मुदखेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.३१ रोजी मुदखेड शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक नांदेड रोड मुदखेड येथे असंख्य अहिल्या प्रेमी जनतेच्या उपस्थित उत्साहात  साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रवीण गायकवाड, मा. उपनगराध्यक्ष राजाअप्पा कोत्तावार, लक्ष्मण देवदे, माधव कदम, करीम खान, नगरसेवक कमलेश चौदंते, उमाकांत घोंगडे, माजी सैनिक संघटनाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रभु घोंगडे, सुनील चौंदते, मारुती गुंठे, बालाजी गव्हाणे, संजय चव्हान, शिवानंद देवके, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कैलास गोडसे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण, उत्तमराव चव्हाण, दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोतावार, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे,

पत्रकार गंगाधर डांगे,संजय कोलते, धम्मा कांबळे, ईश्वर पिन्नलवार धनगर समाजाचे गजानन संभोड, गजानन कमळे, शिवाजी बिस्मिल्ले, भुजंग फुले, मारुती कमजळे, मारुती फुले, गंगाधर फुले, बाळू संभोड, कान्होबा बिस्मिल्ले, रमेश फुले, गिरीष कमळे व असंख्य धनगर समाज बांधव व शहरातील अहिल्या प्रेमी जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



गोदावरी नदीच्या पात्रात महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हाती लागले फक्त तराफे.

संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहर 

दि. १८ रोजी  प्रकाशित करण्यात आलेली "मुगट, ब्राह्मणवाडा, वासरी येथुन बोटिंग मशिनने वाळुचा उपसा " या बातमीमुळे मुदखेड महसूल प्रशासन व पोलीस यांनी संयुक्त कारवाई आज दि. १९ रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करण्यात आली.  गोदावरी नदी पात्रात केवळ  तीन वाळूचे तराफे हाती लागले परंतु प्रत्यक्षात मात्र  या ठिकाणी बोटिंग मशिनने या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू होता. 

मुगट परिसरातील गोदावरी नदी पात्रात बोटिंगच्या साह्याने खुलेआमपणे वाळूचा उपसा सुरू आहे. ही बातमी प्रकाशित करताच महसूल व पोलीस प्रशासन यांनी दि.१९ रोजी दुपारी चारच्या दरम्यान  गोदावरी नदीच्या पात्रात धाड टाकून  कारवाई केली त्यात हाती केवळ वाळूचे तराफेच लागले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दोन बोटीने वाळू चा उपसा करण्यात येत होता. 

महसूलच्या हाती ना बोटींग मशीन लागली ,ना वाळूचा साठा लागला केवळ नदीच्या काठावर पडलेले वाळूचे तराफेच हाती लागले. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई ही दबावाखाली तर करण्यात आली नाही असा प्रश्न निर्माण होतो? 

अनेक दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसा वाळूचा उपसा सुरू होता परंतु  कुठलीच कारवाई केली नाही.आज पोलिसाच्या धाडीपूर्वीच आज या ठिकाणी नदीपात्रातील दोन बोटी अचानक कुठे गायब झाल्या हा प्रश्न पडतो. 


पुन्हा एकदा महसूल प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकला खरा पण काही दिवसातच पुन्हा एकदा हे वाळू माफिया डोके वर करून पुन्हा सक्रिय होऊन गोदावरी पात्रातून वाळूचा उपसा बोटींग मशीनने सुरू करतील.

यावेळी पोलीस व महसूल विभागाच्या हाती सापडलेले तीन वाळुचे तराफे नष्ट करण्यात आले.मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे , जमादार आलेवार, नायब तहसीलदार जगता,मंडळ अधिकारी जडे, तलाठी बोधमवाड, तलाठी मुंगल व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

मुगट, वासरी,ब्राह्मणवाडा येथून बोटिंग मशीनने वाळूचा उपसा.

 संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहर 

मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात मधून मोठ्या प्रमाणात बोटिंग मशीनच्या साह्याने दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा वाळूमाफिया खुलेआम पणे करत आहेत.


तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाळूची खुलेआम पणे नदीच्या पात्रातून बोटिंग मशीनच्या वापर करून दिवसाच काढली जात आहे सध्या तरी कोणत्याच रेती घाटाचा लिलाव झाला नाही पावसाळ्यापूर्वी वाळू माफियाकडून हा उपसा केला जात आहे दररोज मुदखेड नांदेड या रस्त्याने अनेक रेतीचे टिप्पर अवैध रेतीचा पुरवठा करत आहेत. हा सर्व प्रकार दिवसा सुरू असून सुद्धा तालुक्यातील महसूल प्रशासन मात्र कुठेतरी थातुरमातुर कारवाई करुन शांतपणे बसल आहे. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महसूल प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा असुन मात्र त्या ठिकाणी गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासन काय करत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे? 

अशीच परिस्थिती सुद्धा मुदखेड तालुक्यात आहे. महसूल प्रशासनाला वाळू माफियांवर अंकुश ठेवता येत नाही. गेल्या अनेक दिवसापासून वासरी, मुगट,ब्राह्मणवाडा या ठिकाणाहून बोटिंग मशीनच्या साह्याने दिवसाला वाळूचा उपसा केला जात आहे.त्यामुळे दररोज शेकडो बरास वाळूचा खुलेआम पुरवठा मुदखेड तालुक्यातून हदगाव, हिमायतनगर, हिंगोली याठिकाणी केला जात आहे. या वाळू माफियांना राजकीय पाठबळ असल्यामुळे वाळूची तस्करी थांबवणे हे प्रशासना समोर आव्हान आहे. प्रशासनाने वाळू विषय धोरण ठरवले असले तरी  प्रत्यक्षात मात्र याचा उपयोग सर्व सामान्य नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी होताना दिसत नाही.तालुक्यात झटपट पैसा कमावण्यासाठी वाळुची तस्करी केली जात आहे.

खुजडा-टाकळी येथे गोदावरी नदीत अनधिकृत वाळू उत्खनन करणारी यांत्रिकी बोट उद्ध्वस्त

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी (अतिक अहमद)

 दि.१७ रोजी मुदखेड तालुक्यातील खुजडा-टाकळी शिवारात गोदावरी नदीपात्रात बोटीच्या साह्याने अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ पथकासह धाड टाकून कारवाई केली. दुपारी सुमारे पाच वाजता करण्यात आलेल्या या धाडीत यांत्रिकी बोट ताब्यात घेऊन जिलेटिनच्या साह्याने ती उद्ध्वस्त करण्यात आली.

अनधिकृत उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कारवाई ठोस असून यामध्ये तहसील कार्यालय, महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त सहभाग नोंदवला. कारवाईच्या वेळी मंडळाधिकारी एच. जी. पठाण, ग्राम महसूल अधिकारी गोपाल माने, श्री. कोटूरवार, विश्वनाथ बोदमवाड, मनोज वाघमारे, राजू चव्हाण, मस्के, गलांडे, पोलीस पाटील (खुजडा) गुंतापले, पोलीस पाटील (टाकळी) श्री. शिंदे, कोतवाल श्याम कोलते, वाहन चालक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, बिट जमादार चक्रधर आणि पुणेबॉईनवाड यांचा सक्रिय सहभाग होता.

या धाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असून, पुढील काळात अशा स्वरूपाच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. देऊळगावकर यांनी सांगितले.

मुगट जिल्हा परिषद शाळेची यशाची परंपरा कायम.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनीधी 

मुगट येथील जिल्हा परिषद शाळेचा इयत्ता दहावी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.त्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

      शाळेचा निकाल यंदा ८५% टक्के टाकला आहे.त्यात सर्व प्रथम कुमारी कदम सुमित्रा आनंदराव हिने ९१.८० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक आला आहे. 

       कुमारी जाधव रुपाली राम हिने ८४.४० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाली असून शाळेत व्दितीय क्रमांक आला आहे.कुमारी जाधव आरती शिवानंद हिने ८३.४०टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली असून शाळेत त्रितीय क्रमांक आला आहे.कुमारी ऋतूजा  गंगाधर हाटकर   हिने  ८३.४० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली असुन शाळेत त्रितीय क्रमांक आला आहे.


        शाळेत पुन्हा एकदा मुलांन पेक्षा मुलीची उत्तीर्ण संख्या अधिक आहे. यात विशेष प्राविण्य प्राप्त होऊन ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत,तर प्रथम श्रेणीत १३, व्दितीय श्रेणीत २२,पास श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून मुगट जिल्हा परिषद शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल दरवर्षी चांगला लागत आहे.

     जिल्हा परिषद शाळेतील विशेष प्राविण्य विद्यार्थीना शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांनी मुलांच्या घरी जाऊन त्यांचे व पालकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

       शाळेतील दहावी उत्तीर्ण  विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी,मंडळ अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील, शाळेय शिक्षक इत्यादींनी  शुभेच्छा दिल्या आहेत.


महाराष्ट्र दिनी कै. हरी महाराज भंडारे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ बक्षीस वितरण.

 संपादक आशिष मुगटकर

उमरी तालुका प्रतिनीधी 

 दि.१ में रोजी उमरी तालुक्यातील बोरजुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद  व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  हरी महाराज चांदू भंडारे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री. गुंडावार, श्री विठ्ठल पवार ग्रा.पं., सदस्य, श्री. विठ्ठल भंडारे, श्री.लक्ष्मण भंडारे, श्री.बाबुराव भंडारे, श्री.दत्ता भंडारे, श्री.निळकंठ चंदापूरे, मुख्याध्यापक श्री कचकलवाड सर, श्री सोनकांबळे सर,श्री दिलीप भंडारे,श्री ज्ञानेश्वर भंडारे  इ. मान्यवर उपस्थित होते.



लोकप्रिय बातम्या