निवघा नॅशनल स्कूल मध्ये सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

           मुदखेड तालुक्यातील निवघा येथील नॕशनल स्कुल मध्ये सन 2013-14 च्या बॕचचे विद्यार्थी राम कोंडिबा पुयड व लक्ष्मण कोंडिबा पुयड यांची SRPF पोलिस मध्ये निवड झाल्याबद्दल व आमची आदर्श विद्यार्थीनी,आदर्श कन्या श्रध्दा आनंदराव कंकाळ हिची CISF व बारड पोलिस स्टेशनचे शेख अजहर साहब यांची पोलिस हेड कॉन्सटेबल पदी पदोन्नती झाल्याबद्दल नॕशनल स्कुल निवघा येथे भव्य सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजान करण्यात आले होते.


                   यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जि.प.कनिष्ठ लिपीक श्री शिवाजीराव नरबाजी पवार,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संकुल निवघाचे केंद्रप्रमुख श्री शिवाजीराव पाटील साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलातील गोविंद शिंदे,शिवाजीराव कहाळेकर सर,आनंदराव कंकाळ तर पालक प्रतिनिधी अमृतराव कळणे,प्रकाशराव कांचनगिरे,श्रीरंग केंचे,माधवराव पवार,गणपत पांचाळ सर आदी उपस्थित होते.

     यावेळी SRPF महाराष्ट्र पोलिस म्हणून निवड झालेले राम पुयड,लक्ष्मण पुयड,CISF श्रध्दा आनंदराव कंकाळ,शिवाजीराव कहाळेकर सर,केंद्र प्रमुख शिवाजीराव पाटील साहेब आदिंनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी पालकांच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन पुढे जावे यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

     या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष प्रा.संदिप पवार,सचिव प्रा.वर्षा मिराशे,सहसचिव प्रा.संकेत पवार तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षीका सौ.संजीवनी पतंगे,पायल पवार,सौ.संगिता बेलकर,सौ.प्रणिता घोरबांड,सौ.जयश्री शिखरे आदिंनी परिश्रम घेतले.

विषमता संपविण्यासाठी समतेची अक्षरे कोरणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ - खा. अशोक चव्हाण

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनीधी

दि. २३ रोजी मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा चोर येथील अण्णा भाऊ साठे नगर नवी आबादी या ठिकाणी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०४ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्य रत्न अण्णा भाऊ साठेयांच्या प्रतिमाना पुष्प माल्या अर्पण करून लाल निक्षाण ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले, नंतर या कार्यक्रमाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले.

यावेळी बोलतांना खा. अशोक चव्हाण म्हणाले की,समाजातील विषमता संपविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी दलित, पीडित, शोषितांच्या व्यथा आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडल्या आणि खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने साहित्याची निर्मिती केली. हे अण्णाभाऊंचे साहित्य शोषित, पीडिताचा आवाज बनवून साता समुद्रापारही उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या लेखणीचा संदेश समाजाने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एकोप्याने राहून हक्का साठी जागृत राहून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना पदरात पाडून घेतल्या पाहिजे, मातंग समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी च्या धर्तीवर आर्टिची स्थापना सद्याच्या शासनाने करून दिली आहे. त्यामुळे समाजात शिकणारा वर्ग तयार झाला तर अण्णाभाऊ साठे शिक्षण व प्रशिक्षण संस्थे मार्फत मोठ मोठ्या सरकारी हुद्यावर आपला समाज पोहचू शकतो, यासाठी काही मदत लागलीच तर मी आपल्या साठी सदैव तयार असल्याचे सांगून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमात भाजपा जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप केले.

या कार्यक्रमासाठी खा. अशोक चव्हाण, प्रवीण गायकवाड,शंकर मुतकलवाड,बालाजी पाटील खटिंग, सुदाम पाटील खानसोळे,गुलाब सूर्यवंशी,भीमराव पाटील कल्याने,रत्नाकर पाटील शिंदे,बाळासाहेब देशमुख बाराडकर,शंकर पवार उत्तम चव्हाण,विजय सूर्यवंशी,साहेबराव मोरे, संतोष पाटील गाढे, सुधाकर देशमुख, चंद्रकांत हनुमंते, मारुती किरकण,रामशिंग चव्हाण, मारोती पाटील जाधव, धुरपता कांबळे, आकाश सोनटक्के, प्रल्हाद मस्के, साहेबराव गोरखवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप वाघमारे व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर सरपंच सत्वशीला माधव वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प माल्या व शाल देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रल्हाद मस्के यांनी मानले, अण्णा भाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित शाहिरीचा जलसा होऊन भोजन दा न व ढोल ताशाच्या निनादात अण्णाभाऊच्या तैल चित्राची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली.

डिएफओ यांच्या प्रशासकीय अन्यायाविरोधात वनपाल बसले उपोषणाला ते ही कुटुंबियांसह

  संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

   मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वनविभाग सतत विविध गोष्टींवरून चर्चेत राहत असतो काही चांगले काम केल्यामुळे तर काही कर्मचाऱ्यांन प्रशासकीय त्रास देण्यामुळे सतत चर्चेत असतो पण् कर्मचाऱ्यांना प्रशासकीय त्रास दिल्यास वनविभागाची नाचक्की होते हे मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही.

       मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे वनपाल पदावर कार्यरत असलेले इंद्रजित हरिभाऊ बारस्कर यांनी प्रशासकीय त्रासाला कंटाळून साखळी उपोषणाला स्वातंत्र्य दिनी सुरुवात केली असून त्यांचेसोबत त्यांच्या आई श्रीमती मालतीबाई हरिभाऊ बारस्कर, विद्या इंद्रजित बारस्कर ( पत्नी) 

शिवबा इंद्रजित बारस्कर (मुलगा) इंद्रजा इंद्रजित बारस्कर (मुलगी) आदी बारस्कर कुटुंबियांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना वनविभागातील कर्मचाऱ्यांसोबतच सर्व सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळत असून वरिष्ठ अधिकारी सूडबुद्धीने कसे वागतात याची प्रचिती येत असून या प्रकरणामुळे वनविभागाची नाचक्की होत आहे.

वनपाल इंद्रजित बारस्कर यांनी मा . वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक अमरावती यांनी २३ आक्टोबर २०२३ ते ०५ जुलै २०२४ पर्यंतच्या काळात ०५ वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याची माहिती ई मेल द्वारे दिली आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून होणारा मानसिक त्रास व पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे आठ महिन्यांच्या वेतनासह अन्य मागण्यांबाबत रितसर अर्ज केलेला असून संपूर्ण कुटुंबियांसोबत साखळी उपोषणाला बसण्याची बहुदा ही पहिलीच घटना असावी अशा प्रकारामुळे वनविभागाची नाचक्की तर होतंच असून वनविभागातील विविध कर्मचारी संघटना सामाजिक कार्यकर्ते तथा मुदखेड शहरातील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा भाजपचे कार्यकर्ते विनोद टिकाराम चंद्रे.,स्मिता चंद्रे,दिपक जुजाराव,निता दिपक जुजाराव आदींसह असंख्य समाजबांधवांनी आपला पाठिंबा इंद्रजित हरिभाऊ बारस्कर यांना दिला आहे.

थावराजी प्रा.आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनीधी

पासदगाव येथील थावराजी प्राथमिक आश्रमशाळेत ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्यध्यापक यांच्या हस्ते महात्मा गांधीजीच्या प्रतीमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करुण्यात आला.ततपुर्वी शाळेतील विद्यार्थ्याची गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली.



शाळेचे मुख्यध्यापक टि.टि.राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

    याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,शैक्षणीक साहित्य व इतर साहित्य मान्यवराच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राठोड टि.टि, अधिक्षक मोळके एम.एन.सहशिक्षक एस. नेव्हल, चन्नावार आदि कर्मचारी उपस्थित होते

अवयवदान सर्वश्रेष्ठ दान , कुष्ठरोग दैवीशाप नाही

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी

दि. १२रोजी अवयवदान हे श्रेष्ठ दान असून मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो.तसेच पर्यावरण  संवर्धनासाठी ही चळवळ उपयुक्त असून यात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत देहदान चळवळीचे नांदेड येथील प्रणेते माधव आटकोरे यांनी व्यक्त केले. 

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जिल्हा परिषद प्रशाला विष्णुपुरी येथे वेळोवेळी प्रासंगिक अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.त्याचाच एक भाग म्हणून अवयव दान सप्ताहाच्या औचित्याने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

   प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश कुलकर्णी यांनी एक प्रेरणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव यांनी देहदान याविषयी सविस्तर माहिती दिली .माधवआटकोरे यांनी चालवलेली चळवळ दिशादर्शक असून मी स्वतः देहदानाचा फॉर्म भरून देत आहे अशी घोषणा करून विद्यार्थी पालकांना देहदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. ए .खदीर यांनी केले .तर आभार शैलजा बोरसे यांनी मानले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद नांदेड च्या शिक्षण विभागाचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, देहदान चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार माधव आटकोरे ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला जाधव,  पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, दिनेश अमीलकंठवार, मारुती काकडे, पंचफुला नाईनवाड, चंद्रकला इदलगावे ,सुनिता सोळंके, पद्माकर देशमुख कृष्णा बिरादार, संतोष देशमुख आदि शिक्षकांसह प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.विलास ढवळे यांनी विद्यार्थ्यांसाठी या  तंत्रयुगात अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाबरोबर नवीन मार्ग धुंडाळावेत यासाठी जागतिक स्तरावर अनेक नोकऱ्यांची उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक बनले पाहिजे असे सांगितले.

पर्यटन विकास योजनेअंतर्गत मुगट व आमदुरा येथे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन.

संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहार

दि.10 रोजी महाराष्ट्र शासन पर्यटन विकास योजने अंतर्गत मुगट व आमदुरा येथे भुमीपुजन.

 मुगट येथील महानुभाव पंथाच्या दत्त मंदिरा साठी 60 लक्ष रुपये निधी तर आमदुरा येथे रु 61.62 लक्ष रकमेचे भव्य सभा मंडप राज्यसभा खा. अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नातून साकरण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने भूमिपूजन सोहळा मुगट व आमदुरा येथे आयोजित करण्यात आला होता.

 यावेळी व्यासपिठावर खा. अशोक चव्हाण,आ.अमर राजुरकर, प्रवीण गायकवाड,हनुमंत देशमुख,शंकर मुतकलवाड, बालाजी पाटील खटिंग ता. अध्यक्ष मुदखेड भाजपा, बाळासाहेब देशमुख,भीमराव कल्याणे,गणेशराव शिंदे, रमेश कल्याणे,डॉ. माणिकराव जाधव, गांधी पवार, कोमल जैस्वाल, महंत कृष्णराज बाबा बाळापुरकर,महंत अशोकबुवा बाळापुरकर, माधव कदम,गोपीनाथ मुंगल, गणेशराव मुंगल,सुर्यभान मुंगल, युवराज पवार ,धोंडीबा वंजे, माधवराव कल्याणे,सुरेश कल्याणे,शरद पवार,आदीची उपस्थिती होती.

पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा - रिप बेनिफिट संस्थेचे प्रतिपादन .

संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा प्रतिनीधी

                    तीन एकरच्या परिसरात निसर्गरम्य हरित लता, वेली,वृक्ष,डौलणारी फुलझाडे, विस्तृत पसरलेले गवताचे मैदान, हरीने वाढलेली झाडे आणि चिमुकल्यांचा वावर पाहून पर्यावरणपुरक शाळेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे विष्णुपूरी शाळा असे गौरोद्गार 

      रिप बेनिफिट संस्थेने काढले  आहेत. नांदेड जिल्ह्यात पर्यावरण प्रेमी शिक्षकांना भरीव मार्गदर्शन करण्यासाठी रिप बेनिफिट संस्थेचे चंद्रिका, अक्षय,शिवानी व भरत यांच्यासह समग्र शिक्षा अभियानचे कार्यक्रमाधिकारी  विलास ढवळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विष्णुपूरीस भेट देण्यासाठी आले होते. यावेळी शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रिप संस्थेच्यावतीने शालेय परिसरात एका बहुवार्षिक रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले. रिपने पर्यावरण प्रेमी शिक्षक उदय हंबर्डे यांना पुढील कार्यासाठी निवडून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यावेळी मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी व कृष्णा बिरादार यांनी शाळेतील पर्यावरणपुरक प्रकल्पांची माहिती दिली. शाळेतील पर्यावरणपुरक रचना पाहून समाधान व्यक्त केले.


नामांतर शहिदांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याची गरज - मादळे

 संपादक आशिष मुगटकर



              नामांतर हुतात्मा अभिवादन सभा संपन्न

राज्यभरातील आंबेडकरी विचारवंतांनी जागविल्या नमांतराच्या दाहक आठवणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

- छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी हुतात्मा जनार्दन मावडे, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण आंबेडकरी समाजाने ठेऊन संगठित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त  महाव्यवस्थापक आर. बी. मादळे यांनी केले. हुतात्मा नामांतर स्मारक समिती नांदेडच्या वतीने आयोजित नामांतर हुतात्मा अभिवादन सभेत अध्यक्षीय पदावरून आर. बी. मादळे बोलत होते. यावेळी विचार मंचावर अरुण गाडे (नागपुर), डॉ. संजय अपरांती, दिगंबर मोरे, अशोक ढोले, माधव जमदाडे, इंजिनिअर भरत कुमार कानिंदे

श्याम निलंगेकर आदींची उपस्थिती होती.

    शहरातील ताज पाटील हॉटेल येथे रविवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता नामांतर हुतात्मा अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना आर. बी. मादळे म्हणाले की, छत्रपती संभाजी नगर येथील मराठवाडा विद्यापीठाला शासनाने महामानव डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राज्यातील आंबेडकरी जनतेने राज्य शासनाकडे केली. त्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने २७ जुलै १९७८ रोजी नामांतर झाल्याचा ठराव जाहीर करूनही सवर्णांनी संपूर्ण राज्यात जाळपोळ सुरू केली आणि मागासवर्गीय समाजाची घरे जाळली आणि आंबेडकरी समाजाच्या नामांतराच्या मागणीला विरोध केला. हे नामांतर आंदोलन सतत १७ वर्षे चालले. यामध्ये आंबेडकरी युवकांचे बळी गेले, अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली. तसेच हुतात्मा जनार्दन मावडे, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांनी बलिदान दिले. तेंव्हा कुठे राज्य शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला. नामांतर शहिदांच्या बलिदानाचे स्मरण ठेऊन समाजाने संघटित होणे गरजेचे आहे असे आर. बी. मादळे म्हणाले.

     यावेळी काकासाहेब डावरे, भिमराव भुरे, आर. एन. गाजभारे, चंद्रकांत ठाणेकर, मारुती साळवे, टी.पी. वाघमारे, ईश्वर सावंत, विवेक मवाडे, सोनटक्के आदींनी नामांतर काळामध्ये नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला कसे मुठीत जीव धरून जगावे लागले यासह लढ्याच्या दग्ध आठवणींची माहिती उपस्थित आंबेडकरी जनतेला दिली. सुरुवातील तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातले. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आंबेडकरी समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्र संचालन प्रा. अविनाश नाईक यांनी तर आभार प्रा. इंगोले यांनी मानले.

नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी.

 छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहिद झालेले जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे आणि गौतम वाघमारे यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने उद्या रविवारी दुपारी 3 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेड शहरातील आयटीआय चौक जवळील हॉटेल ताज पाटील येथे उद्या रविवार दि.४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी दूरसंचार विभागाचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक आर. बी.मादले हे राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून के. एस. हरिदास आणि दिगंबर मोरे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी  शामदादा गायकवाड, अॅड. गोपाळ भगत ( मुंबई ), पँथर चंद्रकांत ठाणेकर ( देगलूर ), डॉ. संजय अपरांती ( नाशिक),  अरविंद सोनटक्के  (आयआरएस ), भिमपुत्र टेक्सास गायकवाड ( पुणे ), माधवराव जमदाडे (नांदेड ), श्याम निलंगेकर (नांदेड ), डॉ. शत्रुघ्न जाधव ( हिंगोली ), रमेशभाई खंडागळे (औरंगाबाद ), गौतम मोरे, मारोतराव साळवे, भीमसेन कांबळे, विलास कटारे, अनंत भवरे ( औरंगाबाद ), अरुण गाडे ( नागपुर ), विलास भालेराव ( लातुर ), भीमप्रकाश गायकवाड ( परभणी), बंधुराज लोणे (मुंबई), भीमराव भूरे, दिगंबर मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.अविनाश नाईक हे करणार असून प्रसिद्धी प्रमुख म्हणून भय्यासाहेब गोडबोले, माधव गोधणे आणि जयवर्धन भोसीकर हे काम पाहणार आहेत. तरी या अभिवादन सभेला आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

 असे आवाहन संयोजन समितीचे इंजि. भरतकुमार कानिंदे, टी.पी. वाघमारे, आर.सी. कांबळे, काकासाहेब डावरे, अभि.डी.डी. भालेराव, इंजि. अशोक गायकवाड, राजकुमार सिंदगीकर, अरुण केसराळीकर, इंजि. मिलिंद गायकवाड, इंजि. वसंत वीर, इंजि. दिपक बनसोडे, स्टेशन प्रबंधक देविदास भीसे, इंजि. भिमराव हाटकर, इंजि. गणपत गायकवाड, संजय वाघमारे, यशवंत थोरात, प्रा. प्रल्हाद इंगोले, साहेबराव पुंडगे, इंजि. भिमराव धनजकर, हिरामन वाघमारे, एस.टी. पंडीत, सम्राट हाटकर, रमेश दुधमल, कोंडीबा वासाटे, प्रेमानंद घुले, गौतम खिराडे, साहेबराव भोरगे, सरपाते खडकीकर, ईश्वर सावंत, मिलींद कदम, देवानंद तारु, अशोक भवरे, देविदास ढवळे, नागोराव ढवळे, दिलीप हनुमंते, वसंत सोनकांबळे, विजय पोपुलवार आदींनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.


नायगाव विधानसभा मतदार संघातील हजारो भाविक काशीला रवाना

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनिधी

दि. 3 रोजी येथील रेल्वे स्थानाकातून काशी तीर्थ यात्रेसाठी जाणाऱ्या विशेष रेल्वेस राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खा. अशोक चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवून काशीला रवाना केले.

सविस्तर वृत्त असे की, नायगाव विधानसभा मतदार संघांचे आ. राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी सौ. पूनमताई राजेश पवार यांच्या वतीने नायगाव विधानसभा मतदार संघातील गोरगरीब, वंचित, शोषित, पीडित भाविक भक्तांना काशी येथिल तीर्थ क्षेत्राचे दर्शन मिळवून द्यावे या निर्मळ हेतूने तीर्थ यात्रेचे आयोजन करण्यात आले, या यात्रेला विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आली होती. यावेळी संत महंत यांच्या सह राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. राजेश पवार,माजी आ. अमरनाथ राजूरकर,माजी सभापती राजेश कुंटूरकर,सौ.पुनमताई पवार,उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, भाजपा नांदेड उत्तरचे महामंत्री प्रवीण गायकवाड भाजपा धर्माबाद ता.अध्यक्ष विजय डांगे, उमरी ता. अध्यक्ष बालाजी ढगे, मुदखेड ता.अध्यक्ष बालाजी खटिंग आदी उपस्थित होते.

यावेळी मुदखेड शहर भाजपच्या वतीने जाणाऱ्या यात्रेकरूंचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, स्वागतासाठी शहर अध्यक्ष संजय सोनटक्के,माजी नगराध्यक्ष सुनील शेटे, माजी नगर उपाध्यक्ष माधव कदम माजी नगरसेवक संजय आऊ लवार,गोविंद गोपनपल्ले,चांदु बोकेफोड,शहर सरचिटणीस कानोबा बिस्मिले,प्रभाकर पांचाळ,ता. उपाध्यक्ष माधव वाघमारे,युमोचे ता. अध्यक्ष सतिश मुंगल, शहराध्यक्ष गजू कमळे,रामशिंग चव्हाण, सुशील मुंगल,विठ्ठल आचार्य, माणिक मुंगल आदी उपस्थित होते.



नांदेडमध्ये शंभर टक्के पगारीसाठी शिक्षकांचे मुंडण आंदोलन..

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी

 राज्यातील अंशत: तथा विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली पंधरा दिवसांपासून भर उन-पावसात धरणे आंदोलन सुरू  आहे. हे अंशतः अनुदानित शिक्षकांच्या अनुदान टप्पा वाढीसह विविध मागण्याबाबत शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करावा या प्रमुख मागणीसाठी नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह राज्यभर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे. 

या आंदोलनास पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन , खा. वसंतराव चव्हाण, आ बालाजी कल्याणकर, आ.मोहन हंबर्डे आ विक्रम काळे आदी लोकप्रतिनिधी भेटी दिल्या. 

या प्रसंगी महिला शिक्षक भगीणीने पालकमंत्र्यांचे पाय धरत आपल्या वीस वर्षांची दूरदैवी जीवन व्यथा सांगितली. यास शासन जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत शंभर टक्के अनुदान व विविध मागण्या सोडवण्याची आर्तपणे मागणी केली.  तेव्हा पालकमंत्री यांनी आठ दिवसांत अनुदानाची गोड बातमी मिळेल असे आश्वासन दिले. पण नांदेड सोडताच या आश्वासनाच विसर पालकमंत्र्यांना पडला. म्हणून नांदेड शिक्षक समन्वय समितीने आज मुंडण आंदोलन केले. 

प्रा कैलाश खानसोळे,प्रा तुकाराम वळसंगे,नामदेव गवळे,सोळंके व्ही जी,दिगंबर माने,प्रा गणेश तरटे, प्रा. उत्तम कांबळे, शिवप्रसाद चडगुलवार,सिद्धार्थ शिंदे आदीं शिक्षकांनी मुंडण करत शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. येत्या दोन दिवसांत निर्णय नाही झाला तर शिक्षक व संस्था  चालकांनी शाळा बंदचा इशारा दिला आहे.. 

या आंदोलनास समाजातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्था संघटनांनी पाठिंबा दिला तरी निर्दयी शासन या आंदोलनाची दखल न घेतल्याने शिक्षकांची शोकांतिका वाढतच आहे.

प्रसंगी गंगाप्रसाद नरवाडे यांनी मुंडण करण्याची विनामूल्य सेवा केली त्या बद्दल शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आभार मानले . यावेळी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. यापूढेही शासन निर्णय निर्गमित होईपर्यत चालूच राहील असे शिक्षक समन्वयकांनी  सांगीतले.




मुदखेड कॉंग्रेस कडून महायुती सरकारच्या विरोधात रुमने मोर्चाचे आयोजन -जिल्हा अध्यक्ष बालाजी गाढे यांची माहिती

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका प्रतिनीधी.

 दि २  रोजी मुदखेड तालुका कॉंग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. ६ रोजी मंगळवारी मुदखेड तहसील कार्यालयावर शासनाच्या विरोधात रुमने मोर्चा काढण्यासाठी युवक काँग्रेसने यलगार पुकारला असल्याची माहिती नांदेड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनी मुदखेड येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

    मुदखेड तालुका व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने ता १ (गुरुवार) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 या वेळी कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पठ्ठान, शहर उपाध्यक्ष सुर्यकांत चौदंते, अविनाश चौदंते, अब्दुल लतीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी राज्यातील भाजप प्रनित महायुती सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचा घनाघात करण्यात आला, आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीत भांडने लावून तेड निर्माण करीत असल्याचा आला आहे.

   या पुर्वी महायुतीच्या काळात करण्यात आलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फोल ठरली असून अजुनही तालुक्यातील बहुतांश शेतकरी वंचीत आहेत. या सोबतच पीक कर्ज, पीक विमा, प्रोत्साहन रक्कम, शेतकऱ्यांना मिळालेले नाही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही अश्या अनेक मागण्या संदर्भात वेठीस धरले जात आहे, या शिवाय महावितरण कंपनिच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून, महायुती शासणाच्या महावितरण खासगीकरणाचा निषेधार्ह सुरु असलेला विजेचा खेळ खंडोबा थांबला पाहिजे त्या साठी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यलगार पुकारण्यात आला आहे. 

     शेतकर्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती दिली पाहिजे, पीक कर्ज तातडीने देण्यात यावे गेल्यावर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा महावितरण अंतर्गत शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा देण्यात यावा, चोवीस तास सींग फेज देणृयात यावा, एक गांव एक लाइनमन मिळालाच पाहिजे, विज भार कमी करण्यासाठी विद्युत केंद्राची निर्मिती करण्यात यावी. ग्रामीण भागात जोडणारे रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे.

या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांची निवेदन शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तहसिलदारांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे. निद्रावस्थेतील भाजप प्रनित महायुती शासनाच्या विरोधात दि. ६ (मंगळवार) सकाळी १० वा ठाकरे चौकातून भव्य रुमने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनी केले आहे.

लोकप्रिय बातम्या