नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्या समोर धरणे आंदोलन करत घटनेचा निषेध..
नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. खा.शरद पवार साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानावावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला . नांदेड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून नांदेड चे अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेशी साहेब यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कार्यावाही करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते मा. आ. शंकरअण्णा धोंडगे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जांभरूणकर,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. प्रांजली रावणगावकर,मनपा माजी विरोधीपक्ष नेते जीवन पा.घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. कल्पनाताई डोंगळीकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, गजानन पापंटवार,जिल्हासरचिटणीस डॉ. परशुराम वरपडे, मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर ,अर्धापूर तालुकाध्यक्ष उद्धवराव राजेगोरे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनील पतंगे,
जिल्हासरचिटणीस सचिन देशमुख पार्डीकर, आनंदराव चिठे, रमेश गांजापूरकर, नांदेड तालुकाध्यक्ष उत्तमराव पा. आलेगावकर,ओबीसी सेल प्रदेशउपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड,जेष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष विश्वांभरराव भोसीकर,जिल्हाचिटनिस चंपतराव हातागळे, प्रकाशराव मांजरमकर,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियांका कैवारे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हासचिटणीस सौ. रेखा राहिरे,बिलोली तालुकाकार्याध्यक्ष नागनाथराव खेळगे,प्रा.नारायणराव शिंदे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अर्धापूर शहराध्यक्ष संदीप राऊत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा