आमदुरा येथे बाल संस्कार शिबिर व कीर्तन महोत्सवाचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे ब्रह्मचैतन्य बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था पुणे कडून बाल संस्कार शिबिर व कीर्तन महोत्सवाचे आयोजन  तसेच अधिकमासाच्या निमित्ताने भव्यदिव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

 या बाल संस्कार शिबिराला दि.१७ मे २०२६ पासून सुरुवात होणार असून त्याची सांगता दि. २५ मे २०२६ रोजी होणार आहे. या शिबिरात दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ६ ते १०, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ४ संत चरित्र कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे.

 या शिबिरात बालकांवर वारकरी संप्रदायाचे विविध संस्कार केले जाणार आहेत त्यात प्रामुख्याने हनुमान चालीसा, टाळ पावल्या, नित्याचे श्लोक, संत चरित्र, गीता संहिता, पखवाज गायन, यांचा समावेश असणार आहे. 

या १० दिवस चालणाऱ्या संस्कार शिबिरामध्ये कीर्तन महोत्सवाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले बाल कीर्तनकार हे या ठिकाणी कीर्तन करणार आहेत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत या कीर्तनाचा महोत्सव होणार आहे.

या बालसंस्कार शिबिरात परिसरातील  बालकांनी  मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून  करण्यात आले आहे.

 या बाल संस्कार शिबिर व किर्तन महोत्सवाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार ह.भ.प गणेश महाराज पवार आमदुरेकर यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या