मुगटचे विकास पुरुष श्री.गंगारामजी पाटील कल्याणे काळाच्या पडद्याआड .

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुक्यातील उशाला अखंडीत पणे वाहनारी गोदा माय.गोदा माईच्या कुशीत वसलेले छोटस पण वैभवशाली संपन्न असलेले गाव म्हणजे मुगट होय.

 याच गावात लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन. शेतकरी कुटुंबात गंगाराम (बापु) यांचा जन्म झाला.

       घरात माली पाटीलकी होती. जवळपास शेकडो एकर जमीन त्यांच्या कडे होती. दशरथ पाटील यांना मुलबाळ नव्हते. अनेक देवाला साकडं घातलं. काही वर्षांनंतर घरात पाळणा हलला दशरथ पाटलांच्या पुत्र रत्न जन्माला आले.त्या गोंडस बाळाचे नाव गंगाराम ठेवण्यात आले. दशरथ पाटलाना आकाश ठेंगणे झाले होते.त्यांचा या आनंदात संपुर्ण गाव सहभागी झाले होते.

          या आनंदात त्यांनी संपूर्ण गावाला त्या काळात पुरण पोळी जेवण दिले.हळु-हळु बाळ गंगाराम मोठे होत गेले तसे- तसे आपल्या शेतात, विशेष करून प्राण्यांत त्यांची रुची वाढत गेली. घरात शेकडो एकर जमीन, मोठ्या संख्येने पशुपालन यात त्यांना रुची वाढली.       गावातील समाज कार्यात ते सहभागी होऊ लागले.कालांतराने गावातील राजकारण त्यांनी प्रवेश केला.गावातील सोसायटी, ग्रामपंचायत मध्ये त्यांना आपली वेगळी छाप निर्माण केली.

            पंचकृषीत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.कालांतराने त्यांना दोन मुल, दोन मुली झाल्या. पशुची पारख करण्यात अत्यंत कुशल होते.जनावरांच्या अंगावर खाना खुना त्यांबद्दल त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यातल्या त्यात त्यांचे अश्व प्रेम खुपचं जास्त होते.दक्षिणेत प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या यात्रेला दे दरवर्षी न चुकता जायचे.त्यांच्या हताने लाखोचे अश्वाची खरेदी लोक करत असत.

  गावातील लहान मोठी व्यक्ती त्यांना बापू या नावाने हाक मारत असत.राजकारणा ते निष्कलंक, एकनिष्ठ राहिले.कोनताही राजकीय पुढारी गावात आलातर प्रथम त्यांना भेटत असे.मुगट ग्रामपंचायत वर १९९५ पर्यंत त्यांनी सत्ता होती.वयांचे कारखान्याच्या बैठकीत जाने होत नसल्याने त्यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला.भाऊराव कारखान्याचे संचालक म्हणून २०१०पर्यत त्यांनी काम केले.

   गावाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.गावात लोकांसाठी पाण्याची व्यवस्था,रस्ते,नाल्या या सारखी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली.राजकारणात कांग्रेसचे कै.शंकरराव चव्हाण साहेब, खा.अशोकराव चव्हाण साहेब यांचे कट्टर समर्थक होते.शेवट पर्यंत ते कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

  कालांतराने वय होत गेल तरी त्यांचे अश्व, श्वान,बैल यांच्या प्रतीचे प्रेम तसेच कायम होते.त्यांचा वारसा आता पुढे त्यांचे नातवंडे चालवत आहेत.दि.१४रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मध्यरात्री १२ नंतर त्यांच्या शरीराने साथ सोडली त्यांचे वय ९७ वर्ष होते.मुगट गावचे लाडके बापू सर्वांना पोरक करुन कैलासात कायम स्वरुपी निघून गेले.

अशा या मुगटच्या मातीत जन्मलेल्या कर्तृत्ववान, एकवचनी, एकनिष्ठ, विकास पुरुष यांना मुकला आहे.

त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.🌹🌹🙏🙏

संकलन आशिष कल्याणे 

श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील 

 दि.०४ फेब्रुवारी रोजी बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडच्या वतीने आज इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.

   कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत, भावपूर्ण मनोगते व्यक्त केली。शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.ज्यावेळी वातावरण भावूक झाले होत.

      प्रमुख पाहुणे प्रा. नारायण सावंत मार्गदर्शन करताना, 'निरोप घेणे कठीण असले तरी, ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे' असे सांगत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा डॉ पंजाब शिंदे यांनी' १२वी च्या बोर्ड परिक्षेला सामोर जातांना' येणाऱ्या अनेक अडचणीचा उलगडा केला . अध्यक्षीय समारोपात प्रा. परशुराम माने यांनी विद्यार्थांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

       तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कैलाश खानसोळे,सूत्रसंचालन गायत्री पवार, तनुजा पवार या विद्यार्थिनींनी केले तर कार्यक्रमाची सांगता प्रा मनोहर ओसावर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता अकरावीचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



मुगट जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

      दि.१ फेब्रुवारी रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी ११वाजता माजी विद्यार्थी व माजी शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

          या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन जोशी (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक),प्रमुख पाहुणे म्हणून श्री देविदास पवार (माजी मनपा आयुक्त ) हे होते.

          शाळेतील सण १९६५ ते २०१५ या कालावधीतील शालेय शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांसाठी शाळेकडून आयोजित करण्यात आला होता. 

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे यांनी सुरुवातीला केले. 

    कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. 

     शाळेत तत्कालीन मुख्याध्यापक, शिक्षक म्हणून कार्य केलेल्या उपस्थित सर्वांचा शाल व पुष्प देऊन माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

      यावेळी जवळपास शाळेतील २५ माजी मुख्याध्यापक ,माजी शिक्षक, शिक्षीका यांनी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. 

   माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे, छ.संभाजीनगर येथून माजी विद्यार्थी व शिक्षक आले होते. या शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत तर अनेक जण मोठ्या पदावर विराजमान होऊन सेवानिवृत्त झाले आहेत.

       या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील माजी शिक्षकांनी आपले मनोगत मांडले व शालेय जीवनातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यात एस. के. पचलिंग सर, बी.टी पाटील सर, नारायण कुलकर्णी सर, चंडीदास देशपांडे सर, पी एम.पेंटेवाड सर, आदींनी आपले मनोगत यावेळी  मांडले. 

      माजी विद्यार्थी यांनी सुध्दा शालेय जीवनातील आपल्या जुन्या आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला. या प्रसंगी माजी विद्यार्थी यांच्याकडून शाळेला एक प्रिंटर, १५ पांढरे फळे या वस्तू भेट दिल्या.

    सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी आपण हा उपक्रम अशाच पद्धतीने राबवावा असं मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले.         कार्यक्रमाचे सूत्रसंचाल ज्ञानेश्वर मरकंटे (शिक्षक) आशिष कल्याणे  यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शालेय समिती,शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी,माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

      मुगट जिल्हा परिषद शाळेत प्रथमच हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये माजी विद्यार्थी, माजी शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा नवीनच उपक्रम शाळेमध्ये प्रथमच राबवला त्यामुळे शाळेतील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकप्रिय बातम्या