मुदखेड तालुक्यातील उशाला अखंडीत पणे वाहनारी गोदा माय.गोदा माईच्या कुशीत वसलेले छोटस पण वैभवशाली संपन्न असलेले गाव म्हणजे मुगट होय.
याच गावात लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व पशुपालन. शेतकरी कुटुंबात गंगाराम (बापु) यांचा जन्म झाला.
घरात माली पाटीलकी होती. जवळपास शेकडो एकर जमीन त्यांच्या कडे होती. दशरथ पाटील यांना मुलबाळ नव्हते. अनेक देवाला साकडं घातलं. काही वर्षांनंतर घरात पाळणा हलला दशरथ पाटलांच्या पुत्र रत्न जन्माला आले.त्या गोंडस बाळाचे नाव गंगाराम ठेवण्यात आले. दशरथ पाटलाना आकाश ठेंगणे झाले होते.त्यांचा या आनंदात संपुर्ण गाव सहभागी झाले होते.
या आनंदात त्यांनी संपूर्ण गावाला त्या काळात पुरण पोळी जेवण दिले.हळु-हळु बाळ गंगाराम मोठे होत गेले तसे- तसे आपल्या शेतात, विशेष करून प्राण्यांत त्यांची रुची वाढत गेली. घरात शेकडो एकर जमीन, मोठ्या संख्येने पशुपालन यात त्यांना रुची वाढली. गावातील समाज कार्यात ते सहभागी होऊ लागले.कालांतराने गावातील राजकारण त्यांनी प्रवेश केला.गावातील सोसायटी, ग्रामपंचायत मध्ये त्यांना आपली वेगळी छाप निर्माण केली.
पंचकृषीत त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.कालांतराने त्यांना दोन मुल, दोन मुली झाल्या. पशुची पारख करण्यात अत्यंत कुशल होते.जनावरांच्या अंगावर खाना खुना त्यांबद्दल त्यांचा दांडगा अभ्यास होता.त्यातल्या त्यात त्यांचे अश्व प्रेम खुपचं जास्त होते.दक्षिणेत प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या यात्रेला दे दरवर्षी न चुकता जायचे.त्यांच्या हताने लाखोचे अश्वाची खरेदी लोक करत असत.
गावातील लहान मोठी व्यक्ती त्यांना बापू या नावाने हाक मारत असत.राजकारणा ते निष्कलंक, एकनिष्ठ राहिले.कोनताही राजकीय पुढारी गावात आलातर प्रथम त्यांना भेटत असे.मुगट ग्रामपंचायत वर १९९५ पर्यंत त्यांनी सत्ता होती.वयांचे कारखान्याच्या बैठकीत जाने होत नसल्याने त्यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला.भाऊराव कारखान्याचे संचालक म्हणून २०१०पर्यत त्यांनी काम केले.
गावाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.गावात लोकांसाठी पाण्याची व्यवस्था,रस्ते,नाल्या या सारखी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली.राजकारणात कांग्रेसचे कै.शंकरराव चव्हाण साहेब, खा.अशोकराव चव्हाण साहेब यांचे कट्टर समर्थक होते.शेवट पर्यंत ते कांग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
कालांतराने वय होत गेल तरी त्यांचे अश्व, श्वान,बैल यांच्या प्रतीचे प्रेम तसेच कायम होते.त्यांचा वारसा आता पुढे त्यांचे नातवंडे चालवत आहेत.दि.१४रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मध्यरात्री १२ नंतर त्यांच्या शरीराने साथ सोडली त्यांचे वय ९७ वर्ष होते.मुगट गावचे लाडके बापू सर्वांना पोरक करुन कैलासात कायम स्वरुपी निघून गेले.
अशा या मुगटच्या मातीत जन्मलेल्या कर्तृत्ववान, एकवचनी, एकनिष्ठ, विकास पुरुष यांना मुकला आहे.
त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.🌹🌹🙏🙏
संकलन आशिष कल्याणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा