महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेसचे २७ पदाधिकारी नांदेड जिल्हाच्या मदतीला

 "भारत जोडो पदयात्रा" यशस्वी करण्याची  व्यवस्था पुर्ण


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी 

 नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी लोकनेते, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील २७ पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली  नांदेड जिल्ह्यात मदतीसाठी नियुक्त केले आहेत. 

यात्रा यशस्वी करण्याची  पुर्ण व्यवस्था झाली असुन एक आगळा कार्यक्रम होतो आहे हे या वरून  स्पष्ट  दिसते. 

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात यात्रेच्या पूर्वतयारीसाठी मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव  चव्हाण* यांनी यात्रा व्यवस्थापनासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांची नेमणून करून त्यांच्यावर जिल्हानिहाय जबाबदारी देण्याची सूचना मांडली होती. नांदेड जिल्ह्यासाठी देखील काही पदाधिकारी नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी एकूण २७ पदाधिकारी नांदेड जिल्ह्यासाठी नियुक्त केले आहेत. हे पदाधिकारी पुढील आठवड्यात नांदेडला दाखल होणार असून, नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण यशस्वी  होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. त्यांच्याकडे व्यवस्थापनासंदर्भातील विविध जबाबदारी सोपवली जाईल.

प्रदेश काँग्रेसने नांदेडसाठी नेमलेल्या २७ पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर व प्रदेश चिटणीस अँड. सुरेंद्र घोडजकर हे स्थानिक नेते तर गेल्या महीनाभरा पासुन नांदेड येथे नियोजनाची सुत्र सांभाळत आहेत त्यांचे सह  अतिरिक्त 25 राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या वर जबाबदारी दिली.  माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान (मुंबई) माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे (पुणे ) आ. कैलास गोरंट्याल, डॉ. उल्हास पाटील,परभणी चे माजी खासदार  तुकाराम रेंगे पाटील, अँड. रामहरी रुपनवार, चारुलता टोकस, अँड. गणेश पाटील, किशोर गजभिये, सुभाष कानडे, हरिभाऊ शेळके, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, डॉ. राजू वाघमारे, रमेश शेट्टी, सचिन सावंत, उमाकांत अग्निहोत्री, विनायकराव देशमुख, अभिजित सपकाळ, प्रदेश चिटणीस अलका राठोड, अनिस कुरेशी, कॅ. निलेश पेंढारी, प्रकाश मुथा, सोनाली मारने, अँड. गौरी छाब्रिया व परभणी चे नेते तथा प्रदेश  प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांचा समावेश आहे.

धर्माबाद शहरातील निकृष्ट दर्जाची कामे तात्काळ थांबवुन दोषींवर कारवाईची करा- समाजसेवक शिवशंकर सुरकुटवार

 सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष 

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

धर्माबाद शहरात विविध विकासकामासाठी तात्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्फत ३ कोटी रु निधि देण्यात आला.सदरिल कामे हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धर्माबाद मार्फत करण्यात येत आहे. परंतु सी सी रास्ता व सी सी नल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत आहेत. 

हे गुत्तेदार यानी जानिवपूर्वक रस्त्याच्या मजबूतिसाठी लागणारे साहित्य गजाली, रेती, गिटि, अतिशय कमी प्रमानात वापरुन श्रीखंड खाण्याच काम केले आहे. परतीच्या पावसामूळे रोड हा अक्षरश उखडून गेला आहे.त्यामुले या रस्त्याचे काम तातकल बंद करण्यात यावे व निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारांचे थकित बिल थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय अदा करू नये . सर्व कामे इंस्टिमेट प्रमाने त्या द्वारे करण्यात यावे.सदरिल प्रकरणात दोषी अडळणाऱ्यां अधिकारी व गुत्तेदारवर कडक कारवाई करावी.

 अशा या मागण्या चा लेखी निवेदन उपअभियांत याना देण्यात आला जर या बाबिकडे दुर्लक्ष केल्यास १आक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल.

सर्व कामे चांगल्या रीतिने करावी या करीत १ आक्टो २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, धर्माबाद येथे आमारण उपोषणाला बसले होते. 

या कार्यालयातील संबंधित अधिकारी यानी आमच्या खालील सर्व मागण्या मान्य करून त्याप्रमाने कामे करण्यात येतील असे तोंडी आश्वासन दिले व तुमास लेखी स्वरूपात दि. ३/१०/२०२२ रोजी पत्र दिले जाईल असे सांगितल्याने, मी माझे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे गेतले होते. परंतु अध्याप लेखी स्वरूपत कोनत्याही प्रकारची माहिती देऊन मागणी मान्य केलेली नहीं. त्यामुळे पुन्हा मी दि.११ आक्टो २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग , धर्माबाद कार्यालयमोर आमारण उपोषण करण्यात येईल. अशी   मागणी समाजसेवक शिवशंकर सुरकुटवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे 

मातासाहेब देवांजी जन्मोत्सवाला प्रारंभ

 

संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार 

मुगट येथील सत युगातील पावन तपस्थान गुरुद्वारा माता साहेब देवांजी येथे दि ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर च्या दरम्यान खालसा पंथाच्या पूजनीय माता साहेब देवांजी यांचा ३४१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने व धार्मिक विधीने साजरा केला जात आहे.


या जन्मोत्सव सोहळ्यात तख्त सचखंड श्री हुजुर साहेब अबचलनगर नांदेड पुजनीय जत्थेदार बाबा कुलवंत सिंग, समूह तक्ता साहेबांचे पूजनीय पंचप्यारे,समूह जथे बंदियो, दलपंथ, संत महापुरुष,संत बाबा नरेंद्रसिंगजी, संत बाबा बलविंदर सिंग,नानक नाम सेवा साधसंगत तसेच धार्मिक व सामाजिक संप्रदायाच्या सहकार्यातून  मोठ्या उत्साहात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यात श्री गुरु ग्रंथ साहेबांचे अखंड वाचन, विशेष गुरमीत समागम होणार आहे.यासाठी प्रसिद्ध रागी,जथे, कथा वाचक, प्रचारक आणि संत यांचा समावेश असणार आहे. 

दि.७ रोजी या धार्मिक कार्यक्रमाला धार्मिक विधी ने सुरुवात केली जाणार आहे.त्यात श्री.गुरु ग्रंथ साहेबाचे अखंड पाठ सकाळी  ७ पासून संपूर्ण दिवसभर भजन, किर्तन,साखी,कथाविचार,यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ८ ऑक्टोबर दिवान साहब मध्ये सकाळी ७ वा.ते २वाजे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी ३.०० वाजता घोड्याच्या शर्यती व नेजाबाजी यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे .

दि. ९ऑक्टोबर रोजी दुपारी २.०० वाजता गुरुग्रंथ साहेबाच्या छत्रछायेखाली महानगर कीर्तनाचे  होणार आहे.

गुरुद्वारा माता साहेब देवाजी मुगट येथुन ब्राह्मणवाडा - गाडेगाव मार्ग ही  भव्य शोभायात्रा निघणार असून सचखंड श्री हुजूर साहेब अबचलनगर नांदेड येथे  या शोभायात्रेची समाप्ती होणार आहे.

 या धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मातासाहेब देवांजी प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंग निहाल सिंग  बुडा दल ९६ करोडी, संत बाबा नरेंद्रसिंगजी कार सेवावाले, संत बाबा बलविंदर सिंग जी कार सेवा वाले यांनी केली आहे.

लोकप्रिय बातम्या