावण्यासाठी सोबत घेऊन जातात. परत येतात, ते मिथिला नरेशची सुपूत्री जानकी हिच्याशी विवाह करूनच!

राजा दशरथ आणि सर्व जनतेचा प्रिय सुकुमार राम, सिंहासनावर बसण्यासाठी नियुक्त केला जातो, तेव्हा कैकयी आपल्या वचनांची आठवण करून देत भरताला राजसिंहासन आणि रामाला वनवास मागून घेते. आयुष्यातला सोनेरी क्षण हातात येता येता निसटून गेला, तरी राम स्थितप्रज्ञ राहतात आणि वडिलांनी भावनेच्या भरात तिसऱ्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ऐन तारुण्याची चौदा वर्षे वनवासात काढतात. सावलीसारखी असलेली पत्नी सीता राजवैभव सोडून पतीच्या पाठोपाठ वनवास स्वीकारते आणि बंधू लक्ष्मणदेखील नवे नवे लग्न झालेले असतानाही पत्नीवियोग सहन करून सेवेसाठी रामापाठोपाठ जातो. 

दंडकारण्यात रामाचा सामना एकापेक्षा एक भयाण राक्षसांशी होतो. राम त्यांचा पराभव करतो. ऋषी,मुनी,तपस्वी,साधू, उपेक्षित जनता, त्यांच्या भेटीसाठी आसुसलेले भक्त यांचा उद्धार करतो. अशातच रावण नामक दुष्ट राक्षस रामाच्या अपरोक्ष त्याच्या पत्नीला पळवून नेतो. जीवापाड प्रेम असलेली अर्धांगिनी तिचे आपण रक्षण करू शकलो नाही, हे शल्य त्याच्या मनाला टोचत राहते. तिच्या शोधार्थ राम आकाशपाताळ एक करतो. दशानन रावणाशी युद्ध करतो. राजधर्माला अनुसरून सीतेची अग्निपरीक्षा घेऊन सन्मानाने परत आणता़े 

वनवास संपवून आल्यावर अयोध्येचा राजा बनतो. परंतु एका नागरिकाने उपस्थित केलेल्या शंकेमुळे राम पुनश्च राजधर्म आणि पतिधर्म या द्वंद्वात अडकतात. त्यांची व्यथा सीतेला कळते. तेव्हा सीतामाई आपणहून वनात जाऊन वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात राहणे पसंत करते. अनेक वर्षे ती परत येत नाही. हतबल रामाला एक राजा म्हणून सीतेचा वियोग सहन करावा लागतो. परंतु सीतेवरील प्रेमापोटी तो दुसरा विवाह करत नाही. तर राजसूयज्ञाच्या वेळेस सीतेची सुवर्णमूर्ती स्थापित करतो. त्या प्रसंगी लव कुशाची भेट होते, पण ही आपलीच मुले आहेत, यापासून राम अनभिज्ञ असतो. त्यांच्यायोगे राम सीतेची भेट घेण्यास वनात जातो, तेव्हा सीता मुलांना रामाच्या स्वाधीन करून वसुंधरेच्या कुशीत कायमची निघून जाते.

रामाला संसारसुख मिळत नाहीच, शिवाय एकल पालकत्व अंगिकारून मुलांचा आणि रयतेचा सांभाळ करावा लागतो. कालपरत्वे सर्व जबाबदाऱ्या संपवून राम शरयू नदीत आपले अवतारकार्य संपवतो.

अशी ही रामकथा म्हणावी की रामव्यथा? परंतु, एवढे सगळे घडूनही रामाने पदोपदी आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि धीराने, संयमाने, न्यायाने, प्रेमाने वागून रामराज्य निर्माण केले. आपणही रामाकडून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात राम आणुया आणि प्राप्त परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकुया. जय श्रीराम!



गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी १५ कोरोना पॉझिटिव्ह; छ. संभाजीनगरकरांची चिंता वाढली

मुख्य संपादक आशिष मुगटकर



छत्रपती संभाजीनगर 

एकीकडे राज्यभरात मोठ्या आनंदात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा केला जात असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरकरांची (Chhatrapati Sambhaji Nagar) कोरोनाने (Corona) चिंता वाढवली आहे.

कारण कोरोना संसर्गाने शहरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात १७ नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असतानाच, आता मंगळवारी (२१ मार्च) रोजी एकाच दिवसात १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत शहरात कोरोनाचे ४३ सक्रिय रुग्ण असून, सर्वजण घरीच उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे सर्व रूग्णापैकी कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत. 

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरातील रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळाली होती. उपचारासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले. अनेकांनी आपला जीव गमवला होता. एवढंच नाही तर दुसऱ्या लाटेत तर रुग्ण संख्या एवढी होती की, शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कमी पडल्या होत्या. हा सर्व अनुभव पाहता, कोरोना संसर्ग उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक सक्रिय होऊन संसर्गजन्य ठरतो. दरम्यान आता मार्च महिना सुरु झाल्यावर अशीच काही रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत १५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची देखील चिंता वाढली आहे. तर मंगळवारी दर शंभर चाचण्यांमागे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ९.५५ टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

आरोग्य विभागाची चिंता वाढली... 

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहे. तर एकाचवेळी १५ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता वाढती रुग्ण संख्या पाहता महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घेण्याचे देखील आवाहन डॉक्टरांनी केले आहेत. तर शहरातील आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यात येत आहे. 

गुढीपाडव्याच्या शोभयात्रेत सहभागी होताना काळजी घ्या...

आज राज्यभरात मोठ्या आनंदात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे शहरात यानिमित्ताने शोभयात्रा देखील काढण्यात येणार असून, मोठ्याप्रमाणावर नागरिक यात सहभागी होत असतात. पण वाढत्या कोरोनाची रुग्ण संख्या पाहता शोभयात्रेत सहभागी होताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शोभयात्रेत होणारी गर्दी लक्षात घेता मास्कचा वापरा केला पाहिजे. तसेच घरी आल्यावर हात धुतले पाहिजे. तर गर्दीत वावरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी-- भगवान पाटील नागेलीकर.

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील बहुतांश भागात दि.१६ मार्च रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना करण्यात आली.

 मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी, हरभरा, गहू, ज्वारी, टरबूज, पपई अशा रब्बी व बागायती पिकांचे १००% नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. आधिच कोरोना-१९ मुळे हैराण झालेला शेतकरी कसाबसा सदरील पिकांची लागवड करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु अचानक झालेल्या गारपिटीमुळे त्याचे हातास आलेल्या पिकाचे १००% नुकसान झाल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग हैराण झाला आहे.

सर्व बाबींचा यथोचित गांभीर्याने विचार करुन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शासन स्तरावर तात्काळ मिळवून देऊन शेतकऱ्यास दिलासा द्यावा अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस भगवान पाटील पुयड नागेलीकर  यांनी केली.

राज्याचे संकट मोचक ना.गिरीष महाजन यांचा मुदखेड तालुक्यातील संकट ग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद

मुख्य संपादक आशिष मुगटकर


मुदखेड दि.१९

येथील बारड, पांढरवाडी, पाटनूर शिवारात दि १६ मार्च रोजी आलेल्या असमानी संकटात सापडलेल्या गारपिटग्रस्त बळीराज्याचे दुःख वाटून घेण्यासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधित पिकांची पाहणी करत शेतकरी बांधवांच्या व्यथा थेट बांधवर जाऊन समजून घेतल्या आणि सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांचे समाधान होईल इतकी मदत लवकरात लवकर केल्या जाईल असे अश्वस्त केले आहे. राज्याच्या राजकीय,सामाजिक, सैक्षणिक,धार्मिक आणि नैसर्गिक आपत्ती कमी ज्यांची भाजपा नेतृत्वात संकट मोचक म्हणून ख्याती आहे. अश्या कर्तव्य दक्ष ग्रामीण विकास तथा पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या भेटीने मुदखेड तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आशा प्रफुलीत झाल्या असून राज्य भाजपाचे संकटत मोचक मुदखेड तालुक्यातील गारपीठ ग्रस्त शेतकऱ्यांची अडचण नक्कीच दूर करतील असा विश्वास शेतकरी बांधवानी व्यक्त केला आहे.

या वेळी ना.गिरीष महाजन यांच्या सोबत आ.राम पाटील रातोळीकर,आ.बालाजी कल्याणकर,आ.राजेश पवार,जिल्हाधिकारी अभीजीत राऊत, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलीस अधीक्षक यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्वच विभागाचे प्रमुख आणि मुदखेड चे तहसीलदार सुजित नरहिरे, गटविकास अधिकारी बळदे, कृषि अधिकारी पुरी तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे,भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले,सरचिटणीस विजय गंबीरे,भाजपा मराठवाडा प्रभारी(दि.वि.आ )प्रवीण गायकवाड,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऍड.किशोर देशमुख,भाजपा ओ.बी.शी.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,भाजपा ता. अध्यक्ष शंकर मुतकलवाड,कृ.ऊ.बा.स. मुदखेडचे सभापती मैसाजी भांगे,भाजपा मुदखेड शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव विलास कल्याने आदी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मंत्री मोहदयांच्या ताफ्यात सहभागी झाले होते. हा संपूर्ण दौर्यात बाधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मंत्री मोहदयांना  भाजपा किसान मोर्चाचे दिगंबर टिप्परसे, संचालक बालाजी खटिंग,गोविंद चित्तलवाड,ओबीसी मोर्चाचे कैलाश आमदूरकर यांनी दौऱ्याच्या शेवट पर्यंत दिली. या बद्दल शेतकरी बांधवांकडून विश्वासक  दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केल्या जात होती.

खा.प्रताप पाटील चिखलीकर पोहचले मुगटच्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहर 

मुगट येथे गुरुवारी  सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज दि.१८रोजी मुगटला भेट दिली.

मुगट येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना डोळ्यात पाणी दिसून येत होते. खासदार साहेबांनी  व्यथा ऐकून त्यांना भावनिक धीर देत त्यांचे सांत्वन केले. 



गारपिटीमुळे मुदखेड तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांना फटका बसला आहे. मुगट येथील केळी, टरबूज, हरभरा ,ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गावातील अनेक लोकांच्या घरावरील पत्रे ही वादळ वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. मुगट येथील बागायतीचे क्षेत्र अधिक असून त्यामध्ये ऊस, केळी, टरबूज अशा नगदी पिकाची लागवड अधिक प्रमाणात केली जात आहे. 

या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

 मुगट येथील शेतकरी किरण कल्याणे, भास्कर कल्याणे, साहेबराव पवार, माणिका मुंगल यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन खासदार साहेबांनी पिकांची पाहणी केली.

"या गारपिटीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे.त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी मी माझे सरकार असून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी म्हणाले."



यावेळी त्यांच्या सोबत किशोर देशमुख , बालाजी पुयड,गणेशराव शिंदे ,प्रवीण गायकवाड, म्हैसाची भांगे,मुन्ना चांडक ,कालिदास जंगिलवाड, बिस्मिल्ले, गणेशराव येळमकर, विलास कल्याणे, सुरेश कल्याणे श्याम सुंदर मुंगल, शामराव मुंगल, मुदखेड तहसीलदार,नायब तहसीलदार,मुगट तलाठी अर्पिता देशपांडे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी  उपस्थिती होते.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही


मुंबई दि.१७

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कोणाचेही फोन उचलतात असे व्हिडिओ फिरतात. तर त्यांचे वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, अशाप्रकारचा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज सभागृहात लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा, तुम्ही काळजी करु नका. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनचा तिसरा आठवडा सुरु आहे. अवकाळी मुद्द्यावरून विरोधक सभागृहात आक्रमक झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांची तातडीने मदत करू असे आश्वासन दिले आहे.



"२०२६ पर्यंत भारताला 'संयुक्त हिंदू राष्ट्र' घोषित केले जाईल"

मुख्य संपादक आशिष मुगटकर



अहमदनगर जिल्हा 

 देशातील शहरांची नावे बदलणे ही तर फक्त सुरुवात आहे. भविष्यात अहमदनगर आणि हैदराबाद शहरांची नावे बदलून अहिल्याबाईनगर आणि भाग्यनगर करण्यात येणार असून २०२६ पर्यंत भारताला 'संयुक्त हिंदू राष्ट्र' घोषित केले जाईल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निलंबित आमदार टी.

राजा सिंह यांनी केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

टी राजा सिंह म्हणाले की, हिंदू देशाला ‘संयुक्त हिंदू राष्ट्र’ बनवण्याची मागणी करत आहेत. जर ५० हून अधिक इस्लामिक देश आणि १५० हून अधिक ख्रिश्‍चन राष्ट्रे असू शकतात, तर भारताला हिंदू राष्ट्र का घोषित केले जाऊ शकत नाही? भारतातील १४० कोटींपैकी बहुतेक हिंदू आहेत.वर्ष २०२५ आणि २०२६ मध्ये भारताला ‘अखंड हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल. हे मी म्हणत नाही, ही सर्व साधू-संतांची गर्जना आहे आणि हे त्यांचे भाकीत आहे.

सिंह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर ही केवळ सुरुवात आहे. या नामांतरामुळे काही लोक दुखावले आहेत. जर तुमचा जन्म औरंगाबादला झाला असेल तर तुमचा मृत्यू संभाजीनगरमध्ये झाला पाहिजे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची खिल्ली उडवत राज सिंह म्हणाले की, काही लोक म्हणतात की मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असला तरी तुम्हाला संभाजीनगरमध्ये मरावे लागेल. तुमचा मृत्यू हिंदु राष्ट्रात होईल.

उस्मानाबाद शहरांचे नामांतर ही केवळ सुरुवात आहे. या नामांतरामुळे काही लोक दुखावले आहेत. जर तुमचा जन्म औरंगाबादला झाला असेल तर तुमचा मृत्यू संभाजीनगरमध्ये झाला पाहिजे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची खिल्ली उडवत राज सिंह म्हणाले की, काही लोक म्हणतात की मी औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुमचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असला तरी तुम्हाला संभाजीनगरमध्ये मरावे लागेल. तुमचा मृत्यू हिंदु राष्ट्रात होईल.

यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मा. मा. जाधव यांचा सत्कार संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ मा.मा.जाधव यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या मराठी अभ्यास मंडळावर दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक जगदीश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य बापूसाहेब काळबांडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.



डॉ मा. मा.जाधव यांचा मंचच्या वतीने सन्मानपत्र,फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर. सन्मानपत्राचे वाचन नरेंद्र नाईक यांनी केले. प्रमुख पाहुणे प्राचार्य बापूसाहेब काळबांडे यांनी मा.मा.जाधव यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर मा.मा.जाधव.सत्काराला उत्तर देताना असे म्हणाले, ज्या यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वाधिक प्रयत्न केले.म्हणून त्यांच्या नावाने चालणाऱ्या विचारमंचच्यावतीने माझा सत्कार करण्यात आला,त्याचा मला खूप मोठा आनंद वाटतो. ते पुढे असे म्हणाले, बदलत्या शिक्षण धोरणांत अभ्यासक्रम तयार करताना सर्वसमावेशक व बदलते उदिष्ट पूर्ण करणारा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्यांनी सत्कारा बदल मंचाचे अध्यक्ष नारायण शिंदे व त्यांचे सहकारी यांचे आभार मानले.

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. जगदीश कदम म्हणाले की, मा.मा.जाधव हे परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्व आहे. ते आतापर्यंत एक भूमिका घेवून जगले. त्यांनी अक्षरगाथा हे त्रैमासिक चालवताना व विवेक जागरच्या माध्यमातून जाधव सरांनी आव्हानात्मक विषयावर घेऊन चर्चा घडवून आणली, असे गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. संजय जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्यंकटी पावडे यांनी केले. तर आभार अनमोलसिंघ कामठेकर यांनी मानले.

यावेळी निर्मलकुमार सूर्यवंशी, राउतखेडकर, रामेश्वर शिंदे,अनंत पुपलवाड, विजयकुमार बेंबडे,प्रा.कमलाकर चव्हाण, डॉ. भारत कचरे, संदीपराव देशमुख, अर्जुन शिंदे आदी उपस्थित होते.

राज्यात सोमवारनंतर पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



पुणे : राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट येऊ घातले असून, सोमवारनंतर (दि. १३) राज्याच्या उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून १६ व १७ मार्चला संबंध राज्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

देशाच्या उत्तर पश्चिम, पश्चिम, मध्य भागात सोमवारनंतर पश्चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे द्रोणीय रेषा तयार होण्याचा अंदाज आहे. परिणामी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे जमिनीवर आर्द्रता वाहून आणली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.

डॉ. काश्यपी म्हणाले, "रविवारनंतर ढगाळ स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारी व मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचीही शक्यता आहे. मात्र, पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल. त्यानंतर गुरुवारी ढगांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर १६ व १७ मार्चला मेघगर्जनेसह व सोसाट्याच्या वाऱ्यासह संबंध राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेगही ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे."

या दोन दिवसांत राज्यभर पावसाचा अंदाज असून त्यानंतर १८ मार्चपासून कोकणात वातावरणात सुधारणा होईल. विदर्भात मात्र, काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहील. त्यानंतर हा कमी दाबाचा पट्टा ओडिशा, तेलंगणा राज्यांत सरकेल, असेही काश्यपी यांनी सांगितले.

पुण्यातही ढगाळ वातावरणयाच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. १६ व १७ मार्चला सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटांची शक्यता आहे. वातावरण सध्या कोरडे असल्याने सोासाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठतील, झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डाॅ. काश्यपी यांनी केले आहे.

मुदखेड राजीव गांधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

संपादक आशिष मुगटकर



 मुदखेड तालुका / प्रतिनिधी

    मुदखेड शहरातील राजीव गांधी महाविद्यालय दि.८रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा  सन्मान करण्यात आला.  

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथील प्रा. सौ. राजेश्वरी कदम , कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय नांदेड येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.  स्मिता कोंडेवार , महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सहाय्यक अधिकारी मुक्ता बोराडे ,कोमल मेश्राम हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वानखेडे सविता यांनी केले , प्रा. डॉ. मंजुषा कोल्हे, कांबळे संयोगिता, प्रा. डॉ. सावते विद्या ,नंदा करंजकर, अश्विनी पेरेवार , सुलोचना माळवे, प्रा. डॉ. आर . बी. कोटलवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

 महाविद्यालयीन कर्तुत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी , विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

होळीची खरेदी करताना महागाईचे चटके! प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

होळी सणानिमित्ताने बाजारपेठ सजली आहे. हलव्याचे हार- कडे यांच्यासह गौरी अशा विविध वस्तू बाजारात विक्रीस आल्या आहे. होळीची खरेदी करताना यंदा महागाईचे चटके अधिक प्रमाणात सहन करावे लागत आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात आल्या.

कोरोनामुळे गेली दोन वर्ष सणावर विविध प्रकारचे निर्बंध आले होते. निर्बंध हटल्याने यंदा सर्वच सण उत्सव धुमधडाक्यात साजरे होत आहे.

होळी सणानिमित्त नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. होळीसाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. हलव्याचे हार, कडे, नारळ, गवऱ्या, रांगोळी, रंग अशा विविध प्रकारच्या वस्तू विक्रीस आल्या आहे.

होळी साजरी करताना नागरिकांना होळीपेक्षा महागाईचे चटके अधिक सहन करावे लागत आहे. गॅस सिलिंडर, साखर, तेल अशा सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या दरांमध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ झाली आहे.

होळीच्या काही दिवसअगोदरच सिलिंडरच्या दरांमध्ये पन्नास रुपयांनी आणखी वाढ झाल्याने महागाईत अधिकच भर पडली आहे. सण असल्याने साजरा करणे आवश्यकच आहे. या हेतूने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहे.

असे जरी असले तरी खरेदीवर मात्र परिणाम झाला आहे. नागरिकांकडून केवळ ५० टक्के खरेदी केली जात आहे. अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आल्या. तसेच, महागाईमुळे किलोवर विक्री होणारे हलव्याचे हार, कडे यंदा नगावर विक्री होत आहे.

वीस ते पन्नास रुपये नग हार, तर कडे ४० ते ५० रुपये नग त्याचप्रमाणे हलव्याचा नारळ ५१ रुपयापासून ते १०१ रुपयांपर्यंत विक्री होत आहे. सरासरी विचार केल्यास प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच, १० ते ३० रुपये गौरी विक्री होत आहे. रंगांच्या दरांमध्येही चांगलीच वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.

"महागाईमुळे प्रत्येक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, पाडव्यास आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. खरेदी विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे." - नामदेवराव बिच्चेवार बारडकर, विक्रेता






श्रीमती लक्ष्मीबाई लोखंडे यांचे निधन

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

मुगट येथील श्रीमती लक्ष्मीबाई नामदेवराव लोखंडे यांचे वयाच्या ८५वर्षी मुगट येथील राहत्या घरी दि.५ रोजी सकाळी १०:३० वाजता ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर देहावर दि.६ रोजी सकाळी १० वाजता मुगट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुगट येथील सेवानिवृत्त आर्मी सैनिक दत्तराम नामदेवराव लोखंडे यांच्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पश्चात ३मुले, १मुलगी, सुना, नातु असा परिवार आहे.

न्याहाळी आश्रम शाळेत दहावी परिक्षा सुरळीत




मुदखेड तालुका/ प्रतिनिधी 

 दहावी शालांत परीक्षा मार्च 2023 मुदखेड तालुक्यातील अनेक परिक्षा केंद्रावर आज पासून सुरळीत चालू झाल्या आहेत. 

मुदखेड येथील न्याहाळी माध्यमिक आश्रम शाळेत परिक्षा केंद्र असून केंद्र क्रमांक ५२५४ हा असुन या परिक्षा केंद्रावर  एकूण १९९ परीक्षार्थीं असून एकूण ८ हॉल आहेत.या केंद्रावर आलेल्या सर्व परिक्षार्थी  विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.



यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.गणेशजी मोरे सर,प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नंदा भानावत ,केंद्रसंचालक श्री सुधाकर पाटील, डूबकवाड , वागरे ,पोले ,देवके ,गोरडवार,पेंटेवाड इतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या