स्व.डॉ.श्री. विठ्ठलराव तावडे पुण्यस्मरणा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे तळणीत आयोजन.

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

 हदगाव पंचायत समितीचे माजी सभापती,हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, बालाजी वैद्यकीय शिक्षण प्रसारक मंडळ हिमायतनगर, श्री दत्त एज्युकेशन सोसायटी तळणीचे संस्थापक, सचिव, शिक्षण महर्षी स्व.डॉ.श्री.विठ्ठलराव मारोतराव तावडे तळणीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणनिमित्त, अभिवादन व आरोग्य सेवेचा वसा जोपासत ग्राम तळणी येथे दि.२९/०४/२०२२रोजी शुक्रवारी सकाळी १० ते ३ पर्यंत स्थळ आर्य समाज मंदिर तळणी ता. हदगाव जिल्हा. नांदेड येथे होणार आहे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे.

समस्त तळणी ग्रामवासीयांच्या आयोजनाखाली व मार्गदर्शनाखाली ह्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी कोरोना सारख्या जागतिक आरोग्य संकटात, रक्ताचा प्रचंड तुटवडा पडत असताना सर्वानी पुढ येत रक्तदानाचा उच्चांक नोंदविला गेला. ही परंपरा जोपासत याही वर्षी सुध्दा गावातील नागरीक व युवकांनी पुढाकार घेऊन जास्तीत रक्तदान करुन आरोग्य सेवेत योगदान देण्यासाठी परिश्रम घेत आहे.

 लहान बालकात जास्त प्रमाणात सिकलसेल, थायलेसिमिया, हा आजार ग्रस्त मुलांना दर, २१ दिवसांनी शरीरात रक्तपुरवठा नियमित करावा लागतो त्यामुळे, निरोगी व्यक्ती, सुदृढ युवकांनी रक्तदानासारख्या पवित्र कार्यात पुढ येणे महत्त्वाचे आहे तर सर्वानी सर्वश्रेष्ठ दान रक्तदान 🩸करुन मानवतेला प्रमोट करुया कुणाला तरी जिवदान देऊया.....!

तरी जास्तीत जास्त, तरुणांनी  रक्तदात्यानी रक्तदानासाठी या असे आव्हान समस्त गावकरी मंडळी तळणी यांनी केली आहे.

मुगट जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 मुगट जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या निमित्ताने गावात प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते.

 मुख्याध्यापक श्री टि एस मुंगरे,दगडू रकसाळे, एम ए खालिख, संजय बाऊस्कर, कोकणे, नागनाथ लोखंडे, मोरे, मंगनाळे, सौ. कुलकर्णी सौ. येरावार, सौ. सोनाळे, सौ कांबळे.अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शाळापूर्व तयारी अभियान पाथरड रेल्वे जिल्हा परिषद शाळेत संपन्न

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शाळापूर्व तयारी अभियान अंत्यत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.त्या मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक स्टॉल वर पूर्ण उपक्रम राबवून त्यांची तपासली केली गेली.

त्यानंतर गावात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.प्राथमिक पदवीधर श्री शेवाळकर सर यांनी पालक मेळाव्यात कार्यपुस्तीके बद्धल खूपछान पालकांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन पहिलीचे वर्गशिक्षक श्री व्ही.डी. कल्याणकर सर यांनी केले तर त्यांना सहकार्य श्री येमेकर सर पांचाळ सर मैराळ मॅडम तसेच श्री शेवाळकर सर यांनी केले.



कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पवीतवार सर (हरीओम) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले .

मुदखेड तालुका माहिती सेवा समिती अध्यक्षपदी बाबाराव राऊत यांची निवड

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 माहिती सेवा समितीच्या मुदखेड तालुकाध्यक्ष पदी बाबाराव(बाळु) आनंदराव राऊत मुगटकर तर तालुकाउपाधक्षपदी लक्ष्मण अशोकराव कोकरे कामळजकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुदखेड येथील शासकीय विश्राम गृहात ता १८ सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान माहिती सेवा समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजीराव पाटील लंगोटे हे अध्यक्षस्थानी होते तर. प्रमुख मार्गदर्शक मारोतराव शिंदे पाटील, बालाजीराव मोरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत माहिती सेवा समितीच्या कार्यप्रणालीची माहिती देऊन नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 

मुदखेड तालुका अध्यक्ष पदी बाबाराव (बाळु)राऊत मुगटकर यांची तर, तालुकाउपाध्यक्ष पदी लक्ष्मण अशोकराव कोकरे कामळजकर यांची निवड झाल्याने नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. या समितीच्या माध्यमातून जनहितार्थ कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.

जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे शाळापूर्व तयारी अभियायान मेळावा उत्साहात संपन्न.

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

    आपण कोरोनामुळे गेले कित्येक महिने प्रभावित झालेलो आहोत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे. काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील. या अनुषंगाने सदरील प्रशालेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले होते.



         या मध्ये सर्वप्रथम पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचा सर्वे अंगणवाडी ताईंच्या मदतीने केला गेला आणि त्या मुलांच्या पालकांना व मुलांना सदरील मेळाव्याचे निमंत्रण दिले गेले.सकाळी गावातून प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली .या फेरी सोबत डायट चे प्राचार्य रविंद्र आंबेकर तसेच जेष्ठ आधीव्याख्याता जयश्री आठवले आणि सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.त्या नंतर प्रवेशपात्र मुलांचे आणि पालकांचे स्वागत घेऊन मुलांच्या प्रत्यक्ष शाळापूर्व तयारी आणि त्यांच्या कडून कोणत्या क्रिया अपेक्षित आहेत याची माहिती पालकांना स्वयंसेवकाच्या मदतीने देण्यात आली.यात मुलांचा शारिरीक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक आणि भावनात्मक विकास,भाषा विकास आणि गणन पूर्व तयारी याची वैशिष्ट्य पूर्ण रचनात्मक केलेल्या टेबलाच्या माध्यमातून देण्यात आली. यानंतर घेण्यात आलेल्या

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  शंकरराव हंबर्डे,तसेच राजेश हंबर्डे विश्वनाथराव हंबर्डे, यांचे स्वागत मुख्याध्यापक खदीर सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम सौ.मिरा  रेवनवार ,सौ.अर्चना देशमुख ,सौ.प्रिती कंठके ,सौ. माट्रलू , सौ.वैशाली कुलकर्णी,श्रीमती  पाईकराव ,सौ.कविता कलेटवार , राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,  श्रीपाद बोरीकर , बिदरकर,धनगे , डी.के.केंद्रे,  उदय हंबर्डे, आनंद वळगे व विकास दिग्रसकर यांनी घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन गुरुपवार यांनी केले.

लॉयन्स क्लब नांदेड सफायर अध्यक्षपदी एम जे एफ लॉ. विनोदभाऊ पावडे यांची बिनविरोध निवड..

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

  लॉयन्स क्लब नांदेड सफायार च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची नुकतीच विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.नांदेड जिल्हा अध्यक्ष पदासाठी उपस्थित सर्वानुमते  एम जे एफ लॉ. विनोदभाऊ पावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.



 उपस्थित विशेष सभेत अध्यक्षपदी एम जे.एफ लॉ. विनोदभाऊ पावडे निवड करण्यात आली. या वेळी प्रथम अध्यक्ष लॉ. अजय बाहेती, विभागीय अध्यक्ष लॉ.अद्वैत उंबरकर, विद्यमान अध्यक्ष एम जे एफ  लॉ. अजय राठी, विद्यमान सचिव  लॉ.निलेश मुनोत, कोषाध्यक्ष लॉ. महेंद्रसिंह चौहान, माजी अध्यक्ष  लॉ.रवींद्र औंढेकर, लॉ. डॉ अश्विन लव्हेकर, लॉ आनंद चीमकोडकर,लॉ.व्यंकटेश पारसेवार,  लॉ. सुशील भारतीया, लॉ. विक्रम कंदकुर्ते, लॉ.निलेश व्यास, एम जे एफ  लॉ. शंटी भाटिया,  एम जे एफ  लॉ. रामगडिया  यांची  यावेळी विशेष उपस्थिती होती.



    


''अवंतिका एजुकेशन राष्ट्रीय अवॉर्ड " रमिंदर कौर मोदी यांना प्रदान

दिल्ली येथे भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान !

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

 मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत शिक्षाविद व माउंट लिट्रा झी स्कूल नांदेड शाळेच्या नवनियुक्त प्राचार्या सौ. रमिंदरकौर मोदी यांना दिल्ली येथील नामांकित "अवंतिका एजुकेशन अवॉर्ड २०२२" सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील हिंदी भवन येथे दि. १६ एप्रिल संस्थेतर्फे आयोजित ३७ व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी मिसेज़ इंडिया, सहित्यिक, लेखक आणि शिक्षाविद डॉ सौ. परिन सोमानी आणि लोकसभा सदस्य खासदार श्री प्रवीण कुमार निषद यांची उपस्थिति होती. तर विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून बेंगलोर येथील स्टेफिटचे चेअरमैन डॉ जी. के. गणपती रेड्डी, आय. एम. एस. नोएडा येथील अधिष्ठाता डॉ मंजू गुप्ता, शिक्षण भारतीचे माजी विभागीय अधिकारी डॉ उपेंद्र कौशिक, जी. एस. बी. मथुराचे संचालक पद्मश्री मोहन स्वरुप भाटिया, अर्वाचीन भारती भवन संचालक डॉ अनुरूप शर्मा, नवजीवन अकैडमी ग्रुप ऑफ स्कूल न्यू दिल्लीचे चेअरमन श्री आर. के. शर्मा, माजी विभागीय संचालक दिल्ली श्री एल. के. खुराना, संस्थेचे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक किशोर सिंग चौहान, संचालक डॉ आनंद अगरवाल आणि सचिव सौ. रजनी अगरवाल यांची उपस्थिती लाभली होती. 

संस्थेचे मुख्य संचालक डॉ आनंद अगरवाल यांनी अवंतिका अवॉर्ड च्या गेल्या ३७ वर्षांच्या मार्गक्रमणाविषयी माहिती सांगितली. खासदार प्रवीण कुमार निषद यांनी पुरस्काराची परंपरा ३७ वर्षे अबाधित राखल्यांचे सांगून शुभेच्छा दिल्या. पद्मश्री मोहन स्वरुप भाटिया, डॉ मंजू गुप्ता आदींनी मनोगत व्यक्त केले. सौ. रमिंदरकौर मोदी यांना अवॉर्ड मोमेंटो, प्रमाणपत्र, शाल, पुस्तकं प्रदान करण्यात आले. नांदेड येथून शिक्षण क्षेत्रात योगदान देत सौ. रमिंदरकौर मोदी यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली असे वक्तांनी सांगितले. कार्यक्रमात भारतातून विविध राज्यातून आलेल्या प्राचार्य, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमात्वंना येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीं, शिक्षक यांची उपस्थिती होती. 



अवंतिका एजुकेशन अवॉर्ड संस्था दिल्लीत कार्यरत असून दिल्ली तसेच देशातील विविध राज्यात सुद्धा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करीत आहे. तर भारताबाहेर सुद्धा पुरस्कार वितरणाचे अनेक कार्यक्रम झाल्याचे कळते. सौ. रमिंदरकौर मोदी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आर्टऑफ लिव्हींग कडुन तणाव मुक्त गाव पदयात्रा

प्रमुख प्रचारक  साध्वी नित्यबोधाजी यांनी दिले उपदेश 

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील अनेक गावात तणाव मुक्त करण्यासाठी गुरूदेव श्री श्री श्रीरवीशंकरजी यांच्या कृपाआशीर्वादाखाली आर्टऑफ लिव्हींग मुदखेड कडुन पद यात्रा काढण्यात आली. 

यात प्रमुख प्रचारक साध्वी नित्यबोधाजी यांचा सहभाग असुन त्यांचे अमृतवाणीतुन  जीवन सुखी समाधानी आणि तणाव मुक्त  जगण्यासाठी उपदेश ही मिळाले आहेत. नांदेड जिल्हा प्रशिक्षक वैशालीदिदि  गुंजकर , तालुका समन्वयक  डाॅकटर संजय पवार, डाॅकटर लताताई पवार यांनी तणाव मुक्त पद यात्रा चे नियोजन केले आहे. 

डोणगाव गावात दि. १५ रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्त मंदिर मध्ये श्री गुरू पुजा करून पद यात्रा करण्यात आली .समारोप कार्यक्रमात साध्वी जी यांनी शेतकरी हा आपल्या भारताचा कणा आहे. राजा आहे. त्यांनी वीष मुक्त अन्न  उत्पादन करावे असे उपदेश दिले. 

युवापीढी ही व्यसनापासून मुक्त करण्यासाठी गावातील जबाबदार मंडळीनी पुढाकार घ्यावा , अशी ईच्छा व्यक्त केली. यानुसार स्वयं सेवक ही तयार केले.सर्व गावकरी सुखी समाधानी आणि तणाव मुक्त जीवन जगावे या साठी सविस्तर मनोगत व्यक्त केले. सरपंच शोभाबाई बोबडे सह ग्राम पंचायत सदस्य तसेच आनंदराव  हामंद, पत्रकार  प्रल्हाद मस्के, पांडुरंग पाटील उपासे , सुरेश बामणीकर , अरविंद हामंद ,  शेतकरी संघटनेचे बोबडे , शाहीर हेमक  आदी उपस्थित होते. गावकरी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी होते .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड येथे निषेध

 नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन करत घटनेचा निषेध..

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा.शरद पवार साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानावावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला . नांदेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून नांदेड चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी साहेब यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कार्यावाही करावी अशी मागणी करण्यात आली.

   


यावेळी जेष्ठ नेते मा. आ. शंकरअण्णा धोंडगे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जांभरूणकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर,मनपा माजी विरोधीपक्ष नेते जीवन पा.घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पनाताई डोंगळीकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, गजानन पापंटवार,जिल्हासरचिटणीस डॉ. परशुराम वरपडे, मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर ,अर्धापूर तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनील पतंगे,


 


जिल्हासरचिटणीस सचिन देशमुख पार्डीकर, आनंदराव चिठे, रमेश गांजापूरकर, नांदेड तालुकाध्यक्ष उत्तमराव पा. आलेगावकर,ओबीसी सेल प्रदेशउपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड,जेष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष विश्वांभरराव भोसीकर,जिल्हाचिटनिस चंपतराव हातागळे, प्रकाशराव मांजरमकर,राष्ट्रवादी युवती  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका कैवारे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हासचिटणीस सौ. रेखा राहिरे,बिलोली तालुकाकार्याध्यक्ष नागनाथराव खेळगे,प्रा.नारायणराव शिंदे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अर्धापूर शहराध्यक्ष संदीप राऊत  आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी घेतली बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडांची गंभीर दखल !

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पोलीस महासंचालकां समवेत बैठक..

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

     नांदेड येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, या हत्या प्रकरणी गठीत झालेल्या विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा ते नियमित आढावा घेणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

     मंत्रिमंडळ बैठकीनंतर अशोक चव्हाण यांची गुरुवारी दुपारी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी अशोक चव्हाण यांनी बियाणी हत्याकांडाचा घटनाक्रम तसेच बियाणी कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष चौकशी पथकाच्या तपासाचा आढावा घेतला.

     संजय बियाणी यांचे मारेकरी व या हत्याकांडाचे सूत्रधार लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी गृहमंत्री या नात्याने आपण या तपासाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी केली व  गृहमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. 

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, संजय बियाणी यांची हत्या अतिशय गंभीर असून, त्यांचे मारेकरी कोण व या हत्येचा हेतू काय? याचा लवकरात लवकर उलगडा झाला पाहिजे, हीच महविकास आघाडी सरकारची भूमिका आहे !

नदी नाल्यांना कॅनालचे पाणी सोडावे-शिवानंद शिप्परकर

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

गेल्या महीनाभरापासून उन्हाचा पारा वाढला असून पशु पक्ष्यांसह नागरीक उन्हाच्या काहीलीने अक्षरशः त्रस्त होत आहेत उन्हामुळे जमीनीतील पाणी पातळी खालावलेली आहे नदी नाल्यांचे व छोट्या तलावातील पाणि बाष्पीभवन होऊन आटून गेले आहे गावागावांत पाणी पुरवठा सुद्धा कुठे एक दिवसाआड नळाला पाणी येत आहे तर काही गावात पाणी टंचाईच्या झळा नागरीकांना सोसाव्या लागत आहेत सध्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडले आहे ते पाणी पशु-पक्षी,जनावरे व नागरीकांसाठी जमीनीतील पाणी पातळी वाढल्याने पिण्याच्या प्रश्न सुटेल म्हणून तात्काळ नदी नाल्यांत कॅनालचे पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकप्रिय बातम्या