स्व.माधवराव देशमुख यांचे दुःखद निधन.

संपादक आशिष मुगटकर

हदगाव तालुका प्रतिनीधी 

 हदगाव तालुक्यातील तळणी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख ,रवी कुमार देशमुख यांचे वडील व अविनाश देशमुख यांचे काका स्व.माधवरावजी किशनराव देशमुख यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.

तळणी व निवघा परिसरात भुसारचे विश्वसनीय व्यापारी म्हणून परिसरातील सर्व गावांमध्ये लोकप्रिय व्यक्तीमत्व होते.

 गेले ५-६वर्षापासुन आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. परंतु मागील १२-१३ दिवसांपासून , त्यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे त्यांना नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर नातू डॉ अंकुश देवसरकर यांच्याकडे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर मृत्यूची झुंज देताना आज दि .२५ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यामुळे तळणी येथील प्रत्येकाच्या मदतीला धावणारा सर्वांचे काम करणारा, मनमिळाऊ स्वभावाचा,  मार्गदर्शन आज त्यांच्यातून निघून गेल्यामुळे तळणी ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे हे कार्य सदैव सर्वांना स्मरणात राहील... अनेकांवर त्यांनी केलेल्या उपकाराची व स्नेहाची, संख्या मोठी आहे.

देशाईंना भावपूर्ण श्रद्धांजली. 

 शोकाकुल:-आमदार बाबुराव कदम कोहळीकर समर्थक परिवार हदगाव -हिमायतनगर विधानसभा तथा निवघा -तळणी शिवसेना विभाग प्रमुख सुदर्शन पाटील मनुलकर

देगावच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

अर्धापूर तालुक्यातील देगाव येथील कर्ज बाजारी शेतकरी दिनेश दशरथ जाधव वय 35 यांनी खाजगी तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे या धास्तीने 13 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मयत शेतकऱ्याचा भाऊ भारत दशरथ जाधव यांनी बारड पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून मयत दिनेश दशरथ जाधव यांनी खाजगी बँकेच्या कर्जाची परतफेड करूनही सातबारा वरील बोजा बँकेचा बोजा कमी करून दिल्या जात नसल्याने चिंतेत होता. सन 2019 मध्ये  राधाही इंडिया लिमिटेड शाखा नांदेड

या खाजगी बँकेचे अंदाजे कर्ज एक लाख वीस हजार रुपये काढले होते निसर्ग कोपल्याने दरवर्षी होत असलेल्या नापिकीने आणि वारंवार वेळोवेळी कर्जाचे हप्ते भरूनही सातबारा वरून कर्जाचा बोजा कमी केल्या जात नव्हता या मानसिक तणावाखाली असलेल्या मयत दिनेश दशरथ जाधव या शेतकऱ्याने आपल्या देगावच्या  शिवारात असलेल्या माधव नामदेव जाधव यांच्या गोठ्यात टिन पत्राला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.

याप्रकरणी बारड पोलीस ठाण्यात कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या  प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केंदासे , एन के सिंगरवाड, चक्रधर पवार, शेख अझहर,हे करित आहेत.

माजी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांची माजी सैनिक शिष्टमंडळांनी घेतली भेट.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

दि.२ रोजी जिल्हा माजी सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन माजी सैनिकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली.

माजी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेतली. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व माजी सैनिक यांच्या समस्या व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी सैनिकांचे सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व माजी सैनिक यांना सहकार्य करण्याचे आश्वासन सैनिक फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी यांना दिले.

               यावेळी मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधत त्यांचे आभार मानले. माजी सैनिकांच्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांशी पोलिस अधिक्षक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

   यावेळी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डूमणे,  विकास बलफेवाड, राजाराम हळदे, मारोती गुंठे, चंद्रकांत तेलंगे, चाँद, शशिकांत मोडवान, संजय चव्हाण उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या