मुदखेड तालुका प्रतिनिधी
दि.१येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी मुदखेड च्या वतीने विश्वगुरू मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दिनांक १७ सप्टेंबर वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन करण्याचे आवाहन संपूर्ण राष्ट्राला करण्यात आले होते. यानिमित्ताने मुदखेड भारतीय जनता पार्टीच्या वतीने रेल्वे स्थानक प्रांगणात कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून हातात झाडू घेत रेल्वे स्थानकाचे संपूर्ण प्रांगण झाडून स्वच्छ करत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती स्वच्छता पखवाडा निमित्ताने सेवा कार्यक्रम हाती घेऊन साजरी करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्याचे सरचिटणीस प्रवीण गायकवाड, जिल्हा चिटणीस भगवान पानेवार,सौ. केतकी चौधरी, तालुका अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग,माजी अध्यक्ष शंकर मुतकलवाड, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गोपनपल्ले, गुलाब सूर्यवंशी, किसान मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव पुयड नागेलीकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक, माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष माधव वाघमारे, व्यापारी आघाडीचे तालुका अध्यक्ष गोविंद उर्फ कानोबा बिस्मिल्ले, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष हरी बैनवाड सोशल मीडिया प्रमुख प्रभाकर पांचाळ, निळकंठ हामंद,गंगाधर भांगे पाटील खांबाळकर नरेंद्र मोदी विचार मंच युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील मुंगल, मारुती पाटील मुंगल, कालिदास जंगीलवाड, बापूराव पाटील मुंगल, जांबुवंत पाटील इजळीकर यांच्या सह अनेकानी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करून भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी आगे बढो देश आपके साथ है! अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
