पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती त्यांच्या जीवनाच्या विकासाशी संबंधित आहे.-डॉ.एस.एल.शिंदे.

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

 श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालयामध्ये  वनस्पतीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने  

सजीवांची उत्क्रांती वर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालय नांदेड येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे डॉ. एस. एल.शिंदे होते. 

या वेळी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. राजेश्वर कोटलवार  आणि विज्ञान विभागाचे प्रभारी डॉ. उत्तम जायभाये उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन  देशाचे माजी पंतप्रधान  श्री . राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सविता बजरंग वानखेडे यांनी केले.   

'सजीवांची उत्क्रांती' या विषयावर  बोलत असताना वनस्पती व प्राणी पृथ्वीतलावर कसे निर्माण झाले व सजीवांची उत्क्रांती होत असताना कोणत्या नैसर्गिक घटकांचा त्यावर परिणाम झाला. सध्या निसर्गात होत असलेला बदल आणि त्याचा होणारा सजीवावर परिणाम यासंदर्भात विचार पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे  व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम यांनी भविष्यामध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची आवश्यकता व अशा क्षेत्राची निवड करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विज्ञान शाखेची  विद्यार्थिनी श्रेया शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन कू.साक्षी यांनी केले .

 या कार्यक्रमासाठी प्रा.जायभाये, प्रा.राजू कोंडेकर ,प्रा. प्रकाश कोथळे , प्रा. दत्ताजी मेहेत्रे, प्रा. प्रशांत कदम, प्रा. माने, प्रा. आरती नरवाडे, प्रा.करंजकर, प्रा. कोल्हे हे उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री डी के डहाळे ,श्री दत्ता इंगोले ,श्री जे टी विश्वब्रह्म व श्री मुकुंद डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. ख्य विद्यार्थी उपस्थित होते.

विष्णुपूरी जिल्हा परिषद शाळेत भूगोल दिन संपन्न

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

   भूगोल हा मनुष्याच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. याच भूगोल दिनाचे महत्त्व विविध प्रात्यक्षिक व चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जि.प.हा.विष्णुपूरी शाळेने भूगोल दिन अनोख्या पध्दतीने साजरा केला. सर्वप्रथम इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बिग बँग कसा झाला, याचे नाटकात रुपांतर करुन सादरीकरण केले.

 सूर्य-स्वयंम हटकर,बुध-आशीष मोरे,शुक्र-प्रतिक गिरबिडे,पृथ्वी-कु.मानवी गवारे,मंगळ-सुरज हंबर्डे, गुरु-युवराज चव्हाण, शनी-प्रतिक मरखले,युरेनस-विजय पवार आणि नेपच्यून-अजय हंबर्डे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ग्रहमाला बनून विश्व कसे निर्माण झाले, याचे अचूक सादरीकरण केले.या कार्यात विद्यार्थ्यांना कांचनमाला पटवे,जयश्री देवशेट्टे,यशोदा संत व जयश्री शिंदे या शिक्षिकेंनी भरीव मार्गदर्शन व सहकार्य केले.

 प्रशालेच्या संत बाबा निधानसिंगजी भव्य सभागृहात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भूगोल विषयक आकर्षक चित्र प्रदर्शनी लावली होती. सर्व विद्यार्थी, अनेक पालकांनी या प्रदर्शनीचा लाभ घेवून भूगोलाचे महत्त्व जाणून घेतले. ही प्रदर्शनी मांडण्यास आदर्श शिक्षक विकास दिग्रसकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, निष्णात गणित शिक्षक कृष्णा बिरादार,पद्माकर देशमुख यांनी मार्गदर्शन व मांडणी केली. 

भूगोल दिनाचे महत्त्व अत्यंत समर्पक पध्दतीने सादर केल्यामुळे विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे-अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, साहेबराव हंबर्डे, शंकरराव हंबर्डे, विश्वनाथराव हंबर्डे, राजेश हंबर्डे,मुख्याध्यापक नागनाथ दिग्रसकर, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक व बहुसंख्य पालकांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या संपर्क सत्राचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

यशवंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ८५१७५ या ठिकाणी आज दि.४ रोजी सकाळी ११:३० मिनिटांनी ABC आयडी समंत्रनसत्राच्या शिबिराचे आयोजन केले होते याप्रसंगी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत इंगळे सर  हे अध्यक्ष स्थान होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव शिंदे हे होते याप्रसंगी प्रा  शिंदे यांनी ABC आयडी  कशी काढायची? त्याचे महत्त्व काय?याबद्दल सविस्तर विवेचन केले व येत्या रविवारपासून प्रत्येक रविवारी समंत्रणाचे तासाचे नेहमी प्रमाणे आयोजन केल्या जातील त्याचे वेळापत्रक लवकरच अभ्यास केंद्रात व आपल्या ग्रुप वर उपलब्ध होईल याबद्दलही सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री हेमंत इंगळे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व शिक्षणात झालेले बदल याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कैलास खानसोळे सर यांनी केली तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कपाटे सर यांनी केली या प्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते

लोकप्रिय बातम्या