मराठवाडा अध्यक्ष पदी मा. सैनिक श्री.लक्ष्मण देवदे यांची निवड

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

माजी सैनिक संघटनेचे जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे यांच्या कार्याची दखल घेऊन सैनिक फेडरेशन चे अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा मा खासदार श्री सुधीर सावंत साहेब यांनी मराठवाडा अध्यक्ष पदाची जबाबदारी  लक्ष्मण देवदे यांना देण्यात आली आहे .

या निवडी बाबत सैनिक फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री निंबाळकर साहेब नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड साहेब यांनी लक्ष्मण देवदे यांचा कामाची दखल घेऊन राज्यभर काम करण्याची संधी दिली याबाबत वरील मान्यवराचे आभार . 

मुदखेड शहरातील नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांचा नगरसेवक पदाचा प्रदीर्घ अनुभवl लक्षात घेऊन यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिल्या बाबत संघटनेचे अध्यक्ष सुधीर सावंत साहेब यांचे प्रथम आभार मानण्यात आले व धनगर समाज मुदखेड शहर यांच्या वतीने धनगर समाजाचा एक सैनिक राज्यभर काम करण्याची संधी मिळाल्या बाबत धनगर समाजाच्या वतीने लक्ष्मण देवदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

 वरील कार्यक्रमास धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खंडेराव वडे सर, पिंटू गुंठे, भुजंग फुले, शिवाजी बिस्मिल्ला, मारुती कमजोर, माजी सैनिक मारुती गुंठे,कोंडीबा इरपे, योगेश बिस्मिल्ला,गजानन कमळे, रमेश फूले, खंडू कमळे, सुरने मोगले, संभोड गोवींद ,कोडीबा गुंठे बाळू  जेष्ठ पत्रकार मनोज दादा कमटे, ईश्वर भाऊ पिन्नलवार, उपेंद्र देवदे  व असंख्य धनगर समाजाचे कार्यकरते सत्कार कार्यक्रमास उपस्थीत होते !

मातृभूमी न्यूज कडून आपणास हार्दिक शुभेच्छा....



आझाद मैदान मुंबई महाएल्गार आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे- नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. कैलास खानसोळे

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

शिक्षक समन्वय संघ, महाराष्ट्र राज्य तर्फे सोमवार दि. 10/10/2022 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाएल्गार आंदोलन प्रचलित नियमानुसार म्हणजेच 15 नोव्हेंबर 2011 व 04 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार सर्व विना अनुदानित तथा अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना हक्काचे अनुदान मिळावे यासाठी लावण्यात आलेले आहे.



याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात विभागनिहाय महाएल्गार आंदोलन नियोजन व शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन शिक्षक समन्वय संघ मार्फत करण्यात येत आहे. आज मंगळवार

 दिनांक 27/09/2022 ला नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक शाळा कनिष्ठ महाविद्यालय येथे जावून शिक्षकांशी संवाद साधुन आपल्या हक्काच्या पगारी साठी आणि 100% अनुदान मिळण्यासाठी दि10 आक्टोबर 2022 रोजी अझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात येत आहे

या साठी नांदेड जिल्हयातील प्रा महेश गव्हाणे प्रा .भागवत गोरे प्रा अंतेश्वर फुगणर, प्रा मधुकर फाजगे प्रा शुद्धोधन हटकर प्रा पेंदोर सर प्रा लक्ष्मीकांत कदम प्रा कदम सर प्रा श्रीहरी खुर्दामोजे प्रा प्रकाश जाधव प्रा अजित शिंदे प्रा राजेश पंडीत सह जिल्हयातील शिक्षक परिश्रम घेत आहे

'माझा पगार, माझी जबाबदारी'आणि आता 'मुंबईची माझी शेवटची वारी' या ब्रीदवाक्य प्रमाणे या वर्षीची दिवाळी आझाद मैदानावर साजरी करू व जोपर्यत 100% अनुदान मिळण्याचा शासन आदेश निर्गमीत होणार नाही तो पर्यत माघार नाही अशा ठाम विश्वासाने सहभागी होणार असे सवे .शिक्षक सांगत आहे तरी मायबाप शासन या शिक्षकांना न्याय देईल का ? दिवाळीचा सण लेकरा बाळात साजरा करण्याची गोड भेट देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी एनसीसीच्या वार्षिक शिबिरात जीवन आधार रक्त केंद्र नांदेड व ५२ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल एम. रंगराव यांच्यावतीने माता साहेब गुरुद्वारा मुगट ,नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 रक्तदानाच्या प्रारंभी फर्स्ट अधिकारी शेषराव राठोड सेकंड अधिकारी डॉ. माणिक गाडेकर यांनी रक्तदान करून एनसीसी कॅडेटला रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले त्यानंतर सुभेदार चौगुले नायक अरविंद कुमार यादव हवालदार गुरु सिंधप्पा घोष जसबीर यादव ,या भारतीय सैन्यातील आर्मी अधिकाऱ्यांनी रक्तदान दिले .असे म्हणतात "जो अन्न दे व अन्नदाता धन दे व धन दाता जो विद्या दे विद्या दाता पर जो रक्त दे व जीवनदाता "रक्तदान श्रेष्ठ दान असते. 



सदरील रक्तदान शिबिरात ७ अधिकाऱ्यांनी व ४३राष्ट्रीय छात्र सैनिकांनी रक्तदान करून परोपकारितेचा आदर्श समाजाला घालून दिला.

 या रक्तदान शिबिरासाठी डेपुटी कमांडर वेटरी  वेल्लु, सुभेदार मेजर लाल मोहम्मद ,सुभेदार गोपाल सिंग ,रमण शर्मा सेकंड अधिकारी गोविंद केंद्रे ,पुरुषोत्तम जाधव, देविदास शेटे थर्ड अधिकारी सोनल जयस्वाल, गिरीश पारसेवार डॉ. किशोर इंगळे कॅम्प सीनियर चंद्रकांत सातपुते व जीवन आधार ब्लड सेंटरचे जगदीश सोनकांबळे अर्जुन वैद्य यांनी परिश्रम घेतले

एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीराला मातासाहब गुरुद्वारा मुगट येथे सुरूवात

 एनसीसी कॅडेट्स राष्ट्र निर्माण कार्यात हातभार लावतात -कर्नल रंगाराव

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 दि. २१ रोजी ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड द्वारा आयोजित वार्षिक प्रशिक्षण शिबिराची सुरुवात माता साहेब गुरुद्वारा मुगट या ठिकाणी दिनांक २० रोजी झाली. हे वार्षिक प्रशिक्षण शिबिर आठ दिवस चालणार आहे .आज प्रशिक्षणाची सुरुवात ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड चे कमांडिंग अधिकारी कर्नल रंगाराव यांच्या प्रारंभिक भाषणांनी झाली त्यात त्यांनी वरील उद्गार काढले. एनसीसीचे विद्यार्थी स्वतःची पिढीच बदलू शकतात तसेच राष्ट्र कार्यात त्यांचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. नजीकच्या काळात व्यावसायिक संधी सुद्धा एनसीसी कॅडेट्स ला उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा फायदा कॅडेट्सनी स्वतः फायदा घेऊन समाजापर्यंत पोहोचावा असे आव्हान त्यांनी केले. सर्वप्रथम हे शिबिर चालविण्यासाठी माता साहेब गुरुद्वाराने जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल गुरुद्वाराच्या प्रमुखांचे त्यांनी आभार मानले. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात परभणी ,हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील एकूण ५०५ कॅडेट सहभागी झालेले आहेत. कॅम्प कमांडंट म्हणून स्वतः कर्नल रंगराव काम पाहत आहेत .डेप्युटी कॅम्प कमांडर म्हणून लेफ्टनंट कर्नल वेटरी वेल्लू , कॅम्प अड जूनंट म्हणून फर्स्ट ऑफिसर श्री एस.डी .राठोड हे काम पाहत आहेत. या प्रशिक्षण शिबिरासाठी सुभेदार मेजर ललित कुमार मेहतासुभेदार गोपाल सिंग , महमद लाल, वैजनाथ चौगुले रमन शर्मा फर्स्ट ऑफिसर शिवराज कदम सेकंड ऑफिसर गोविंदराव केंद्रे ,डॉ. माणिकराव गाडेकर ,देविदास शेटे पुरुषोत्तम जाधव, सोनल जयस्वाल व डॉ. किशोर इंगळे ने सु बो महाविद्यालय , श्री गिरीश पारशेवार सर त्याचबरोबर  पी आय स्टाफ ,सुनील कुमार हावलदार कटरे,एसवीर, योगेश कुमार ,घोस, जगतराम जशबीर कुमार ,नेगी ,सिधप्पा, सुरजकुमार ,संजयकुमार अरविंद राज्य व केंद्र शासनाचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते

राष्ट्रीय छात्र सेना च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शिबिरात दिले शस्त्र प्रशिक्षण.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट स्थित माता साहेब देवांजी गुरुद्वारा येथे  ५२महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड द्वारा वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे प्रशिक्षण शिबीर दिनांक २०ते २७  सप्टेंबर या कालावधीत माता साहिब गुरुद्वारा मुगट येथे होत आहे. सदर प्रशिक्षणाचे संपूर्ण संचालन बटालियनचे कर्नल एम. रंगाराव करत आहेत. या प्रशिक्षणात छात्रसैनिकांची विभागणी अल्फा ,ब्रावो, चार्ली या तीन कंपन्यांमध्ये करून प्रत्येक कंपनीला एक दिवस .२२ रायफल च्या मदतीने शस्त्र प्रशिक्षण दिले जात आहे.

 प्रत्येक छात्र सैनिकांना फायर सराव करण्यासाठी पाच राऊंड दिले जात आहे प्रत्यक्ष रायफल द्वारा फायरिंगचा अनुभव  घेतल्यामुळे  विद्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशिक्षण मुळे छात्रसैनिकांच्या मनातील भीती दूर होऊन छात्रसैनिकांमध्ये अभूतपूर्व धैर्य व सहास निर्माण होत आहे.

 या प्रशिक्षणामध्ये कॅम्प कमांडर कर्नल रंगाराव व डेप्युटी कॅम्प कमांडर लेफ्टनंट कर्नल वेटरी वेल्लु, सुभेदार मेजर ललित कुमार सुभेदार गोपाल सिंग लाल मोहम्मद ,वैजनाथ चौगुले ,रमण शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले तर शस्त्र प्रशिक्षण सराव घेण्यात फर्स्ट ऑफिसर एस.डी. राठोड, शिवराज कदम सेकंड ऑफिसर डॉ. माणिक गाडेकर, गोविंद केंद्रे, पुरुषोत्तम जाधव, देविदास शेटे थर्ड ऑफिसर सोनल जयस्वाल ,गिरीश पारसेवार,डॉ. किशोर इंगळे नेसूबो महाविद्यालय. तसेच फायरिंग रेंज वर नायब सुभेदार रमण शर्मा हवालदार जसबीर, सरोज कुमार डॉ.माणिक गाडेकर देविदास शेटे व नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील ५०५ छात्र सैनिक उपस्थित होते

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात देशातील प्रमुख शिवसेनीकांचा विशेष कार्यक्रम

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा/प्रतिनिधी

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या शिवसेनेच्या सर्व प्रदेश प्रमुख उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमची भूमिका विशद केली. 



वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार मार्गक्रमण करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून कोणतीही गद्दारी केलेली नाही असे निक्षून सांगितले. हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून असंगाशी झालेला संग सहन करण्यापलीकडे गेल्याने बाहेर पडलो असे आवर्जून सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातुन मिळणारा पाठींबा पाहता आपापल्या भागात स्थानिक भुमिपूत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी जरूर लढा. आपल्याला याकरिता सर्वतोपरी मदत नक्की करू अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली. 

यात मध्यप्रदेशचे राज्यप्रभारी थाडेश्वर महावर, मध्यप्रदेशचे राज्य प्रमुख ऍड.राजीव चतुर्वेदी, राजस्थानचे राज्यप्रमुख लखन सिंह पवार, उत्तर प्रदेशचे महासचिव अभय द्विवेदी, उत्तर प्रदेशचे महासचिव अनिरुद्ध देव त्रिपाठी, गुजरातचे  राज्यप्रभारी जिमी अडवाणी, गुजरात राज्यप्रमुख एस. आर. पाटील, छत्तीसगड राज्यप्रमुख धनंजय परिहार, दिल्ली राज्यप्रमुख संदीप चौधरी, दिल्ली राज्यप्रभारी नीरज सेठी, तामिळनाडू राज्यप्रमुख मणीभारती, पुद्दुचेरी राज्यप्रमुख नमचिवायन, मणिपूर राज्यप्रमुख टोम्बी सिंह, आसाम राज्यप्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदर सिंह मनचंदा, पश्चिम बंगाल राज्यप्रमुख शांती दत्त, त्रिपुरा राज्यप्रमुख शांती दत्त यांचा समावेश होता. 

यावेळी शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, कॅप्टन अभिजित अडसूळ हेदेखील उपस्थित होते.

