कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या वर ईडीने केलेल्या कारवाईचा; महाविकास आघाडी करनार निषेध आंदोलन

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

महाराष्ट्रचे अल्प संख्यांक व उद्योजकता विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईडीच्या केंद्रीय पथकाने चौकशी साठी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.त्यामुळे केंद्र सरकारच्या या दबाव तंत्राचा महाराष्ट्रात सर्वत्रच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यां पासून ते नेत्या पर्यंत सर्वच जाहीर निषेध व्यक्त करत आहेत.

नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस, महविकास आघाडी कडुन सुध्दा या घटनेची गंभीर दखल घेऊन दि.२५/०२/२०२२ रोजी दुपारी ११:००वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या समोर, आयटीआय येथे  कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या वर ईडीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करुन, निषेध आंदोलन  केले जाणार आहे.त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी सर्वानी एकत्र यावे.

 महविकास आघाडी कडुन  निषेध आंदोलन केले जाणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डि.बी.जांभरुणकर साहेब यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मुगट येथे, गुरु रविदास जयंती निमित्त बेगमपुरा चेतना समागम मोठ्या उत्साहात संपन्न

गुरुवाणी किर्तनकार भाई गुरमेल सिंघ जी (पंजाब) भाई मनोज सिंघ जी (हिमाचल प्रदेश) यांनी गुरुवाणी च्या माध्यमातून मार्गदर्शन.




मुगट वार्ताहार

गुरू रविदास जी महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त संत रवि‌‌‌दास युवा फाउंडेशन मुगट, च्या वतीने आयोजित दुसरा बेगमपुरा चेतना समागम, गुरु रविदास प्रेरणा भवन मुगट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या कार्यक्रमाची सुरुवात गुरु रविदास जी महाराज यांच्या वाणी ने करण्यात आली, गुरुवाणी किर्तनाचा आनंद समाज बांधवांनी घेतला, गुरुवाणी किर्तनकार भाई गुरमेल सिंघ जी (पंजाब) भाई मनोज सिंघ जी (हिमाचल प्रदेश) यांनी गुरुवाणी च्या माध्यमातून मोलाचं मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून, गुरुद्वारा माता साहिबचे जत्थेदार बाबा तेजासिंग निहान सिंगजी महाराज,भाई मंजीत सिंघ जी, भाई बबलू जी,भाई सिंगारा सिंघ जी, संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे युवा प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल वाघमारे, राज्य उपाध्यक्ष अवधूत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कामठा (खु) चे सरपंच सौ अर्चनाताई भाडेकर, भिमराव पाटील कल्याणे संचालक, माधवराव पाटील कल्याणे, धोंडीबा वंजे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,व गावातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी लहान मुलांनी आपल्या भाषणांनी समाज बांधवांचे लक्ष वेधून घेतले होते.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जिल्हा नांदेड चे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी आडेराव, जिल्हा सचिव संतोष आडेराव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विष्णु आडेराव, मुदखेड तालुका अध्यक्ष पुरभा आडेराव, मुदखेड तालुका उपाध्यक्ष मारोती आडेराव मुदखेड तालुका सचिव सुरेश सोनटक्के, मारोती संभाजी आडेराव, संजय आडेराव, भगवान सोनटक्के, साईनाथ आडेराव, बालाजी श्रीराम आडेराव, भगवान सातवाजी आडेराव, विठ्ठल आडेराव, संभाजी आडेराव, बालाजी सोनटक्के, रामप्रसाद आडेराव, विनायक वाघमारे, पारसराम आडेराव,घनश्याम आडेराव,अंकोश आडेराव, बालाजी सटवाजी आडेराव,आम्रता आडेराव, ओम आडेराव इत्यादींनी परिश्रम घेतले,🙏🙏🙏

पोलीस जमादार श्री. राजकुमार शेंडगे यांचे निधन

 संपादक आशिष मुगटकर





नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

लोहा येथील येथील रहिवासी असलेले पोलिस जमादार श्री.राजकुमार निवृत्तीराव शेंडगे यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.१७रोजी रात्री ११:३० वाजता नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

नांदेड येथील एस.पी.कार्यालयात जमादार पदावर कार्यरत आहे.त्यांचा अंत्यविधी लोहा येथील स्मशानभूमीत दि.१८रोजी दुपारी १२:००वाजता करण्यात येणार आहे.त्यांचा या निधनामुळे लोहा शहरात दु:खाची शोककळा पसरली आहे.

त्यांच्या या अकाली निधनामुळे परिवारास दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुली,एक मुलगा,नातु, असा परिवार आहे.



मुगट जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधीच्या मध्यस्थीने अनेक वर्षापासूनचे रखडलेले काम अखेर मार्गी ! .

 दलित वस्तीतील नालीचा प्रश्न अखेर निकाली....

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुगट येथील नवी आबादी नालीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला होता परंतु आज स्वतः जिल्हा परिषद सदस्याचे प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून चर्चा करून या समस्येवर तोडगा काढून प्रश्न अखेर मार्गी लावला आहे.

नवी आबादी याठिकाणी असलेल्या वडार वस्ती चे सांडपाणी गेल्या अनेक वर्षापासून नाली अभावी जागेवरच साचत होते. त्यामुळे या भागातील राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर घाणीचा व सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत होता ग्रामपंचायतीने नाली करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला पण त्याचा काही लोकांनी विरोध केला होता.



 त्यामुळे निधी असून सुद्धा या नालीचे काम करता येत नव्हते. या वस्तीचे संपुर्ण सांडपाणी जवळील असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात समोर मोठ्या प्रमाणात साचत होते त्याचं घाण पाण्यातून पशुपालक आपल्या पशुना दवाखान्यात नेत - जात असत. अनेक वेळा या ठिकाणी ग्रामपंचायतला लोकांनी तक्रारी केल्या होत्या. 

त्यामुळे ग्रामपंचायतीनी अखेर हा प्रश्न हाती घेतला परंतु आज जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे यांच्या हस्तक्षेपामुळे आज हा प्रश्न कायमचा सोडवला गेला आहे.मुगट जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणाताई कल्याणे यांच्या प्रयत्नातून गावात अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत व अनेक कामे सुरू आहेत.  

याठिकाणच्या नागरिकांन कडुन आजही नाली करण्यासाठी पुन्हा थोडा विरोध काही व्यक्तीने केला पण तो नंतर मावळला. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रतिनिधी भिमराव पाटील कल्याणे, गावचे सरपंच प्रतिनिधी धोंडीबा वंजे, ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे, पंचायत समिती अभियंता दरबस्तरवार पोलीस कर्मचारी, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पाटील कल्याणे, पोलीस पाटील भगवान हाटकर, ग्रामपंचायत चे कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती.

कु.संयोगिता कांबळे हिचे सेट परिक्षेत यश.


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड शहरातील भिमनगर येथील कु.सयोगिता कांबळे सेट परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे म्हणून तिचे सगळीकडे कौतुक होत आहे.सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु.संयोगिता हिने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासात सातत्य ठेवुन  आज हे यश मिळवले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सप्टेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या प्राध्यापक पात्रता परीक्षेत कु. संयोगिता अरविंद कांबळे ही इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाली आहे. 

कु.संयोगिता कांबळे हिचे शालेय शिक्षण मुदखेड येथे महात्मा गांधी विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड व एमए (इंग्लिश) पीपल्स कॉलेज नांदेड येथे पूर्ण झाले आहे. 

 वडील अरविंद कांबळे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी आपार कष्ट केले. मिळेल ते काम करुन आणि नांदेड शहरामध्ये ऑटो चालवून त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली नाही.  

 वडीलांच्या या आपार कष्टामुळेच त्यांची मुलगी कु. संयोगिता कांबळे हिने सेट परीक्षेत यश प्राप्त केले आहे. तिच्या ह्या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यालय आणि राजीव गांधी महाविद्यालयतील शिक्षकांकडून व तीचे (आजी आजोबा) निर्मलाबाई किशन कांबळे, रमा अरविंद कांबळे (आई वडील)सारिका रविंद्र कांबळे (काका काकू)कविता प्रविण कांबळे (काका काकू)सर्व परिवारांकडून कौतुक केले व आभिनंदन करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.



मातृभूमी मराठी न्यूज कडुन हार्दिक शुभेच्छा

मुगट येथे त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा मुगट च्या वतीने त्याग मूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती मोठ्या उत्साहात विहारात साजरी करण्यात आली.


माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मंडळींच्या हस्ते करण्यात आले.प्रतिमेला पुष्पहार ,दिप प्रज्वलन करण्यात आले.

गावातील पंचशील बुद्ध विहार मध्ये अनेक उपासक व उपासिका यांच्या प्रमुख  उपस्थितीत जयंती उत्साहात संपन्न झाली. 

या प्रसंगी विशेष  पोलिस पाटील भगवान हाटकर, साहेबराव हाटकर, ग्रामपंचायत सदस्य देवदत्त हाटकर, उत्तम हाटकर, अशोक हाटकर, प्रल्हाद हाटकर, राहुल हाटकर, चंद्रमणि हाटकर, लक्ष्मण हाटकर, साहेबराव हाटकर,  तुकाराम हाटकर, गौतम हाटकर, गोविंद हाटकर सकाळ पेपर तसेच रमाई मंडळाच्या महिला गोदावरीबाई हाटकर, सुशिलाबाई हाटकर, रेखाबाई हाटकर, संध्या हाटकर,रेणूकाबाई गवारे, रुखमीनबाई  हाटकर, सुलोचनाबाई हाटकर, आम्रपाली  गवारे, सुरेखा हाटकर सुमनबाई हाटकर, शशिकलाबाई हाटकर  या प्रसंगी उपस्थित होते .



विष्णुपूरी हायस्कूलच्या नवीन खोल्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न.

संपादक आशिष मुगटकर



   नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

  संस्कार-गुणवत्ता-प्रगती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विष्णुपूरी हायस्कूलच्या नवीन तीन वर्ग खोल्यांचा बांधकाम  उद्घाटन सोहळा नांदेड दक्षिणचे रयतप्रिय आमदार मा.मोहनराव मारोतराव हंबर्डे यांच्या शुभाहस्ते संपन्न झाला. 

यासमयी मा.आमदार मोहनराव हंबर्डे यांनी पायाभरणीचे श्रीफळ वाढविले आणि अत्यंत उत्साहात या सोहळ्याला मनस्वी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी त्यांच्या सोबत सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव आबासाहेब देशमुख हंबर्डे, उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे, उपसरपंच विश्वनाथराव हंबर्डे, मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर,बाबुराव हंबर्डे, माजी सरपंच शेंबोले,अनिल हंबर्डे, राजेशजी हंबर्डे, दत्ता गिरी महाराज,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, उदय हंबर्डे, एम.ए.खदीर तथा ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

 या शुभ प्रसंगी मा.आमदार यांनी प्रशालेच्या संपूर्ण संरक्षक भिंत बांधकामासाठी तात्काळ १५ लक्ष रुपयांचा निधी मान्य केला,यास्तव गावकऱ्यांनी पुनश्च मा.आ.मोहनरावजींचे विशेष आभार व्यक्त केले. शाळेच्या भौतिक विकासासाठी मी सदैव तत्पर असून सर्वोपरी मदत देण्यास तयार आहे,असे अभिवचन मा.आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी दिली.

मुदखेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

संपादक आशिष मुगटकर

रा.यु.कॉं.तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह मुदखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. धनंजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

     नुकत्याच राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे .

येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणी सुरू असून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांचे युवक संघटन वाढविण्याच्या दृष्टीनें जिल्हाभर दौरे चालू आहेत,

आज मुदखेड येथे बऱ्याच दिवसापासुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष ही पदे रीक्त आहेत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक घेऊन इच्छूकांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रीयेला सुरूवात केली आहे.

    जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता जोडून तालुक्यात युवकांची भक्कम फळी तयार करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिक उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला.

 यावेळी प्रास्ताविक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांनी केले,विधानसभा प्रभारी प्रमोद देशमुख यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.



यावेळी मुदखेड तालुका प्रभारी चंद्रकात पाटील टेकाळे,शहराध्यक्ष महंमद बुराण,विधानसभा सचिव विशाल महाजन,जिल्हा कार्यकारीणी सदस्य चक्रधर पाटील कळणे,तालुकाउपाध्यक्ष प्रदीप पाटील ढगे, विद्यार्थी आघाडीचे प्रशांत कल्याणे, आनंदा टीपरसे,गोविंदराव मुंगल,जळबाजी हाटकर,हनमंत नटूरे,भुजंग गायकवाड , माधव मुंगल,शिवाजी किरकन, पिंटू लष्करे, संतोष बोडलवाड, कोंडीबा गायकवाड,बालाजी गाढे, खडोजी चरले, तिरुपती कुदारे , कैलास गाढे,माधव राठोड ,विलास मुगल,गोविंद डोणगावकर,राम पाटील,आनंदा नटूरे, पांडू पाटील मुंगल ,बालाजी गोपाळ ,बालाजी मिरेवाड, हणमंत सूर्यवंशी,बाबाराव शिंदे , आकीत आडे ,आनंदा पाटील, ऋषिकेश पाटील,संतोष मुगल ,शिवाजी माने ,पांडूरंग गायकवाड,माधव वाडीकर ,आशिष कल्याने,जीवन,शकर गायकवाड ,परमेश्वर दरेगावकर,पवन नटूरे,लोकडेश्र्वर कराळे , गंगाधर शिंदे आणि आदींची उपस्थिति होती.कर ,पवन नटूरे,लोकडेश्र्वर कराळे , गगा धर शिंदे आणि  आदींची उपस्थिति होती.

लोकप्रिय बातम्या