मुगट वार्ताहर
दि. १८ रोजी प्रकाशित करण्यात आलेली "मुगट, ब्राह्मणवाडा, वासरी येथुन बोटिंग मशिनने वाळुचा उपसा " या बातमीमुळे मुदखेड महसूल प्रशासन व पोलीस यांनी संयुक्त कारवाई आज दि. १९ रोजी दुपारी ४ वाजता कारवाई करण्यात आली. गोदावरी नदी पात्रात केवळ तीन वाळूचे तराफे हाती लागले परंतु प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी बोटिंग मशिनने या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू होता.
मुगट परिसरातील गोदावरी नदी पात्रात बोटिंगच्या साह्याने खुलेआमपणे वाळूचा उपसा सुरू आहे. ही बातमी प्रकाशित करताच महसूल व पोलीस प्रशासन यांनी दि.१९ रोजी दुपारी चारच्या दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात धाड टाकून कारवाई केली त्यात हाती केवळ वाळूचे तराफेच लागले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी दोन बोटीने वाळू चा उपसा करण्यात येत होता.
महसूलच्या हाती ना बोटींग मशीन लागली ,ना वाळूचा साठा लागला केवळ नदीच्या काठावर पडलेले वाळूचे तराफेच हाती लागले. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई ही दबावाखाली तर करण्यात आली नाही असा प्रश्न निर्माण होतो?
अनेक दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवसा वाळूचा उपसा सुरू होता परंतु कुठलीच कारवाई केली नाही.आज पोलिसाच्या धाडीपूर्वीच आज या ठिकाणी नदीपात्रातील दोन बोटी अचानक कुठे गायब झाल्या हा प्रश्न पडतो.
पुन्हा एकदा महसूल प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करून या प्रकरणावर पडदा टाकला खरा पण काही दिवसातच पुन्हा एकदा हे वाळू माफिया डोके वर करून पुन्हा सक्रिय होऊन गोदावरी पात्रातून वाळूचा उपसा बोटींग मशीनने सुरू करतील.
यावेळी पोलीस व महसूल विभागाच्या हाती सापडलेले तीन वाळुचे तराफे नष्ट करण्यात आले.मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे , जमादार आलेवार, नायब तहसीलदार जगता,मंडळ अधिकारी जडे, तलाठी बोधमवाड, तलाठी मुंगल व महसूल कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा