ब्रह्माकुमारी मुदखेड मध्ये अध्यात्मिक ज्ञान दिवस साजरा

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व  मुख्य प्रशाशिका व संस्थेच्या पहिल्या ब्रह्माकुमारी मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांचे ५७ वा स्मृती दिवस ब्रह्माकुमारी उपसेवाकेंद्र मुदखेड येथे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

आज दिनांक २४ जून  रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या पूर्व मुख्य प्रशासिका जगदंबा यांच्या  पावन स्मृती दिवसानिमित्त ब्रह्माकुमारीज् मुदखेड येथे मातेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप लावून  श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

 अनुराधा बहेन आणि श्रुती बहेन यांनी नियोजन केलं.  कुमारी ऐश्वर्या व अक्षरा हिने गीत सादर केले. 


 ब्रह्माकुमारीज् मुदखेड संचालिका पुजा बहेनजी यांनी जगदंबा सरस्वती यांची विशेषता सांगितली. परमपिता परमात्मा शिव ने प्रजापिता ब्रह्मा द्वारे जेव्हा या ज्ञान यज्ञा ची स्थापना केली व त्या यज्ञातून अशा महान विभूती चा अलौकिक जन्म झाला. मात्र वयाच्या १४व्यावर्षात ईश्वरीय अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ करत  संपूर्ण जीवन परमात्म्याच्या कार्यात अर्पण करून विश्व परिवर्तनाच्या कार्यामध्ये संपूर्ण जीवन समर्पित केलं.

 त्यांची वाणी मध्ये मधुरता आणि प्रत्येक बोल हे मनाला शांत करणारे आणि शक्ती संचारित करणारे होते.

 संस्थापक प्रजापिता ब्रह्मा बाबांचा निर्देशणांमध्ये राहून मार्गदर्शन  या साम्राज्याच्या स्थापनेत ते सतत अग्रेसर होत्या. 

 आज अश्या विश्व कल्याणी, महादानी, वरदानी, मातेश्वरी जगदंबा यांच्या ५७ व्या स्मृती दिवस निमित्त आपणही त्यांच्यासारखे बनण्याचे दृढ संकल्प करण्याचे आव्हानही ब्रह्माकुमारी पूजा बहेनजी यांनी केले.


 यानंतर  ब्रह्माकुमारी मुदखेड उपसेवाकेंद्रावरती येणारे राजाराम भाई नकुलवार  यांचे सुपुत्र डॉ. मसनाजी राजाराम नुकुलवार  यांना  अभियांत्रिक या विषयांमध्ये पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल   आणि  दहावीच्या परीक्षेमध्ये ८९ टक्के गुण मिळवणारा ज्ञानेश्वर  राहेरे यांचाही अध्यात्मिक ज्ञान दिना निमित्ताने  सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमासास

सेवानिवृत्त प्राचार्य राठोड , नायब तहसीलदार बोड्डावार , मनोज कमटे,  ग्रामीण जिल्हा सरचिटणीस केतकी ताई चौधरी,  ब्रह्माकुमारी  केंद्रात दररोज येणारे सदस्य मोठ्या संख्येने  उपस्थित होते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरड रेल्वे येथे शाळा पूर्व दुसरा मेळावा उत्साह वातावरणात संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरड [रेल्वे] या ठिकाणी शाळा पूर्व दुसरा मेळावा उत्साहात पार पडला.

प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व शिक्षक यांच्यातर्फे फूल देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आठ आठवड्यांच्या सरावानंतर हा मेळावा घेण्यात आला. या अभियानात दिल्या गेलेल्या पुस्तिकांची या ठिकाणी स्वीकृती करण्यात आली . विद्यार्थ्यांनी केलेले काम तपशीलवारपणे पाहिले गेले. या मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त अशी उपस्थिती लावली होती. 



या मेळाव्यासाठी नांदेड डायटचे श्री वाघमारे सर I E O व श्री अनूप नाईक विषय तज्ञ डायट नांदेड हे उपस्थित होते. त्यांनी पालकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. एकूण सात स्टॉल टाकून त्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व स्तरांवरील गुणवत्ता तपासून त्यांना इयत्ता पहिली मध्ये प्रविष्ट करण्यात आले.यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्‍तराम आवातिरक व उपाध्यक्ष श्री संतोष राजमोरे यांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

या मेळाव्याचे आयोजन वर्गशिक्षक श्री व्ही. डी. कल्याणकर सर यांनी केले तर मेळाव्यासाठी मुख्याध्यापक श्री हरिओम सर विषय शिक्षक श्री विद्याधर शेवाळकर सर पांचाळ सर ,मैराळ मॅडम यमेकर सर या सर्वांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कल्याणकर सर यांनी तर आभार श्री शेवाळकर सर यांनी व्यक्त केले.

विद्या-दानम सर्वश्रेष्ठ दानम...विष्णुपूरी हायस्कूलच्या शिक्षकांची विद्यार्थी प्रवेशासाठी डेरला गावात आत्मिय भेट

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा /प्रतिनिधी

      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ कै.दु.का.बोर्डे असे म्हणत असे की, विद्यार्थी हे दैवत माझे,एकेकांचे स्वरूप घडवण्यास मी सदैव तत्पर असे...विद्यार्थ्यांशिवाय विद्यामंदिर म्हणजे आत्माविहीन कुडी.

      शाळेला खरी शोभा विद्यार्थीच असतात. प्रतिवर्षी नवनवीन विद्यार्थी जाणीव व प्रयत्नपूर्वक शाळेत दाखल करुन घेणे व प्रसंगी विद्यार्थ्यांच्या दारी जावून त्यांना शाळा प्रवेशासाठी प्रेरित करणे हे स्थानिक प्रशासन,मु.अ. आणि अर्थातच शिक्षकांचे परम आद्यकर्तव्यच आहे. याच कर्तव्याचा भाग म्हणून जि.प.हा.विष्णुपूरी शालेय व्यवस्थापन समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष विलासराव आबासाहेब देशमुख हंबर्डे, उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे, सर्व सन्माननीय सदस्य आणि मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर यांच्या विधायक सूचना व प्रेरणेने   मी आर.जी.कुलकर्णी,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच  गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक   कृष्णा बिरादार सर आज दि.१३ जून २०२२ रोजी डेरला  या गावी आमच्या जि.प.हा. विष्णुपूरी शाळेत प्रवेशासाठी त्या शाळेतील मु.अ.,विद्यार्थी, पालक व सुजाण नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेतली. 


         गावातील कोणत्याही विधायक कार्याची सुरुवात विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्हा परिषद शाळेतूनच करावी तरचं यश लिलया प्राप्त होते,याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे आम्ही प्रथम जि.प.प्रा.शा.डेरला शाळेत भेट दिली. संरक्षित शाळा,प्रसन्न वातावरण,सुसज्ज मु.अ.चे कार्यालय पाहून मन हरकून गेले. कार्यालयात अत्यंत आदराने मुख्याध्यापक तथा राज्य पुरस्कार प्राप्त  मा.पंडित पवळे सरांनी शब्द सुमनांनी आत्मियतेने स्वागत केले. बिरादार सरांची लवकरचं अधिकारी म्हणून निवड होवू घातल्यामुळे शाल,संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ग्रंथ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यासमयी राजेश कुलकर्णी यांचा सुध्दा सन्मान केला गेला. या सत्कार कार्यात शाळेतील शिक्षक यु.व्हि.क्षीरसागर, डी.डी.पांचाळ,सौ.एम.एच.पवार, सौ.ए.व्हि.भंडे,सौ.जे.के.हंबर्डे, सौ.डी.एस.सनपुरकर आणि सन्माननीय पालक दत्तराम अण्णा कदम यांची उपस्थिती होती. 

        प्रस्तुत प्रशालेत इयत्ता ७ वी चे एकूण ८ विद्यार्थी इयत्ता ८ वी वर्गात प्रवेश घेण्यास तयार झाले.तात्काळ प्रवेश अर्ज भरुन घेण्यासाठी क्षीरसागर सरांनी बहुमूल्य सहकार्य केले.

 पाल्यांना विष्णुपूरी प्रशालेत पाठविण्याची विनंती आणि आवाहन केले असता आपल्या प्रशालेबद्दल सुकीर्ती ऐकली असल्यामुळे प्रवेश देण्यासाठी लिलया तयार झाले.

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान केल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल दोघांस शिक्षा द्या

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड शहरातील मुस्लिम समाजकडून आज शुक्रवारची प्रार्थना पठण करून दुपारी ठीक 02.30 वाजता तहसील कार्यालयात प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान केल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल दोघांस शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदन सादर करून महामहीम राष्ट्रपती यांना कळवावे असे सांगितले .

मागील काही दिवसांखाली एक वृत्तवाहिनवरील मुलाखतीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल ह्या दोघांनी द्वेष भावनेतून मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या प्रकरणी ताबडतोब भारतीय जनता पार्टीने दोन्ही प्रवकत्यांना निलंबन केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्याअनुषंगाने आज मुदखेड शहरातील मुस्लिम समाजाकडून तहसिलदार यांचे प्रतिनिधी म्हणून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार शिवाजी पाटील जोगदंड यांनी मुस्लिम समाजाकडून निवेदन स्वीकारुन पुढील कार्यवाही साठी पाठवू असे आश्वासन दिले.

       या वेळी हफीज मोहम्मद अतीक, हफीज मोहम्मद इमरान रझा, मुफ्ती मोहम्मद नयूम, मुफ्ती सुलेमान, मौली अश्फाक, मौलाना जमील, हफीज अब्दुल रहीम माजी उपाध्यक्ष बंदेली खान पठाण, माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब, माजी नगर सेवक अब्दुल सलाम सर, माजी नगर सेवक बबलू सेठ, एमआय एम चे शहराध्यक्ष मोहम्मद हुसैन, मोहम्मद वसीम, मदिना मस्जिद चे अध्यक्ष मोहम्मद युसुफ साहेब, मोहम्मद रफीक, शेख बाबू , मोहमद अहेमद आदी सह इतर मुस्लिम समाजातील युवकांचा समावेश होता.

कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

यशाची परंपरा कायम ठेवत १२ वीचा निकाल-९७.५०% 

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत कौठा.ता.कंधार जि. नांदेड येथील कै. शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.५०% लागला आहे.कनिष्ठ महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 

 विज्ञान शाखेतून मोनिका तवंडे ८१% प्रथम ,हूडगे आशुतोष ८०%,द्वितीय तर शरद हरळे80%,तृतीय आला आहे. कला शाखेतून शकील मुल्ला ८२%,प्रथम ,शेळगावे मनीषा ७९%, द्वितीय आली आहे. तसेच अनेक विद्यार्थी विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

      या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा अर्चनाताई शिवकुमार देशमुख,सचिव शिवकुमार देशमुख , प्राचार्य धुमाळे सर,नकाते सर ,पांडागळे मॅडम ,येवतीकर सर,राठोड सर पाटील मॅडम ,पालिमकर ,वाघमारे,देशमुख यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या १९८० वर्ग मित्रांचे स्नेह संमेलन आनंदात साजरे

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 आज जागतिक मित्र दिनाचे औचित्य साधत मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालय इ.स. १९७९ ते १९८० सालीच्या १०वी वर्गात शिकलेल्या विद्यार्थीचे ( वर्ग मित्रांचे) स्नेह संमेलन आनंदाने संपन्न झाले.

या स्नेह संमेलनात सर्व प्रथम आपल्या वर्गाचे आपले सहकारी स्व. चांदू बिस्मीले, स्व.शामराव पांचाळ, स्व. साईनाथ पिन्नलवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.मित्र आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.काहिकाळासाठी सर्व जण आपल्या भुतकाळात गेले होते.मित्रानी सर्वांशी संवाद साधला.प्रत्येकाचे मन शेवटी भरुन आले होते. जे सहकारी मित्र शासकीय सेवेतून सेवा निवृत झाले त्यांचा प्रथम सत्कार करण्यात आला. उपस्थीत सर्व मित्राचा सस्नेह सत्कार लक्ष्मणराव देवदे यांच्या हस्ते करण्यात आला.

 सस्नेह कार्यक्रमाला शालेय वर्ग मित्र लक्ष्मण देवदे,कामाजी पवार,दिलीप देशमुख,तुळशीराम चुकेवाड,अशोक रेड्डेवार,बालाजी बेंबरे,चंद्रकांत चौधरी,रामदेव समंदर,हूशेन भाई,प्रल्हाद लोकरे,रामजी धडे,देवराव गाडेगावकर,डॉ. चव्हाण,प्रकाश भिसे,राम बैनवाड, गोवींद मुंगल,राम गुंजकर,दत्ता एर्गुले,संजय पाटील,देविदास चिलवंतकर ,आनंद गंड्रस ,भांगे पाटील पत्रकार शमशुद भाई, व १९८० बॅच चे १० वी वर्गातील असंख्य मित्र परीवार होते .

पूढील वर्षी २०२३ मध्ये १९८० च्या वर्गातील सर्व विद्याथी ,गुरुजन सर्वाना आमंत्रीत करून मोठा कार्यक्रम घेन्याचे ठरले असल्याचे मुदखेड नगर परीषद चे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी कळवले आहे .

मुदखेड रेल्वे गेट वर सुरक्षा संबंधी मार्गदर्शन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 मुदखेड येथे   दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा अभियानाअंतर्गत आज दिनांक आठ जुन रोजी गेट वर सुरक्षा संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या अभियाना मध्ये सहाय्यक मंडळ विद्युत अभियंता रिजवान अंसारी तसेच सुरक्षा प्रचारक सुभाष आवलवार ,शंकर  धर्माजी  , स्वदेश खंदारे,  डी. एम. मीना यांनी मार्गदर्शन केले.

रेल्वे गेट फाटक बंद असताना दुचाकी धारकांनी आपले वाहन खालून काढू नये रेल्वे गेट फाटक वाहनधारकांच्या सुरक्षित साठी निर्माण करण्यात आले आहे. याचा विचार करून वाहनधारकाने रेल्वे फाटक सुरक्षा संबंधी नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले.

मेंडका गावात रेल्वे गेट असून या रेल्वेगेट सुरक्षा संबंधी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण ईजळीकर हे होते.

श्री.रामजी पुयड यांचे निधन

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

पुणेगाव येथील जेष्ठ नागरिक श्री.रामजी अर्जुनराव पुयड यांचे वयाच्या ९५ वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी पुणेगाव येथे दि.४रोजी निधन झाले.त्यांचा अंत्यविधी उद्या दि.५ रोजी पुणेगाव येथे दुपारी ३वाजता ईनाम मळा येथे होणार आहे.

त्यांच्या पश्चात ४मुले,४मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

शारदा कॅन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाका भाजपाचा नेते प्रवीण गायकवाड यांची मागणी

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

दि.२ ,मुदखेड येथील मुदखेड ते उमरी राज्य महामार्गचे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने,राज्य महामार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवास्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.या राज्य महा मार्गावरून महाराष्ट्र राज्यातील धर्माबाद, उमरी या दोन तालुक्यातील लोकांना जिल्ह्याशी जोडणारा  हाच मुख्य रस्ता आहे.तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील जनतेला सोईचा असणारा व महाराष्ट्र राज्यास जोडणारा प्रवाशी मार्ग व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण आणि आ.राजेश पवार माजी आ.बापूसाहेब गोरठेकर अस्या दिग्गज राजकीय लोकांच्या मतदार संघातील प्रमुख राज्य महा मार्ग म्हणून विशेषत्व प्राप्त झालेला राज्य महामार्ग ठेकेदाराच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळे प्रलंबित राहिला आहे. याकडे भाजपा (दि.वि.आ.) चे मराठावाडा विभाग प्रभारी प्रवीण गायकवाड यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन शारदा कॅन्स्ट्रकशन अशोक नगर नांदेड या बांधकाम ठेकेदार कंपनीस काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. या निवेदनात गायकवाड यांनी ठेकेदार यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बांधकामा करिता घालून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करुन,अंदाज पत्रकात नमूद बाबींचा भंग झाल्याचे नमूद केले आहे.तसेच या विलंबा मुळे प्रवाशी मार्गस्थ नागरिकांना सोसावी लागणारी इजा,गैरसोय व या मार्गांवरील उध्वस्त झालेले अनेक व्यावसायिक यास शारदा कॅन्स्ट्रक्शन या कंपनीस जबाबदार धरून काळ्या यादीत टाकण्याची विनंती केली आहे.

या निवेदनाच्या प्रति, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,ना. अशोक चव्हाण,नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर,विधान परिषदेचे आ.रामपाटील रातोळीकर, नायगाव मतदार संघांचे आ. राजेश पवार यांना व्हाट्सअँप प्रणाली द्वारे भ्रमणध्वनीवर निवेदन देऊन लोक प्रतिनिधीचे लक्ष गायकवाड यांनी वेधण्याचा प्रयत्न केला आहे.यावर लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा काय पवित्रा घेतात की ठेकेदारास पाठीशी घालतात याकडे धर्माबाद -उमरी -मुदखेड तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

लोकप्रिय बातम्या