मुगट वार्ताहार
खालसा पंथाच्या पूजनीय माता 'माता साहेब देवांजी' यांचा ३४० वा जन्मोत्सव सोहळा या वर्षी मोठ्या उत्साहात शासन नियमाचे पालन करून संपन्न झाला.दि. १७ ते १९ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालला यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
दि. १७ पासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमला सुरुवात विधीपूर्वक पूजन करून करण्यात आली. या ठिकाणी विविध संत-महात्मे यांचे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम संपन्न झाले. यात प्रसिद्ध रागी, जत्थे , प्रचारक, ढाडी, कवीशर यांची विशेष उपस्थिती होते.
दि. १८ रोजी सकाळी विशेष किर्तन तर दुपारी ३वा. विशेष घोड्यांच्या शर्यती, नेमबाजी तलवारबाजी, यांचे चित्तथरारक कवायतीचे करण्यात आल्या. हे पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. १९ रोजी नगर कीर्तनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. दुपारी २ वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या छत्र छायेखाली महानगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुव्दारा माता साहेब देवांजी येथुन महानगर कीर्तन करत अबचलनगर हुजुर साहिब नांदेड येथे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संत बाबा नरेंद्र सिंघजी, संत बाबा बलविंदर सिंघजी, जत्थेदार बाबा तेजासिंघजी, मुख्य आर याम बुड्डा दल, बाबा गुरुसेवक सिंघजी चंदीगड, मुख्य आर याम बुड्डादल ,भाई हरजिंदर सिंघजी आणि हजूरी नव तरुण यावेळी उपस्थित होते.
या माता साहेब देवाजी जन्मोत्सव सोहळ्यात मध्ये भक्तांनी या ठिकाणी शासकीय नियमाचे पालन करून सहभागी व्हावे व माताजींचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन जत्थेदार बाबा तेजासिंघ निहाण सिंघ बुड्डादल ( सतयुगी तपस्थान - गुरुद्वारा माता साहिब देवांजी), संत बाबा नरेंद्र सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा), संत बाबा बलविंदर सिंग जी (गुरुद्वारा लंगर साहेब कारसेवा) यांनी केली होते.
मोठ्या संख्येने भक्त जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते.यामध्ये दिल्ली, पंजाब,हरीयाना,युपी,याचा विशेष सहभागी झाले होते.
यावेळी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १५अधिकारी व ७० पोलीस कर्मचारी या बंदोबस्तात ठेवण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा