मातासाहेब देवांजी जन्मोत्सवाला प्रारंभ

 

संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार 

मुगट येथील सत युगातील पावन तपस्थान गुरुद्वारा माता साहेब देवांजी येथे दि ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर च्या दरम्यान खालसा पंथाच्या पूजनीय माता साहेब देवांजी यांचा ३४१ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती भावाने व धार्मिक विधीने साजरा केला जात आहे.


या जन्मोत्सव सोहळ्यात तख्त सचखंड श्री हुजुर साहेब अबचलनगर नांदेड पुजनीय जत्थेदार बाबा कुलवंत सिंग, समूह तक्ता साहेबांचे पूजनीय पंचप्यारे,समूह जथे बंदियो, दलपंथ, संत महापुरुष,संत बाबा नरेंद्रसिंगजी, संत बाबा बलविंदर सिंग,नानक नाम सेवा साधसंगत तसेच धार्मिक व सामाजिक संप्रदायाच्या सहकार्यातून  मोठ्या उत्साहात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यात श्री गुरु ग्रंथ साहेबांचे अखंड वाचन, विशेष गुरमीत समागम होणार आहे.यासाठी प्रसिद्ध रागी,जथे, कथा वाचक, प्रचारक आणि संत यांचा समावेश असणार आहे. 

दि.७ रोजी या धार्मिक कार्यक्रमाला धार्मिक विधी ने सुरुवात केली जाणार आहे.त्यात श्री.गुरु ग्रंथ साहेबाचे अखंड पाठ सकाळी  ७ पासून संपूर्ण दिवसभर भजन, किर्तन,साखी,कथाविचार,यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ८ ऑक्टोबर दिवान साहब मध्ये सकाळी ७ वा.ते २वाजे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी ३.०० वाजता घोड्याच्या शर्यती व नेजाबाजी यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे .

दि. ९ऑक्टोबर रोजी दुपारी २.०० वाजता गुरुग्रंथ साहेबाच्या छत्रछायेखाली महानगर कीर्तनाचे  होणार आहे.

गुरुद्वारा माता साहेब देवाजी मुगट येथुन ब्राह्मणवाडा - गाडेगाव मार्ग ही  भव्य शोभायात्रा निघणार असून सचखंड श्री हुजूर साहेब अबचलनगर नांदेड येथे  या शोभायात्रेची समाप्ती होणार आहे.

 या धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मातासाहेब देवांजी प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंग निहाल सिंग  बुडा दल ९६ करोडी, संत बाबा नरेंद्रसिंगजी कार सेवावाले, संत बाबा बलविंदर सिंग जी कार सेवा वाले यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या