नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
संस्कार-गुणवत्ता-प्रगती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विष्णुपूरी हायस्कूलच्या नवीन तीन वर्ग खोल्यांचा बांधकाम उद्घाटन सोहळा नांदेड दक्षिणचे रयतप्रिय आमदार मा.मोहनराव मारोतराव हंबर्डे यांच्या शुभाहस्ते संपन्न झाला.
यासमयी मा.आमदार मोहनराव हंबर्डे यांनी पायाभरणीचे श्रीफळ वाढविले आणि अत्यंत उत्साहात या सोहळ्याला मनस्वी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या सोबत सरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव आबासाहेब देशमुख हंबर्डे, उपाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य साहेबराव हंबर्डे, उपसरपंच विश्वनाथराव हंबर्डे, मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर,बाबुराव हंबर्डे, माजी सरपंच शेंबोले,अनिल हंबर्डे, राजेशजी हंबर्डे, दत्ता गिरी महाराज,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, उदय हंबर्डे, एम.ए.खदीर तथा ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
या शुभ प्रसंगी मा.आमदार यांनी प्रशालेच्या संपूर्ण संरक्षक भिंत बांधकामासाठी तात्काळ १५ लक्ष रुपयांचा निधी मान्य केला,यास्तव गावकऱ्यांनी पुनश्च मा.आ.मोहनरावजींचे विशेष आभार व्यक्त केले. शाळेच्या भौतिक विकासासाठी मी सदैव तत्पर असून सर्वोपरी मदत देण्यास तयार आहे,असे अभिवचन मा.आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा