नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दि.२ रोजी जिल्हा माजी सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन माजी सैनिकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली.
माजी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेतली. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व माजी सैनिक यांच्या समस्या व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी सैनिकांचे सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व माजी सैनिक यांना सहकार्य करण्याचे आश्वासन सैनिक फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी यांना दिले.
यावेळी मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष वेधत त्यांचे आभार मानले. माजी सैनिकांच्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांशी पोलिस अधिक्षक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डूमणे, विकास बलफेवाड, राजाराम हळदे, मारोती गुंठे, चंद्रकांत तेलंगे, चाँद, शशिकांत मोडवान, संजय चव्हाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा