विद्या-दानम सर्वश्रेष्ठ दानम...विष्णुपूरी हायस्कूलच्या शिक्षकांची विद्यार्थी प्रवेशासाठी डेरला गावात आत्मिय भेट

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा /प्रतिनिधी

      महाराष्ट्रातील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ कै.दु.का.बोर्डे असे म्हणत असे की, विद्यार्थी हे दैवत माझे,एकेकांचे स्वरूप घडवण्यास मी सदैव तत्पर असे...विद्यार्थ्यांशिवाय विद्यामंदिर म्हणजे आत्माविहीन कुडी.

      शाळेला खरी शोभा विद्यार्थीच असतात. प्रतिवर्षी नवनवीन विद्यार्थी जाणीव व प्रयत्नपूर्वक शाळेत दाखल करुन घेणे व प्रसंगी विद्यार्थ्यांच्या दारी जावून त्यांना शाळा प्रवेशासाठी प्रेरित करणे हे स्थानिक प्रशासन,मु.अ. आणि अर्थातच शिक्षकांचे परम आद्यकर्तव्यच आहे. याच कर्तव्याचा भाग म्हणून जि.प.हा.विष्णुपूरी शालेय व्यवस्थापन समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष विलासराव आबासाहेब देशमुख हंबर्डे, उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे, सर्व सन्माननीय सदस्य आणि मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर यांच्या विधायक सूचना व प्रेरणेने   मी आर.जी.कुलकर्णी,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच  गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक   कृष्णा बिरादार सर आज दि.१३ जून २०२२ रोजी डेरला  या गावी आमच्या जि.प.हा. विष्णुपूरी शाळेत प्रवेशासाठी त्या शाळेतील मु.अ.,विद्यार्थी, पालक व सुजाण नागरिक यांची प्रत्यक्ष भेट घेतली. 


         गावातील कोणत्याही विधायक कार्याची सुरुवात विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्हा परिषद शाळेतूनच करावी तरचं यश लिलया प्राप्त होते,याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे आम्ही प्रथम जि.प.प्रा.शा.डेरला शाळेत भेट दिली. संरक्षित शाळा,प्रसन्न वातावरण,सुसज्ज मु.अ.चे कार्यालय पाहून मन हरकून गेले. कार्यालयात अत्यंत आदराने मुख्याध्यापक तथा राज्य पुरस्कार प्राप्त  मा.पंडित पवळे सरांनी शब्द सुमनांनी आत्मियतेने स्वागत केले. बिरादार सरांची लवकरचं अधिकारी म्हणून निवड होवू घातल्यामुळे शाल,संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ग्रंथ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यासमयी राजेश कुलकर्णी यांचा सुध्दा सन्मान केला गेला. या सत्कार कार्यात शाळेतील शिक्षक यु.व्हि.क्षीरसागर, डी.डी.पांचाळ,सौ.एम.एच.पवार, सौ.ए.व्हि.भंडे,सौ.जे.के.हंबर्डे, सौ.डी.एस.सनपुरकर आणि सन्माननीय पालक दत्तराम अण्णा कदम यांची उपस्थिती होती. 

        प्रस्तुत प्रशालेत इयत्ता ७ वी चे एकूण ८ विद्यार्थी इयत्ता ८ वी वर्गात प्रवेश घेण्यास तयार झाले.तात्काळ प्रवेश अर्ज भरुन घेण्यासाठी क्षीरसागर सरांनी बहुमूल्य सहकार्य केले.

 पाल्यांना विष्णुपूरी प्रशालेत पाठविण्याची विनंती आणि आवाहन केले असता आपल्या प्रशालेबद्दल सुकीर्ती ऐकली असल्यामुळे प्रवेश देण्यासाठी लिलया तयार झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या