मुगट वार्ताहर
मुगट येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज दि.१८रोजी मुगटला भेट दिली.
मुगट येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना डोळ्यात पाणी दिसून येत होते. खासदार साहेबांनी व्यथा ऐकून त्यांना भावनिक धीर देत त्यांचे सांत्वन केले.
गारपिटीमुळे मुदखेड तालुक्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांना फटका बसला आहे. मुगट येथील केळी, टरबूज, हरभरा ,ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गावातील अनेक लोकांच्या घरावरील पत्रे ही वादळ वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. मुगट येथील बागायतीचे क्षेत्र अधिक असून त्यामध्ये ऊस, केळी, टरबूज अशा नगदी पिकाची लागवड अधिक प्रमाणात केली जात आहे.
या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
मुगट येथील शेतकरी किरण कल्याणे, भास्कर कल्याणे, साहेबराव पवार, माणिका मुंगल यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन खासदार साहेबांनी पिकांची पाहणी केली.
"या गारपिटीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे.त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी मी माझे सरकार असून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी म्हणाले."
यावेळी त्यांच्या सोबत किशोर देशमुख , बालाजी पुयड,गणेशराव शिंदे ,प्रवीण गायकवाड, म्हैसाची भांगे,मुन्ना चांडक ,कालिदास जंगिलवाड, बिस्मिल्ले, गणेशराव येळमकर, विलास कल्याणे, सुरेश कल्याणे श्याम सुंदर मुंगल, शामराव मुंगल, मुदखेड तहसीलदार,नायब तहसीलदार,मुगट तलाठी अर्पिता देशपांडे गावातील शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा