मुगट पाटी ते गाडेगाव रस्त्याची दयनीय अवस्था.

 खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या..

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुगट पाटी ते गाडेगाव या ८ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची अक्षरश चाळणी झालेली दिसुन येत आहे.

या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. हा रस्ता जिल्हा अंतर्गत रस्त्याचे तो रस्ता निळा- गाडेगाव- आमदुरा- माळकौठा असा जोडला गेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती ही कागदावरच झाली असून प्रत्यक्षात मात्र संबंधित कंत्राटदाराकडून एकही खड्डा दुरुस्ती केल्या दिसून येत नाही.

 मागील दोन-तीन वर्षापासून हा रस्ता असाच खड्डेमय आहे. या वर्षीच्या पावसाने तर त्या रस्त्यावरील खड्डे मोठे झाले आहेत, त्यामुळे साधी दुचाकी सुद्धा सरळ चालवता येत नाही. या ८ किमी प्रवासासाठी नांदेडला येण्यास जवळपास ३० मिनिटांचा वेळ लागत आहे .

 या रस्त्याने दररोज धर्माबाद पर्यंत अनेक शासकीय कर्मचारी प्रवास करत असतात. याचं खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर छोटे-मोठे अपघात होतच असतात.तारेवरच्या कसरती प्रमाणे दूधवाले, फळभाज्यावाले यांना आपली दुचाकी ही न्यावी लागत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. 

संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा जेणेकरून भविष्यात खड्ड्यांमुळे कुणाला आपला जीव गमवावा लागू नये, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.




बारड वाडीतील शेतकऱ्याची कर्जाबाजारी पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

 संपादक आशिष मुगटकर



बारड / प्रतिनिधी

बारड वाडीतील अल्पभूधारक शेतकरी संतोष देवबा सुकापुरे वय ३८वर्षे रा.बारड वाडी  यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना घडली असून घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येतआहे.

बारड वाडी शिवारात सुकापुरे यांची दीड एकर  शेती आहे मागील दोन वर्षा पासून शेतीची सतत नुसकानीत असल्याने  ची होणारी नापीकी मुळे अनेक नैसर्गिक संकटे शेतीवर असल्याने शेतकरी अडचणीत होता त्यातच  महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बारड कडून शेतीचे व शेती पिकाच्या मशागती साठी अंशी हजार रुपये कर्ज घेतले होते शेतीच्या सतत च्या नापीकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे  कर्ज कसे परतफेड करावे या मानसिक तनावात राहून सततच्या चिंतेमुळे नैराश्य होऊन सुकापुरे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाच्या फांदीला कपड्याच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.भाऊ गजानन सुकापुरे यांच्या जबाबावरुन आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आले आहे पुढील चौकशी कामी से.पो.नी यांच्या आदेशाने पो.उपनिरीक्षक वानोळे यांच्या कडे दीला आहे.

खालसा पंथाच्या पूजनीय माता "माता साहेब देवांजी" यांच्या ३४० व्या जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

खालसा पंथाच्या पूजनीय माता 'माता साहेब देवांजी' यांचा ३४० वा जन्मोत्सव सोहळा  या वर्षी मोठ्या उत्साहात शासन नियमाचे पालन करून संपन्न झाला.दि. १७  ते १९ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालला यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

 दि. १७ पासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमला सुरुवात विधीपूर्वक पूजन करून करण्यात आली. या ठिकाणी विविध संत-महात्मे यांचे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम  संपन्न झाले. यात प्रसिद्ध रागी, जत्थे , प्रचारक, ढाडी, कवीशर यांची विशेष उपस्थिती होते.

दि. १८ रोजी सकाळी विशेष किर्तन तर दुपारी ३वा. विशेष घोड्यांच्या शर्यती, नेमबाजी तलवारबाजी, यांचे चित्तथरारक कवायतीचे  करण्यात आल्या. हे पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दि. १९ रोजी नगर कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी २ वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या छत्र छायेखाली महानगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुव्दारा माता साहेब देवांजी येथुन महानगर कीर्तन करत  अबचलनगर हुजुर साहिब नांदेड येथे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

  संत बाबा नरेंद्र सिंघजी, संत बाबा बलविंदर सिंघजी, जत्थेदार बाबा तेजासिंघजी, मुख्य आर याम बुड्डा दल, बाबा गुरुसेवक सिंघजी चंदीगड, मुख्य आर याम बुड्डादल ,भाई हरजिंदर सिंघजी आणि हजूरी नव तरुण यावेळी उपस्थित  होते.

या माता साहेब देवाजी जन्मोत्सव सोहळ्यात मध्ये भक्तांनी या ठिकाणी शासकीय नियमाचे पालन करून सहभागी व्हावे व माताजींचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन जत्थेदार बाबा तेजासिंघ निहाण सिंघ बुड्डादल ( सतयुगी तपस्थान - गुरुद्वारा माता साहिब देवांजी), संत बाबा नरेंद्र सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा), संत बाबा बलविंदर सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा) यांनी केली होते. 

मोठ्या संख्येने भक्त जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते.यामध्ये दिल्ली, पंजाब,हरीयाना,युपी,याचा विशेष सहभागी झाले होते.


यावेळी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १५अधिकारी व ७० पोलीस कर्मचारी या बंदोबस्तात ठेवण्यात आले होते.

कोजागिरी निमित्य "सहस्त्र चंद्र दर्शन" सोहळ्याचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका/ प्रतिनिधी

देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी केंद्रिय कृषि मंत्री,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दिनांक १९.१०.२०२१ रोजी कोजागिरी पोर्णिमे निमित्त सहस्त्रचंद्र  दर्शन सोहळ्याचे राज्यभर राष्ट्रवादी महीला कॉंग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा तथा महीला आयोगाच्या अध्यक्षा मा.रुपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार राज्यभर आयोजन करण्यात आले.

त्याचप्रमाणें जि.प.प्रा.शा.डोंगरगाव येथे "सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे" आयोजन मुदखेड तालुका राष्ट्रवादी महीला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.पुजाताई व्यवहारे यांनी केले होते, यावेळीं तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर,गावचे सरपंच शिवानंद पाटील व्यवहारे,गणेशराव व्यवहारे सहशिक्षक श्री शिवाजी पाटील सर,यांचे शुभहस्ते विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.

 कार्यक्रमानुरुप विद्यार्थ्याना कोजागिरी पोर्णिमेचे महत्व,सहस्त्रचंद्र दर्शन या कार्यकमाची संकल्पना व शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सामाजीक, शैक्षणीक कार्याविषयी शिवानंद पाटील शिप्परकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस चे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी संजय आऊलवार, उत्तमराव चव्हाण व चांदु चमकुरे प्रचारासाठी सरसावले

 संपादक आशिष मुगटकर


 मुदखेड शहर प्रतिनिधी/अतीक अहेमद 

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक  मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून मुदखेड मधील सर्वच नगरसेवक काँग्रेस प्रक्षाचा प्रचार आपआपल्या पध्दतीने करतांना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाचे मा. मारोती बल्लाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड नगर पालिकेतील काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक तथा गोल्लावार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संजय आऊलवार , ज्येष्ठ काँग्रेस स्थानिक नेते तथा नगरसेविका प्रतिनिधी उत्तमराव चव्हाण , काँग्रेस नगरसेविका प्रतिनिधी चांदु चमकुरे खूपच तळमळीने प्रचार करत आहेत यावरून दिसून येत आहे देगलुर शहरातील वडर गल्ली,बंजारा समाज गल्ली मध्ये काँग्रेस चे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. 



नांदेड जिल्हयात असेच जर पक्ष संघटन दिसून आले तर आगामी मुदखेड शहरात होणा-या निवडणुकामध्ये यांचा चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वच मुख्य पक्ष या पोटनिवडणुकीत जोर लावतांना दिसत आहेत. यामुळे आगामी काळात कोणाचा झेंडा देगलूर- बिलोली विधानसभेवर फडणार हे पाहणे महत्वाचे आहे कारण निवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी पार पडणार असून ह्या विद्यमान नगरसेवकांना ज्या भागाची जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे करताना दिसून येत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा आदेश म्हणजे सौभाग्य असेच संबोधले तर वावगे ठरणार नाही ही निवडणूक नसून नगरसेवकांची जणू एक परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेत चांगले गुण संपादन करणार हे काळ्या दगडावरची रेष असेन.

जि.प.हा.विष्णुपुरी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्वक संपन्न

  संपादक आशिष मुगटकर



नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

जि.प.हा.विष्णुपुरी शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहपूर्वक संपन्न झाला.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पीजे. कलाम यांच्या नावाने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पीजे.कलाम यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ दिग्रसकर यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी शाळेत वाचन कट्टा तयार करुन विद्यार्थी मनःपूर्वक वाचन करत होते.आनंद वळगे यांनी या दिनाचे महत्त्व विशद केले. जवळपास घड्याळी एक तास विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद घेतला. यावेळी शाळेतील शिक्षका शैलजा बुरसे,यशोदा स़त,जयश्री शिंदे,चंद्रकला ईदलगावे,के.एन. पटवे, क्रिडा शिक्षिका जे.टी.देवशेट्टे यांनी सुंदर अशा वाचनकट्ट्याची निर्मिती करुन वातावरण वाचनमय केले. 

सुत्रसंचालन व आभार एम.ए.खदीर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, उदय हंबर्डे, शिवाजी वेदपाठक, क्रुष्णा बिरादार यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाटी येथे धम्म चक्र प्रर्वतन दिन उत्साहात साजरा

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड /तालुका प्रतीनिधी 

मुदखेड तालूक्याच्या दक्षिण भागात अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या महाटी या गावाला सूरुवाती पासूनच चळवळीचा वसा आहे.सूरुवातिला बसपा नंतर संभाजी ब्रिगेड  व हल्ली वंचीतच्या माध्यमातून मराठा समाजासह  गावातील मागास व ईतर मागास वर्गात भाईचाराची एक झलक पहायला मिळते.ईकडे आंबेडकर जयंती ही बौद्धानीच  केली पाहिजे किंवा साठे जयंती ही मातंगानीच करायची ही  प्रथा लोकांनी संपूष्टात अनून एक वैचारीक आदर्श जागृत केला आहे.

त्याच अनूशंगाने काल धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधत वंचित आघाडीच्या वतीने प्रस्तुत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.येथिल बौद्ध विहारात घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाची सूरुवात महापूरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.लागलीच पंचशिल ध्वजारोहणाला सूरुवात झाली.

मागास  समाजाच्या न्याय व हक्कासाठी ज्यांची नेहमीच  सहकार्याची भुमिका असते असे  समाजातिल  पत्रकार साहेबराव गागलवाड यांना पंचरंगी ध्वज फडकवन्याचे भाग्य लाभले. सामुदायीक पंचशिल आणि त्रीशरण गाथा गृहण करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ जाधव,अशोक जाधव,चंद्रकांत गागलवाड,माधव जाधव,संभाजी जाधव,रवी कुमार जाधव,सूनिल जाधव,सकळोची जाधव,भिमराव भदरगे, शेषराव पवार,बहुजन चळवळिचा भाग असलेल्या कौतीकबाई जाधव व सागरबाई जाधव यांनी परीश्रम घेतले.

आंबेडकरी विचार धारेचे संघदिप ढवळे यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. 

 तर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांच्या संघर्षास प्रेरीत वंचित आघाडीच्या रवी कुमार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बारड, मुदखेड येथे महाविकास आघाडी बंदला उत्सपुर्त प्रतिसाद

 पालकमंत्र्यांच्या हाकेला साथ बाजारपेठ बंद ठेवून निषेध

संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

बारड, मुदखेड येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या महाराष्ट्र बंद हाकेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साथ देत राष्ट्रवादी, शिवसेना कार्यकर्त्यांनी सहभागी होत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून लखिमपुर खिरी शेतकरी हत्याकांड निषेध नोंदवला आहे.

लखिमपूर खिरी शेतकरी हत्याकांड भाजप सरकार निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या वतीने दि.११सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवहान करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बंदची हाक दीली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्या वतीने तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काँग्रेस तालुका अध्यक्ष उध्दवराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवानंद शिप्परकर, शिवसेना तालुका प्रमुख संजय कुरे, यांच्या वतीने बंदचे आवहान करण्यात आले होते.


बारड व मुदखेड येथे  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशाने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून भाजप सरकारचा निषेध केला आहे.

केंद्रशासनाच्या एकाधिकार शाहीच्या विरोधात घोषना बाजी करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला.व्यापारी संघटनेने बंद मध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.


महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या बंद यशस्वीतेसाठी सुनिल देशमुख,उत्तमराव लोमटे,प्रताप देशमुख, आशोक देशमुख, श्रीराम कोरे,किशोर देशमुख,प्रभाकर भिमेवार, राहूल आठवले, उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, चांदु चमकुरे, कैलास चंद्रे,गिरीष अप्पा कोत्तावार,सुनील मुंडले, शेख जब्बार, दीलीपराव कोरे, संजयराव मुलंगे, बालाजी लोणवडे,नरसिंग आठवले, बंटी कांबळे, आनंदा कांबळे,प्रमेश्वर भिमेवार, गजानन कराळे,किशोर पिल्लेवाड, रामदास कांबळे, संतोष बंडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल महाजन,चक्रधर कळणे, माधव व्यवहारे, सादीक शेख, प्रदीप ढगे, प्रशांत मुंगल,प्रशांत कल्याणे,शिवसेनेचे मारोती लोणवडे, नारायण पांचाळ, सुरेश लोणवडे,आदीने पुढाकार घेतला.

"माता साहेब देवांजी" यांच्या ३४० व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन.

 खालसा पंथाच्या पूजनीय माता "माता साहेब देवांजी" 



मुगट प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट गावच्या क्षेत्रात स्थित असलेल्या गुरुद्वारा खालसा पंथाच्या पूजनीय माता 'माता साहिब देवांजी' या नावाने प्रसिद्ध आहे. या स्थळाची एक वेगळीच ओळख आहे. 



खालसा पंथाच्या पूजनीय माता 'माता साहेब देवांजी' यांचा ३४० वा जन्मोत्सव सोहळा या वर्षी मोठ्या उत्साहात शासन नियमाचे पालन करून संपन्न होणार आहे. दिनांक १७ ते १९ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले आहेत.

जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आहे. दि. १७ पासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमला सुरुवात विधीपूर्वक पूजन करून होणार आहे. या ठिकाणी विविध संत-महात्मे यांचे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात प्रसिद्ध रागी, जत्थे , प्रचारक, ढाडी, कवीशर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

दि. १८ रोजी विशेष घोड्यांच्या शर्यती, नेमबाजी तलवारबाजी, यांचे चित्तथरारक कवायतीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ रोजी नगर कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी २ वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या छत्र छायेखाली महानगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.



  संत बाबा नरेंद्र सिंघजी, संत बाबा बलविंदर सिंघजी, जत्थेदार बाबा तेजासिंघजी, मुख्य आर याम बुड्डा दल, बाबा गुरुसेवक सिंघजी चंदीगड, मुख्य आर याम बुड्डादल ,भाई हरजिंदर सिंघजी आणि हजूरी नव तरुण यावेळी उपस्थित राहणार आहे.

या माता साहेब देवाजी जन्मोत्सव सोहळ्यात मध्ये भक्तांनी या ठिकाणी शासकीय नियमाचे पालन करून सहभागी व्हावे व माताजींचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन जत्थेदार बाबा तेजासिंघ निहाण सिंघ बुड्डादल ( सतयुगी तपस्थान - गुरुद्वारा माता साहिब देवांजी), संत बाबा नरेंद्र सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा), संत बाबा बलविंदर सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा) यांनी केली आहे.

नांदेड टेक्सटाईल मिलचा समावेश पि. एम. मित्र योजनेत करावा- नेते प्रवीण गायकवाड

केंद्रीय वस्रोद्योग मंत्री मा.पियुषजी गोयल यांच्याकडे मागणी

संपादक आशिष मुगटकर



नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री मंडळाने मा. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली देशातील वस्रोद्योग क्षेत्राचा विकास करण्यासाठी पि. एम. मित्र योजनेस नुकतीच मान्यता दिली आहे. या बद्दल आपले व सरकारचे हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो.

तसेच सविनय आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, एके काळी नांदेड टेक्सटाईल मिल ही नांदेड जिल्ह्याची कामधेनू व वैभव होती. दररोज तीन पाळी मध्ये तीन हजार मजूर काम करीत असे. ही मिल गेल्या दीड दशका पासून बंद पडली आहे. कराडो रुपयाची भारत सरकारची मालमत्ता धूळ खात पडली आहे व हजारो हात बेकारीच्या खाईत लोटल्या गेले आहेत.

तेंव्हा मी आपणास विनंती करतो की, पि. एम. मित्र महत्वाकांगशी योजनेत नांदेड टेक्सटाईल मिलचा समावेश केल्यास हजारो रोजगार निर्माण होऊन नांदेड जिल्ह्यात मोठा कामधेनू उभारल्या जाऊन नांदेड जिल्ह्यास गत वैभव प्राप्त होईल व नांदेड कर सदैव आपल्या ऋणात राहतील.

तेंव्हा नांदेड टेक्सटाईल मिलचा पि. एम. मित्र योजनेत समावेश करावा अशी विनंती.मा. पियुषजी गोत्र, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, भारत सरकार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे नेते प्रवीण शंकरराव गायकवाड( मराठवाडा प्रदेश प्रभारी, भाजपा दि. वि. आ.) यांनी केली आहे.




मिशन आपुलकीचे फलित जि.प.हा.विष्णुपूरी शाळेस स्पर्धापरीक्षेची पुस्तके भेट

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड / जिल्हा प्रतिनिधी

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व जिल्हापरिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून साकारलेल्या मिशन आपुलकीचे फलित जि.प.हा.विष्णुपूरीस नुकतेच प्राप्त झाले आहे. 

लोकसहभागातून शिक्षण क्षेत्रास मदत म्हणून स्पर्धापरीक्षेची चाळीस पुस्तके पंधरा हजार रुपये किमतीची प्रशालेस बार्हाळी मुखेड येथील सामाजिक जाण असलेले प्रतिष्ठित व्यापारी सतीश गंगाधरराव महाजन यांनी त्यांची आई कै.भाग्यलक्ष्मी गंगाधरराव महाजन यांच्या नवव्या स्मरणार्थ विष्णुपुरी प्रशालेस भेट म्हणून दिली.मिशन आपुलकीचे महत्त्व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी व सृजनशील शिक्षक आनंद वळगे यांनी सतीश महाजन यांना पटवून दिल्यामुळे प्रशालेस स्पर्धापरीक्षेची पुस्तके भेट देण्याचा मानस व्यक्त केला.





        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास आबासाहेब देशमुख अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सतीश महाजन, व्यंकटराव उमाटे अध्यक्ष तंटामुक्ती, गजानन अस्वले,साहेबराव हंबर्डे, विश्वनाथ हंबर्डे, राजेश हंबर्डे, दत्ता धोंडीबा गिरी महाराज, कमलाकर हटकर तथा प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी वेदपाठक हे उपस्थित होते. 

या प्रसंगी शाळेतील वीस विद्यार्थ्यांना पुस्तकांचे सन्मानाने वितरण करण्यात आले.मिशन आपुलकीचे हे दृश्य फलित असून पालक व गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व बहारदार सुत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक कृष्णा बिरादार व आभार एम.ए.खदिर यांनी व्यक्त केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, आनंद वळगे,जयश्री शिंदे, विकास दिग्रसकर, शैलजा बुरसे,पद्माकर देशमुख,सोमनाथ बिदरकर,पंचफुला नाईनवाड, चंद्रकला ईदलगावे व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास पालक,गावकरी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.






मुगट जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 संपादक आशिष मुगटकर










मुगट प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

भारताचे लाडके बापू ज्यांनी शेवट पर्यंत अहिंसेच्या मार्गाने चालत राहुन या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ज्यांनी जय जवान जय किसान नारा दिला अशा भारत मातेच्या दोन रत्नांची जयंती साजरी करण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मुंगरे,व  इतर शिक्षक, शिक्षीका यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शाळेतील शिक्षक कोकणे सर,रकसाळे सर,बाऊसकर सर,गोरडवार सर, मोरे सर,लव्हाळे सर, मंगनाळे सर तर शिक्षीका सौ.कुलकर्णी,सौ.सोनवने,सौ.कांबळे यांची जयंती कार्यक्रमास उपस्थिती होती.

मुगट ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न मा.पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 संपादक आशिष मुगटकर


मुगट प्रतिनिधी

  शांती व अहिंसेच्या मार्गाने सत्याचा आग्रह धरता येतो, कोट्यवधी नागरिकांच्या मनामनात क्रांतीची ज्वाला पेटवता येते आणि सामर्थ्यशाली राजवटींचाही पाडाव करता येतो, हे जगाला दाखवून देणारे राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी व जय जवान जय किसानचा नारा देऊन जगाला दृढ इच्छा शक्तींची आणि सामर्थ्याची प्रचिती देणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिना निमित्ताने मुगट ग्रामपंचायत कार्यालयात या भारत मातेच्या तेजस्वी पुत्रांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

 गावातील मान्यवर मंडळीच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी संचालक भिमराव पा कल्याणे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा.कल्याणे ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कल्याणे,धाराजी पवार, बालाजी मुंगल, विलास कल्याणे, तुकाराम हाटकर,हातागळे , शामराव कल्याणे, माधवराव कल्याणे,तुप्पेकर, शिवाजी कल्याणे, राहुल हाटकर, अनिल कुलकर्णी सह इतर नागरिक उपस्थित होते.

                         


 


                                🌺🌸🙏🌸🌺

मुदखेड तालुक्यास ओला दुष्काळ जाहीर करून १००%पिक विमा मिळवून द्यावा.

मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे साहेब यांचेकडे मागणी.


मुदखेड / तालुका प्रतिनिधि

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या पुरजन्य परिस्थितिमुळे सर्व नद्यानाल्यातून पाणी बाहेर येऊन सर्व शेती पाण्याखाली गेली होती व गोदावरीच्या बैक वाटरमुळे आजही पुर्ण शेती पाण्याखाली आहे.

त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापुस,मुग,उडीद,केळी,ऊस व फुलशेती संपुर्णपणे नासून गेली आहेत व केळी वरील करपा रोगामुळे केळी पिका-पिकी आल्यामुळे केळीचे दरही क्विंटलला फक्त ४००/-ते ५००/-रूपयाला कोणी विचारत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाला आहे. आता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून योग्य ती मदत करावी आणि शेतकऱ्यांना  त्यांच्या हक्काचा विमा १००℅मिळवून देण्यासाठी आदेशित करावे.

  अशी  मागणी मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचेकडे तहसिलदार सुजित नरहरे यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला तालुकाध्यक्षा सौ. पुजाताई व्यवहारे,सामाजिक न्याय विभागाचे संतोष दर्शनवाड,सोशियल मिडीया तालुकाध्यक्ष ऋषीकेश पाटील पाथरडकर, प्रशांत पाटील मुंगल,माधवराव व्यवहारे,सुरज पवार,शिवाजी शिंदे,नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

प्रशासनाची नजर पैसेवारी पाहुन मुगटचे शेतकरी संतापले !

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील प्रशासनाची नजर पैसेवारी पाहुन मुगट येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ८ तालुक्याची नजर पैसेवारी ५०पैशापेक्षा अधिक काढली आहे.

त्यात मुदखेड तालुक्याचा समावेश आहे.यातील एकाही गावाची पिक पैसेवारी ५०पैशा पेक्षा खाली निघालेली नाही.

हि बातमी जेव्हा शेतकऱ्यांना दैनिक लोकमत वृत्त पत्रातून समजल्या वर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

गोदावरी नदीच्या आलेल्या पुरामुळे,मुगट मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक १०० टक्के खराब झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पीक पावसामुळे हातचे गेले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त व दुःखी आहे.त्यावर प्रशासनाने काढलेली नजर पैसेवारी(आनेवारी) हि शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठ चोळल्या सारखी आहे.प्रशासनाने अतिवृष्टीमुळे व नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पुन्हा पंचनामे करावे.नंतर हातात सोयाबीन उरले तर त्याची खुशाल पैसेवारी काढली असा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

( या संबंधात मुगट तलाठी सौ.देशपांडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या की हि प्रशासनाने नजर पैसेवारी ही सोयाबीन पेरणीनंतर च्या काळातील म्हणजे जुलै,आगस्ट महिन्यातील आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या नजर पैसेवारीस गांभीर्याने घेऊ नये.अंतीम पैसेवारी (आनेवारी) ही अद्याप काढण्यात आली नाही.ती सोयाबीन पीकाच्या काढणी नंतर काढली जाईल असे त्या म्हणाल्या.)

लोकप्रिय बातम्या