उद्यापासून महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू होणार

 संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क :-

ब्रिटीशकालीन भारतीय दंड संहितेच्या जागी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय दक्षता अधिनियमानुसार पुरावा कायदा लागू करण्याची तयारी महाराष्ट्र पोलीस करीत आहेत.

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या की, नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ९० टक्के पोलिस दल प्रशिक्षित आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीने विविध स्तरावरील पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक मॉड्यूल तयार केले. आम्ही ७४ लहान व्हिडिओ देखील तयार केले, जे नवीन फौजदारी कायद्यांचा सामना करताना पोलिसांना मार्गदर्शन करतील आणि ते केव्हाही वापरू शकतात. या तिन्ही दंडात्मक कायद्यांचे मराठीत भाषांतर झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.


नव्या कायद्यांची अंमलबजावणी करताना आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बंधनकारक करण्यासारख्या काही नवीन गरजा पूर्ण करण्यात पोलिसांना व्यावहारिक अडचणी येऊ शकतात, हे मान्य करून त्या म्हणाल्या की, 'आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी अद्याप कोणतेही मॅन्युअल देण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही आमचे वैयक्तिक फोन वापरणार आहोत, असे गृहीत धरले आहे. ऑनलाइन प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीचे एफआयआरमध्ये रूपांतर केले जाईल. पण लोक बरेच फसवे कॉल करत असल्याने ते कसे कार्य करते? हे पाहणे आवश्यक आहे.


भारतीय न्याय संहितेत (बीएनएस) कलम ६९ जोडण्यात आले आहे, ज्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की, जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेशी लग्न करण्याचे वचन दिले परंतु प्रत्यक्षात तिच्याशी लग्न करण्याचा हेतू नसेल आणि तरीही तिच्याशी सहमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो फौजदारी गुन्हा ठरेल ज्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे एक नवीन कलम आहे, जे या प्रकरणांना (लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार) बलात्काराच्या प्रकरणांपासून वेगळे करते," असे महाराष्ट्राचे माजी डीजीपी प्रवीण दीक्षित यांनी सांगितले. नव्या कायद्यांचा उद्देश गुन्हेगाराला शिक्षा देणे नसून न्याय देणे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चार वर्षांचा अभ्यास करून सर्व संबंधितांची मते विचारात घेण्यात आली आणि त्यानंतरच हे नवे कायदे तयार करण्यात आले. पहिल्यांदाच तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर जास्तीत जास्त शिक्षेसाठी केला जाणार आहे, ज्यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण वाढेल. किमान सहा किरकोळ गुन्ह्यांची शिक्षा म्हणून समाजसेवेची संकल्पना मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे बीएनएसमध्ये आयपीसीच्या ५११ कलमांची संख्या कमी करून ३५८ करण्यात आली आहे.


मराठ्यांना डावलून वंजारी, माळी, धनगरांना आरक्षण दिलं एकदाची जातीनिहाय जनगणना करून टाका ! खा.उदयनराजे भोसले

 संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क:-

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी केली आहे. मी जात पात मनात नाही.

पण मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation)23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी (Vanjari) असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली. 

सध्या जालन्यातली वडीगोद्री येथे सध्या लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अुतल सावे यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मनधरणी करणार आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हेदेखील आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सरकार मराठा समाजाला फसवत आहे: अंबादास दानवे

सरकार मराठ्यांना फसवत आहे आणि दुटप्पी भूमिका घेत आहे. सग्यासोयऱ्यांचे नोटिफिकेशन काढले परंतु ते झाल्याने जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले. ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि त्या आधीपासून मिळतात. पाच नातेवाईकांचे नाव ओबीसीमध्ये असल्यास ओबीसींचे प्रमाणपत्र मिळते, सरकारने यामध्ये नवीन काही केले असे नाही, उलट सरकारने यात मराठ्यांची फसवणूक केली आहे.

लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण हिंसा, गावबंदी करणे चुकीचे आहे, परंतु असे केल्याने उपोषणकर्त्यांचा आंदोलकणाच्या विरोधात जनमत जात असते. हे सरकार आंदोलन पेटवत आहे, मराठयांनी ओबीसी विरोधात आणि ओबीसींना मराठ्याविरोधात आंदोलन केले पाहिजे असे सरकारलाच वाटते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 

फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रमध्ये असा जातीयवाद होणे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे. जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी भूमिका घेताना राजकीय विद्वेष होऊ नये, याची भूमिका घेणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने भूमिका घ्यायचे तशी भूमिका पंकजा मुंडे घेतात का हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले भोगायला भेटले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचा मुदखेड भाजपा तर्फे जाहीर निषेध

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका (प्रतिनिधी)

दि.१९ रोजी नांदेड - मुदखेड - उमरी चौकात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शेगाव पालखी दर्शना दरम्यान चिखलाने भरलेले पाय एका ओबीसी कार्यकर्त्याच्या हातून धुवून घेतले ही बाब तमाम ओबीसी समाजाचा अवमान करणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवीणारी आहे.देशात एकाबाजूला पंतप्रधान श्रमाचा सन्मान करण्यासाठी सेंट्रल व्हिस्टा या देशाच्या सर्वोत्तम सभागृहात श्रमिकांचे पाय धूऊन सन्मान करत असतांना लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित विजयाने हुरळून गेलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्तेचा माज जाहीर पणे प्रदर्शित केला आहे. या घटनेचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रातील जनता करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुदखेड भाजपाने निषेध आंदोलन केले आहे.

या वेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड,जिल्हा सचिव भगवान पानेवार,पंचायतराज व ग्रामीण विकासचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख मनोज कमठे ता.महामंत्री पुरुषोत्तम चांडक, शहराध्यक्ष संजय सोनटक्के,माजी नगर उपाध्यक्ष माधव कदम, माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले,संजय आऊलवार,नारायण पवार निवघेकर,युवा मोर्चा ता.अध्यक्ष सतीश पाटील मुंगल,माजी सैनिक आघाडी ता. अध्यक्ष बालाजी गव्हाणे,शहर महामंत्री प्रभाकर पांचाळ,युमो शहराध्यक्ष गजानन कमळे,मोहन जाधव,विनोद चंद्रे, कोमराजी येगुर्ले, बब्लू जनिमिया,पिंटू जाधव आदी कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर धिक्कार असो!धिक्कार असो!नाना पाटोले चा धिक्कार असो!...

निषेध असो!निषेध असो!नाना पटोलेचा निषेध असो!अस्या गोषणांनी संपूर्ण परिसर दुम दुमून टाकला होता.

शाळेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत एस.टी.पासेस ; एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क 

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास (ST Bus Pass) हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याच्या सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

या संदर्भात १८ जून पासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.

मुदखेड शहरात राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

         मुदखेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात श्री कालेजी देवी मंदिरापासून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास श्री कालेजी मंदिर चे मुख्य पुजारी मारुती महाराज यांचे हस्ते श्री ची आरती करून  भव्य मिरवणूक सुरू करण्यात आली.

              मोठ्या थाटामाटात व उत्साहात राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्यप्रतिमेसह मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्याने निघाली होती तरुणांचा उत्साह आणि महिलांची उपस्थिती या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आली यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडोजी वडे न.प.चे माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, महामंत्री तथा निधी बँकेचे प्रमुख प्रवीण  गायकवाड, शहराध्यक्ष कैलास गोडसे, सूर्यकांत, चौदंते गुरुजी ,,मनोज कमटे, डॉ संदीप पचलिंग, गोविंद गोपनपल्ले, गजानन कमळे ,कानोबा बिस्मिल्ले, सचिन चंद्रे, गिरीष कोत्तावार ,गजानन संभोड , सुरेश शेटे ,पुरुषोत्तम चांडक, रमेश बोडके, ऋषी पारवेकर, गंगाधर कुंचटवाड, धम्मदीप कांबळे आदी उपस्थित होते.




गावातील डिपीवरुन शेतातील विद्युत मोटारी सुरू.

(आठ दिवसांतच दोन वेळा डि.पी जळाल्याने नागरिक हतबल)



मुगट वार्ताहार 

मुगट गावातील डिपी वरुन शेती पंपाच्या मोटारी सुरू असल्यामुळे आठ दिवसांतच डिपी जळाला आहे.

त्यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावात मोठ्या प्रमाणात आकोडे चोरांची संख्या चांगलीच असुन सुद्धा डिपी जळन्याच्या घटना जास्त घडत नाहीत .संपुर्ण गावाचा भार हा सहा ते सात डिपी वर आहे.

 गावातील वेशीतील हनुमान मंदीरा जवळील डिपी वर सुद्धा जास्त लोड दिसत नाही.परंतु मागील काही दिवसांपासून या गावठाणातील अनेक शेतकरी या डिपी वरुन विज चोरी करून,आकोडे टाकून,शेती पंपासाठी विज घेत आहेत.त्यामुळे डिपी जळन्याच्या घटना घडत आहेत.लाईनम्यान यांनी संबंधित शेतकऱ्यांना वारंवार सांगुन सुद्धा ऐकण्यास तयार नाहीत उलट अरेरावीची भाषा वापरत आहेत.त्यामुळे मात्र सर्व सामान्य वीज ग्राहकाला याचा फटका बसत आहे.

संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून शेती पंपासाठी वीज चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विद्युत ग्राहक करत आहेत.

नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा

संपादक आशिष मुगटकर



मातृभूमी न्युज नेटवर्क 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आज (दि. ५) पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस त्यांनी राष्ट्रपतींकडे केली.

दरम्यान, नवीन सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी ७ जून रोजी एनडीएची दिल्लीत बैठक होणार आहे.

लोकसभा निवडणूक निकालाचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. आज (दि. ५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक झाली. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान पदासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारला आणि पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रीमंडळाला नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली.

राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा होणार विसर्जित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७ वी लोकसभा विसर्जित केली जाईल.

नव्या सरकारचा शपथविधी ८ जूनला

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सभागृहात बहुमत मिळाल्यानंतर संभाव्य सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक आहे. ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.

मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पुर्व तयारी तालुकास्तरीय कार्यशाळा व प्रशिक्षण संपन्न

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.३१ रोजी मुदखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे खरीप हंगाम पुर्व तयारी तालुकास्तरीय कार्यशाळा व प्रशिक्षण संपन्न झाले. 

          या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी श्री.दत्तकुमार कळसाईत साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या योजना विषयी, सोयाबीन बियाणे बि.बि.एफ. पध्दतीने व टोकण पद्धतीने लागवड करावी, सोयाबीन वरील किड व रोग व्यवस्थापन,निंबोळी अर्क वापरणे, दशपर्णी अर्क तयार करणे, जैविक बुरशीनाशके यांचा वापर करणे तसेच शेतकरी गट करणे, व्हाट्सअप गृप तयार करणे,CRA तंत्रज्ञान हवामान अनुकूल शेतीवर आधारित फळबाग लागवड कृषी करावी, इ.विषयावर मार्गदर्शन केले तसेच उपस्थित कृ.वि.कें पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप जायभाये सर (वरिष्ठ शास्त्रज्ञ -कृषि विद्यावेत्ता) यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांचे कोणते वाण वापरावे ह्याविषयी माहिती दिली त्यामध्ये सोयाबीन वाणाची निवड, लवकर येणारे व उशिरा येणारे वाण, परभणी कृषि विद्यापीठ प्रचलीत वाण-MAUS-71,MAUS-612,MAUS -162,MAUS-158 व MAUS -725 या वाणाची वैशिष्ट्ये कोणत्या किडीला व रोगाला बळी पडत नाहीत याविषयी माहिती दिली. त्यांनी सोयाबीन पिकाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे गरज असते त्यामुळे एकरी दीड पोते 12 -32-16 व सोबत 8 किलो गंधक देणे उपयुक्त आहे.शेतकरी 20-20-0-13 देतात पण त्यात पालाश नाही आणि सोयाबीन पिकाला पालाश ची गरज असते.

      त्यामुळे आवश्यक आणि योग्य खत दिल्यास खर्चात बचत होते हे देखील सांगितले.तसेच तुर पिकांमध्ये कोणते बियाणे वापरावे त्यांचे वाण-लालतुरी साठी BDN -716 व तसेच पांढरीतुर BDN-711, गोदावरी या वाणाची लागवड करण्याविषयी शेतकर्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच कृ. वि. कें. पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ.माणिक कल्याणकर (वरीष्ठ शास्त्रज्ञ -विकृतीशास्त्र) यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील किड व रोग कशा प्रकारे येतात, त्यावरील उपाययोजना सोयाबीन वरील रोग पिवळा मोझॅक, मुळकुज, तसेच किडी खोड किडा, खोड माशी, पाने खाणारी अळी इ. व तुर पिकावरील मर रोग ,व पाने गुंडाळणारी अळी इ. यावरील उपाय व व्यवस्थापन कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. चव्हाण सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ट्रायकोड्रमा चे उपयोग उपलब्ध जैविक संवर्धक यांची बिजप्रक्रीया कसी करावी व ट्रायकोड्रमा सर्वच पिकांना कशाप्रकारे उपयोगी आहे.याविषयी माहिती दिली.व तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी मुद्खेड डॉ. अमरज्योती गच्चे मॅडम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले , कृषी विभागाच्या योजना, CMKSY शेततळे करणे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड,MREGS फळबाग  लागवड करणे, सोयाबीन बियाणे किंवा कापुस बियाणे खरेदी करताना पक्की पावती व लेबल असलेले बियाणे खरेदी करावे, व उपस्थित शेतकर्यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक व बिजप्रक्रीया कसी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व उगवण क्षमते नुसार बियाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याविषयी सांगितले व सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच हंगाम पूर्व कार्यशाळा व प्रशिक्षण आयोजित करून अगदी वेळेपूर्वी योग्य मार्गदर्शन झाल्याने सांगण्यात आलेले सर्व आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरल्यास उत्पन्न वाढण्यास नक्कीच फायदा होईल.तसेच यावर्षी मान्सून अगदी वेळेत असून अनुकूल असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे असे  देखील त्यांनी मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राम कपाटे यांनी केले, कार्यक्रमाची प्रस्तावना श्रिमती. डाॅ. अमरज्योती गच्चे मॅडम यांनी केली तर आभारप्रदर्शन श्री. व्ही. बी. गिते यांनी केले.

 यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी श्री. दत्तकुमार कळसाईत साहेब, कृ.वि.कें. पोखर्णी येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संदीप जायभाये सर व डॉ.माणिक कल्याणकर सर व महबिजचे श्री.चव्हान सर व श्री. सोनटक्के सर, तालुका कृषिअधिकारी डॉ.अमरज्योती गच्चे मॅडम व मंडळ कृषी अधिकारी श्री. पि. टी. हिलालपुरे साहेब तसेच कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व प्रगतीशील शेतकरी/शेतकरी वर्ग यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.

लोकप्रिय बातम्या