गुणवत्तावृद्धीसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्रिय सहकार्य

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

दि.२१

     कोराना काळात नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेंनी आँनलाईन शिक्षण,घरोघरी भेटीच्या माध्यमातून शिक्षण आणि अत्यंत कल्पकतेने विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना नंतर जिल्हा परिषद शाळेंची विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. हळूहळू पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेंकडे वळत आहे,त्याचाच सुपरिणाम म्हणजे आज प्रत्येक जि.प.च्या शाळेचा पट कमालीचा वाढलेला दिसत आहे. संस्कार, गुणवत्ता व प्रगती या तीन ब्रीद्रचे उपयोजन करुन जिल्हा परिषद विष्णुपूरी प्रशाला नेहमीच विद्यार्थी गुणवत्तेबाबत अग्रणी राहीली आहे. कोरोना काळानंतर या शाळेचा पट तेराशे विद्यार्थ्यांचा झाला असून इयत्ता पहिले ते दहावीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग या शाळेत अत्यंत यशस्वीपणे चालत आहेत. केवळ पट वाढला तरी गुणवत्तावृद्धिही झाली पाहिजे, याच विचाराच्या माध्यमातून नेहमीच येथील शालेय व्यवस्थापन समिती विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात व यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत असते. त्याचाच एक भाग म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे यांनी नेमका विद्यार्थी गुणवत्तेत किती प्रगत आहे, याच्या अवलोकनासाठी एक पायाभूत सोपी चाचणी परीक्षा दि.20 रोजी घेतली. यामध्ये मराठी, इंग्रजी व गणित विषयातील मूलभूत क्रिया श्रवण,वाचन,लेखन ,आकलन आणि गणित विषयासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित पंदरा गुण्यांच्या चाचणीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही चाचणी प्रशालेच्या भव्य मैदानात इयत्ता सहावी ते नववी या वर्गांची घेण्यात आली. या चाचणीस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख स्वतः अवलोकन व निरीक्षणासाठी मैदानात चाचणी पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. त्यांच्या सोबत विद्यार्थीहितदक्ष पालक राजेश हंबर्डे, शिक्षणप्रेमी नागरिक माधवराव हंबर्डे, गोविंदराव शंकरराव हंबर्डे, शाळेसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे संतोष हंबर्डे, उग्रसेन हंबर्डे यांची उपस्थिती लाभली होती. अत्यंत उपयुक्त अशी ही प्रश्नपत्रिका प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी वेदपाठक यांनी कृष्णा बिरादार यांच्या सहाय्याने काढली होती. प्रश्नपत्रिकेसंबंधी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी दिल्या.या परीक्षेच्या माध्यमातून आलेल्या निकालाद्वारे जे विद्यार्थी पायाभूत संकल्पनेत कच्चे आहेत,त्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी आनंद वळगे,चंद्रकला इदलगावे, उदय हंबर्डे, पद्माकर देशमुख, जयश्री शिंदे, पंचफुला नाईनवाड,वैशाली कुलकर्णी, शैलजा बुरसे,कांचनमाला पटवे,एम.ए.खदिर व विकास दिग्रसकर यांनी मोलाचे सहकार्य केले.अशा उपयुक्त पायाभूत परीक्षेचे आयोजन केल्याबाबत पालक व सुजाण नागरिकांनी समितीचे तथा प्रशालेचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

मुदखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 दि१७ सप्टेंबर २०२२ रोजी मुदखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. 

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती चंदा रावलकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, नांदेड, श्री. नागमवाड साहेब, नायब तहसीलदार, मुदखेड यांच्या हस्ते पदवी प्राप्त प्रशिक्षानार्थ्याना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

प्रारंभी पाहुण्याचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य श्री. एम.एस. बिरादार यांनी केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कु. भाग्यश्री बनसोडे तर आभार प्रदर्शन श्रीमती चंदा वाहुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री नितीन देशपांडे, राजेंद्र हसनपल्ली, सुरेश पांढरे, राजरत्न सरपाते,, हनुमंते सर, इंदरवाड सर व इतर सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. 

दिल्लीत लोकनेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब आणि रा.जे.ना.संघाचे उपाध्यक्ष प्रा.नारायण शिंदे यांची स्नेह भेट

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने नांदेड येथील राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रा.नारायण शिंदे व त्यांच्या सहकार्यानी आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सस्नेह भेट घेतली.

  आदरणीय जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन साहेबांना भेट दिली. प्रा.शिंदे यांनी वेणू हि कादंबरी , रंग एकतेचा व कांहीं एकांकिका हा नाट्य संग्रह त्यांना  भेट दिला.

भेट देताच साहेबांनी प्रतिक्रिया दिली, मी वाचून तुम्हाला अभिप्राय कळवतो !कार्यक्रमाच स्थळं दुर आहे,पायी जाऊ नका टॅक्सीने जान्याचा सल्ला दिला. 



एवढ्या कमी वेळात  ते माझ्यासी बोलले. मला या गोष्टीचा खुप मोठा आनंद झाला. मला या वयात माझ्या सारख्या एकटं जीवन जगण्यार्‍याला हि मोठी उर्जा आहे असे मला वाटते.साहेबांना भेटण्याचं माझं खुप दिवसांच स्वप्न पूर्ण झालं.असे प्रा.नारायण शिंदे हे मातृभूमीशी बोलताना म्हणाले. 

या भेटीच्या वेळी प्रा.डि बी.जाभंरुणकर ,प्रा. अनमोलसिगं कामठेकर,मा सुभाष गायकवाड, इंजिनिअर भोसीकर ,दगडगांवकर , डॉ विक्रम देशमुख आदी उपस्थित होतो.



गोजातीय प्रजातीचे गुरे, म्हशींच्या बाजारास मनाई - जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 संपादक आशिष मुगटकर

• जनावरांच्या खरेदी विक्रीसाठीचे सर्व बाजार बंद राहणार 



नांदेड जिल्हा/प्रतिनिधी

दि.१२ लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध, निर्मुलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. याअनुषंगाने गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची कोणत्याही ठिकाणाहून ने-आण करणे, बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन भरविणे किंवा प्राण्यांना एकत्र आणून कार्यक्रम करण्यास प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण खुशालसिंह परदेश यांनी निर्गमित केले आहेत.

 लम्पी चर्मरोगाच्याबाबत नांदेड जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातीची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यांसाठी असलेली गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांच्या शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियमित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करत आहे.  गोजातीय प्रजातीचे गुरे व म्हशीचा कोणत्याही प्राणी बाजारास मनाई, प्राण्यांच्या  शर्यती लावणे, प्राण्याच्या जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियोजित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांच्या गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.

नियमित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जनावरांमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या बाधित झालेलया गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास मनाई करण्यात आली आहे. जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी चे जिल्ह्यातील सर्व बाजार पुढील आदेश होईपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोग असल्याने संशयित असलेल्या किंवा संक्रमित किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर काटेकोर अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात येईल असेही कळविले आहे.

माजी सैनिकांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

मुदखेड येथे दि. ११ सप्टेंबर रोजी शहरातील बौद्ध प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी माजी सैनिकांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमता तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.

 यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. संयोगिता अरविंद कांबळे (शिक्षण - एम.ए. इंग्लिश,एम.एच.सि.ई.टी.२०२१)  कु.आदिती बाबासाहेब चौदंते (शिक्षण - नीट २०२१ उत्तीर्ण) शैलेश सुनील चौदंते (शिक्षण नीट २०२२ उत्तीर्ण) या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा माजी सैनिकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच उपस्थित असलेल्या सर्व माजी सैनिकांचा बौद्ध प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी माजी सैनिक विकास समिती नांदेड जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी शैलेश चौदंते याच्या पुढील शिक्षणासाठी माजी सैनिक यांची एका महिन्याची संपूर्ण पेन्शन रोख रक्कम पंचवीस हजार रुपये २५०००/देण्यात आले.



या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सैनिक विकास समिती जिल्हा सल्लागार लक्ष्मणराव देवदे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये मुदखेड येथील बौद्ध प्रशिक्षण केंद्र येथील पूजनीय भंन्ते पद्मरत्न महाथेरो,पूजनीय भंन्ते शीलरत्न (नांदेड),पूजनीय भंन्ते पयारत्न  महाथेरो (विशाखा बुद्ध विहार लेबर कॉलनी नांदेड.)

तसेच माजी सैनिक प्रभाकर घोंगडे, मारुती गुंठे,  राजाराम हळदे, देविदास पवार, चंद्रकांत तेलंग, बालाजी गव्हाणे, साहेबराव वने, तसेच सुनील चौदंते आणि देवराव चौदंते यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी परिश्रम घेतले.

त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला विविध पक्षातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला पुरुष नवयुवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासक नागोराव लोखंडे सर व मोहन सावते सर यांनी केले.

खा.चिखलीकरांनी दिली मुदखेड केंद्रीय विद्यालयास सदिच्छा भेट

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनिधी / अतिक अहेमद

मुदखेड शहरातील केंद्रीय विद्यालय के. रि. पु. ब. आज  दि. ०६ रोजी दुपारी नांदेड  जिल्ह्याचे लोकप्रिय  खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी सदिच्छा भेट दिली खासदाराचे  स्वागत महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने केंद्रीय विद्यालायाचे प्राचार्य  प्रकाश गजभिये यांनी केले कार्यक्रमाला नांदेड जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष गोविंद गोपणपल्ले , शहर बी जे पी अध्यक्ष मुन्ना सेट चांडक, बी जे पी वरिष्ठ नेते दिलीप देशमुख, गज्जू संबोड, का नो बा बी यांच्या सह शहरातील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ती , पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक महेश शर्मा सह सर्व पोलिस कर्मचारी वर्ग, शिक्षकवृन्द  तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संर्खेत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. प्राचार्य महोदयाने मुख्य अतिथिचे स्वागत शाल, श्रीफळ व शब्द सुमनांनी केले. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुषमा मदेवाड वर्ग ११ (विज्ञान) हिने प्रादेशिक क्रीडा स्पर्धा, पुणे येथे घेण्यात आलेल्या १०० मी. अडथळा शर्यतीत सुवर्ण पदक व लांब उडी मध्ये कांस्य पदक मिळाल्याबद्दल खासदार साहेबानी विद्यार्थीना प्रमाणपत्र व पदक देवून सन्मानित केले.



खासदारानी कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकवर्गाला मार्गदर्शन तथा शुभेच्छ्या दिले. तसेच प्रमुख अतिथि साहेबानी पालक वर्गाच्या व विद्यार्थी वर्गाच्या समस्यावर चर्चा केली सर्व सन्माननीय सद्स्यानी सर्व वर्गात भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे वरिष्ट शिक्षक श्री. पन्नालाल इंगोले, पदव्युत्तर शिक्षक (इंग्रजी) यांनी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्रीमती प्रियंका मालवीय, श्रीमती राधिका बेले, सुश्री उषा राणी, श्री. अजय कूमार यादव, इत्यादी लोकांनी अथक प्रयत्न केले.

गावठी पिस्टलसह (अग्नीशस्त्र) एकास अटक वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी /(अतिक अहेमद)

सध्या नांदेड जिल्हयामध्ये गणेशउत्सव सण हा मोठया प्रमाणात साजरा होत असुन सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडू नये त्याकरीता मा. श्री. प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, मा. श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग नांदेड शहर यांनी सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगाराच्या याद्या अद्यावत करुन त्यांचेविरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही करणे, अवैध धंदयाविरुध्द केसेस करणेबाबत सुचना देऊन गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सदर सुचनांचे अनुषंगाने पो.नि. जगदीश भंडरवार व पो.नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सक्त आदेश देऊन पो.स्टे. हद्दीत कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडणार नाही याकरीता परीणामकारक पेट्रोलींग करण्याबाबत आदेशीत केले.

दि.०२/०९/२०२२ रोजी गुन्हे शोध पथकाचे संजय निलपत्रेवार, सपोनि, पोना/ गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ/ संतोष बेलुरोड, शेख ईम्रान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम असे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, हरीष प्रकाश भगत रा. दिलीपसिंघ कॉलनी नांदेड या व्यक्तीकडे एक गावठी पिस्टल असुन तो सध्या गोवर्धनघाट जवळ असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यावरुन जेतवन बौध्द विहार गोवर्धनघाट या ठीकाणी छापा मारुन हरीष प्रकाश भगत यास पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक देशी लोखंडी गावठी पिस्टल ( अग्नीशस्त्र ) किंमती २५,000/- रुपयाचे मिळुन आल्याने ते पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेतले. सदर प्रकरणी आरोपीने बिनापरवाना, बेकायदेशिररित्या गावठी शस्त्र बाळगले प्रकरणी संजय डी. निलपत्रेवार, सपोनि गुन्हे शोध पथक पो.स्टे. वजीराबाद नांदेड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास प्रविण आगलावे, पोउपनि पो. ठाणे वजीराबाद नांदेड हे करीत आहेत.

पोलीस ठाणे वजीराबाद येथील गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कार्यवाहीबाबत वरीष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

मुगट येथील जय बजरंग गणेश मंडळाकडून शैक्षणिक साहित्यांचे वाटप

 संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहार

मुगट येथील नवी आबादी येथील वडर समाजाच्या युवकांन कडून मागील काही वर्षांपासून श्रीगणेश मृर्तीची स्थापना केली जात आहे.

या वर्षी गणेश मंडळाकडून गरजु मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यासाठी त्यांना देवापुरचे सामाजिक कार्यकर्ते केशव पा.जाधव यांनी त्यांच्या सहकार्य केले.

यावेळी प्रसंगी केशव पा.जाधव देवापुरकर, डॉ.विनय खेडवनकर, आशिष कल्याणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंडळाचे अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार केला. यावेळी मंडळांचे अध्यक्ष यांना आरती संग्रहाचे पुस्तक भेट दिले.



नागुराव धोत्रे, बाबुराव मेटकर,व्यंकटी मेटकर, व्यंकटी देवकर,लक्ष्मण देवकर,यल्लप्पा देवकर, शिवाजी काचगुंडे,संजय देवकर,राम देवकर, पिराजी देवकर,राजु देवकर,सटवा रायपूर,बाबु देवकर,कैलाश मेटकर,रामा वर्षेवाड, लहान मुलांना,महिलांची उपस्थिती होती.

मुदखेड न.प कॉम्प्लेक्स मध्ये माजी सैनिक यांना हवा गाळा

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड नगर परिषद कडुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक जवळील नविन बांधकाम पूर्ण होत असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये माजी सैनिक कल्याण संबंधी कार्या साठी गाळा हवा आहे.या सह अनेक मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने तहसीलदार व मुख्याधिकारी मुदखेड यांना सादर करण्यात आले.

नायबतहसिलदार संजय नागमवाड यांना तर नप कार्यालय अधीक्षक शेख यांना माजी सैनिक यांनी निवेदन दिले.



न प चेक माजी उपाध्यक्ष तथा  माजी सैनिक कल्याण जिल्हा   पदाधिकारी  लक्ष्मण देवदे, मंडल अधिकारी पठाण,  मारोती गुंठे ,  सुनील चौदंते, चंद्रकांत तेलंगे ,देवराव चौदंते,विकास बलफेवाड,राजाराम हाळदे,देवराव पवार ,संजय चव्हाण, बालाजी गव्हाणे , शशीकांत मोडवान, बालाजी इबीतवार , माधवराव पवार यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

निवेदनाच प्रत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील मातंग समाज उपेक्षितच संतोष तेलंग यांचे प्रतिपादन

 संपादक आशिष मुगटकर



 मुदखेड(तालुका प्रतिनिधी)

 देशभर नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला गेला असला तरी मातंग समाज हा विकासापासून कोसो दूर आहे आजही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रभावीपणे प्रयत्न करत असताना दिसून येत नाही मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षण वर्गीकरणाचा लढा आजही सुरू आहे उच्च शिक्षणात मातंग समाजातील विद्यार्थी पुरेशा प्रमाणात पुढे येत नसल्याचे चित्र आज घडीला निर्माण झाले आहे मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आज खऱ्या अर्थाने गरज असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देखील मातंग समाज हा उपेक्षितच असल्याचे प्रतिपादन लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा संघटक संतोष तेलंग यांनी महाटी येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलताना केले .

तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रभाकर बालाजी ढगे पो पा यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व लाल ध्वजाचे ध्वजारोहण गावच्या महिला सरपंच सौ राजश्रीताई ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. जाहीर सभेच्या अध्यक्ष स्थानी संभाजी नागोजी पा ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रतिनिधी, बळी दत्तराम पा ढगे माधवराव धोंडीबा पा गाढे(शालेय व्यवस्थापन अध्यक्ष) शिवाजी काशीनाथ पा ढगे नागेश विठ्ठल पा ढगे हे होते, प्रमुख वक्ते म्हणून भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे मराठवाडा प्रभारी प्रविण

 गायकवाड मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सहसचिव संजय कोलते यांची उपस्थिती होती

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अशोक ढगे मारुती ढगे बळवंट ढगे गणेश ढगे हनुमंत ढगे बाबूस ढगे प्रभाकर ढगे बचतगटाच्या प्रमु�

लोकप्रिय बातम्या