प्रमुख प्रचारक साध्वी नित्यबोधाजी यांनी दिले उपदेश
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील अनेक गावात तणाव मुक्त करण्यासाठी गुरूदेव श्री श्री श्रीरवीशंकरजी यांच्या कृपाआशीर्वादाखाली आर्टऑफ लिव्हींग मुदखेड कडुन पद यात्रा काढण्यात आली.
यात प्रमुख प्रचारक साध्वी नित्यबोधाजी यांचा सहभाग असुन त्यांचे अमृतवाणीतुन जीवन सुखी समाधानी आणि तणाव मुक्त जगण्यासाठी उपदेश ही मिळाले आहेत. नांदेड जिल्हा प्रशिक्षक वैशालीदिदि गुंजकर , तालुका समन्वयक डाॅकटर संजय पवार, डाॅकटर लताताई पवार यांनी तणाव मुक्त पद यात्रा चे नियोजन केले आहे.
डोणगाव गावात दि. १५ रोजी सकाळी आठ वाजता श्री दत्त मंदिर मध्ये श्री गुरू पुजा करून पद यात्रा करण्यात आली .समारोप कार्यक्रमात साध्वी जी यांनी शेतकरी हा आपल्या भारताचा कणा आहे. राजा आहे. त्यांनी वीष मुक्त अन्न उत्पादन करावे असे उपदेश दिले.
युवापीढी ही व्यसनापासून मुक्त करण्यासाठी गावातील जबाबदार मंडळीनी पुढाकार घ्यावा , अशी ईच्छा व्यक्त केली. यानुसार स्वयं सेवक ही तयार केले.सर्व गावकरी सुखी समाधानी आणि तणाव मुक्त जीवन जगावे या साठी सविस्तर मनोगत व्यक्त केले. सरपंच शोभाबाई बोबडे सह ग्राम पंचायत सदस्य तसेच आनंदराव हामंद, पत्रकार प्रल्हाद मस्के, पांडुरंग पाटील उपासे , सुरेश बामणीकर , अरविंद हामंद , शेतकरी संघटनेचे बोबडे , शाहीर हेमक आदी उपस्थित होते. गावकरी सुद्धा मोठ्या उत्साहात सहभागी होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा