अपघातात एक जण गंभीर जखमी; जखमीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल
मुदखेड / तालुका प्रतिनिधी
दि.९रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर मुगट रेल्वे स्टेशन मुदखेड या टी पॉईंट वळण रस्त्यावर दुपारी दोन ते तीन च्या सुमारास ट्रक व दुचाकी च्यात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मालवाहू ट्रक मुदखेड कडे जात असताना वळण रस्त्यावर दुचाकी क्रमांक एम एच २० ए वाय ९४ ९८ ही दुचाकी घेऊन उद्धव दत्ता मेकाले हा मुगट बस स्थानका कडे येत होता अचानक या वळणावर ट्रकच्या मागच्या चाकामध्ये दुचाकी आली. ही गोष्ट ट्रक चालकाला कळताच त्याने गाडीचे ब्रेक दाबून गाडी जाग्यावरच थांबवली.त्यामुळे जीवीत हानी टळली. तरीसुद्धा मोटारसायकलची समोरील चाक ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वार उद्धव मेकाले हा बाजूला फेकला गेला त्यामुळे त्याचे प्राण वाचले परंतु डोक्याला गंभीर मार लागला आहे.
पुढिल उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात उध्दव मेकाले यांना दाखल केले आहे.घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून संबंधित ट्रक चालकास व ट्रक ला ताब्यात घेऊन मुदखेड पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा