प.पु.श्री.कै.दत्तराज बाबा बाळापूर यांचे निधन

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुगट येथील महानुभाव पंथाचे प्रसिद्ध देवस्थान फुलारीमाता मठ आहे. या फुलारीमाता मठसंस्थानचे संचालक.प.पु.श्री.कै. दत्तराज बाबा गुरू माणिक बुवा बाळापुरकर यांचे आज दि.२९.रोजी दुपारी ३ वाजता वयाच्या ८०व्या वर्षी मुगट येथे दुःखद निधन झाले.

 उद्या शुक्रवार दि.३० रोजी दुपारी ४ वाजता मुगट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांच्या पश्चात महंत कृष्णराज बाबा,इ.श्री.आशोकराज दादा,इ.श्री.संजयराज दादा, तपस्वीनी यमुनाताई, तपस्वीनी उषाताई, तपस्वीनी अनुराधाताई, कुमारी भाग्यश्री, कुमार आबासाहेब असा शिष्य परिवार आहे.

शंखतीर्थ जिल्हा परिषद शाळेत माता पालक मेळावा उत्साहात साजरा.

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील शंखतीर्थ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यात गावातील मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी उपस्थित मातांसाठी शाळेत संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात उत्साहाने मातां सहभागी झाल्या होत्या. त्यानिमित्त शाळेतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.



 कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास कदम व प्रमुख पाहुणे नारायण कदम हे होते.

यावेळी माता पालक भारतबाई वाघमारे,जयश्री निळकंठ मेळघावे,माधवी रामदास कदम,रवीना विश्वनाथ आंबेकर,वर्षा मोहन कदम,सुमित्रा बालाजी कळसे,मेघा गजानन जोशी,कदम संयंत्र तसेच शाळेतील शिक्षक सौ पपूलवाड मंजुषा,सौ धोंडगे मंजुषा,कागणे सर, गिरी सर हे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ मेळगावे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ दुर्गम मॅडम व्यक्त केले.

मुदखेड तालुका भाजपा च्या संघटनात्मक बैठकीत अनेकांच्या प्रमुख पदावर नियुक्त्या

  संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुक /प्रतिनिधी 

मुदखेड येथील वैष्णवी गार्डन मंगल कार्यालयत दि.२रोजी आयोजित संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भाजपा चे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर हे होते तर व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, लक्षुमण ठक्करवाड,डॉ.माधव उचेकर,श्रावण भिलवंडे, मराठवाडा दि.आ.प्रभारी प्रवीण गायकवाड, जिल्हा सचिव हनुमंत देशमुख, ओबीसी आ.जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड, शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक,महिला आ. जिल्हा सरचिटणीस केतकी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुदखेड भाजपा शहर व तालुका भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक आढावा संघटन सरचिटणीस गंगाधर जोशी यांनी घेतला.

या आढावा बैठकी नंतर मुदखेड तालुका भाजपा फ्रेंड अभियान तालुका प्रमुख पदी गुलाब सूर्यवंशी यांची सोशल मीडिया प्रमुख पदी प्रभाकर पांचाळ तर ओबीसी आघाडी अध्यक्ष पदी हारी बैनवाड आणि कानोबा बिष्मीले यांना व्यापारी आ. शहराध्यक्ष तर स्वप्नील चंद्रे यांना शहर सोशल मीडिया प्रमुख पदाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावक यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले.

यावेळी कृ.ऊ.बा.स. संचालक बालाजी पाटील खटिंग, माजी सभापती भगवान पानेवार,ओबीसी आ. जिल्हा उपाध्यक्ष गुलाब सूर्यवंशी,ता.सरचिटणीस सुदाम पाटील खानसोळे,संजय पवार,अशोक पवार,प्रा. दिनेश शेटे,माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के,महिला आ.ता.अध्यक्ष जयश्री देशमुख,युवा मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा ता.अध्यक्ष, माधव वाघमारे,आनंदराव पाटील कल्याने,तुळशीराम चुकेवाड, सुभाष मगरे,युमो शहर अध्यक्ष गजानन कमळे, चक्रधर पवार, शंकर पाटील पवार,अमोल अडकीने, संतोष चमकुरे,यांच्या सह मुदखेड शहर व तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

लोकप्रिय बातम्या