मुदखेड तालुका / प्रतिनिधी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरड [रेल्वे] या ठिकाणी शाळा पूर्व दुसरा मेळावा उत्साहात पार पडला.
प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने अध्यक्ष उपाध्यक्ष व शिक्षक यांच्यातर्फे फूल देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आठ आठवड्यांच्या सरावानंतर हा मेळावा घेण्यात आला. या अभियानात दिल्या गेलेल्या पुस्तिकांची या ठिकाणी स्वीकृती करण्यात आली . विद्यार्थ्यांनी केलेले काम तपशीलवारपणे पाहिले गेले. या मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त अशी उपस्थिती लावली होती.
या मेळाव्यासाठी नांदेड डायटचे श्री वाघमारे सर I E O व श्री अनूप नाईक विषय तज्ञ डायट नांदेड हे उपस्थित होते. त्यांनी पालकांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. एकूण सात स्टॉल टाकून त्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व स्तरांवरील गुणवत्ता तपासून त्यांना इयत्ता पहिली मध्ये प्रविष्ट करण्यात आले.यानंतर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दत्तराम आवातिरक व उपाध्यक्ष श्री संतोष राजमोरे यांच्या हस्ते शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्याचे आयोजन वर्गशिक्षक श्री व्ही. डी. कल्याणकर सर यांनी केले तर मेळाव्यासाठी मुख्याध्यापक श्री हरिओम सर विषय शिक्षक श्री विद्याधर शेवाळकर सर पांचाळ सर ,मैराळ मॅडम यमेकर सर या सर्वांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कल्याणकर सर यांनी तर आभार श्री शेवाळकर सर यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा