मुदखेड तालुक्यातील ऊसाचे दोन कोटी लवकरच शेतकऱ्यांना मिळणार .

 शेतकरी शिवसेना नेते प्रल्हाद इंगोले यांचा लढा यशस्वी !

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

महाराष्ट्र शुगर या बंद पडलेल्या कारखान्याचे परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे  जमा झालेले दोन कोटी रुपये  मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील अशी माहिती शिवसेनेचे शेतकरी नेते तथा  ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिली .

       महाराष्ट्र शुगर सोनपेठ जि परभणी या बंद पडलेल्या साखर  कारखाना कडे असलेल्या ४ कोटी २२ लाख रुपया पैकी  एनसीएलटीने देऊ केलेले दोन कोटी रुपये परभणी चे जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन वर्षांपासून जमा होते. ते पैसे कोणत्या शेतकऱ्यांना द्यायचे या संदर्भात प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने  सदरील पैसे दोन वर्षापासून  जमा होते  . ऊसाचे रुपये    शेतकर्यांना मिळावे यासाठी साखर आयुक्त ,परभणी जिल्हाधिकारी  यांचे कडे अनेक वेळा शेतकऱ्यांना घेऊन आंदाेलने केली. निवेदन दिले.अनेक वेळा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्या. शेवटी  जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्याशी चर्चा करून सदरील पैसे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड यांच्याकडे कडे वर्ग करावेत असे ठरले. उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार तयार केलेल्या यादीप्रमाणे शेतकर्यांच्या खात्यावर जमा करता येतील  हे पटवुन दिले. त्यामुळे परभणी जिल्हाधिकारी आचल गोयल , उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सदर पैसे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड यांच्याकडे वर्ग केलेआहे. शेतकर्यांचे अडकून पडलेले हे हजारो रूपये  लवकरच शेतक यांना मिळतील असा विश्वास शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य  इंगोले यांनी व्यक्त केला.

प्रल्हाद इंगोले, शिवसेना शेतकरी नेते तथा सदस्य ऊसदर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र यांनी  सतत या प्रकरणाचा पाठलाग केल्या मुळे यश आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी केंद्र सरकार कडुन शेकडो करोड ची मंजुरी

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

महाराष्ट्र विकास आघाडी चे दिगगज मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश असे मिडीयाने दाखवले .......

 काँग्रेस चे मोठे कार्यकर्ते ही उत्साहीत

 आघाडीचे इतर पक्षाचे चिंताग्रस्त असल्याचे चित्र 

नांदेड जिल्ह्यातीलविविध विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज मंत्री नितिन गडकरी यांनी शेकडो कोटी रुपये मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात नांदेड ते मुदखेड आणि भोकर मतदारसंघात सतत वापरायचे प्रमुख रस्ते खड्डेमय झाले मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता.या रस्त्याचा कायापालट करने साठी मंत्री गडकरी यांनी दुर दृष्टीने रस्त्याचे काम करायला लावले . रूंद व सरळ गुळगुळीत रस्ता करण्याच्या विकास कामाला दोनशे कोटी रुपये पेक्षा अधिक निधी मंजूर केला. आज पर्यंत शेकडो रूपये च्या पटीत नांदेड जिल्ह्यातील रस्तासाठी निधी मंजूर करणे सुरू च असुन त्याची बेरीज हजारो कोटीत होत आहे. 

मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघात माळकौठा तालुका मुदखेड येथे नवा रस्ता गाव वस्ती मधुन चक्क इंग्रजी यु आकारात केला होता .तो धोकादायक वळण असल्या ची ओरड मिडीयामध्ये झाले मुळे आता गाव वस्ती बाहेरून दुसरा प्रमुख रस्ता करणे साठी सुद्धा सरकार निधी देत.  


या आधी अनेक कोटी रुपये रस्त्यावर कसे खर्च दाखवते याची चौकशी ईडी कडुन केंद्र सरकार करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही . निधी मागणी काँग्रेस कडुन आणि निधी पाठवणार भाजप चे सरकार आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी पार्टी सध्या भाजप च्या विरोधात आक्रमक आहेत पण नांदेड मध्ये त्यांच लक्ष नाही.     

 पाटबंधारे कॅनल वर नवीन पुल असोत की ग्राम पंचायत गावातून रस्त्याच्या कडेला तसेच शहराबाहेर मुदखेड कडुन उमरी रस्त्यावर मोठी नाली बांधकाम घेण्यासाठी अनेक कोटी रुपये निधी बांधकाम खात्याने आणला आहे. 

काल परवा भोकर विधानसभा मतदारसंघात मुगट , माळकौठा, निवघा, मेंडका ग्राम पंचायत मधील चिखलमुक्त ग्राम विकास साठी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येकी ८० लाख रूपये असे मुदखेड तालुक्यात ३ कोटी २० लाख रूपये निधी भाजप च्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या रोजगार हमीत मंजूर केला आहे. श्रेय घेण्यासाठी लगेच कार्यक्रम घेतले.

काँग्रेस चे जिल्हा व तालुका अध्यक्ष यांनी या कामासाठी कार्यक्रम घेऊन राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकार कडुन हे शेकडो कोटी रुपये आले हे सांगितले आहे. 

एकी कडे शिवसेना नेतृत्व माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे व राष्ट्रवादी नेते तथा माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्री मंडळात मंत्री तथा पालकमंत्री चव्हाण यांचे कडून निधी साठी प्रयत्न केले तर त्यास भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील सरकार प्रतिसाद देते हा चिंतनाचा विषय आहे.

 आणि

 दुसरी कडे काँग्रेस सदस्य नोंदणी कार्यक्रमा त काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजुरकर यांनी देशपाळीवर मुस्लिम समाजाचे नेतृत्व, मुख्य नायक , खानदानी लोकसभेचे सदस्य असलेले खासदार आवैशी साहेब यांच्या बद्दल ठेवणीतील शब्द वापरून उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस च्या पराभवा बद्दल टिका करतात हे गंभीर चिंता करण्याचा विषय झाला आहे. 

   आता पुढे काय होईल हे स्पष्ट दिसते की नाही हे पहावे लागेल.

 नाट्यमय आणि गुप्त घडामोडी सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या चिंता करण्याचा विषय आहे .

देश व विदेशात सीआरपीएफ बल ची सशक्त बल म्हणुन ओळख.

 कंमाडेट महाराणीया यांनी मौलीक व प्रेरणादायी विचार मांडले.

संपादक आशिष मुगटकर



 मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथे केन्द्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मध्ये १९ मार्च रोजी  स्थापना दिवस विशेष कार्यक्रम घेऊन साजरा करणयात आला. मुखालय व कार्टर गार्ड  परिसरात  क॔माडेट लिलाधर महारानीया यांच्या हस्ते  ध्वारोहण झाले .त्यानंतर शहीद स्मारकास पुष्प चक्र अर्पन करून  आदरांजली वाहण्यात आली.  

 आपल्या विशेष भाषणात कमांडेट महाराणीया यांनी मौलीक व प्रेरणादायी विचार मांडले . भारताची अंतर्गत सुरक्षा सांभाळुन केंद्रिय राखीव पोलीस बल सि आर पी बलाने  संयुक्त राष्ट्रसंघाची  शांती सेना च्या रूपात श्रीलंका सह अनेक देशात आपली जबाबदारी ईमानदारीने  म्हणुन देश आणि विदेश ही ओळखते  सीआरपीएफ बल हे एक सशक्त बल आहे. 


मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय चे कमांडेट लिलाधर महारानीया यांनी विचार  मांडले.


 या विशेष परेड कार्यक्रमास  कमांडेट   मुख्य वैद्यकीय अधिकारी  डाॅकटर  लाॅरेन्स  बांडो सर, डाॅकटर अमुल्या कुजूर , पुरुषोत्तम जोशी, पुरुषोत्तम राजगडकर आदी प्रमुख उच्च पदस्थ अधिकारी   उपस्थित होते. परेड मध्ये उप निरिक्षक सह जवान सहभागी होते.



केम्ब्रिज इंग्लिश स्कुलचे नामांतर कै.शंकरराव देशमुख इंग्लिश स्कुल बारड

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

कै.शंकरराव राजारामजी देशमुख बारडकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, नांदेड)यांच्या सहाव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून १५/०३/२०२२ रोजी श्री शितला देवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड ता मुदखेड जि नांदेड संचलित 'केम्ब्रिज इंग्लिश स्कुलचे शासकीय नियमानुसार नावपरिवर्तन करून 'शंकरराव देशमुख इंग्लिश स्कुल अँड  ज्यूनियर कॉलेज बारड'असे करण्यात आले

या प्रसंगी मा.गोविंदराव शिंदे नागेलीकर(जिल्हा अध्यक्ष: काँग्रेस कमिटी नांदेड ) संजय शंकरराव देशमुख बारडकर,आनंदराव गादिलवाड(पं स.सभापती) प्रभाकर आठवले(सरपंच बारड)श्री बाळासाहेब देशमुख बारडकर(उपसरपंच) बारड शत्रूघ्न गंड्रस,बालासाहेब गव्हाणे (ता.अध्यक्ष काँग्रेस अर्धापुर)विलासराव देशमुख,उत्तमराव लोमटे,रमेशचंद्र महाजन, रामेश्वर कोरबनवाड,अशोक गव्हाणे शेषेराव दंडे, नवनाथराव देशमुख,दिलीपराव बारडकर  भगवानराव पाटील कांजाळे पंडितराव भोसले,गौतम आठवले,मारोती कांबळे दिलीप मुलंगे,हरिषचन्द्र देशमुख,प्रल्हादराव मुसळे विलासराव गव्हाणे,रंगुनाथराव देशमुख, दोन्ही संस्थेचे कार्यकारी मंडळ,परिसर व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत  सोहळा संपन्न झाला.

मुदखेड येथे श्रीमंत सुभेदार राजे मल्हाररावजी होळकर यांची ३२९ वी जयंती उत्साहात साजरी.

 राजे मल्हारराव होळकर चौक येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथील राजे मल्हाररावजी होळकर चौकात मुदखेड शहरातील अनेक मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थित श्रीमंत सुभेदार राजे मल्हाररावजी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे जेष्ठ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खंडेराव वड्डे सर हे होते.मुदखेड नगर परीषद चे माजी उपनगराध्यक्ष तथा खंडोबा मंदीर देवस्थान मुदखेडचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी देवदे, माजी नगरसेवक उमाकांत घोंगडे, गोविंदराव गोपनपले, कैलाश गोडसे, नेते प्रविन गायकवाड,मुन्ना चांडक, पत्रकार ईश्वर पिन्नलवार, पत्रकार ऐडके ,सचीन चंद्रे ,आनंदा ढगे ,पाटील देवा, धबडगे पाटील, ऋषिकेश पारवेकर पाटील, प्रकाश सुर्यवंशी पाटील, गजु संभोड ,गजु कमळे ,कानबा बिस्मीले, उपेंद्र देवदे, बाजीराव महादाळे, संदीप मोडवान, कालीदास जंगीलवाड ,गोवींद सुरने,मोगले,मारोती कमजळे , दिलीपराव देशमुख, बाळू संभोड यांची प्रमुख उपस्थिती होती.


 धनगर समाजाचे असंख्य कार्यकर्त श्रीमंत सुभेदार राजे मल्हाररावजी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थीत होते.





.

मुदखेड बालेकिल्ला ढासळलेला.!

 काँग्रेस ने आपल्या यश-अपयशाचे चिंतन करावे.

संपादकीय लेख

 मुदखेड नगरपरिषदेचे तालुका काँग्रेस चे अध्यक्ष असतांना ते प्रभारी म्हणूण कामा कडे.....  

२४×७ म्हणजे सतत संपर्कात होते. 

स्मशान भुमी ला जायला पक्का रसता नाही. तीथे दुखी असलेल्या अंत यात्रात सहभागी यांना थोडाआधार बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही की पिण्याचे शुद्ध पाणी नाही. अशी बातमी आली. लोकांनी तेव्हडे कोटी रुपये शासनाकडून साहेब पाठवतात त्याचा नागरिकांना आवश्यक सेवा दयावे असे विचार अनेकांनी मांडले. 

मग दहा वर्षानी  कामाचा प्रस्ताव यांनी लक्ष देऊन तयार करावा लावला. सीता नदी काठी भव्य स्टेडीयम बांधकाम झाले.त्याचा उपयोग सहा वर्षात किती झाला हे सर्वानी पाहिले आहीले

  आता पर्यंत नगरपालिका कडुन  किती कोटी रुपये निधी वापरून हा विकास केला याची माहिती समोर आली तर चिंतन करता येईल. 

 मुदखेड शहराच्या  राजवाडी पिंपळकौठा जाणार रस्त्या जवळ विविध जाती जमातीची स्मशान भुमी आहे. तीथे अंदाजे दोन तीनशे पेक्षा अधिक वर्षा पासून अंत्य संस्कार करतात ती चा खरेदी विक्री व्यवहार नगरपालिका कडुन जवळपास अर्धा कोटी रुपये निधी वापरून करण्यात आला. या विरोधात न.प समोर उपोषण करूनचौकशी करावी ही मागणी कार्यकर्ते यांनी केली होती .पत्रकारांनी ही यात सहभागी होऊन मागणी स पाठिंबा दिला आणि बातम्या सुद्धा असंख्य दिल्या. मसनवटयाच्या नावाखाली लाखात नाही तर कोटी रुपये निधी वापरून काळीमालावणारे काम केले व साहेबांच्याडोक्यावर पाप केले सारखे झाले. 

  नागरिकांना आवश्यक असलेल्या  पाणी पुरवठा विभाग किती कोटी रूपये दर वर्षी खर्च दाखवते .अनेक ठिकाणी पाण्याची टाकी बांधून रिकामी ठेवते या अन्याय कारक प्रकरणाची चौकशी करावी म्हणुन आमरण उपोषण आंदोलन झाले .पत्रकारांनी खुप बातम्या ही देवुन वरिष्ठ नेते यांच्या  लक्षात आणून दिले. हे तालुका काँग्रेस  अध्यक्ष तथा प्रभारी यांनी पाहीले की नाही.

याचा परिणाम नंतर झालेल्या निवडणूक निकालात दिसून आला.

मुदखेड नगरपालिका मध्ये काँग्रेस हारली. पुन्हा पुन्हा टिकीट दिले मुळे. टिकीट चा बाजार केला जाते म्हणुन जवळपास चार हजार मते पंजावर आली आणि नऊ हजार मतदारांनी पंजा चे बटन दाबलेच नाही आणि विरोधी  मत कळवीले.

मार्केट कमेटी मध्ये ही काँग्रेस  हारली .५०% जागा विरोधात निवडून आल्या. सभापती अपक्ष करावा लागला .चेअरमन जिल्हा अध्यक्ष व माजी अध्यक्ष हे कोण उभे करायचे याच्या साठी गुपतगु  दोन महिने आधी पासून करत होते . जिनिंग फॅक्टरी मध्ये हे बसुन रहात होते पण मतदारांना हे आपले कडे घेवु शकले नाही. 

जिल्हा परिषद बारड गटात तब्बल अडीच वर्षे लोकप्रतिनिधी नाही.

मुगट पंचायत गणात हे काँग्रेस कडुन कुणी निवडून घेवु शकले नाही. 

चक्क साहेबांच्या लोकसभा निवडणूकीत याचे परिणाम दिसले.मतदार काँग्रेस ला मतदान  कमी संख्येने  केले .

जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानात ग्राहकांना धान्य देण्याची सोय.... ...पुरवठा अधिकारी यांची माहिती.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथील तहसील कार्यालयात १५ मार्च रोजी जागतीक ग्राहक दिना निमित्ताने विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार संजय नागमवाड हे होते. प्रास्ताविक शासनाच्या ग्राहक हित विभागाचे महेश गाजुलवाड यांनी केले. त्या नंतर ग्राहक पंचायत च्या तालुका अध्यक्ष केतकी चौधरी यांनी ग्राहक हित कडे लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.  ग्राहक चळवळी चे कार्यकर्ते  मनोज कमटे व भुषण चक्करवार यांनी रेशन दुकान संबंधी तसेच वीज वितरण कंपनी  संबंधी ग्राहकांना सतत मदत करावे असे मत मांडले. 

तालुका ग्राहक  विभाग मुख्य पुरवठा  अधिकारी संजय जोगदंड यांनी रेशन कार्ड धारकांना जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानात  धान्य देण्याची सोय आहे अशी माहिती दिली.

वीज वितरण कंपनी संबंधी ग्राहकांना ही मदत करू असे स्पष्ट  केले. या बैठकीस मंडळ अधिकारी बालाजी कुराडे , प्रकाश  लाठकर ,माहिती अधिकार  कार्यकर्ते लढ्ढाजी , व्यापारी प्रतिनिधी विजयराव पेदे ,समाज सेवक डुबुकवाड अण्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.

बारड येथील शिवालय मंदिरात अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता

 सप्ताह कार्यक्रमात किर्तन,भजन सामूहिक परमरहस्य ग्रंथाचे वाचन

संपादक आशिष मुगटकर



बारड/ प्रतिनिधी

बारड येथील शिव मंदिर शिवालय मंदिरात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संकल्पनेतून अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात झाली असून एकोनिस वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह सुरू आहे सात दिवस चालणाऱ्या सप्ताहामध्ये किर्तन, भजन, भारुड, परमरहस्य ग्रंथाचे सामुहिक वाचन शिवपाठ, रुद्रभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि.१० रोजी सकाळी परमरहस्य ग्रंथाची ग्रंथ दिंडी गावातून काढण्यात आली यावेळी महिलांनी कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तर मुख्य रस्त्यावर महिला भजनी मंडळाच्या भंजनाने टाळ मृदुंगाच्या गजराने  परिसर भक्तिमय बनला होता.

दि. ११ रोजी शुक्रवारी काल्याचे किर्तन सद्गुरु वेदांत श्री १०८ श भ्र सतगुरु महादेव शिवाचार्य महाराज यांनी किर्तन रुपी सेवेतून जीवन जगण्याचा मूलमंत्र भक्तांना दिला आहे यावेळी विणेकरी वेदमूर्ती गंगाधर स्वामी यांनी वीणावादन केले आहे. तर प्रवचनातून भक्तांना व्यसनापासून दूर होऊन जीवनाचा आनंद घेण्याचा, संसार सुखी सुखमय बनवण्याचा संदेश दिला आहे.युवकांनी पण मिळेल त्या संधीचे सोने करुन माता पित्याची सेवा करत जीवन सुखमय पणे जगण्याचा मुलमंत्र दीला यावेळी विरशैव समाज मंडळच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात झेप घेतलेल्या कु.रुषाली मुलंगे,कु.शितल कराळे,संकेत आमदुरकर, शुभांगी चंद्रपाड यांचा सन्मान करण्यात आला आहे.

नित्यपूजा रुद्राभिषेक बाळू स्वामी,गजानन स्वामी, यांनी केला परमरहस्य ग्रंथाचे वाचन बालाजी कत्रे यांनी केले सूचक म्हणून आंबेगावकर महाराज यांनी काम पाहिले बारड भजनी मंडळाने भजनाची कार्य केले तर पेटीवादक निवघेकर यांनी केले तर तबला वादक राचया स्वामी,शैलेश लालमे, सुनील मुंलगे, परसराम माळकरी, अशोक लोणे, आदींनी काम पाहिले काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाच हजार सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,भा. च. स. सा. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, संचालक सुभाषराव देशमुख, भगवान तिडके, शेषेराव दंडे,कनिष्ठ अभियंता आर.व्ही. धकाते, यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी श्रीराम कोरे,दीलीप कोरे, प्रभाकर भिमेवार,काशीनाथ मुलंगे,विनोद कोरे, वसंत लालमे, नामदेव बिचेवार,नामदेव उपवार, संतोष एमले,शिवप्रसाद कराळे, बाबुराव बिचेवार,माधव कोरे,मारोती चंद्रपाड, सुरेश एमले,राजु मुलंगे,मोहन मुलंगे, सदाशिव तांडे, शंकर लाहेवार,बाळासाहेब एमले, रामेश्वर धुडकेवार,नारायण संगेवार, जीवन भिमेवार,बाळू मुलंगे,सारंग मुलंगे, ऋषीकेश मुलंगे,आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

मुदखेड तालुक्यातील शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशन कडुन आर्थिक मदत

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील नागेली ,निवघा , रोहीपिंपळगाव,सह इतर गावात राहणारे आत्महत्या ग्रस्तांचे वारसदार यांना नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशन कडुन पंचवीस हजार रूपये ची आर्थिक मदत करण्यांत आली .

दि.१० मार्च रोजी पंचायत समिती मुदखेड  तहसील कार्यालयाच्या सभागृहात नाम चे केशव घोणसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साधा कार्यक्रम घेऊन आत्महत्या केलेल्या च्या वारसदारांना धनादेश वाटप केले गेले.निवघा येथे आत्महत्या केलेले बाळकृष्ण बापुराव पवार यांच्या वारसदार श्रीमती वैशालीताई यांच्या घरी जाऊन नाम फाऊंडेशन कडुन  पत्रकार केशव घोणसे पाटील यांनी  पंचवीस हजार रूपये चा धनादेश दिला.

यावेळी  भाऊराव चव्हाण सह. साखर कारखाण्याचे संचालक शिवाजीराव पवार , मुलीचे वडिल  पांडुरंग भोसले, प्रा. अमृत जाधव हे उपस्थित होते.

 या वेळी  नाम चे मनोज कमटे , प्राध्यापक अमृत जाधव ,उद्योजक  शिवानंद देवके , रूकमाजी शिंदे,  दिनेश शर्मा, भगवान नागेलीकर ,साहेबराव हौसरे , अब्दुल रज्जाक  आदी उपस्थित होते.


माळकौठा येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा.

 शिवजयंती निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन

संपादक आशिष मुगटकर



मुगट / वार्ताहार

 दि०७ रोजी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

त्या निमित्ताने प्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांच्या व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी करण्यात आले होते.

 शिवजयंतीच्या निमित्ताने माठकौठा गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. 

 या व्याख्याना प्रसंगी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.माणिकराव जाधव,सरपंच केशव तारु,उपसरपंच शहाजी पाटील जाधव , प्रभाकर कोटगीरे. मुदखेड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक वटाणे, सहकारी सूरणर ,विठ्ठल पाटील शिंदे(ग्रा.स ).शालेय समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोटगीरे, उपाध्यक्ष शेषेराव कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.



ग्राम पंचायत सदस्य गणपती गायकवाड,माजी संचालक भारत पा.जाधव, मराठा समूहाचे संस्थापक संतोष पाटील शिंदे. माजी सरपंच मारोतराव जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी पा. जाधव,व्यंकटराव जाधव,अशोक पा. जाधव, आदींची उपस्थिती लाभली.

व्याख्याते अविनाश भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यावरुन आजच्या पिढीने कशी प्रेरणा घ्यावी यावर सविस्तर असे मार्गदर्शन केल. तसेच त्यांनी  गावातील शाळा डिजिटल करुन आपल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्यात आवश्यकता आहे असे सांगितले.

माळकौठा येथे मागील १३ वर्षा पासून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतिने घेतला जातो. यासाठी अनेक नामवंत वक्ते दरवर्षी बोलाविले जातात.

यावेळी व्याख्यानाला सभोवतालच्या  महाटी,येळी,चिलंपिपीरी,खुजडा,टाकळी,रोहिपिंपळगाव,वसंतवाडी,कामळज,देवापुर,वासरी,निवघा व परिसरातील हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती.

या प्रसंगी संतोष शिंदे ,ज्ञानेश्वर पाटील शिंदे (किसान युवा क्रांती संघटना मुदखेड तालुका अध्यक्ष),पप्पू पाटील जाधव,प्रविण पाटील जाधव (छावा जिल्हा अध्यक्ष नांदेड) साईनाथ पाटील शिंदे,सुर्यभान पाटील शिंदे,नागेश जाधव,शिवाजी शिंदे,साईनाथ शिंदे,बालाजी शिंदे,नितिन जाधव,कृष्णा जाधव,आनंदराव शिंदे,संभाजी जाधव,तेजेश जाधव, गजानन मठपती व  गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

देळुब (खुर्द) शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री राम बालाजी पावडे यांची निवड.

 

संपादक आशिष मुगटकर



अर्धापूर तालुका / प्रतिनिधी

अर्धापूर तालुक्यातील देळुब( खुर्द) येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली. दि. ४ मार्च २०२२ रोज शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देळुब (खुर्द)येथे शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेमध्ये उपस्थित पालकांमधून अध्यक्ष म्हणून श्री.राम बालाजी पावडे यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री गोविंद नागोराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून 

१)श्री संदीप बालाजी पताळे 

२)श्री प्रभाकर दादाराव कदम 

३)श्री आनंदा शेषेराव कराळे  

४)श्री अर्जुन एकनाथ पताळे 

५) सौ.ताई माधव डाखोरे 

६) सौ.दुर्गा फुलाजी मांजरे 

७)सौ. राणी रंगराव डाखोरे 

८)सौ.कुशवर्ता सखाराम जाधव

९)सौ. छायाबाई देविदास पताळे 

यांची निवड करण्यात आली.

समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी एस.पी व शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री भागवत सर हे राहतील.

अपरंपार स्वामी मठात बालयोगी व्यकंट महाराज यांच्या हस्ते महादिप उत्सव

 बालयोगी व्यकंट स्वामी यांच्या उपदेशाच्या परिणाम म्हणजे मुदखेड च्या मठाचे सुंदर रूप
संस्थानचे शंकरराव पचलिंग यांची स्पष्ट वक्तव्य . 

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

महाशिवरात्र महादिप उत्सव कार्यक्रमाचे बालयोगी महाराज यांच्या हस्ते झाले उद् घाटन 

मुदखेड येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरू श्री अपरंपार स्वामी मठात महाशिवरात्र निमित्ताने परिसरात रस्त्यावर दिप लावण्यात आले. 

यावेळी ब्रम्हाकुमारी पुजा  बहेनजी यांनी शिव महीमा सह स्वर्णिम भारत निर्माण करण्याचे आवाहन केले.मुख्य ईश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बालयोगी व्यकंट स्वामी यांच्या उपदेशात वेळेला महत्व देण्याचे सर्व प्रथम सांगितले. माऊंटआबु ओमशांती ईश्वरीय विश्वविद्यालय बद्दल गौरव पुर्ण विचार मांडले. समाधिस्थ स्वामी  महाराज यांच्या आदेशाने वयाच्या अठ्ठावीस वया पासून माझे जीवन बदलले याचा खुलासा केला. आज शिव रूपाने भाव मोठा आहे तो सदैव जागृत व्हावा  असा उपदेश दिला. 

कुणी च कुणाच नाही अपरंपार, शिवबाबा , शीव म्हणा तोच तुमच्या सोबत आहे. सनातन धर्मा मध्ये उद्दबती लावु नका . भक्ती मार्ग  स्वच्छ मनाने करा असे सांगून अपरंपार स्वामी मठात संजीवनी समाधी तुम्हाला आशीर्वाद  देणारी आहे. 

तंबाखू पुडी  सोडला तरी सभामंडप उभा करता येते.समाजात दुसर्याला काम करण्याची संधी दया. पद मोठे नाही .तुम्हाला अध्यक्ष पद मिळालेकी तुम्ही स्वताला काय समजता पण तुम्ही भाव अपरंपार स्वामी मठात ठेवा असा स्पष्ट संदेश दिला.चैतन्य तुमच्या मध्ये फुलवा .तालुक्याच्या ठिकाणी मोठे कार्य व्हावे .अपरंपार मठाच्या शेती ठिकाणी दवाखाना काढा शाळा काढा असे मनोगत व्यक्त केले.

मुदखेड येथे ईश्वरीय विश्वविद्यालय कडुन शिवरात्री विशेष कार्यक्रम

संपादक आशिष मुगटकर




मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड येथे  आजादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की और कार्यक्रमात ८६ वी महाशिवरात्रीसाजरी झाली.  पहिल्यांदाच श्री अपरंपार स्वामी मठाच्या पवित्र प्रांगणात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवाकेंद्र मुदखेड तर्फे १०  फुट शिवलिंगाचे भव्य दर्शन तसेच महाआरती करून करण्यात आले. 

या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती नांदेड वसंत नगर सेवा केंद्र संचालिका आदरणीय स्वाती बहेनजी,  भोकर उपसेवाकेन्द्र संचालिका  हर्षा बहेनजी, मुदखेड़ उपसेवा केंद्र संचालिका पूजा बहेनजी, वंदना बहेनजी, मीना बहेनजी, वनिता बहेनजी तसेच अपरंपार स्वामी मठाचे  ईश्वर महाराज, श्री अपरंपार स्वामी मठ संस्थान अध्यक्ष सुरेश शेटे, वैजेनाथ भालेराव  शंकरराव पचलिंग, देविदास चंद्रे, संजय आउलवार,  बाबुराव चिलवंतकर, शिवानंद देवके, सूर्यकांत चौदंते, सचिन चंद्रे, पत्रकार ईश्वर पिन्नालवार, संतोष गाडे,  कालिदास चौधरी, केतकी चौधरी, जयश्री  देशमुख, रेखा पवार सह  प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येत उपस्थित होते.

 नांदेड चे ठाकूर भाई, राजू भाई, प्रल्हाद भाई, दत्ता भाई, साईनाथ भाई, प्रवीण भाई, भोकरचे चिंतावार भाई  मुदखेड़ उपसेवाकेंद्रतील सर्वांनी  सहकार्य केले.  कार्यक्रमामध्ये शंकर-पार्वतीच्या रूपात कु.आस्था आणि कु. ऐश्वर्या , एक छोटी ब्रह्माकुमारी अक्षरा हिने ईश्वरीय संदेश दिला.  या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन ब्रम्हाकुमारी पूजा बहेनजी यांनी केले, यांच्या हस्ते आजादी चा अमृत महोत्सवाचे बुकलेट, ईश्वरी प्रसाद तसेच पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार ही केले.



लोकप्रिय बातम्या