बालयोगी व्यकंट स्वामी यांच्या उपदेशाच्या परिणाम म्हणजे मुदखेड च्या मठाचे सुंदर रूप
संस्थानचे शंकरराव पचलिंग यांची स्पष्ट वक्तव्य .
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
महाशिवरात्र महादिप उत्सव कार्यक्रमाचे बालयोगी महाराज यांच्या हस्ते झाले उद् घाटन
मुदखेड येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरू श्री अपरंपार स्वामी मठात महाशिवरात्र निमित्ताने परिसरात रस्त्यावर दिप लावण्यात आले.
यावेळी ब्रम्हाकुमारी पुजा बहेनजी यांनी शिव महीमा सह स्वर्णिम भारत निर्माण करण्याचे आवाहन केले.मुख्य ईश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालयोगी व्यकंट स्वामी यांच्या उपदेशात वेळेला महत्व देण्याचे सर्व प्रथम सांगितले. माऊंटआबु ओमशांती ईश्वरीय विश्वविद्यालय बद्दल गौरव पुर्ण विचार मांडले. समाधिस्थ स्वामी महाराज यांच्या आदेशाने वयाच्या अठ्ठावीस वया पासून माझे जीवन बदलले याचा खुलासा केला. आज शिव रूपाने भाव मोठा आहे तो सदैव जागृत व्हावा असा उपदेश दिला.
कुणी च कुणाच नाही अपरंपार, शिवबाबा , शीव म्हणा तोच तुमच्या सोबत आहे. सनातन धर्मा मध्ये उद्दबती लावु नका . भक्ती मार्ग स्वच्छ मनाने करा असे सांगून अपरंपार स्वामी मठात संजीवनी समाधी तुम्हाला आशीर्वाद देणारी आहे.
तंबाखू पुडी सोडला तरी सभामंडप उभा करता येते.समाजात दुसर्याला काम करण्याची संधी दया. पद मोठे नाही .तुम्हाला अध्यक्ष पद मिळालेकी तुम्ही स्वताला काय समजता पण तुम्ही भाव अपरंपार स्वामी मठात ठेवा असा स्पष्ट संदेश दिला.चैतन्य तुमच्या मध्ये फुलवा .तालुक्याच्या ठिकाणी मोठे कार्य व्हावे .अपरंपार मठाच्या शेती ठिकाणी दवाखाना काढा शाळा काढा असे मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा