कामगारांना आडवून रोख रक्कम व मोबाईलची लुट
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
मुगट / वार्ताहर
मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातील मुगट पाटी ते मातासाहेब रोड रात्रीला दुचाकी स्वारांना लुटनारी टोळी चांगलीच सक्रिय झाली आहे.आता पर्यंत त्यांनी रात्रीचा फायदा उचलून अनेकांना चाकुचा धाक दाखवून लुटले आहे.
मुगट पाटी पासुन जवळच खडकी व होळ नाला असुन त्यावर मोठें पुल बांधण्यात आले.या पुला जवळील रस्त्या हा वळनदार आहे.पुला जवलच गतीरोधक झाल्यामुळे रात्रीला याठिकाणी वाहनांची गती कमी होते.याचाच फायदा घेत रात्रीला ८ते८:३० च्या वेळेत दबाधरुन पुलाच्या जवळ बसतं आहेत.तर कधी गाडीचा पाठलाग करत या पुलावर दुचाकी स्वारांना गाठुत आहेत.
या पुलावर वाहनाची गती कमी होताच दुचाकी स्वारांच्या गळ्याला चाकू लावुन त्यांच्या कडील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला जात आहे.
आता पर्यंत मुगट येथील नांदेड ला दुकानात कामाला गेलेल्या कामगारांना तीन, चार दुचाकी स्वारांना या टोळीने लूटले आहे. या घटनेमुळे परिसरात भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा